Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शब्दखेळ : विरंगुळा

ह
हेमंतकुमार
Sun, 05/24/2020 - 12:15
💬 523 प्रतिसाद
शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा. 1 ऐच्छिक : 2 अपूर्णता : 3 विष्णूचे स्थान : 4 वाचा : 5भिन्नता : 6काळी तुळस : 7 सावत्र : 8धन्वंतरी : 9कायदेशीर : 10 आश्चर्य : 11गरूड : 12 समृद्धी : 13 सीता : 14 ऐश्वर्य : 15 निष्फळता : 17 शत्रू : 18 चारा : 19 संन्यासी : 20 ओसाड : 21 कुबेर : २२. चतुर्वर्णापैकी एक : 23. विष्णूभक्त : 24 निज 25 सूड उगवणे : 26 लग्नाची एक पद्धत : 27 अग्नी :

प्रतिक्रिया द्या
148937 वाचन

💬 प्रतिसाद (523)
ह
हेमंतकुमार Fri, 07/10/2020 - 11:38 नवीन
क्लासमेट्स >>> चूक कारण तुम्ही 'संजय मोने' दुसऱ्यांदा घेऊ शकत नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...
ह
हेमंतकुमार Fri, 07/10/2020 - 11:36 नवीन
आनंद इंगळे, संदीप कुलकर्णी, जयवंत वाडकर, पल्लवी पाटील, कादंबरी कदम, वेलणकर, अश्विनी भावे
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/10/2020 - 11:40 नवीन
पल्लवी पाटील, कादंबरी कदम, अश्विनी भावे असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Fri, 07/10/2020 - 11:52 नवीन

३, ६ आणि ८ अक्षरी प्रत्येकी एक चित्रपट राहिलाय.

  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/10/2020 - 17:55 नवीन
आता पहिले निम्मे तर सुटलंय, पुढचं निम्मे सोपे जायला हवे :))
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Fri, 07/10/2020 - 18:38 नवीन
संदीप-कादंबरी अजिंक्य
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 07/11/2020 - 03:29 नवीन
अजिंक्य बरोबर
  • Log in or register to post comments
आ
आवडाबाई Sat, 07/11/2020 - 07:39 नवीन
जयवंत वाडकर-पल्लवी पाटील : तू तिथे असावे अश्विनी भावे-आनंद इंगळे: आजचा दिवस माझा
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 07/11/2020 - 07:59 नवीन
बरोबर . छान. सत्यजित सर्वोत्तम . सर्वांना धन्यवाद !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 07/13/2020 - 14:13 नवीन
आता घेऊया ‘पर्यावरण’ हा विषय. खाली सहा निरर्थक वाक्ये दिलेली आहेत. त्यातील शब्दांचा क्रमही विस्कटलेला आहे. प्रत्येक वाक्यात दिलेल्या विषयाचा एक शब्द दडलेला आहे. योग्य ती अक्षरे उचलल्यावर तो तयार होईल. अशा प्रत्येक शब्दाची अक्षरसंख्या वाक्यापुढील कंसात दिली आहे. ती संबंधित वाक्याच्या शब्दसंख्येइतकी नाही. त्यामुळे अक्षरे कशी उचलायची हे तुम्ही ठरवा. असे विषयाशी संबंधित सहा शब्द तयार करा. ते झाल्यावर आणि खालीलप्रमाणे मांडल्यावर असे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल : (१ २ ३ ) असल्याने ( ४ ५ ६ ). ............................... १. सुपरिचित कापाकापीतून निरंतर चिकटवले. ( ५ अक्षरी शब्द ) २. दर्जाहीन शस्त्रोपवित उगवलेले.( ४) ३. विपरित चंद्रकोरीच्या आधारभूत पळत्याच्या दिसाकडे ( ६) ४. वजनदार दर्यावर्दीने म्हणावयाचा अपहरण (६) ५. उमजतोय कलकलाट भुसभुशीत (४) ६. हसलाकाळ ढालगज सडेतोड. (४) .
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Mon, 07/13/2020 - 15:40 नवीन
४.पर्यावरणाचा ५.समतोल ६.ढासळला
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 07/13/2020 - 16:03 नवीन
४.पर्यावरणाचा ५.समतोल >>> एक्दम बरोबर ! ढासळला >> शेवटचे अक्षर वेगळे. शेवटी वाक्य करताना सुधारता येईल.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Mon, 07/13/2020 - 16:10 नवीन
ढासळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
स
सत्यजित... Mon, 07/13/2020 - 16:13 नवीन
उर्जास्त्रोत?
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Mon, 07/13/2020 - 16:23 नवीन
पारंपरिक
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 07/13/2020 - 17:06 नवीन
उर्जास्त्रोत, पारंपरिक, ढासळतो. >>> सर्व बरोबर !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 07/14/2020 - 06:04 नवीन
हे राहिले: ३. विपरित चंद्रकोरीच्या आधारभूत पळत्याच्या दिसाकडे ( ६)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 07/14/2020 - 12:58 नवीन
३ = कोळसाधारित. पूर्ण वाक्य: पारंपरिक उर्जास्तोत कोळसाधारित असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळतो.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Tue, 07/14/2020 - 15:51 नवीन
मात्र 'संधी' असावासे वाटले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Tue, 07/14/2020 - 16:50 नवीन
हरकत नाही; तुम्ही नेहमीप्रमाणे बाजी मारलीत ! छान
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/17/2020 - 04:16 नवीन
नवा खेळ पूर्ण नव्या ढंगात ! विषय: समाज. खाली दिलेल्या ८ प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे: १. शब्दाची अक्षरसंख्या आणि २. त्या शब्दातील मूळ अक्षरांची संख्या (म्हणजे काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, जोडाक्षर, रफार,इ. असलेली सर्व अक्षरे सोडून). (उदा. ‘शासनयंत्रणा’ चा तपशील ६, २ असा असेल). सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे. ............................................................................ प्रश्न: १. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक समस्या कोणती ? ( 6, 2) २. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, 3) ३. समस्या १ वरील महत्त्वाचा उपाय कोणता ? ( 9,6 ) ४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या (आजार) ? ( 4,2 ) ५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5,1 ) . ६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सदोदित काय सहन करावे लागते ? (5, 4). ७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, 4 ). ८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, 4). ……………………………………………………………………….. येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर ....
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 07/17/2020 - 11:48 नवीन
(उदा. ‘शासनयंत्रणा’ चा तपशील ६, २ असा असेल). हे जरा अजुन समजाउन सांगाल का ? ६ समजले , २ समजले नाही
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Fri, 07/17/2020 - 12:30 नवीन
जलप्रदूषण
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/17/2020 - 12:59 नवीन
‘शासनयंत्रणा’ चा तपशील ६, २ म्हणजे : या शब्दातील एकून अक्षरे ६, त्यातील मूळ अक्षरे फक्त २ - स , न. ....... म्हणून जलप्रदूषण चूक. कारण ते ६, ४ आहे !
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Fri, 07/17/2020 - 13:03 नवीन
१.वायूप्रदूषण
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/17/2020 - 13:12 नवीन
वायूप्रदूषण नाही. हे पण चूक. विषय : समाज , हे लक्षात घ्या. पर्यावरणातली समस्या झाली. प्रश्नात विचारलेली समस्या प्रचंड मूलभूत आहे तुम्ही आम्ही आपण सगळे देखील त्या समस्येत अंतर्भूत आहोत !! गेली कित्येक वर्षे आपण येता जाता त्या समस्येचा उल्लेख करतो आणि त्यामुळे “आपले सगळे असं” असे म्हणत असतो. इतकी ती मूलभूत आहे. १ चे उत्तरा वरच खेळाचा पुढचा सगळा डोलारा उभा आहे. म्हणून ते माझ्या मनातलेच येण्यासाठी मी तुम्हाला अजून सुद्धा मदत करेन.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Fri, 07/17/2020 - 13:39 नवीन
असल्याने प्रदूषणाशी निगडीत असावे वाटले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Fri, 07/17/2020 - 13:32 नवीन
१ ची समस्या आपली आणि चीनची पण आहे. त्यांच्या राजकीय व्यवस्थेमुळे चीन त्याच्यावर कायद्याने पण नियंत्रण आणू पाहते. पण आपण खरी लोकशाही पडलो. त्यामुळे आपण त्या समस्येकडे हताशपणे बघत बसतो.... आता सोप्पे ? :))
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 07/17/2020 - 13:33 नवीन
लोकसंख्या. पण हे ६ ,२ मधे बसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
स
सत्यजित... Fri, 07/17/2020 - 13:37 नवीन
लोकसंख्यावाढ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
स
सत्यजित... Fri, 07/17/2020 - 13:43 नवीन
जंगलतोड
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 07/17/2020 - 13:46 नवीन
२. निरक्षरता ?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/17/2020 - 13:49 नवीन
१ लोकसंख्यावाढ व २. निरक्षरता बरोब्बर , छान !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/17/2020 - 13:59 नवीन
आता बघूया ३. उडी मारून पुढच्या प्रश्नाकडे जाऊ नका. ३ हे काय आहे ते तसं सोपे आहे. त्यासाठी एक वापरून वापरून गुळगुळीत झालेला सरकारी शब्द तुमच्या मनात आला असेलच. पण, त्याऐवजी कोडयासाठी एक खास लांब शब्द वापरला आहे. त्यासाठी तुम्हाला जरा ताण द्यावा लागेल !
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 07/17/2020 - 14:09 नवीन
हो, मनात "समाननागरीकायदा" हा शब्द आला होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Fri, 07/17/2020 - 14:11 नवीन
कायद्याकडे नका जाऊ, समाजशास्त्र आणि वैद्यकाच्या दृष्टीने शब्द बघा
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/17/2020 - 14:15 नवीन
Demography हा संपूर्ण कोड्याचा विषय आहे .
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 07/17/2020 - 14:49 नवीन
३. स्त्रीपुरुषसमानता. हा शब्द नक्की नाही , पण ह्याच्याशी संबंधीत आहे का ?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/17/2020 - 14:57 नवीन
म मा नाही. लोकसंख्या नियंत्रणात आणायला थेट उपाय कोणता? असा विचार करा. त्यासाठी लोकसंख्याशास्त्रातील शब्द हवा.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/17/2020 - 15:02 नवीन
१९७५च्या आणीबाणीत सक्तीने उपद्व्याप केल्याने ‘तो’ ६ अक्षरी शब्द बदनाम झाला. पुढे त्याला पर्यायी शब्द सरकारने काढला. आपल्याला ९ अक्षरी हवा आहे !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/17/2020 - 15:05 नवीन
तो ७ अक्षरी बदनाम झाला
  • Log in or register to post comments
प
पलाश Fri, 07/17/2020 - 15:21 नवीन
३ जुने बदनाम झालेले नाव : कुटुंबनियोजन नवे नाव : कुटुंबकल्याणयोजना (९/४)?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/17/2020 - 15:29 नवीन
तुमची दिशा योग्य आहे. आता ९, ६ वाला योग्य शब्द शोधा !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/17/2020 - 15:30 नवीन
'सरकारी' दृष्टीने बघण्याऐवजी 'लोकसंख्याशास्त्राचे' दृष्टीने बघा .
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/17/2020 - 16:49 नवीन
निसर्गानुसार कुठल्याही समाजात दोन घटना कायम घडत असतात. त्यांचा समतोल बिघडला की मगच लोकसंख्या वाढ होत राहते . बघा या माहितीचा काही उपयोग होतोय का !
  • Log in or register to post comments
प
पलाश Fri, 07/17/2020 - 17:42 नवीन
घटणारा मृत्युदर व तुलनेने स्थिर जन्मदर यामुळे लोकसंख्यावाढ होते. पण यासंबंधी कोड्यातला हा शब्द काही सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/17/2020 - 17:46 नवीन
ठीक आहे . सध्या ३ बाजूला ठेऊ. अन्य कोणी बघेल. कुटुंबनियोजन न केल्यास ४ व ५ समाजात उद्भवतात. त्यांची उत्तरे देऊ शकता.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Fri, 07/17/2020 - 17:50 नवीन
बेरोजगारी ?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/17/2020 - 17:54 नवीन
बेरोजगारी >>> अग्दी बरोबर !
  • Log in or register to post comments
प
पलाश Fri, 07/17/2020 - 18:10 नवीन
४. कुपोषण
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा