जनातलं, मनातलं

घडता घडता घडेल ते घडेल

Primary tabs

माझा एक मित्र अरूण ढवळे जे.जे.स्कूल ऑफ आर्टस मधे डिप्लोमा घेऊन झाल्यावर एका नावाजलेल्या वर्तमानपत्रात कार्टूनीस्ट म्हणून काम करायचा. धोबीतलावला त्याचा एक स्टुडियो पण आहे. आणि बरं चाललं आहे.मी मेट्रोसिनेमा जवळ बसची वाट बघत उभा असताना आमची नजरा नजर झाली. मला त्याने बसला उभ्या राहिलेल्यांच्या रांगेत हाताला ओढून माझ्या बरोबर चल म्हणून घेऊन गेला,तो एकदम त्याच्या स्टूडियोत.
निरनीराळे फोटोझ,फ्रिहॅन्ड स्केचीस,कार्टून्स,म्युझीयम मधे ठेवण्यालायक काही आडव्या फोटो फ्रेम्स,लॅन्डस्केप्स वगैरे बघून मला बरं वाटलं.
एका गिर्‍हाईकाला पटवून झाल्यावर माझ्या बरोबर गप्पा मारायला बसला.लंच टाईम असल्याने शेजारच्या हॉटेल मधून दोन प्लेट्सची ऑर्डर देऊन आला.जुन्या आठवणीना उधाण आलं.माझ्याकडून काही गोष्टी त्याने ऐकल्यावर मी म्हणालो,
"आता तुझा जीवन प्रवास कसा झाला तो सांग"
अरूण सांगू लागला,
"माझ्या पूर्वीच्या कथा ऐकशील तर तू तोंडात बोटच घालशिल.कुठे हा माझा फोटो स्टुडियो आणि कुठे मी सुरवातीला कित्येक वर्षापूर्वी प्रयत्न केलेली आणि असफल झालेली माझी खानावळ.
कोकणात काहीच नाही जमलं तर खानावळ घालण्याचा प्रयत्न अगदीच असफल होईल असं नाही.म्हणजे मी तो धंदा काही असातसा समजत नाही.पण अन्नछत्र उघडण्याचं एक पुण्यकर्म करतो हे वाटत असताना अगदी नव्याने प्रयोग करण्यात खूप काही भांडवलाची जरूरी भासत नाही.
असाच विचार करून मी वेंगुर्ल्या जवळ उभ्यादांड्यावर एक छोटीशी खानावळ उघडली.सुनील गांवसकरचं हे मुळगांव हे तुला माहित असेलच.चिं.त्र्य. खानोलकरची पण अशीच एक खानावळ होती.आणि त्या धंद्यात त्यांच लक्ष लागत नव्हत.पण पोट्यापाण्याची सोय म्हणून करीत होते.
खानोलकरांच उदाहरण देण्याचा मतितार्थ असा की कुठे खानवळीचा धंदा आणि कुठे शेवटी महान नाटककार कथाकार म्हणून नावाजायला येणं.माझं थोडंफार तसंच झालं.त्या अयशस्वी प्रयत्नातून पुढे जे.जे स्कूल ऑफ आर्टसमधे शिकून इथे आता हा स्टुडियोच्या धंद्यात गुरफटणं."तरट्यात"काय लिहून ठेवलेलं असतं हे कळत नाही तेच बरं.
मी म्हणालो,
"तुझ्या त्या खानावळीचं काय झालं ते सांग"
अरूण म्हणाला,
"तेच सांगायचं आहे.सहा ताटं,तीन फूलपात्र असली तरी बारा लोकांची जेवायची सोय करायला कठीण वाटण्याचं काहीच कारण नाही.चहाचे कप,किंवा पितळेच्या वाट्या पाणी पिण्यासाठी,आणि केळीची पानं किंवा फणसाच्या पानाच्या पत्रावळी ताटं म्हणून वापारता येतात.एकदा एका मित्राच्या घरी पार्टी होती म्हणून चिकन तयार करण्यापूर्वी चिकन कापायला एकच सूरी होती तरी मी कात्री वापरून काम पार पाडलं होतं.मी तसा ह्या बाबतीत सुधारणावादी आहे.ही माझी वृत्ति उत्तेजन देणारी, साहसी,आव्हान देणारी आणि सृजनशील बनायला अवसर देते.
योजना आखून,निर्धारीत मार्ग पत्करून अडकून रहाण्यापेक्षा अशा तर्‍हेने काम करताना गंमतीदार गोष्टी घडायला मोका मिळतो.पदार्थ बनविण्याच्या सुची प्रमाणेच डीश बनवली पाहिजे असं नाही.मी नेहमीच एखाद्दा पदार्थात तूप आणि लसूण सुचीपेक्षा जास्तच वापरायचो.एकच दुष्परीणाम म्हणजे थोडं वजन वाढतं.

मी कुणाकडून खानावळ कशी चालवायची याचे धडे घेतले नव्हते.घडता घडता घडेल ते घडेल हीच वृत्ती ठेवली.खानावळ चालवण्याच्या स्वैर कल्पनेने मी भारावलो होतो.त्यात मी अपयशी होईन असं मला कदापी वाटलं नव्हतं.खानावळ चालू केल्यावर तसं होईल असा मला भासायला लागलं.पण त्याला उशिर झाला होता.
आणि अर्थात पैसे कमविण्याचा मुद्दा माझ्या यादीत अगदी शेवटचा होता.त्यामुळे काही तरी अद्भुत करून पाहाण्याकडे लक्ष केंद्रीत करायला मला स्वातंत्र्य मिळालं. कुठलीही गोष्ट कशी असावी ह्याचं माझ्याकडे कसलंच अनुमान नव्हतं.गाडा मी पुढे रेटीत गेलो आणि ना ना तर्‍हेच्या संभावनांचा शोध लावला,बरोबर खूप चूका पण केल्या.खरंच ह्यामुळे शिकायला मोठी संधी चालून आली.एखादी गोष्ट यशस्वी झालीच तर ठीक आहे. झालीच आहे.आणि नाहीच झाली तर मात्र मला का नाही झाली ह्याचा विचार करावा लागायचा आणि यशस्वी व्हायला नंतर कुठला दुसरा मार्ग हुडकून काढावा लागायचा.

चुका होतानाच शोध लागतात.कलिंगड खाताना चिमूट भर मीठ चोळ तेच कलिंगड किती गोड लागतं हे लक्षात येईल.विश्वास ठेव माझ्यावर.एकदा करून बघ.साखरेच्या चिमूटा ऐवजी मी चुकून मीठाची चिमूट कलिंगडाला लावली होती.
माझ्या खानावळीत वेटर म्हणून शिकलेली पोरं मी ठेवली नाहीत.ते इतकं मला महत्वाचं वाटलं नाही.जोपर्यंत गिर्‍हाईकाला काय हवंय हे ओळखणं,त्यांच्याशी चांगली वागणूक ठेवणं, आणि गिर्‍हाईकाचं समाधान होईल अशी त्याना ट्रिटमेंट देणं हे झाल्यावर वेटरला युनीफॉर्म असला पाहिजे ह्याची मी कधीच पर्वा केली नाही.त्यांचे कपडे स्वच्छ असले म्हणजे झालं.
खरं म्हणजे विचित्रताच प्रत्येकाला विपुलता आणते.

काही लोक मला म्हणाले खानावळीचा माझा धंदा अपयशी ठरला.का तर मला दिवाळखोरी करावी लागली.खरं तर मी एव्हडा धनवान-पैशाच्या दृष्टीने नव्हे- होतो की दुसरा एखादा यशस्वी खानावळवाला एव्हडं स्वपनातही आणू शकणार नाही.
माझ्या सुधारणावादावरच्या विश्वासाला माझी खानवळ बंद करून पुष्टी मिळाली.खानावळ सरळ बंद करून मी चालू पडलो.मी कसलेच प्लॅन केले नाहीत.मागे सगळं टाकून मुंबईला आलो.चित्रकला शिकलो आणि हा स्टुडियो घातला.
मला वाटतं कोणतीही गोष्ट करायला एकच मार्ग नसावा.जो मार्ग माझ्या कामाला येतो तो आता आहे तोच.पण हा उद्दा बदलू शकतो."
अरूण ढवळ्याचं हे सर्व ऐकून त्याचं एक म्हणणं पटलं की "कुणाच्या तरट्यात काय लिहून ठेवलंय कुणाष्टाऊक"

श्रीकृष्ण सामंत

रामपुरी

हल्ली आम्हाला शिर्षकावरून लेखक ओळखता येतो पण कधीकधी अंदाज चुकतो मग असे होते बाकि काही नाही. आपले चालू द्या...

श्रीकृष्ण सामंत

रामपुरी,(कपिल)
तुझ्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
"हल्ली आम्हाला शिर्षकावरून लेखक ओळखता येतो"
ह्या तुझ्याच म्हणण्यावरून तुझी फारच चांगली प्रगती आहे असं मला वाटतं.कारण
"लेखकावरून शिर्षक ओळखावं आणि मगच लेख वाचावा"
असं पण तू अलीकडेच एका माझ्या तुझ्यासारख्याच मायबाप वाचाकच्या- मृदुलच्या- माझ्या लेखाच्या त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिये वर उपदेश-कम- प्रतिक्रिया दिल्याचं मला आठवतं.

"कठीण????
प्रेषक रामपुरी ( गुरू, 10/09/2008 - 20:59) .
समजायला कठीण गेले.
तुम्ही मिसळपाव वर छापलेली प्रत्येक ओळ वाचता असे दिसते. आम्ही लेखक बघून ठरवतो. या लेखाच्या प्रतिसाद संख्येवरुन लक्षात आलं नाही का तुमच्या?
अवांतरः आत्तासुद्धा लेख वाचलेला नाही. सरळ प्रतिसादाकडे आलोय (तेही चुकुन पान उघडले म्हणून)
(ह. घ्या.)"
लेखनाचं प्रशंसन प्रतिक्रियेवर नसतं.त्या लेखाची "वाचनं"किती झाली यावर असावं.
जसं वर्तमानपत्राच्या वाचक- संख्येवर वर्तमानपत्राची प्रसिद्धी असते.
कारण प्रत्येक वाचक प्रतिक्रिया देतोच असं नाही.
पण तू म्हणतोस तसं"आत्तासुद्धा लेख वाचलेला नाही. सरळ प्रतिसादाकडे आलोय"
असे प्रतिसाद मिळायला मला तरी लेख लिहिता येत नाहीत.जे लिहित असतील त्यांच कौतूक केलं पाहिजे.

"पण कधीकधी अंदाज चुकतो मग असे होते बाकि काही नाही. आपले चालू द्या..."
अंदाज चूकायचा नसल्यास,
"लेखक आणि त्याच्या लेखाचं शिर्षक"हे दोनही वाचावं"
असा तू यापुढे सल्ला द्दावास.
म्हणजे "हे राम" म्हणावं लागणार नाही.
तू माझ्या पेक्षा लहान (वयाने) आहेस म्हणतोस तेव्हा तुला मला एक उपदेश द्दायला हरकत नाही.
एक चिनी म्हण आहे.
"खरं सांगावं पण खरं ओकूं नये"(उपदेश पण)
बाकी आमचं चालायचंच.....

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

:)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

श्रीकृष्ण सामंत

जैनाचं कार्ट,
खरं लिहायला लक्षात ठेवावं लागत नाही.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

टारझन

सामंत काकांचा विजय असो !!! ओकलेल्याला काय सभ्य धुतलाय !! आम्हाला कधी जमणार असे ? हे राम :)

लेखनाचं प्रशंसन प्रतिक्रियेवर नसतं.त्या लेखाची "वाचनं"किती झाली यावर असावं.

टाळ्या !! सोला आने सच बात !!!! सहमत आहे

--(केवळ गद्य वाचणारा)
टारझन धडेकर

रामपुरी

तत्वज्ञानाचे मुखवटे पांघरणे सोपे असते आणि ते अंगिकारणे अवघड असते. सगळ्यांनाच ते जमत नाही. एक प्रतिकूल प्रतिसाद आल्यावर बिथरणे हे त्याचेच द्योतक आहे. असो..
"असे प्रतिसाद मिळायला मला तरी लेख लिहिता येत नाहीत.जे लिहित असतील त्यांच कौतूक केलं पाहिजे."
ज्याअर्थी आपण माझा मागील प्रतिसाद लक्षात ठेवलात त्याअर्थी आपण सुद्धा प्रतिसादाला भुकेले आहात हे लक्षात येते.
'लेखनाचं प्रशंसन प्रतिक्रियेवर नसतं.त्या लेखाची वाचनं किती झाली यावर असावं.'
पान उघडणे म्हणजे वाचणे नव्हे. मी चुकून पान उघडले तरी तो वाचनातच गणला जातो.
तू माझ्या पेक्षा लहान (वयाने) आहेस म्हणतोस
असं मी कुठे म्हटलेलं माझ्यातरी स्मरणात नाही. माझी स्मरणशक्ती नाहीतरी कमकुवत झालेली आहे.
"खरं सांगावं पण खरं ओकूं नये"
याचाही अर्थ काही कळला नाही. पण "खरं" हे खरं असतं. ते सांगणे आणि ओकणे यात मलातरी फरक दिसत नाही.
जर तुम्हाला खोटाच प्रतिसाद हवा असेल तर हा घ्या.. "वा! आपले लेखन अप्रतिम असते. सुस्पष्ट विचार, सुसंगत मांडणी. सुंदर. मी आपला एकही लेख सोडत नाही."

अवांतरः आपल्यासारखा एकेरी प्रतिसाद मलाही देता आला असता पण आता या वयात माझे संस्कार मला विसरता येतील असे वाटत नाही.
आधी म्हटलेच आहे पण परत एकदा "आपले चालू द्या" आणि आता याही प्रतिसादाची अपेक्षा ठेवू नका. धन्यवाद.