Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वरुण मोहिते यांना श्रद्धांजली

र
रानरेडा
Fri, 07/12/2019 - 19:32
🗣 113 प्रतिसाद
मिपा च्या सुरुवातीपासून असलेले सदस्य वरुण मोहिते यांचे काल दुःखद निधन झाले . वरुण मित्रा तुला श्रद्धांजली, जिकडे असशील तिकडे धमालच करशील, मजेत रहा !
वर्गीकरण
श्रद्धांजली

प्रतिक्रिया द्या
68669 वाचन

💬 प्रतिसाद (113)
ग
गोरगावलेकर Sat, 07/13/2019 - 06:27 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 07/13/2019 - 06:33 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
प
प्रमोद पानसे Sat, 07/13/2019 - 06:45 नवीन
दोन स्टोरीज अर्धवट सोडल्या मी pm वर बोललो होतो त्याला.एकावेळी एकच स्टोरी संपव ... आता पुढे काय झालं कसं समजणार ? उत्कंठा वाढवुन गेला वरुण. छान माणूस होता. जवळचं कुणीतरी अचानक हुरहुर लावुन गेल्याची भावना.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sat, 07/13/2019 - 06:51 नवीन
चांगला मित्र गमावल्याचे खूपच दु:ख झाले आहे. फोनवर नेहमीच बोलणे व्हायचे. श्रद्धांजली.. :( :(
  • Log in or register to post comments
झ
झेन Sat, 07/13/2019 - 06:54 नवीन
प्रत्यक्ष परीचय नाही पण मिपावर वाचून वाटतं रांगडा, बहुआयामी, प्रामाणिक, दिलदार माणूस चटका लावून गेला. परमेश्वर घरच्यांना हा धक्का सहन करण्याची ताकद देओ.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 07/13/2019 - 07:01 नवीन
ठाणे कट्ट्याला मी आणि मुवि टेबल धरून बसलो होतो सहालाच. एकेक जण येत होता. मग जरा वेळाने वरुण'आला' असं कोणी म्हटलं. अगोदरच्या त्याच्या लेखनावरून कोणी चाळीस पन्नाशीचा माणूस असावा असा माझा अंदाज होता पण अहो मीच वरुण म्हटल्यावर विश्वास बसला नाही. एका बाजूस मुवि, खरेसाहेब, गामा पैलवान आणि पाडगावकर पतिपत्नी यांच्या गप्पा रंगलेल्या. या बाजुला वरुण, मी, सुहास झेले असा ग्रुप जमलेला. वरुणास सर्व वयाच्या लोकांशी वार्तालाप,संवाद करण्याचं सहज साधतं हे लगेच लक्षात आलं. तेवढ्या अर्ध्या तासात त्याने माझ्याशी जमवून माझी फिरकीही घेतली होती. निवडणूक निकालानंतर त्याने कर्जतजवळ फार्म हाऊसला कट्टाही ठरवला होता. तिथूनच रामबाग माथेरान ट्रेक सुरू होतो. त्याला माझ्याबरोबर ट्रेकला यायचे होते पण आणखी बरेच मिपाकर जण आले तर वरती येणार नाहीत मग आपण दोघेतरी जाऊ असं ठरलं. मी गुपचूप एकटाच जाऊन आलो हे कळल्यावर मग पावसाळ्यात जाऊ ठरलं. पण पण पण ते आता केवळ आठवणच राहील हे मला काय माहीत??
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Sat, 07/13/2019 - 07:51 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 07/13/2019 - 08:57 नवीन
सातएक वर्षं झाली असावीत - कोरम मॉलमधल्या पॉप टेट्सच्या कट्ट्यात वरुणची भेट झाली होती. गवि, रामदास, विजुभाऊ, क्लिंटन, प्रभूगुर्जी, साक्षीशेठ असे मिपाचे दिग्गज त्या कट्ट्यात होतेच; पण त्यांच्यासोबतच, वयाच्या मानाने बरीच भटकंती केलेल्या वरूणही लक्षात राहिला होता. त्याची अशी अकाली एक्झिट अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Sat, 07/13/2019 - 09:31 नवीन
आधी मला वाटलं धागा काथ्याकूट मध्ये टाकलाय म्हणजे कोणी तरी मस्करी तर नाही ना करत आहे ? ! भावपूर्ण श्रध्दांजली !
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Sat, 07/13/2019 - 11:18 नवीन
मलाही वाटलं मस्करी असेल. पण हे फारच धक्कादायक आहे। विश्वास बसत नाही. वरुणजींना भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
क
कुलदादा Sat, 07/13/2019 - 09:51 नवीन
  • Log in or register to post comments
क
कुलदादा Sat, 07/13/2019 - 09:51 नवीन
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Sat, 07/13/2019 - 10:03 नवीन
अत्यन्त धक्कादायक बातमी. त्यांचं बरचसं लेखन मिपावर वाचले आहे. एका सिद्धहस्त आणि अनुभवसमृद्ध लेखकाला मिपाकर कायमचे मुकले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 07/13/2019 - 10:19 नवीन
परिस्थिती ठीक असूनही खरे डॉक्टरांची भीती दुर्दैवाने खरी ठरली : https://www.misalpav.com/comment/885892#comment-885892 -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sat, 07/13/2019 - 10:44 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Sat, 07/13/2019 - 11:40 नवीन
अत्यंत धक्कादायक, शब्द सुचत नाहीये, खरच मिपावला दृष्ट लागलीये कुणाचीतरी.
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Sat, 07/13/2019 - 11:44 नवीन
अत्यंत धक्कादायक, शब्द सुचत नाहीये, खरच मिपावला दृष्ट लागलीये कुणाचीतरी.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 07/13/2019 - 12:13 नवीन
:( अर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर!!! :(
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 07/13/2019 - 12:22 नवीन
दोन आठवणी १. मी २ वर्षांपूर्वी इथे लिहू लागलो आणि सुरवातीस माझे 'अंतर्नाद' मधले लेख पुन्हा प्रकाशित केले. तेव्हा वरुणने ते त्या मासिकात वाचल्याची पोच दिली. असा एखादा तरुण ते मासिक वाचतोय हे कळणे हा सुखद धक्का होता. मग आम्ही व्य नितून त्या मासिकावर बोलत असू. २. १० जुलैला त्याचा माझ्या पित्तखड्यावरील लेखाला उत्साहवर्धक प्र आला. त्या लेखात काविळीचा उल्लेख आहे. ….आणि ११ ला त्याचे निधन…. छे, कसतरीच झाले. कुठल्या अवस्थेत त्याने तो वाचला असेल या कल्पनेने मला जाम अस्वस्थ झालो. असो, पुन्हा एकवार श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Sat, 07/13/2019 - 12:22 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली! _/\_
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sat, 07/13/2019 - 13:23 नवीन
फार वाईट बातमी. दोन तीनदा फोनवर बोलणे झाले होते. एक दिवस मुंबईला येऊन भेटून जातो असेही सांगितले होते. पण त्याआधीच वरुण गेला. अतिशय निराशाजनक बातमी.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 07/13/2019 - 14:23 नवीन
एक अवलिया होता वरुण, गेल्यावर्षी एक धमाल छुपा कट्टा केलेला, फक्त आम्ही दोघेच होतो...अर्ध्या तासासाठी भेटायचे ठरवून 3-4 तास गप्पा हाणत बसलेलो (मासे, चिकन होतेच) मध्येच थोडावेळ जरा उदास झालेला वाटला पण नंतर परत मूडमध्ये आला अधेमध्ये कायप्पावर मेसेज व्हायचे बोक्यानंतर आणखी एक चांगला मित्र चुटपुट लावून गेला :(
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Sat, 07/13/2019 - 15:10 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sat, 07/13/2019 - 16:00 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली..
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sat, 07/13/2019 - 17:13 नवीन
अन ३३ कोटीं पैकी कुठल्या देवावर आळ घ्यावा हे लक्षात न आल्यामुळे उगाच आपली मात्र चिडचिड होत राहते. वरुण मोहितेंना भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 07/13/2019 - 19:00 नवीन
वरूण मोहिते यांचे लिखाण वाचल्यावर त्यांच्या व्यक्तिमत्वाला इतके पैलू कसे पडले असतील याचा नेहमी विचार यायचा. प्रत्यक्ष भेटून विचारायचीही इच्छा होती. दुर्दैवाने ती आता पूर्ण होऊ शकत नाही. भावपूर्ण श्रद्धांजली! Sandy
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 07/13/2019 - 21:14 नवीन
माझा एक मित्र आजारी पडला डॉक्टर नी निष्कर्ष काढला कावीळ . मरणाच्या दारात पोचल्यावर योग्य डॉक्टर कडे पोचला निदान झाले Thyroid . औषध चालू केली दोन महिन्यात टणाटण
  • Log in or register to post comments
ट
टिवटिव Sat, 07/13/2019 - 23:47 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली..
  • Log in or register to post comments
र
रानरेडा Sun, 07/14/2019 - 06:13 नवीन
काल वमो च्या घरी गेलो होतो. बरोबर भारत मुंबईकर होते . वरुण याच्या घरी आई , आजोबा त्यांची मैत्रीण आणि इतर नातेवाईक होते . आई किमान बोलण्या इतपत सावरलेल्या दिसल्या . खरो खर काय बोलावे हे आम्हाला कळत नव्हते त्या दोघी कडून कळले त्या प्रमाणे परवा संध्याकाळच्या सुमारास प्रकृती खालावल्या सारखे वाटले , तेंव्हा त्यांना रिक्षात घालून इस्पितळात नेले , वरुण चालत रिक्षात बसला , व्यवस्थित बोलत होता . शुगर लो झाल्यासारखी वाटली म्हणून त्याने एक केक खाल्ला . इस्पितळात रक्तदाब आणि शुगर प्रचंड कमी झालेली दिसली आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली . असे वाटते कि वेदना झाल्या नसाव्या . आई व मैत्रिणी कडून मिपा चा अनेकदा उल्लेख झाला . व मो चे मिपा वर खरेच प्रेम होते . अजून काय लिहू, . आई अजून एक बोलल्या कि व मो कोठलेच पथ्य पाळत नव्हते , यात बरेच सांगून गेल्या . या दिलदार मित्रास आपल्या सर्वा तर्फे श्रद्धांजली , त्याने जे आनंदाचे क्षण दिले होते त्याची आठवण म्हणून शेवटचे जावू शकलो . त्याच्या घरी मुलुंड ला अनेकदा जायचे होते , त्याच्या बरोबर ठरवले होते पण असे जावे लागेल असे वाटले नाही !
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sun, 07/14/2019 - 17:42 नवीन
इस्पितळात रक्तदाब आणि शुगर प्रचंड कमी झालेली दिसली आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली
मी या अनुभवातून गेलो आहे, मिनिटाला खडीसाखर कडंम - कडम करून खात होतो आणि भोवताली काय चालू आहे याचे भानही येत न्हवते इंजेक्शन आणि सलाईन मिळे पर्यंत जीवात जीव न्हवता. नंतरचे नेमकं काय घडले ते आठवत नाही. शारीरिक वेदना जरी कमी असल्या तरी मनाची भीती, अनियंत्रित श्वासोश्वास व मनाची शरीराशी बांधून राहण्याची अविरत तडफड पराकोटीची अस्वस्थता निर्माण करते इतर काही विचारासाठी उसंतही देत नाही असं नक्कीच म्हणेन. रक्तदाब कमी झाल्याने जरी हृदयावर फार ताण येत नाही तरी पॅरालिसिसचा धोका असतोच खडीसाखर व पाणी हाच यावर घरगुती उपाय आहे असं अल्पमतीला वाटते बाकी वस्तुस्थिती तज्ञच जाणोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रानरेडा
र
रानरेडा Sun, 07/14/2019 - 06:14 नवीन
  • Log in or register to post comments
र
रानरेडा Sun, 07/14/2019 - 06:15 नवीन
वमो यांनी मिपा साठी बरेच काही केले होते, त्यांचा बॅनर लागावा अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 07/14/2019 - 06:39 नवीन
अनुमोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रानरेडा
च
चौथा कोनाडा Tue, 07/16/2019 - 12:44 नवीन
अनुमोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रानरेडा
म
मास्टरमाईन्ड Sun, 07/14/2019 - 06:44 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली.. प्रत्यक्ष परिचय नव्हता पण त्यांचं लेखन छान होतं. लिखाण अर्धवट सोडून गेले... आठवण येत राहील.
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे Sun, 07/14/2019 - 15:02 नवीन
श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Sun, 07/14/2019 - 17:26 नवीन
भावपुर्ण श्रद्धांजली :-(
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Mon, 07/15/2019 - 08:06 नवीन
हे प्रचंड वाईट झालंय! कुणीतरी जवळचं, खास अकाली गेल्यावर जो धक्का बसतो अगदी तसं झालंय मला....कसं शक्य आहे हे? वरुण मोहितेंशी एका धाग्यावर नुकताच संवाद झाला होता माझा...उमदं व्यक्तिमत्व!!! अतिशय हुशार आणि बुद्धिमान लेखक आणि वाचक असंच वरुण मोहितेंचं वर्णन करावं लागेल. माझं कधी प्रत्यक्ष बोलणं-भेटणं नाही झालं त्यांच्याशी पण एक सुसंस्कृत आणि व्यासंगी तरूण म्हणून त्यांची माझ्या मनात प्रतिमा होती. खूप हळहळ वाटतेय....त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 07/15/2019 - 08:52 नवीन
@ उपयोजक ,, धन्यवाद तुम्ही कैक मिपाकरांची सुप्त इच्छा नकळतपणे पूर्ण केलेली आहे .. मलापण वरुणला भेटण्याची इच्छा होती पण ती आता कायमची राहिली .. त्याचा फोटो पेस्ट करून तुम्ही त्याला श्रद्धांजली वाहण्यात मोठा हातभार लावलेला आहे ..
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 07/15/2019 - 08:55 नवीन
_/\_ वरुण मोहिते आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली :-( _/\_
  • Log in or register to post comments
स
सोनल परब Mon, 07/15/2019 - 11:10 नवीन
भावपुर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Mon, 07/15/2019 - 13:48 नवीन
वरूण मोहिते यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!! _/\_
  • Log in or register to post comments
च
चिगो Mon, 07/15/2019 - 13:59 नवीन
अरेरे.. काय हे? एवढ्या लहान वयान अकस्मात, तेपण काविळीने निधन? बरंच काही अर्धवटच राहून गेलं, मित्रा.. अत्यंत दु:खदायक आणि धक्कादायक बातमी.. भावपुर्ण श्रद्धांजली..
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 07/15/2019 - 19:08 नवीन
एकामागोमाग एक धक्कादायक बातम्या कळत आहेत मिपावर. भयानक अनपेक्षित! एक अतिशय उमद्या मनाचा माणूस गेला... वरुण मोहित्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली! वाईट झालं!
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 07/16/2019 - 02:19 नवीन
मला अजूनही खरं वाटत नाहीये. इतके दिवस प्रतिसाद लिहायची पण इच्छा होत नव्हती. प्रत्यक्ष भेट झाली नाही पण बाकी संपर्क होता. एवढ्या लहान वयात एवढे अनुभवसमृद्ध कसे याबद्दल मला कायम प्रश्न पडत आला आहे आणि हेवा सुद्धा वाटला आहे. वयापेक्षा जास्त मॅच्युरिटी होती हे तर नक्कीच आहे. आपण जे ६०-७० वर्षे जगून अनुभवणार नाही ते वमोपा एवढ्या कमी वयात अनुभवून गेले. त्यांच्या जाण्याचं दुःख तर आहेच पण ते जिथे असतील तिथेही कट्टा जमवून इतरांचे आयुष्य समृद्ध करत असतील याबद्दल खात्री आहे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 07/16/2019 - 12:43 नवीन
अत्यंत दु:खदायक आणि धक्कादायक बातमी.. भावपुर्ण श्रद्धांजली..
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 07/19/2019 - 14:55 नवीन
वरुण मोहिते यांच्या अकाली निधनाने खूप धक्का बसला व वाईट वाटले. अत्यंत अनुभवसंपन्न आयुष्य अन कसलीही भीडभाड न ठेवता स्वतःचे अनुभव थेट लिहिण्याची बेधडक वृत्ती कायम स्मरणात राहील. वरुण यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
C
charming atheist Wed, 07/24/2019 - 06:57 नवीन
कधी बोलणे झाले नाही पण नाव सतत दिसायचे. वाईट झाले ,श्रद्धांजली. एक प्रश्न,लग्न झाले होते का त्यांचे?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 07/25/2019 - 16:27 नवीन
लग्न झाले होते का त्यांचे? नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: charming atheist
न
नावातकायआहे गुरुवार, 07/25/2019 - 10:32 नवीन
! भावपूर्ण श्रध्दांजली !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा