नक्की प्रॉब्लम काये ?
एकतर २/४ जण सोडले तर इथे कुणाशी व्यक्तिगत ओळख नाही. त्यात फक्त २ जण मला प्रत्यक्ष भेटलेत. त्यात एक माझा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि दुसर्याशी आंतरजालीय ओळख आहे.
सांगायचं कारण असं की फोकस कायम लेखनावर आहे.
कुणाशीही व्यक्तिगत मित्रत्व किंवा शत्रुत्व नाही.
____________________________________________
१. देवभोळे लोक :
जगातले ९०% लोक देवभोळे आहेत. संकेतस्थळ हा त्याच समाजाचा फोरम आहे.
देव ही मानवी कल्पना आहे आणि मेंदूपलिकडे त्याला काही अस्तित्व नाही. अस्तित्व रहस्यमय आहे पण ते स्वयंभू आहे.
थोडक्यात ते चालवणारा असा कुणी नाही.
देव ही कल्पना आहे म्हटल्यावर हे ९०% लोक खवळतात.
त्यांना वाटतं आपण इतके दिवस काय झक मारली की काय ?
पण वरकरणी ते दाखवतात की हा श्रद्धेचा प्रष्ण आहे.
श्रद्धा म्ह्टल्यावर लॉजिक खलास, विषय संपला !
वास्तविकात देव या कल्पनेमुळे मानवता अनेकानेक धर्मात विभागली गेली आहे.
आणि ती कल्पनाच धर्मविस्तार आणि परिणामी अनेक युद्धांचं कारण आहे.
अशा युद्धांमुळे मानवतेचं अतोनात नुकसान झालं आहे.
देवभोळ्यांना ही उघड गोष्ट मंजूर नाही.
आपली ती खरी श्रद्धा आणि दुसर्याची ती अंधश्रद्धा ही प्रत्येकाची धारणा आहे.
प्रत्येक धर्म ही खरं तर स्वरुपाचा उलगडा करण्याची प्रणाली आहे.
तस्मात, वरुन भिन्नता दिसली तरी धर्माचं अंतीम प्रयोजन साधकाला स्वरुपाप्रत आणणं आहे.
सांगायचं कारण असं की वरची एकही गोष्ट लक्षात न घेता देवभोळे लेखनावर तुटून पडतात.
अर्थात, कल्पनेचा वास्तविकतेपुढे काय पाड लागणार ?
परिणामी ते निरुत्तर होतात.
मग हेकेखोर, पढत मूर्ख, स्वतःला शहाणा समजणारा... अशा बिरुदावली लावल्या जातात.
थोडक्यात, जिथे फोरमवर वस्तुनिष्ठ चर्चा व्हायला हवी तिथे आखाडा तयार होतो.
____________________________________________
२. नाम, जप, परिक्रमा.........
एकदा देव ही कल्पना आहे म्हटल्यावर तदनुषंगिक सर्व गोष्टी केवळ टाईमपास होतात.
पण वर्षानुवर्षे या गोष्टीत रमलेले तंद्रीतून बाहेर पडायला राजी होत नाहीत.
इथे पोथ्याच्या पोथ्या, परिक्रमेच्या लेखमाला आणि भक्तीमार्गियांचे भावूक लेख आणि कविता टाकल्या जातात.
त्यावर भाविकांचे भावविभोर प्रतिसाद चालू होतात.
आता जरा काही वास्तववादी बोललं की येळकोट सुरु होतो.
कसा निर्माण होणार वैज्ञानिक दृष्टीकोन ?
का त्याची देशाला गरजच नाही ?
___________________________________________
३. राजकारण
सरकार ही एक सर्विस प्रोवायडर संस्था आहे.
प्रत्येक सेवा आणि वस्तुवर जनता जो कर देते त्यातून जनहीताची कामं करणं हे सरकारचं एकमेव काम आहे.
फक्त इन्कम टॅक्स भरणारे देशसेवा करतात आणि इतरांना जाब विचारण्याचा अधिकार नाही हा गैरसमज आहे.
सामान्यांचं जीवनमान उंचावलं जाणं आणि नागरिकांचं जगणं सुखाचं होणं हा सरकारच्या यशस्वीतेचा एकमेव मानक आहे.
सरकारच्या निर्णयाबद्दल चर्चा म्हणजे देशद्रोह अशी जर नागरिकांची समजूत असेल तर लोकशाहीला अर्थच उरत नाही.
पंतप्रधानासकट प्रत्येक लोकप्रतिनीधी हा जनतेचा नोकर आहे.
पगार घेत नाही म्हणून कुणीही देशाचा मालक होत नाही.
पदावर असेपर्यंत तो जनतेचा नोकर आहे आणि
सरकारच्या प्रत्येक निर्णयाचा जाब विचारायचा हक्क नागरिकांना आहे.
थोडक्यात, नेत्याला डोक्यावर घेणं गैर आहे.
सव्वाशे कोटींच्या देशात कुणाला ऐकमेव समजणं हा देशाच्या बुद्धीमत्तेचा अपमान आहे.
तस्मात, सरकारी निर्णयावर भक्त आणि विरोधक असे तट सुशिक्षितातच पडले,
तर देशाला प्रो-पब्लिक पॉलिटिक्स करणारं नेतृत्व लाभण्याची शक्यता शून्य !
______________________________________
४. अध्यात्म
सर्व चराचर, सत्यानं अंतर्बाह्य व्याप्त आहे
हा अध्यात्माचा साधा अर्थ आहे.
त्याचा व्यत्त्यास म्हणजे सत्यापरता इथे काहीही नाही.
तरीही "मी सत्य आहे" म्हटलं की......
लोक जाम पिसाटतात.
जर सर्वच सत्य आहे तर
इथला प्रत्येक जण, त्याला तो उलगडा होवो किंवा न होवो,
सत्यच आहे.
पण आपल्याला उलगडा होत नाही याचा अर्थ लोक,
आपण चुतिया आहोत असा काढतात !
मग ज्याला उलगडा झाला त्याचं काही ऐकण्यापेक्षा;
तोच कसा मूर्ख आहे हे दाखवण्याची चढाओढ लागते.
परिणामी लोकांना आपणही सत्य आहोत हे समजण्याची शक्यता मावळते.
संकेतस्थळावर अध्यात्मिक लेखनाची अशी वाट लागते म्हटल्यावर,
इथे ते लेखन बंद करण्यापरता पर्याय राहिला नाही.
______________________________________
५. स्वरुपाचा उलगडा आणि जीवनविषयीक आकलन
स्वरुपाचा उलगडा मनाच्या सर्व पैलूंचं ज्ञान आपसूक घडवतो
प्राणायाम आणि योगामुळे शारिरिक कार्यप्रणालीचं व्यावहारिक ज्ञान उपलब्ध होतं.
स्वरुपाचा उलगडा कार्यकौशल्य आणि कार्य सहज करण्याला सहाय्यभूत होतो.
परिणामी समस्येचं त्वरित आकलन आणि सोडवणूकीचा सोपा मार्ग दिसतो.
स्वरुपाचा उलगडा वक्तव्यात ठामपणा आणतो.
कोणत्याही विषयावर काहीही लिहीलं की लोक सुरु :
मीच शहाणा, मलाच सगळं कळतं, मी म्हणतो तेच खरं.....
मग अशा वेगळ्या विषयांवर चर्चा कशी होणार ?
मन हा बायोकंप्युटर नाही का ?
नवजात अर्भकाचा मेंदू ही ब्रँड न्यू हार्डडिस्क नाही का ?
त्यावर डेटा पेस्टच झाला नाही तर तो रिट्रीव कसा होईल ?
असा एकसंध डेटा पेस्ट व्हायला तो कुण्या व्यक्तीची अनफॉरमॅटेड मेमरी स्ट्रींग असायला हवी.
यालाच आपण पुनर्जन्म म्हणून सगळा विषय अगम्य करुन ठेवलायं का ?
___________________________________________________
६. व्यावसाय :
पैसा हा जीवनाचा एक महत्तम पैलू आहे.
व्यावसायिक अनुभवामुळे त्याच्या सर्वप्रकारे अभ्यास झाला आहे.
अध्यात्मामुळे पैशामागच्या सर्व मानसिकतेची उकल झाली आहे.
जुगारा पासून ते बजेटपर्यंत सगळ्या बाबींचा यथोचित विचार झाला आहे.
सांगायचं कारण असं की जे लिहीतो ते अनुभवातून आलेलं आहे
आणि सर्वांना उपयोगी व्हावं म्हणून लिहीतो.
तरीही लोक लपाछपीचे धंदे बंद होणार,
अमक्या अॅक्टमुळे दुकान बंद होणार....
जिएसटी रिटर्नस आणि सोनोग्राफीची रिटर्न्ससारखीच
तुम्हाला भरपूर वेळ दिसतो.
काल हा भास आहे तर रिटर्न्स कशाला वेळेवर भरायची ?
अशा काहीही कमेंटस मारतात.
मग मनात नसतांना बखेडा सुरु होतो.
__________________________________________
७. भग्व्दगीता :
हा ग्रंथ भारतीय अध्यात्मात मानदंड मानला गेला आहे.
पण कृष्णाचं मूळ प्रयोजन साधकांना मार्गदर्शन नसून
अर्जुनाला युद्धप्रवण करणं आहे.
त्यामुळे संसारी किंवा सामान्य साधकाला खरं तर याचा उपयोग नाही.
थोडक्यात, तो सर्वांना दिशादर्शक ठरेल असा,
अध्यात्मिक ग्रंथ नाही.
सांख्ययोगातले दोन श्लोक;
नैनं च्छिंदंती शस्त्राणी, आणि
या निशा सर्व भूतानां, सोडले तर,
सामान्य साधकाला उपयोगी होतील,
असे कोणतेही श्लोक यात नाहीत.
यातल्या कर्मयोगानं तर भारतीय मानसिकतेचा
कर्माप्रती पुरता गोंधळ उडवून दिला आहे.
फलाकांक्षारहित कर्म, इश्वरसमर्पित कर्म....
अशा अव्यवार्ह कल्पनांमुळे
बहुतेकांचा कल,
सचोटी आणि तन्मयतेनं काम करण्याऐवजी;
नाईलाज म्हणून काम आणि
शक्यतो कर्ममुक्तीकडे वळला आहे.
गीतेचे वेगवेगळे अर्थ काढण्याचं काम
भारतात गेली हजारो वर्ष चालू आहे.
या निरर्थक प्रयासाबद्दल,
जरा कुठे वस्तुनिष्ठ विचार मांडला
की गीताप्रेमी हुल्लड चालू करतात.
नक्की काय संदेश दिलायं या ग्रंथानं,
ज्यानं देशाचं भलं झालं ?
कोणती साधनाप्रणाली साधकांना स्वरुपाचा उलगडा घडवू शकली ?
यावर वस्तुनिष्ठ आणि खुल्या चर्चा,
पब्लिक फोरमवर घडायला काय हरकत आहे ?
_________________________
तर अशी सगळी परिस्थिती आहे.
मग कुणी खरडफळा रगडतोयं,
अचानक भूछत्रीसारखे ट्रोलर्स प्रकट होतायंत
ज्यांना दोन ओळी धड लिहीता येत नाही
ते मला विचारतात
तीन वर्ष झक मारली का ?
आत्मपूजा उपनिषदावर आख्खी सिरीज
मनोगतवर प्रकाशित झाली आहे.
अष्टावक्राच्या सांख्ययोगावर
लेखमाला लिहीली आहे.
निसर्गदत्त महाराजांच्या शिकवणीवर
लेख प्रकाशित झाले आहेत.
बुद्ध, ओशो, विविध ध्यान प्रणाली
यांचावर तिथे लिहीलं आहे.
कर्मयोगासारख्या रोजच्या विषयावर
लोकोपयोगी भाष्य केलंय.
विवाह, उत्सव, भय, सजगता
अशा अनेकविध विषयांवर
लेखन केलंय....
कुणी तद्दन कविता टाकतो.
कुणी भंकस लेख लिहीतो....
गप्प करणारं उत्तर दिलं की मग
वातावरण बिघडल्याचा कांगावा होतो !
काय साधतो आपण या सगळ्यातून ?
-----–---------------------–-----------------------------------
ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असल्याने आणि बरेच वैयक्तिक आणि आक्षेपार्ह प्रतिसाद वाढत असल्याने हा धागा आता वाचनमात्र करत आहोत.
-मिपा व्यवस्थापन
----------------------------------------------------------------
💬 प्रतिसाद
(222)
R
Rajesh188
Sun, 05/31/2020 - 16:41
नवीन
पुनर्जन्म वर लेखकाने व्यक्त केलेलं मत हे त्यांचे स्वतःचे मत आहे.
ते खरे आहे असे समजण्याची बाकी लोकांना गरज नाही.
फक्त त्यांच्या बुद्धीच्या क्षमतेनुसार त्यांनी तसा विचार केला आहे .
त्याला ठोस असा काहीच पुरावा देण्याची त्यांची क्षमता नाही तो फक्त विचार आहे.
मानवी मेंदू ला हार्ड डिस्क फक्त तेच म्हणू शकतात आम्ही नाही.
मानवी मेंदू फक्त माहिती साठवण्याचेच काम करत नाही तर डोळ्यांनी दिसणाऱ्या प्रतेक दृष्या चे विश्लेषण पण मेंदू करतो.
महत्वाचे साठवून ठेवणे आणि बाकी delete karne he kam pan मेंदूचं करतो.
शरीराच्या प्रत्येक क्रिया ,प्रतिक्रिया हे पण मेंदूचं करतो.
आणि अशी किती तरी काम मेंदू करतो त्या विषयी मानव प्राण्याला अजुन माहिती नाही.
हार्ड डिस्क हे सर्व कंप्युटर मध्ये करत नाही.
लेखकाची मत त्यांच्या पुरतीच सत्य आहेत.
ते काही खरे सत्य नाही.
स
संजय क्षीरसागर
Sun, 05/31/2020 - 16:58
नवीन
काम करणारी कार्यप्रणाली आहे.
डेटा स्टोरेज > रिट्रायवल > अॅप्लिकेशन ही दोहोत समानता आहे.
मेंदू हा कमालीचा बहुआयामी बायोकंप्युटर आहे.
साध्या कंप्युटरची त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही.
पुनर्जन्म हा स्मृतींशी निगडीत आहे.
तिथे : डेटा स्टोरेज > रिट्रायवल > अॅप्लिकेशन हीच प्रोसेस आहे. .
म
मामाजी
Sun, 05/31/2020 - 17:16
नवीन
संक्षी साहेब थोडे स्पष्ट बोलतो त्या बद्दल क्षमा करा.. आपल्या लिखाणावरून असे वाटते की आपले व्यक्तिमत्व हे एक गोंधळलेले व विस्कळीत अशा स्वरूपाचे असावे.
आदि शंकरचार्यांचा एक किस्सा आपल्या माहीत असेलच.. आपल्या अद्वैत मताचा प्रचार करताना त्यांनी ब्रह्म सत्य व जगन्मिथ्या हा सिद्धांत मांडला.. एकदा ते वाराणशीला आपल्या शिष्यांसह गंगेच्या घाटावर जात होते.. तेवढ्यात त्या अरूंद गल्लीत समोरून एक पिसाळलेला हत्ती येतना त्यांनी बघीतला व ते जीव वाचवण्यासाठी आपल्या शिष्यांसह विरूद्ध दिशेने धावायला लागले.. त्यांच्याकडून शास्त्रार्थात पराभूत झालेले पंडित याच संधीची वाट पहात होते.. त्यांनी लगेच टोमणा मारला आचार्य, ब्रह्म सत्य व जगन्मिथ्या या सिद्धांतानुसार समोरून येणारा हत्ती हा मिथ्या आहे आपण जागीच उभे रहा पळता कशाला.. तेंव्हा आचार्यांनी पळत पळत उत्तर दिले गजोsपी मिथ्या पलायनम् अपी मिथ्या.. ज्या दृष्टिकोनातुन आपण हत्ती मिथ्या आहे हे सांगत आहात तर त्याच दृष्टिकोनानुसार माझे पलायन हे पण मिथ्याच आहे तेव्हा काळजी नसावी..
आपल्या लिखाणा वरून मला हे जाणवले की वडाची साल पिंपळाला लाऊन ते झाड जांभळी चे नसुन आंब्याचेच आहे हे सिद्ध करण्यासारखा आपला प्रयत्न असतो..
स
संजय क्षीरसागर
Sun, 05/31/2020 - 17:33
नवीन
इथे नुकत्याच प्रकाशित झालेल्या कवितेवरचे प्रतिसाद पाहा.
तुमचा सदस्य काळ सदस्यकाळ 3 years 6 months आहे
त्या दरम्यान माझा आयडी ब्लॉक्ड होता.
तुम्ही मागे जाऊन माझ्या सर्व लेखनाचा वेध घेतलात तर तुम्हाला मुद्दा कळेल.
स
संजय क्षीरसागर
Sun, 05/31/2020 - 17:36
नवीन
या लेखावरचे शेवटचे प्रतिसाद पाहा.
L
llपुण्याचे पेशवेll
Mon, 06/01/2020 - 11:05
नवीन
ते शंकराचार्यांकडून पराभूत द्नझालेले पंडित हे बौद्ध मताचा प्रचार करणारे होते हे विषेश. ज्ञानेश्वर माऊलींचा "सर्प विंचू नारायण , परी वंदावे दूरून' हा दृष्टांत पण फार बोलका आहे.
क
कंजूस
Sun, 05/31/2020 - 18:03
नवीन
प्राब्लेम काहीच नाही. कुणी काय सांगतो याचाही नसतो कारण तिथे येणारा तीच श्रद्धा, तोच विश्वास घेऊन येतो.
कुठे?
तीर्थस्थळी.
तिथल्या एकेक कथा इथे पटणारही नाहीत पण तिथे पटलेले भाविकच येतात.
पण मिपावर वादविवाद होणारच.
'मला असे वाटते' 'अशी माझी ठाम श्रद्धा आहे' अशी दोन इंजिंने घाट चढण्याअगोदर मागे लावली की कुठेही गाडी थांबवली जात नाही.
-----------
ब्लॉग लिहिणे उत्तम. कुणी लॉगिन करून मतं मांडायच्या कॉमेंट टाकायला खटपट करत नाही.
संजय सोनवणीचे ब्लॉग - २ दशलक्ष लोकांनी वाचले!
र
रविकिरण फडके
Sun, 05/31/2020 - 18:09
नवीन
पण तो दिल्याशिवाय राहावत नाही!
देव ही माणसाची निर्मिती आहे हा गाभा असलेली दि. बा. मोकाशींची 'कल्पान्त' ही अप्रतिम सुंदर कथा आठवल्याशिवाय राहत नाही. 'आदिकथा' नामे संग्रहातील ही शेवटची कथा आहे. पहिली 'आदिकथा'. ही कथा वाचली की भारावून जातो माणूस, आणि खात्री पटते, की देव म्हणजे आपलीच आयडिया!
तर मंडळी, ज्यांना कुणाला (मराठी) साहित्यात रस असेल आणि (तरीही) हा कथासंग्रह वाचला नसेल तर विनाविलंब वाचा. नाही वाचलात तर काहीतरी महत्वाचं राहून जाईल! सध्या तरी हे पुस्तक मिळतंय. Out of print झालं की मिळायचंच नाही.
स
संजय क्षीरसागर
Sun, 05/31/2020 - 18:22
नवीन
आठवल्याशिवाय राहत नाही.
काये कथेचा सारांश ?
र
रविकिरण फडके
Sun, 05/31/2020 - 19:08
नवीन
कथा समोर नाहीये, म्हणून लिहिताना काळजी घ्यायला हवी नपेक्षा काही चुकीचं लिहून जाईन, म्हणूनही.
शंकर आणि पार्वती बसलेले असताना नारदमुनी घाईघाईने येऊन त्यांना सांगतात, अहो बघा, मानवाने काय भयंकर संहार चालविला आहे पृथ्वीवर, काही शिल्लक राहाणार नाही असं दिसतंय. मानवही शिल्लक राहाणार नाही.
मग पार्वती शंकराला घाई करते आणि ती दोघं विमानातून पाहणी करायला निघतात. सगळं काही जळून खाक झालेलं असतं पृथ्वीवर. एक माणूस म्हणून नजरेला पडत नाही. पार्वती रडकुंडीला येते. म्हणते, हिमालयाचं काय झालंय ते तरी पाहूया. ती हिमालयाची कन्या, तिला माहेरची साहजिकच काळजी. तिथेही आनंदच असतो. पार्वती काळजीत पडते. आता आपलं काय होणार, ती शंकराला विचारते. शंकर म्हणतो, आपलं काय होणार, आपल्याला माणसाने कल्पनेने निर्माण केलं, माणूसच राह्यला नाही तर आपण तरी कसे राहाणार?
कथा ह्यापुढे जे वळण घेते ते भन्नाट आहे. शंकर-पार्वती राहातात, कारण जीवन पुन्हा उभारी घेते. अनेक गोष्टी घडत घडत शेवटी पाऊस पडतो, पृथीवरची आग आग, प्रचंड उष्णता नष्ट होते, वेली पुन्हा उभारू लागतात. इथे पृथ्वीच्या सुरुवातीच्या, साडेचारशे कोटी वर्षांपूर्वीच्या, काळाचा संकेत आहे.
A very potent story, open to interpretations. म्हणून ग्रेट.
स
संजय क्षीरसागर
Sun, 05/31/2020 - 20:02
नवीन
तुम्ही सारांशही यथोचित दिलायं त्याबद्दल धन्यवाद !
मोकाशींनी असा प्रष्ण उपस्थित केलायं की देव मानव- निर्मीत की मानव देव- निर्मीत ?
_______________________
मोकाशींचा अध्यात्मिक अभ्यास कितपत होता याची कल्पना नाही.
वस्तुस्थिती अशी आहे की अस्तित्व सवयंभू आहे.
त्याचा निर्माता कुणीही नाही.
बुद्ध याला शून्यवाद म्हणतो.
तस्मात, शंकर, पार्वती, नारद या केवळ मानवी कल्पना आहेत.
असा कोणताही शंकर नाही आणि तो काहीही निर्माण करत नाही.
R
Rajesh188
Sun, 05/31/2020 - 20:56
नवीन
देव म्हणजे निर्माता असा अर्थ घ्या त्याला काही नाव देवू नका.
नाव माणसांनी दिली आहेत,
देव ही संकल्पना निर्माण करण्याची गरज का निर्माण झाली असा प्रश्न विचारला की निसर्गाचे भयंकर रूप बघून माणसाला भीती वाटायची म्हणून देव ही संकल्पना निर्माण झाली.
किंवा आजू बाजूला घडणाऱ्या घटना कश्या घडत आहेत त्या मागची कारण माहीत नसल्यामुळे देव ही संकल्पना निर्माण झाली.
अशी दोन उत्तर जे देव (निर्माता) मानत नाहीत ते देतात.
पण आता माणसाला सर्व घटना कशा घडतात हे थोडेफार माहीत आहे,बर्या पैकी निसर्गावर ताबा मिळवला आहे तरी सुधा देव ही संकल्पना अजुन सुधा बहुसंख्य लोक मानतात.
का?
पृथ्वी वर सजीव निर्मिती झाली त्याची कारण
ऑक्सिजन,पाण्याची उपलब्धता,योग्य तापमान,आणि बाकी गोष्टी ज्या इथे अस्तित्वात आहेत असे आपण विश्लेषण करतो.
पण ह्या सर्व गोष्टी ची बिलकुल गरज नसलेले जीव पृथ्वी आहेत(सुष्म जीव) वर आहेत तर बाकी ठिकाणी पण असू शकतात पण.
आपण ऑक्सिजन ,पाणी,शोधत बसलो आहे ब्रह्मांड मध्ये.
विश्व हे एका बिंदू मधून निर्माण झाले असे गृहितक सांगते पण त्या बिंदू अगोदर काय होत असे विचारले की काही नव्हत असे समजा असा प्रतिवाद केला जातो हे विज्ञान मध्ये चालत .
प्रत्यक्षात nothing मधून काहीच अस्तित्वात येत नाही हे पण विज्ञान च सांगत.
कारण काही प्रश्नांना उत्तरं नाहीत.
फक्त पृथ्वी पुरताच विचार केला तर
पृथ्वी वरची सजीव सृष्टी नियोजित पने तयार केल्यासारखी च वाटते.
प्रतेक प्राणी,वनस्पती ह्याची निर्मिती नियोजित पने केल्यासारखी आहे.
देव माणसांना निर्माण केला हे टाळ्या घेणारे वाक्य आहे.
पण देवाचे अस्तित्व,ह्या वर खूप विशाल लेखन आहे.
त्याचा प्रतिवाद एका उथळ वाक्यांनी करता येणार नाही.
किंवा जग देवांनी निर्माण केले तर देव कोणी निर्माण केले असल्या अती उथळ वाक्यांनी सुद्धा करता येणार नाही.
आणि ते लोकांना पटणार पण नाही.
स
संजय क्षीरसागर
Mon, 06/01/2020 - 05:39
नवीन
त्याच्या "द ग्रँड डिजाइन" मधे म्हटलंय :
Invoking God is not necessary to explain the origins of the universe, and that the Big Bang is a consequence of the laws of physics alone.
प
प्रसाद गोडबोले
Sun, 05/31/2020 - 18:21
नवीन
प्रश्नः नक्की प्रॉब्लेम काये ?
उत्तर : कोणाचा ? लोकांचा की संक्षींचा ?
लोकांचा प्रॉब्लेम हा आहे कि बहुतांश लोकं कधीच समान बौध्दिक , अध्यात्मिक , वैचारिक , मानसिक आणि आर्थिक पातळीला नसतात. त्यामुळे आपले लेखन सर्वानच्यच लक्षात येइल अन सगळेच कौतुक करतील ही अपेक्षाच फोल आहे. इथे लोकांना दोन वेळच्या जेवणाची चिंता भेडसावत आहे अन त्यांना तुम्ही " काळ भास आहे" असं काही सांगायला लागला की लोकंना कसे कळेल ? ते विनोदच करणार ना ? अहो इथे बहुतांश लोकांना पॅन कार्ड कसे काढायचे अन का काढायचे हे माहीत नाही अन तुम्ही त्यांना इन्कम टॅक्स रिटन वर एक्स्टेन्शन कसे फाईल करायचे सांगताय !!
आता, माझ्या तुमच्या लेखनावरुन केलेल्या काही अनुमानांच्यावरुन, तुमचा प्रॉब्लेम काय आहे ते सांगायचा प्रयत्न करतो :
१. तुमच्या लेखनाचा उद्देश कधीच क्लियर नसतो . म्हणजे की तुमचे लेखन कोणाला उद्देशुन आहे, कोणाला काय आकल्न व्हावे हे अपेक्षित आहे. तुम्हाला तुमची मते इतरांना पटवुन द्यायची आहेत की त्यांची मते खोडुन काढुन खंडन्मंडन करायचे आहे ? की तुम्हाला - " शहाणे करुन सोडावे | अवघे जन || " ह्या समर्थ उक्ती नुसार लोकांना शहाणे करुन सोडायचे आहे ? ( की तुमचे लेखन माझ्या लेखन शैली प्रमाणे स्वांन्तःसुखाय अर्थात स्वतःच्याच आनंदासाठी आहे ? :प )
अगदी ह्या लेखातही तुमचा उद्देश काय हे क्लियर नाहीये , तुम्हाला लोकांचा काय प्रॉब्लेम आहे असे विचारायचे आहे की माझे काही चुकत आहे का असे विचारायचे आहे ? एकदा स्पष्ट केले तर सगळं कसं खुप सोप्पं होऊन जाईल !
जर तुम्ही तुमचा लेखनाच्या सुरुवातीलाच उद्देश स्पष्ट केलात तर कदाचित प्रतिसादात राडा होणार नाही. (अगदी लगेच्च थांबेल असे मी म्हणत नाही, तुमचा कर्मविपाक सिध्दांतावर विश्वास नसला तरीही तुमचे मिसळपाव वरील "संचीत कर्म" काही तुमची पाठ सोडेल असे दिसत नाही, ते तुम्हाला भोगुनच संपवावे लागेल :ड)
२.तुमची मार्केटिंग स्किल्स अगदीच कमकुवत आहेत.
तुम्हाला ओशो आणि जे. कृष्णमुर्ती माहीत असतील ना, ( त्यातील कोणाचे विचार तुम्हाला पटतात अन कोण अगदीच फोल आहे हे तुर्तास सोडुन देऊ) ओशो कडे तब्बल ९१ रोल्स रॉईस होत्या हातात डायमंड चे कोट्यावधी रुपयांचे घड्याळ की काय होते जे त्यांच्या प्रत्येक प्रवचनात चकाकत असते ! जे. कृष्णमुर्तींचे लोकांना नावही माहीत नसावे . असे का ? का तर मार्केटिंग स्किल्स. !!
तुम्ही लोकांची सतत अक्कल काढत राहिलात , किंव्वा कायमच अनाकलनीय बोलत राहिलात तर तुमचा फॅन क्लब कधीच निर्माण होणार नाही ! इथे अब्राहम लिंकन ह्यांचा एक अतिषय उत्तम क्वोट आठवला - “In this age, in this country, public sentiment is everything. With it, nothing can fail; against it, nothing can succeed. Whoever molds public sentiment goes deeper than he who enacts statutes, or pronounces judicial decisions.”― Abraham Lincoln .
(बाकी माझ्या लेखनाचा उद्देश स्वतःच्याच आनंदाकरता असल्याने लोकांच्या सेंटिमेन्ट्स चा मला काहीच फरक पडत नाही. फक्त कधीकधी अगदीच बावळट लोकं दिसली की त्यांची टवाळकी उडवायला मात्र मजा येते ;) )
३. आता सर्वात शेवटी आणि सर्वात महत्वाचे : तुमचा सर्वात मोठ्ठा प्रॉब्लेम आहे की तुमच्या लक्षात येत नाहीये की हे स्थळ खाजगी आहे. आपल्या सोयीनुसार लोकांचे लेखन उडवणे , लोकांचे प्रतिसाद ऊडवणे , काही चनावाला टाईप लोकांना पाठीशी घालणे , तर काही लोकांचे आयडी उडवणे हा येथील अत्यंत बेसिक पॉलिसी आणि प्रोसेजर चा भाग आहे. मला सुरुवातीला ह्याचा फार त्रास झालेला पण नंतर लक्षात आले की
हा सारा प्रकार एकदम वैजुवयनींसारखा आहे.
जोवर दोघांना मजा येत आहे तोवर मजा घ्यायची , अधुन मधुन आपण वैजुला चापट्या मारायच्या अन अधुन मधुन ती आपल्याला प्रेमाने लव्हबाईट्स देईल , पण अगदीच वैजु वयनींच्या नवर्याला संशय यायला लागला तर थोडावेळ दुर रहायचं . संशय विरला कि परत भेटायचं . अ॑शी ही तारेवरची कसरत आहे, मजा येत आहे तोवर करत राहु, अगदीच बोअर व्हयला लागला तर आपण आपल्या मार्गाला , वैजु तिच्या मार्गाला !!
( आता वैजुवयनी कोण हे कृपया विचारु नये, तो ग्रुप बंद पडुन जमाना झाला :( )
असो.
आता तुम्ही ह्या प्रतिसादावर स्कोअर सेटलिग करणारा प्रतिसाद द्या किंवा मुद्दे पटले असा प्रतिसाद द्या किंवा कसेही ! मला काहीच फरक पडत नाही , मला प्रतिसाद टाईप करताना मजा आली म्हणुन टाईपले . आपलं सारंच स्वांतःसुखाय आहे आता !
बाकी तुम्ही बीयर पिता का? एकदा बसुन चर्चा करु !
चीअर्स !
स
संजय क्षीरसागर
Sun, 05/31/2020 - 19:07
नवीन
> इथे लोकांना दोन वेळच्या जेवणाची चिंता भेडसावत आहे ....
इथे लोक भरल्या पोटीच येतात !
> तुमच्या लेखनाचा उद्देश कधीच क्लियर नसतो ?
कोणत्याही लेखाचं ओपनिंग स्टेटमंट पाहा > उद्देश स्पष्ट लिहीलेला दिसेल.
> तुमची मार्केटिंग स्किल्स अगदीच कमकुवत आहेत.
मान्य !
अध्यात्म हा जेके आणि ओशोंचा धंदा होता.
अध्यात्म हा माझा छंद आहे.
मला त्याचा व्यावसाय करायची गरज नाही.
> In this age, in this country, public sentiment is everything......
राजकारणी पब्लिक सेंटीमेंट ओळखूनच जगतो.
अध्यात्मिक त्याला जे गवसलंय ते सांगतो.
लोकांच्या धारणा आणि भावना हाच तर उलगडा होण्यातला अडसर आहे.
> मजा येत आहे तोवर करत राहु, अगदीच बोअर व्हयला लागला तर आपण आपल्या मार्गाला , वैजु तिच्या मार्गाला !!
सौ टके की बात !
थँक्स !
च
चौकस२१२
Mon, 06/01/2020 - 01:49
नवीन
मार्कस ऑरेलियस यांचे निरीक्षणाशी मी सहमत आहे
परंतु ज्यानं उद्देशून त्यांनी लिहिलंय त्यांना यातील काही घ्यायचे नाही... कारण सर्वन्यानी आपणच आहोत हेच ब्रीद वाक्य दिसतंय...
ब
बोलघेवडा
Sun, 05/31/2020 - 18:46
नवीन
संजय सर लेख उत्तम आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही गल्ली चुकला आहात!! कोणत्या प्रेक्षकांसमोर काय सादर करायचं हे ज्याला कळतं तो खरा कलाकार.
स
संजय क्षीरसागर
Sun, 05/31/2020 - 18:54
नवीन
हे ज्याला कळतं तो खरा कलाकार.
हे कलाकाराच्या संदर्भात बरोबर आहे.
पण असा कलाकार फक्त प्रेक्षकांच्या फरमाईशी पूर्ण करत राहील.
स्वतःचं आवडतं गाणं तो कधीही गाऊ शकणार नाही.
स
सुबोध खरे
Sun, 05/31/2020 - 21:31
नवीन
तुमची मार्केटिंग स्किल्स अगदीच कमकुवत आहेत.
मान्य !
मार्कस यांचा मी शिवतीर्थावर सत्कार चारायला तयार आहे.
त्यांनी संक्षी यांच्या परिपूर्णतेतील त्रुटी शोधून काढली आणि ती संक्षी यांनी मान्य ही केली.
बजाओ टाळी
न
निनाद
Mon, 06/01/2020 - 02:02
नवीन
मी (च) बरोबर आणि जग मूर्ख आहे -
तेच तेच वैचारमैथुन
त्याचीच नशा करत बसायची आणि इतरांनीही ती नशा करायची - नशा केलीच पाहिजे, अशी मागणी करत रहायची!
स
संजय क्षीरसागर
Mon, 06/01/2020 - 05:20
नवीन
फक्त लेखन पाहा >
देवभोळे, जपजाप्यवाले, परिक्रमाबहाद्दूर....
मला नेमकं काय म्हणायचंय ते सोदाहरण सिद्ध करतील !
____________________
एखादा स्वतःच्या प्रतिसादाच्या नेमक्या लिंक्स दिल्यामुळे सैरभैर झाला असेल
पण एकूण मामला तोच !
श
शाम भागवत
Mon, 06/01/2020 - 06:03
नवीन
:)
न
नाखु
Mon, 06/01/2020 - 06:27
नवीन
मला तुमचे लेख (बहुंतांश वेळा ) सुरुवात चांगली पण शेवट नेहमीच एकटा कपूरच्या मालिकेनुसार कायम लफडी आणि त्याचे उदात्तीकरण करणाऱ्या हातखंडा वाटेवर जाणारी मालिका अशी वाटतात आली आहे.
आणि त्यानांतर कुणी असहमतीचा सूर तुमच्या लेखाखालची काढला किंवा प्रतिसादात उत्तरादाखल दाखविला कि नेमकी तुमची अवस्था नेमकी अशी होते .
गोल फिरून आपलॆच पुच्छ चावणार्या श्वानासमान ,त्याला गोचीड चावायची असते पण त्या नादात शेपटी चावली जाते मग रागाने तो अजून जोरात चावतो आणि तीच क्रिया निरंतर चालू राहते
ज
ज्ञानोबाचे पैजार
Mon, 06/01/2020 - 06:21
नवीन
खरतर वरती प्रगोंनी बैलाचा डोळा फोडला आहे, त्यांचा प्रतिसाद नीट समजला तर त्या नंतर काहिही लिहायची गरज नाही.
तुमच्या लेखनातून तुमचा व्यासंग नक्की जाणवतो, तुमच्या कडे अनेक वेगवेगळे विषय हाताळाण्याचीही क्षमता आहे. उदा एखाद्या गजलेचा आस्वादात्म्क लेख लिहावा तर तो तुम्हीच किंवा मागे एकदा तुम्ही ग्रेस वर एक लेख लिहीला होता त्या नंतर मला ग्रेस नव्याने भेटायला लागला. तुम्ही लिहिलेली "रुणुझुणु" ही लेखमाला, किंवा भय इथले संपत नाही हे लेख खरोखर वाचनिय आहेत. तुमच्या गेसाल्ट वरच्या लेखाने तर मला जगा कडे पहायचा एक नवा दृष्टीकोन मिळाला, वाटले अरे? असेही काही असू शकते ह्याचा मी कधी विचारच केला नव्हता. या नव्या दृष्टीकोनाचा मला वैयक्तीक आयुष्यात खुप फायदा झाला.
असे असताना सुद्धा तुमचा तिटकारा यायला केव्हा सुरुवात होते? तर त्याचे उत्तर तुमच्या प्रतिसादांमधे आहे. कोणी तुम्हाला प्रतिसाद दिला आणि त्यात काहि वेगळा विचार/ वेगळा दृष्टीकोन मांडायचा प्रयत्न केला की त्याला आपण असे का केले हा पश्च्याताप होईपर्यंत तुम्ही त्याची पाठ सोडत नाही.
एखाद्या नुकत्याच रांगायला लागलेल्या मुलाला जर आपण "आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे" याचा अर्थ समजावून सांगू लागलो तर त्याला तो समजणार आहे का? तो समजण्यासाठी त्याच्या बुध्दीचा आणि अनुभवविश्वाचा विस्तार होणे गरजेचे आहे. त्या नंतर त्याला तो अर्थ आपोआप उमजणारच आहे. पालक म्हणून आपले काम इतकेच की त्याला पसायदानाची ओळख करुन द्यायची आणि वाट बघत रहायचे. पण जर पसायदान समजले नाही म्हणून पालक आपल्या मुलाला निर्बुध्द किंवा मतिमंद समजून त्या पध्दतिने वागवत असतील तर हे समजल्यावर त्या मुलाला आपल्या पालकांचा आणि पसायदानाचा तिटकारा येणे स्वाभाविक आहे.
मी जर मुंबईतल्या एखाद्या मनुष्याला, ज्याने पुणे पाहिलेलेच नाही त्याला, पाषाणचा तलाव किती सुंदर आहे हे सांगू लागलो तर काही काळ त्याच्या मनात नक्की उत्सुकता निर्माण होईल पण मी जेव्हा म्हणेन "अरे पाषाणच्या तलावापुढे तुमचा समुद्र झक मारतो" तेव्हा त्याचा माझ्याकडे पहायचा दृष्टीकोन नक्की बदलेल आणि मग हळू हळू त्याच्या प्रतिक्रियाही बदलत जातील.
मुंबईला पुण्यावरुनही जाता येते, नाशिकवरुनही जाता येते आणि अहमदाबादवरुनही निघालेला मनुष्य मुंबईला पोचतोच. प्रत्येकाचा रस्ता बरोबरच असतो. पण पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आहे म्हणून नाशिकच्या मनुष्याला पुण्याला बोलवून मग मुंबईला पाठवणे व्यावहारीक नाही.
"मै जहा पे खडा रहेता हू, लाईन उधरसेही शुरु होती है" हा अॅटीट्युड सिनेमात बघायला मस्त वाटतो. पण तोच प्रयोग जर कोणी प्रत्यक्ष जीवनात आपल्यावर करायला लागले तर त्याला नैसर्गिकरित्या प्रतिकार होणारच. कारण खर्या जगात प्रत्येका मधेच एक अमिताभ दडलेला असतो.
तेव्हा तुम्हाला कळकळीची विनंती इतकीच की ही एवढी आणि एवढी एकच छोटीशी सुधारणा करता आली तर बघा..... सगळे बदलून जाईल.
या निमित्त्ताने मी आतापर्यंत अनेकवेळा अनेक ठिकाणी तुमची टवाळी केली त्या बद्दल तुमची परत एकदा क्षमा मागतो.
पण याचा अर्थ या नंतर पुन्हा कधीही टवाळी करणार नाही असा नक्कीच नाही. "क्यो की मै अपने कमजोर स्टुडंट का हाथ कभी नही छोडता"
पैजारबुवा,
ग
गवि
Mon, 06/01/2020 - 06:39
नवीन
__/\__
श
शाम भागवत
Mon, 06/01/2020 - 06:44
नवीन
प्रगोंनी छानच लिहलंय.
पैजारबुवा तुम्हीपण मस्त लिहिलंय.
थोडक्यात सांगायचे तर मी म्हणेन की,
“व्यक्ति तितक्या प्रकृती“ ही निसर्गाची योजना आहे. विविधतेतून एकता हे त्याचे सार आहे. या विविधतेचा आदर ठेवता न येणे हा एकमेव प्राब्लेम आहे. अन्यथा हा एक राजामाणूस आहे.
असो.
_/\_
श
शाम भागवत
Mon, 06/01/2020 - 06:49
नवीन
माणसाचा मीपणा वाढला की तो या विविधतेचा नकळत अनादर करायला लागतो. मीपणा जसजसा कमी होत जातो त्याप्रमाणात या विविधतेचा त्या माणसाकडून आपोआप आदर केला जाऊन, तो माणसाचा जग आदर करायला लागते.
श
शाम भागवत
Mon, 06/01/2020 - 06:50
नवीन
*त्या माणसाचा*
च
चौकस२१२
Mon, 06/01/2020 - 08:53
नवीन
पैजारबुवा आपण अगदी चपखल शब्दात मांडले आहेत विचार.. खास करून " असे असताना सुद्धा तुमचा तिटकारा यायला केव्हा सुरुवात होते? तर त्याचे उत्तर तुमच्या प्रतिसादांमधे आहे."
हे तर अगदी तंतोतंत पण त्याचा विचहर हे महाशय करतील असे वाटत नाही
स
संजय क्षीरसागर
Mon, 06/01/2020 - 12:40
नवीन
> कोणी तुम्हाला प्रतिसाद दिला आणि त्यात काहि वेगळा विचार/ वेगळा दृष्टीकोन मांडायचा प्रयत्न केला की त्याला आपण असे का केले हा पश्च्याताप होईपर्यंत तुम्ही त्याची पाठ सोडत नाही.
माझी बाजू अत्यंत प्रामाणिकपणे मांडतो,
याला प्रतिवाद समजू नका
सौंदर्य आणि बुद्धीमत्ता ही माझी दोन आकर्षणं आहेत
मग तो विशी किंवा कार्लसनचा चेस असेल,
कविच्या कल्पनेचा उत्कट अविष्कार असेल,
एखादी सुंदर धुन असेल,
ओशोंचा रुतबा असेल,
निसर्गदत्त महाराजांचं आकाशावर लिहावं असं विधान असेल,
एखादं रमणीय पर्यटन स्थळ असेल,
रसिल्या वारुणीची नशा असेल,
एखादी रसमय पाककृती असेल,
अष्टावक्राच्या प्रतिभेचा झगमगाट असेल,
उपनिषदातला सत्याचा उद्घोष असेल,
जगणं सोपं करणारं संशोधन असेल,
इथे प्रकाशित झालेली कथा किंवा कविता असेल.....
बुद्धीमत्तेचा म्हणजे गोष्टी सोप्या करणं
आणि सौंदर्य म्हणजे मन मोहून जाणं
तस्मात, कुणीही काही सोपं केलं किंवा कुठेही सौंदर्याविष्कार दिसला की
अनाहूतपणे दाद ही दिलीच जाते,
त्यात जरा ही कसूर होत नाही.
थोडक्यात, माझा प्रतिवाद हा कधीही हेकेखोरपणातून होत नाही
आयुष्य सोपं करणं आणि अभिव्यक्ती कलात्मक करणं इतकाच माझा छंद आहे
___________________________________________
उदा. काल हा भास आहे हे माझं विधान आहे
आणि ती उघड वस्तुस्थिती आहे
मी तसा जगतो आणि मनुष्यसोडता सगळे सजीव तसं जगतात
जीवनातला वेळेचा दंश काढून टाकण्याचा केलेला तो अत्यंत सोपा प्रयत्न आहे
लोकांचं जगणं मजेचं व्हावं यापलिकडे काहीही हेतू नाही
इतरांना पटल्यामुळे माझी खातरजमा होण्याचा प्रष्णच नाही,
मग लोकांना पटवून देणं याला हेकेखोरपणा कसं म्हणता येईल ?
____________________________________
तरीही तुम्ही माझे २ / ३ प्रतिसाद निदर्शनास आणून दिले
की जिथे दुसरा उघडपणे बरोबर आहे
आणि तरीही मी दुराग्रह धरलायं....
तर मला आनंद होईल आणि तुमचा आभारी होईन.
ज
ज्ञानोबाचे पैजार
Mon, 06/01/2020 - 13:04
नवीन
तुमच्याशी किंवा त्या साठी कोणाशीही प्रतिवाद करणारा मनुष्य हा बरोबर का चूक हे ठरवणे म्हणजे दोनही पार्ट्यांवर अन्याय करण्यासारखे आहे. कारण माझ्या मते चूक किंवा बरोबर या व्यक्तीसापेक्ष कल्पना आहेत. महभारतात दुर्योधनही बरोबर होता आणि धर्मराजही.
एखादी घटना किंवा कल्पना ही व्यक्तीनुरुप आणि कालानुरुप चूक किंवा बरोबर असते. काही काळापूर्वी सती जाणे हे शास्त्रसंम्मत होते पण आज ते नाही. डोक्याचा पुर्ण चकोट करुन घेउन गावभर फिरणे काही पूर्वीच्या काळी अशुभ मानले जायचे आज लॉकडाउनच्या काळात मी स्वतःच्या हातानेच स्वतःचा चकोट करुन घेतला आहे आणि भेटणारे सगळेजण माझे त्यासाठी कौतुक करत आहेत.
धर्मराजाच्या समोर जेव्हा मनुष्यवधाचा गुन्हा केलेले चार आरोपी आणले जातात तेव्हा त्यांचा गुन्हा एकाच प्रकारचा असुनही तो प्रत्येकाला वेगवगळी शिक्षा सुनावतो.
त्यामुळे क्षमा करा, तुमच्याशी प्रतिवाद करणारा मनुष्य बरोबर असे म्हणून तुम्हाला चूक म्हणणे मला शक्य होणार नाही.
मी तुम्हाला फक्त एवढेच सुचवू इच्छित होतो की समोरच्या व्यक्तीला त्याची चूक समजावुन घेण्याची संधी आपण दिली पाहिजे. पण तुमच्या समजावून सांगण्याच्या पध्दतीमधे तुमच्या अरोपीचे मानसिक खच्चीकरण होते व त्याच्यामधे सुधारणा घडवण्याची तुमची जी इच्छा असते ती पूर्ण होण्याची फार कमी शक्यता उरते.
पैजारबुवा,
स
संजय क्षीरसागर
Mon, 06/01/2020 - 13:23
नवीन
> तुमच्या समजावून सांगण्याच्या पध्दतीमधे तुमच्या अरोपीचे मानसिक खच्चीकरण होते व त्याच्यामधे सुधारणा घडवण्याची तुमची जी इच्छा असते ती पूर्ण होण्याची फार कमी शक्यता उरते.
इथून पुढे कदापीही असं होणार नाही अशी हमी देतो.
ज
ज्ञानोबाचे पैजार
Mon, 06/01/2020 - 15:52
नवीन
असे करण्याचा तुम्ही यशस्वी होणार याची मला 100% खात्री आहे,
तुमच्या पुढील लेखनाला अनेक अनेक शुभेच्छा, तुम्ही स्वांतसुखाय लिहित रहा आम्ही त्याचा आनंद घेत राहू
पैजारबुवा
क
कोंबडा
Mon, 06/01/2020 - 18:52
नवीन
संजूबाबा 0 : पैबु ३
ऑ?
ग
गवि
Mon, 06/01/2020 - 07:18
नवीन
अगदी योग्य. सुंदर.
मात्र या संकल्पनेच्या अभावामुळे किंवा तिला बोथट केल्याने (जे अवघडच आहे), युद्धं टळली असती किंवा टळतील असं वाटत नाही संक्षी.
नव्या, वेगळ्या स्वरूपात गट होणार, संघर्ष होणार. वी अनिमल्स लव्ह इट.
गम-ए-इश्क गर न होता तो गम-ए-रोजगार होता..
श
शाम भागवत
Mon, 06/01/2020 - 09:18
नवीन
हे वाक्य अर्धसत्य आहे.
धर्माचं अंतीम प्रयोजन साधकाला स्वरुपाप्रत आणणं आहे आणि त्यानंतर त्या बोधात (विचारात नव्हे) त्या साधकाने उर्वरित जीवन जगायचं आहे.
पहिल्या भागात यश मिळाल्याच्या आनंदात ह्या दुसऱ्या भागाचे विस्मरण होते. प्रत्यक्षात हा दुसरा भाग सर्वात कठीण आहे. “रात्रंदीन आम्हां युध्दाचा प्रसंग” असे तुकोबा म्हणतात ते याच भागाबद्दल म्हणतात.
साधारणत: उन्मनी साधणे हेच धेय्य समजले जाते. समाधी अवस्था हे धेय्य समजले जाते. पण उन्मनी पचली पाहिजे हे विसरले जाते. केवळ या एका गोष्टीमुळे साधनी माणसाचे पतन होत असते. निद्रेमधे जसा निवृत्त अससी। जागेपणी हो तसा ।। ही गोष्ट या भागात साधायची असते.
असे का घडते याचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की, उपासना करताना, मी व माझे संपूर्णपणे बाजूला काढून ठेवल्यावर उन्मनी अवस्था प्राप्त होते. (कोणि याला निराकार गवसला असे म्हणेल तर कोणी सत्य सापडले/गवसले असे म्हणेल. कोण काय म्हणेल हा मुद्दा येथे नाही.) तर सांगायचा मुद्दा असा की, उपासनेतून बाजूला होऊन व्यवहारात उतरताना असा साधक बाजूला काढून ठेवलेले मी व माझे परत आपल्यात सामावून धेतो आणि इथेच सारी गफलत होते.
सगळी परिस्थिती अनुकूल असताना स्वरूपाचा बोध करून घेणे ही क्रिकेटमधली नेट प्रॅक्टिस असेल तर, या बोधात उर्वरित जीवन जगणे ही प्रत्यक्ष क्रिकेटची अंतीम मॅच असते.
मी व माझे बाजूला ठेवलेला माणूस आपोआपच विविधतेचे कौतुक करायला लागतो. कारण त्या विविधतेतच तो एकता पाहायला शिकत असतो/शिकलेलाअसतो. त्यामुळे त्या विविधतेचे तो आदर करायला लागतो व आपोआप इतरांच्या आदरास पात्र होतो.
सर्व प्रकारच्या उपासनेमधे मनाची एकाग्रता साधणे हेच प्रथम शिकायचे असते. उन्मनी अवस्था प्राप्त करण्याच्या स्थितीत येईपर्यंत ही कला चांगलीच साधलेली असते. याच कलेच्या जोरावर अशा माणसाची आकलन शक्ति अफाट वाढते. त्यामुळे असा माणूस सर्वच क्षेत्रात सर्वसामान्य माणसांमध्ये उठून दिसायला लागतो. निरनिराळ्या कला, सिध्दी मिळवण्यासाठी हीच एकाग्रता व हीच आकलन क्षमता उपयोगी पडत असते. पण साधारणत: हे लक्षात न आल्याने बरेचसे साधक आपल्या भौतिक प्रगती बरोबर आपला “मी” मोठा करत नेतात व त्यातून “चांगदेव“ आकार घेतात.
हा दुसरा भाग खरेतर सापशिडीच्या खेळासारखा असतो. मिळणाऱ्या यशाची प्रत्येक गोष्ट ही सापाच्या तोंडासारखी असते, तर “कोणत्याही क्षणी झटकन साधता येणारी एकाग्रता”, ही शिडी सारखी काम करते. हे ज्याला कळेल आणि त्यानंतर वळेल, तो नक्की सापशिडीच्या पटावरील घरापर्यंत पोहोचेल हे नक्की.
आ
आनन्दा
Mon, 06/01/2020 - 09:50
नवीन
माझे एक साधे तत्व आहे, जो माणूस मला सगळे कळले म्हणतो त्याला काहीही कळलेले नाही.
अध्यात्माची सुरुवात मला काही कळत नाही या पासून होते, आणि शेवट मला खरेच काही कळत नाही इथे होतो.
सगळे कळणारा युगपुरूष शतकातून एखादा येतो, आणि त्याला आक्रस्ताळेपणा करून स्वत:ला सिद्ध करावे लागत नाही, सिद्धी त्याच्या आश्रयाने राहतात.
स
संजय क्षीरसागर
Mon, 06/01/2020 - 15:12
नवीन
उर्वरित जीवन जगायचं आहे.
> चुकीच्या अध्यात्मिक शिकवणी मुळे भारतीय मानसिकतेचा बोजवारा उडाला आहे.
अध्यात्म म्हणजे मी नाहिसा करणं नाही.
तर प्रत्येक जण ज्याला मी म्हणतो,
तो आपल्या सर्वांचा मी एकच आहे
हा उलगडा होणं !
हा मी सार्वभौम आहे
आणि तो स्थल-कालरहित असल्यानं
नाहिसा होणं अशक्य आहे.
हा सार्वभौम मीच सत्य आहे
तोच सर्व चराचर अंतर्बाह्य व्यापून आहे.
एकदा उलगडा झाल्यावर
उर्वरित जीवनात कोणताही बोध वगैरे घेऊन जगण्याची गरज उरत नाही.
हे खरं मुक्त आणि स्वातंत्र्यपूर्ण जीवन आहे
____________________________________
मी नाहिसा करण्याच्या प्रयत्नात
साधक आयुष्यभर असंभव प्रयत्न करत राहतो
कारण सार्वभौम मी अखंड आहे
तो साधकाचंच स्वरुप आहे
आणि तो नाहिसा होणं शक्य नाही
हाच तर अध्यात्माचा दावा आहे.
पण संतशिकवणीविरुद्ध कसं जाणार ?
परिणामी साधक विनम्र होण्याच्या मागे लागतो
यातून तो सर्वसमावेशक होण्याऐवजी
सर्व समन्वयक होतो !
थोडक्यात, त्याला स्वत्व रहात नाही.
सगळंच बरोबर म्हटल्यावर कशातच ठामपणा उरत नाही.
परिणामी अशा चुकीच्या अध्यात्माच्या भानगडीत न पडलेला
पाश्चात्य टॅक्सी ड्रायवर सुद्धा
आपल्या महाराजांपेक्षा ऐटबाज वाटतो !
कारण त्यानं मी नाहिसा करण्याचा घाट घातलेला नसतो.
आणि आपले महाराज मी लपवण्याच्या नादात
दिसेल त्याच्या पाया पडून ....
आपली विनम्रता दाखवत असतात.
श
शाम भागवत
Mon, 06/01/2020 - 15:33
नवीन
तुमचे विचार तुम्ही मांडले याबद्दल धन्यवाद.
_/\_
क
कानडाऊ योगेशु
Mon, 06/01/2020 - 20:17
नवीन
स्वामी नित्यानंद पण हेच तर नाही सांगत ना?
स
संजय क्षीरसागर
Mon, 06/01/2020 - 12:57
नवीन
एआर रहेमानचं सुरेख वाक्य आहे :
सगळं जग निधर्मी झालं तरी लोक दुफळी माजवायची वेगळी कारणं शोधतील !
पण दोन शक्यतांचा नक्कीच विचार होऊ शकतो
वरुन भिन्नता दिसली तरी धर्माचं अंतीम प्रयोजन साधकाला स्वरुपाप्रत आणणं आहे
या आकलनानं लोकांना धर्म हा जन्मजात नसून तो व्यक्तिगत विकल्प आहे हे कळेल
हिंदू कुराणाबद्दल उत्सुक होईल,
मुस्लीम उपनिषदाचा वेध घेईल
क्रिस्टीअन बुद्धाच्या सिंप्लीफिकेशननी मोहीत होईल
ज्यू सांख्ययोगात रस घेईल.....
कल्पना अगम्य आहे पण प्रयत्न करायला, किमान एक पाऊल टाकाला काय हरकत आहे ?
जर जग निधर्मी झालं तर लोकांना
धर्माच्या रुपात, स्वरुपाचा उलगडा करणारे अनेकानेक पर्याय दिसतील
जेवढा स्वरुपाचा उलगडा होईल तितका मनुष्य आनंदी होईल
आणि दुफळी माजवायचा विचारही तितकाच व्यर्थ होईल.
श
शाम भागवत
Mon, 06/01/2020 - 09:54
नवीन
अगदी असंच गोंदवलेकर महाराज म्हणतात.
_/\_
आ
आनन्दा
Mon, 06/01/2020 - 10:05
नवीन
वरची सगळी वाक्ये उधारीचीच आहेत :ड
च
चौकटराजा
Mon, 06/01/2020 - 09:59
नवीन
प्रत्येक प्रकारच्या सत्य संशोधनात दोन प्रकारचे फोर्सेस कारणी भूत असतात. एक मी आंधळा आहे म्हणून जग काळे दिसत आहे. किवा आता जगात खरोखरच निबीड अन्धार आहे.
जो जसा वाढलेला आहे त्यात त्याने स्वःत काही अधिक निरिक्षणे ,प्रयोग ,सिद्धता याचा अवलम्ब केला असेल तर्च तो बदलतो. एरवी त्याच्या बालपणाने त्याला जस वाढवला अहे तशीच त्याची मते बनत जातात.
माणसाच्या एकूणच वर्तणुकीवर अहन्कार व वासना ( इगो व लिबिडो) याचा फार गहरा प्रभाव असतो. या दोन्ही गोष्टी माणसाला सत्य समोर दिसत असून स्वीकारायला अटकाव करीत असतात.
देणार्या पेक्शा घेणारा खरेतर महत्वाचा असतो .जे त्याला मिळाले आहे त्याचा उपयोग तो कसा करतो हे महत्वाचे असते पण मानवी जमात नेहमी गुरू ,दाता यान्चे कवतिक करते. सहजिकच ती ज्याला ज्यामुळे जीवन मिळते त्या देवाचे कौतुक ( भक्ती ) जास्त करते अगदी एखादा मानव कितीही महामान्व असला तरी !
उपदेशापेक्षा एखादा जहरी वा अतिमन्गल अनुभव माणसात ( त्याच्या मानसात )बदल करू शकतो.
प्रत्येक प्रकारचे सत्य, त्या सत्याच्या उपयोजनावर बदलत असते .उदा. आपल्यासाठी जे चित्र असते ते फोटोशॉप सॉफ्टवेयर वाल्यासाठी पिक्सल चा सन्च असतो. जे सत्य जनरल सर्जन चे असेल तेच मायक्रो सर्जनचे असेलच असे नाही.
मानवी समाजाच्या मतांचा,सन्कल्पनान्चा आवाका त्यान्च्या मनापुरताच मर्यादित असतो. निसर्गाच्या अतिभव्य यन्त्रणेत या मनाचा आवाक्याचे स्थान नगण्य आहे. सर्व जग हे सापेक्शतेने भारावलेले आहे !
सध्या इतकेच पुरे ....
R
Rajesh188
Mon, 06/01/2020 - 10:19
नवीन
1) निर्जीव वस्तू पासून सजीव कसे निर्माण झाले.
2) सजीव चेतना कशी निर्माण झाली
3) पेशी असेल किंवा अणु त्याची रचना एवढी परफेक्ट कशी काय असते.
4) जीवनाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी कशा अस्तित्वात आल्या
5) बहु पेशिय प्राण्या ची असलेली अत्यंत गुंतागुंतीची रचना आपोआप निर्माण कशी होईल .
6) बिग बँग हे ऊर्जेचा स्फोट होता अस समजले तर त्या ऊर्जेचे स्तोत्र काय होत ह्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित च आहे.
7)मल्टी universe theory म्हणजे काय.
एक universe तयार करण्यास एवढी मोठी energy लागत असेल तर मल्टी universe theory sathi kiti प्रचंड ऊर्जा लागेल तिचा स्तोत्र (source).
काय
8) माणसाच्या मेंदूत गणित,रसायन शास्त्र,भौतिक शास्त्र समजून घेण्याची ताकत कोणी निर्माण केली.(dna,गुणसूत्र,ह्यांचे गुऱ्हाळ लावून ज्ञान चा रस काढू नका ते सर्व पटण्यासारखे नाही).
असे खूप प्रश्न आहेत त्याची उत्तर विज्ञान देवू शकत नाही.
एवढं सुव्यवस्थित निर्माण झालेलं विश्व असेच निर्माण झाले असेल ह्याला कशी प्रमाण नाही.
कोणी तरी निर्माता असलाच पाहिजे.
देव (निर्माता) नाकारणे हे विज्ञानाची गरज आहे पण त्या मुळे निर्मात्याचे अस्तित्व नाकारता येत नाही.
स
सतिश गावडे
Mon, 06/01/2020 - 10:46
नवीन
हे निर्मात्याचे अस्तित्व स्विकारले तर पुढचा प्रश्न तो निर्माता कसा अस्तित्वात आला किंवा त्याला कोणी निर्माण केले हा आहे.
श
शाम भागवत
Mon, 06/01/2020 - 10:55
नवीन
एका ओळीत सगळं जाळं तोडून मोडून की हो टाकलंत.
;)
ग
गवि
Mon, 06/01/2020 - 11:03
नवीन
आपल्या जाणिवेच्या किंवा तर्काच्या पलीकडे काहीतरी आहे हे मान्य करणे म्हणजे आस्तिकता
आणि ते संपूर्णपणे आपल्याला कधीच कळणार नाही या निष्कर्षापर्यंत येणं म्हणजे मोक्ष. मुळात अंत, शेवट, पूर्ण, अपूर्ण, संपूर्ण या संकल्पना सर्व आपल्या मेंदूच्या केवळ मर्यादा आहेत.
बाकी देव, राक्षस, ज्ञान, विज्ञान वगैरे अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. त्या अत्यंत व्यावहारिक आहेत. त्याचे उपयोग वेगळे. ते या वादात आणून काही उपयोग नाही.
स
सतिश गावडे
Mon, 06/01/2020 - 11:10
नवीन
सहमत आहे.
माझे वाक्य त्यांच्या "कोणी तरी निर्माता असलाच पाहिजे." या वाक्याच्या अनुषंगाने होते. आणि ते काय उत्तर देतात याची उत्सुकता आहे. :)
अ
अर्धवटराव
Tue, 06/02/2020 - 05:09
नवीन
त्याचा पत्ता शोधायचा म्हटलं तर जीपीएस वापरता येईल ;)
पण तत्पूर्वी "निर्मीती" नामक काहि संकल्पना शक्य आहे का याचा निकाल लागायला हवा. निर्मीकत्वाच्या संकल्पनेत जे "डेलिबरटनेस" असतं ते नेमकं उमगलं कि निर्मात्याचा शोध अवघड नाहि ;)
धागा कुठलाही असला तरी तुम्हाला बघुन हे असले प्रतिसाद उद्योग आम्हाला सुचतातच :ड इलाज नाहि.
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »