Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नक्की प्रॉब्लम काये ?

स
संजय क्षीरसागर
Sun, 05/31/2020 - 12:38
💬 222 प्रतिसाद
एकतर २/४ जण सोडले तर इथे कुणाशी व्यक्तिगत ओळख नाही. त्यात फक्त २ जण मला प्रत्यक्ष भेटलेत. त्यात एक माझा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि दुसर्‍याशी आंतरजालीय ओळख आहे. सांगायचं कारण असं की फोकस कायम लेखनावर आहे. कुणाशीही व्यक्तिगत मित्रत्व किंवा शत्रुत्व नाही. ____________________________________________ १. देवभोळे लोक : जगातले ९०% लोक देवभोळे आहेत. संकेतस्थळ हा त्याच समाजाचा फोरम आहे. देव ही मानवी कल्पना आहे आणि मेंदूपलिकडे त्याला काही अस्तित्व नाही. अस्तित्व रहस्यमय आहे पण ते स्वयंभू आहे. थोडक्यात ते चालवणारा असा कुणी नाही. देव ही कल्पना आहे म्हटल्यावर हे ९०% लोक खवळतात. त्यांना वाटतं आपण इतके दिवस काय झक मारली की काय ? पण वरकरणी ते दाखवतात की हा श्रद्धेचा प्रष्ण आहे. श्रद्धा म्ह्टल्यावर लॉजिक खलास, विषय संपला ! वास्तविकात देव या कल्पनेमुळे मानवता अनेकानेक धर्मात विभागली गेली आहे. आणि ती कल्पनाच धर्मविस्तार आणि परिणामी अनेक युद्धांचं कारण आहे. अशा युद्धांमुळे मानवतेचं अतोनात नुकसान झालं आहे. देवभोळ्यांना ही उघड गोष्ट मंजूर नाही. आपली ती खरी श्रद्धा आणि दुसर्‍याची ती अंधश्रद्धा ही प्रत्येकाची धारणा आहे. प्रत्येक धर्म ही खरं तर स्वरुपाचा उलगडा करण्याची प्रणाली आहे. तस्मात, वरुन भिन्नता दिसली तरी धर्माचं अंतीम प्रयोजन साधकाला स्वरुपाप्रत आणणं आहे. सांगायचं कारण असं की वरची एकही गोष्ट लक्षात न घेता देवभोळे लेखनावर तुटून पडतात. अर्थात, कल्पनेचा वास्तविकतेपुढे काय पाड लागणार ? परिणामी ते निरुत्तर होतात. मग हेकेखोर, पढत मूर्ख, स्वतःला शहाणा समजणारा... अशा बिरुदावली लावल्या जातात. थोडक्यात, जिथे फोरमवर वस्तुनिष्ठ चर्चा व्हायला हवी तिथे आखाडा तयार होतो. ____________________________________________ २. नाम, जप, परिक्रमा......... एकदा देव ही कल्पना आहे म्हटल्यावर तदनुषंगिक सर्व गोष्टी केवळ टाईमपास होतात. पण वर्षानुवर्षे या गोष्टीत रमलेले तंद्रीतून बाहेर पडायला राजी होत नाहीत. इथे पोथ्याच्या पोथ्या, परिक्रमेच्या लेखमाला आणि भक्तीमार्गियांचे भावूक लेख आणि कविता टाकल्या जातात. त्यावर भाविकांचे भावविभोर प्रतिसाद चालू होतात. आता जरा काही वास्तववादी बोललं की येळकोट सुरु होतो. कसा निर्माण होणार वैज्ञानिक दृष्टीकोन ? का त्याची देशाला गरजच नाही ? ___________________________________________ ३. राजकारण सरकार ही एक सर्विस प्रोवायडर संस्था आहे. प्रत्येक सेवा आणि वस्तुवर जनता जो कर देते त्यातून जनहीताची कामं करणं हे सरकारचं एकमेव काम आहे. फक्त इन्कम टॅक्स भरणारे देशसेवा करतात आणि इतरांना जाब विचारण्याचा अधिकार नाही हा गैरसमज आहे. सामान्यांचं जीवनमान उंचावलं जाणं आणि नागरिकांचं जगणं सुखाचं होणं हा सरकारच्या यशस्वीतेचा एकमेव मानक आहे. सरकारच्या निर्णयाबद्दल चर्चा म्हणजे देशद्रोह अशी जर नागरिकांची समजूत असेल तर लोकशाहीला अर्थच उरत नाही. पंतप्रधानासकट प्रत्येक लोकप्रतिनीधी हा जनतेचा नोकर आहे. पगार घेत नाही म्हणून कुणीही देशाचा मालक होत नाही. पदावर असेपर्यंत तो जनतेचा नोकर आहे आणि सरकारच्या प्रत्येक निर्णयाचा जाब विचारायचा हक्क नागरिकांना आहे. थोडक्यात, नेत्याला डोक्यावर घेणं गैर आहे. सव्वाशे कोटींच्या देशात कुणाला ऐकमेव समजणं हा देशाच्या बुद्धीमत्तेचा अपमान आहे. तस्मात, सरकारी निर्णयावर भक्त आणि विरोधक असे तट सुशिक्षितातच पडले, तर देशाला प्रो-पब्लिक पॉलिटिक्स करणारं नेतृत्व लाभण्याची शक्यता शून्य ! ______________________________________ ४. अध्यात्म सर्व चराचर, सत्यानं अंतर्बाह्य व्याप्त आहे हा अध्यात्माचा साधा अर्थ आहे. त्याचा व्यत्त्यास म्हणजे सत्यापरता इथे काहीही नाही. तरीही "मी सत्य आहे" म्हटलं की...... लोक जाम पिसाटतात. जर सर्वच सत्य आहे तर इथला प्रत्येक जण, त्याला तो उलगडा होवो किंवा न होवो, सत्यच आहे. पण आपल्याला उलगडा होत नाही याचा अर्थ लोक, आपण चुतिया आहोत असा काढतात ! मग ज्याला उलगडा झाला त्याचं काही ऐकण्यापेक्षा; तोच कसा मूर्ख आहे हे दाखवण्याची चढाओढ लागते. परिणामी लोकांना आपणही सत्य आहोत हे समजण्याची शक्यता मावळते. संकेतस्थळावर अध्यात्मिक लेखनाची अशी वाट लागते म्हटल्यावर, इथे ते लेखन बंद करण्यापरता पर्याय राहिला नाही. ______________________________________ ५. स्वरुपाचा उलगडा आणि जीवनविषयीक आकलन स्वरुपाचा उलगडा मनाच्या सर्व पैलूंचं ज्ञान आपसूक घडवतो प्राणायाम आणि योगामुळे शारिरिक कार्यप्रणालीचं व्यावहारिक ज्ञान उपलब्ध होतं. स्वरुपाचा उलगडा कार्यकौशल्य आणि कार्य सहज करण्याला सहाय्यभूत होतो. परिणामी समस्येचं त्वरित आकलन आणि सोडवणूकीचा सोपा मार्ग दिसतो. स्वरुपाचा उलगडा वक्तव्यात ठामपणा आणतो. कोणत्याही विषयावर काहीही लिहीलं की लोक सुरु : मीच शहाणा, मलाच सगळं कळतं, मी म्हणतो तेच खरं..... मग अशा वेगळ्या विषयांवर चर्चा कशी होणार ? मन हा बायोकंप्युटर नाही का ? नवजात अर्भकाचा मेंदू ही ब्रँड न्यू हार्डडिस्क नाही का ? त्यावर डेटा पेस्टच झाला नाही तर तो रिट्रीव कसा होईल ? असा एकसंध डेटा पेस्ट व्हायला तो कुण्या व्यक्तीची अनफॉरमॅटेड मेमरी स्ट्रींग असायला हवी. यालाच आपण पुनर्जन्म म्हणून सगळा विषय अगम्य करुन ठेवलायं का ? ___________________________________________________ ६. व्यावसाय : पैसा हा जीवनाचा एक महत्तम पैलू आहे. व्यावसायिक अनुभवामुळे त्याच्या सर्वप्रकारे अभ्यास झाला आहे. अध्यात्मामुळे पैशामागच्या सर्व मानसिकतेची उकल झाली आहे. जुगारा पासून ते बजेटपर्यंत सगळ्या बाबींचा यथोचित विचार झाला आहे. सांगायचं कारण असं की जे लिहीतो ते अनुभवातून आलेलं आहे आणि सर्वांना उपयोगी व्हावं म्हणून लिहीतो. तरीही लोक लपाछपीचे धंदे बंद होणार, अमक्या अ‍ॅक्टमुळे दुकान बंद होणार.... जिएसटी रिटर्नस आणि सोनोग्राफीची रिटर्न्ससारखीच तुम्हाला भरपूर वेळ दिसतो. काल हा भास आहे तर रिटर्न्स कशाला वेळेवर भरायची ? अशा काहीही कमेंटस मारतात. मग मनात नसतांना बखेडा सुरु होतो. __________________________________________ ७. भग्व्दगीता : हा ग्रंथ भारतीय अध्यात्मात मानदंड मानला गेला आहे. पण कृष्णाचं मूळ प्रयोजन साधकांना मार्गदर्शन नसून अर्जुनाला युद्धप्रवण करणं आहे. त्यामुळे संसारी किंवा सामान्य साधकाला खरं तर याचा उपयोग नाही. थोडक्यात, तो सर्वांना दिशादर्शक ठरेल असा, अध्यात्मिक ग्रंथ नाही. सांख्ययोगातले दोन श्लोक; नैनं च्छिंदंती शस्त्राणी, आणि या निशा सर्व भूतानां, सोडले तर, सामान्य साधकाला उपयोगी होतील, असे कोणतेही श्लोक यात नाहीत. यातल्या कर्मयोगानं तर भारतीय मानसिकतेचा कर्माप्रती पुरता गोंधळ उडवून दिला आहे. फलाकांक्षारहित कर्म, इश्वरसमर्पित कर्म.... अशा अव्यवार्ह कल्पनांमुळे बहुतेकांचा कल, सचोटी आणि तन्मयतेनं काम करण्याऐवजी; नाईलाज म्हणून काम आणि शक्यतो कर्ममुक्तीकडे वळला आहे. गीतेचे वेगवेगळे अर्थ काढण्याचं काम भारतात गेली हजारो वर्ष चालू आहे. या निरर्थक प्रयासाबद्दल, जरा कुठे वस्तुनिष्ठ विचार मांडला की गीताप्रेमी हुल्लड चालू करतात. नक्की काय संदेश दिलायं या ग्रंथानं, ज्यानं देशाचं भलं झालं ? कोणती साधनाप्रणाली साधकांना स्वरुपाचा उलगडा घडवू शकली ? यावर वस्तुनिष्ठ आणि खुल्या चर्चा, पब्लिक फोरमवर घडायला काय हरकत आहे ? _________________________ तर अशी सगळी परिस्थिती आहे. मग कुणी खरडफळा रगडतोयं, अचानक भूछत्रीसारखे ट्रोलर्स प्रकट होतायंत ज्यांना दोन ओळी धड लिहीता येत नाही ते मला विचारतात तीन वर्ष झक मारली का ? आत्मपूजा उपनिषदावर आख्खी सिरीज मनोगतवर प्रकाशित झाली आहे. अष्टावक्राच्या सांख्ययोगावर लेखमाला लिहीली आहे. निसर्गदत्त महाराजांच्या शिकवणीवर लेख प्रकाशित झाले आहेत. बुद्ध, ओशो, विविध ध्यान प्रणाली यांचावर तिथे लिहीलं आहे. कर्मयोगासारख्या रोजच्या विषयावर लोकोपयोगी भाष्य केलंय. विवाह, उत्सव, भय, सजगता अशा अनेकविध विषयांवर लेखन केलंय.... कुणी तद्दन कविता टाकतो. कुणी भंकस लेख लिहीतो.... गप्प करणारं उत्तर दिलं की मग वातावरण बिघडल्याचा कांगावा होतो ! काय साधतो आपण या सगळ्यातून ? -----–---------------------–----------------------------------- ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असल्याने आणि बरेच वैयक्तिक आणि आक्षेपार्ह प्रतिसाद वाढत असल्याने हा धागा आता वाचनमात्र करत आहोत. -मिपा व्यवस्थापन ----------------------------------------------------------------

प्रतिक्रिया द्या
77660 वाचन

💬 प्रतिसाद (222)
श
शाम भागवत Tue, 06/02/2020 - 13:04 नवीन
होना. तेच म्हणतोय. वाहवत जायला होतंय. :)
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 06/02/2020 - 13:10 नवीन
कसलीही काळजी करु नका. सत्य ही स्थिर अवस्था आहे. त्यापासून कुणीही आणि कधीही विचलीत होणं असंभव आहे.
↩ प्रतिसाद: शाम भागवत
स
सोत्रि Tue, 06/02/2020 - 16:57 नवीन
सत्याचा उलगडा हे कळणे आहे. सत्य पचणे हे वळणे आहे.
बरोबर! सत्याचा (निर्गुण निराकार) उलगडा होणे हे एक स्टेशन आहे. ते साध्य नाही, तो अनात्मबोध आहे. सत्य पचणे हा मुक्काम, म्हणजे निर्वीकार अवस्था! बुद्ध ह्यालाच निर्वाण (निब्बान) म्हणतो आणि पतंजली योगश्र्चित्तवृती निरोधः! - (साधक) सोकाजी
↩ प्रतिसाद: शाम भागवत
स
संजय क्षीरसागर Wed, 06/03/2020 - 07:36 नवीन
> ते साध्य नाही, तो अनात्मबोध आहे. अध्यात्मात गंतव्य-स्टेशन-गंतव्य असा प्रकार नाही एकच गोष्ट आहे उलगडा झाला किंवा नाही झाला झीरो किंवा वन. तिसरी शक्यताच नाही ! बोध पचवायला लागतो ही चुकीची धारणा आहे बोध न झालेल्यांनी पसरवलेला, तो गैरसमज आहे _______________________ अनात्मबोध म्हणजे आपण नाही हा उलगडा निर्वाण म्हणजे त्या बोधामुळे लाभलेली मुक्तता दोन्ही एकच. _________________________________ योगश्र्चित्तवृती निरोधः! योगामुळे जाणीवेचा रोख स्वतःकडे वळण्याची शक्यता निर्माण होते असा त्याचा अर्थ आहे
↩ प्रतिसाद: सोत्रि
स
सोत्रि Wed, 06/03/2020 - 11:27 नवीन
अध्यात्मात गंतव्य-स्टेशन-गंतव्य असा प्रकार नाही
हे तुमचं वैयक्तिक मत आहे आणि त्याचा आदर आहे!
निर्वाण म्हणजे त्या बोधामुळे लाभलेली मुक्तता
हेही तुमचे वैयक्तिक मत आहे आणि त्याचा आदर आहे!
योगामुळे जाणीवेचा रोख स्वतःकडे वळण्याची शक्यता निर्माण होते
हेही तुमचेच वैयक्तिक मत आहे आहे आणि त्याचा आदर आहे! - (वैयक्तिक) सोकाजी
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
शाम भागवत Tue, 06/02/2020 - 12:15 नवीन
तरीपण दोघेही बरोबरच आहेत. संक्षीजी निर्विकल्प किंवा निर्विचार स्थितीबद्दल बोलत असावेत तर सोत्रीजी, सगुण साक्षात्काराबद्दल बोलत असावेत. असो. इथेच थांबतो. वहावत जायला होतंय. मिपा काही दिवसांसाठी बंदच केला पाहिजे.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 06/02/2020 - 12:25 नवीन
सगुण म्हणजे आकार त्याचा साक्षात्कार हा कायम अनुभव असतो. आंबा दिसला काय की राम दिसला काय दोन्ही सगुणाचेच साक्षात्कार. निर्गुणाचा साक्षात्कार होत नाही, आपणच निर्गुण आहोत हा उलगडा होतो.
↩ प्रतिसाद: शाम भागवत
क
कोहंसोहं१० Tue, 06/02/2020 - 12:52 नवीन
आंबा दिसला काय की राम दिसला काय दोन्ही सगुणाचेच साक्षात्कार --------> आपणच निर्गुण आहोत हा उलगडा होतो ----> हा उलगडा कोणाला होतो? सर्वच शून्य आहे तर शून्याला जाणणारा कोण? आणि निर्गुणाचा उलगडा कसा होईल कारण उलगडा होणे हा सुद्धा एक गुणच.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 06/02/2020 - 13:06 नवीन
जाणणारा, जाणणं आणि जाणलेलं एकच आहे त्यामुळे जाणणारा असा कुणीही उरत नाही. तो ही जाणलेलंच होतो म्हणजे शून्य होतो.
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
क
कोहंसोहं१० Tue, 06/02/2020 - 13:18 नवीन
हो. त्यामुळे उलगडा झाला हे म्हणणे देखील चूकच. कारण ज्या क्षणी आपण उलगडा झाला असे म्हणाल तेंव्हा त्रिमिती किंवा द्वैत येईल. तुम्हाला दुसरे शब्द शोधावे लागतील.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 06/02/2020 - 13:51 नवीन
> त्रिमिती किंवा द्वैत येईल. तुम्हाला दुसरे शब्द शोधावे लागतील. शब्द हा केवळ निर्देश आहे. शांततेला जाणणारा शांतताच होतो तिथे शांतता, तिला जाणणारा आणी शांततेचा अनुभव अशी त्रिमिती रहात नाही. पण पुन्हा शांतता हा शब्दच आहे ! त्यामुळे समजण्यासाठी संवाद संवादासाठी भाषा आणि भाषेसाठी शब्द....कायम रहणार !
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
क
कोहंसोहं१० Tue, 06/02/2020 - 17:35 नवीन
समजण्यासाठी संवाद संवादासाठी भाषा आणि भाषेसाठी शब्द....कायम रहणार ! --> म्हणूनच योग्य शब्द वापराने महत्वाचे. तुमच्या लिखाणातून बऱ्याचदा विरोधाभासच दिसून येतो. मागे एकदा एका धाग्यावर तुमच्या प्रतिसादात तुम्ही म्हणले होते तुम्हाला प्रश्न पडत नाहीत. आणि आज मात्र प्रश्नांचाच धागा काढलात. असो
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 06/02/2020 - 21:06 नवीन
धागा मला पडलेल्या प्रश्नांचा नाही. माझ्या धाग्यांवर येणार्‍या प्रतिसादांमागची नक्की मानसिकता काय आहे ते सांगण्याचा आहे. .....आणि धाग्यावर प्रष्ण, तुम्ही विचारतायं ! > तुमच्या लिखाणातून बऱ्याचदा विरोधाभासच दिसून येतो. विरोधाभास हा वाचकाचा संभ्रम असतो. हे इथे दिलेल्या माझ्या सर्व प्रतिसातून स्पष्ट होईल.
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
क
कोहंसोहं१० Tue, 06/02/2020 - 21:45 नवीन
धागा मला पडलेल्या प्रश्नांचा नाही. माझ्या धाग्यांवर येणार्‍या प्रतिसादांमागची नक्की मानसिकता काय आहे ते सांगण्याचा आहे ----> संक्षी, कसा निर्माण होणार वैज्ञानिक दृष्टीकोन ? का त्याची देशाला गरजच नाही? असे आणि याहूनही अधिक प्रश्न तुम्हीच लेखात दिले आहेत. शेवटी 'काय साधतो आपण या सगळ्यातून ?' हेही विचारले आहे. आता हे प्रश्न नाहीत असे सांगून पुन्हा आपले हसे करून घेऊ नका. तुम्ही किती परस्परविरोधी विधाने करता हे येथे ठाऊक आहेच आणि याचमुळे अनेकदा तुम्ही मिपावर ट्रोल पण झालेला आहेत. आणि इतिहास पुन्हा रिपीट होतोय. त्यामुळे अजून वेळ घालवू इच्छित नाही कारण यावरही आपण गोल गोल प्रतिसाद छापणार हे माहिती आहे त्यामुळे थांबतो.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 06/02/2020 - 21:56 नवीन
> कसा निर्माण होणार वैज्ञानिक दृष्टीकोन ? का त्याची देशाला गरजच नाही ? ही प्रश्नार्थक विधानं आहेत ! त्याचा अर्थ वैज्ञानिक दृष्टीकोन तयार व्हायला हवा असा होतो. ________________________________ आणि माझा मुद्दा तुम्ही नेमका सोदाहरण सिद्ध केला आहे ! पहा : सगळ्या जगासमोर आपलं हसूं होतं !
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
क
कोहंसोहं१० Tue, 06/02/2020 - 16:42 नवीन
जाणणारा, जाणणं आणि जाणलेलं एकच आहे....म्हणजे शून्य होतो >>>>>>>>पुन्हा विरोधाभास. जाणणारा, जाणणं आणि जाणलेलं एकच आहे म्हणल्यावर ते शून्य होऊ शकत नाही. ते अद्वैत झाले. शून्य नाही. शंकराचार्यांनी शून्यवाद आधीच मोडून काढला आहे (त्यामुळे त्यावर पुन्हा त्यावर चर्चा करण्यात मला रस नाही)
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सोत्रि Tue, 06/02/2020 - 16:59 नवीन
शंकराचार्यांनी शून्यवाद आधीच मोडून काढला आहे
तो त्यांनी मोडून काढला म्हणजे नेमकं काय केलं? कारण शून्यावस्था ही अनुभूती आहे, ती अनुभवावी लागते. - (साधक) सोकाजी
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
क
कोहंसोहं१० Tue, 06/02/2020 - 17:43 नवीन
अनुभूती अद्वैताची. शून्याची नाही किंवा त्या अनुभूतीला शून्य म्हणता येणार नाही कारण शेवटी अनुभूती, अनुभूती घेणारा, आणि ज्याची अनुभूती घ्यायची ते सर्व एक झाले तरी ते एक शिल्लक असतेच. जे शिल्लक राहील ते शून्य नाही. ते अद्वैत. शंकराचार्यांनी हेच सान्गून शून्यमतवादाचे खंडन केले आहे.
↩ प्रतिसाद: सोत्रि
स
संजय क्षीरसागर Tue, 06/02/2020 - 22:27 नवीन
> अनुभूती अद्वैताची. शून्याची नाही किंवा त्या अनुभूतीला शून्य म्हणता येणार नाही. शंकराचार्यांचा युक्तीवाद तर्कशून्य आहे. अध्यात्माचा केंद्रबिंदू साधक आहे अनुभव नाही. शून्याच्या अनुभूतीमुळे साधक शून्य होतो. ______________________________________ > कारण शेवटी अनुभूती, अनुभूती घेणारा, आणि ज्याची अनुभूती घ्यायची ते सर्व एक झाले तरी "ते एक शिल्लक असतेच ". जे शिल्लक राहील ते शून्य नाही. ते अद्वैत. या विधानाचा अर्थ शंकराचार्यांना उलगडा झाला नसावा असा होतो. कारण "ते एक शिल्लक असतेच " ही निव्वळ कल्पना आहे. साधकाला शून्याचा उलगडा झाल्यावर तोही शून्य होतो किंवा शून्यच सर्व चराचर व्यापून होतं आपण देहात आहोत, हा आपला भ्रम होता हे त्याच्या लक्षात येतं. शून्य आणि साधक अशी दुही रहात नाही याला उपनिषदांनी अद्वैत म्हटलंय आणि बुद्ध त्यालाच शून्य म्हणतो ________________________________ शंकराचार्यांच्या युक्तीवादाचं मलाही आजपर्यंत कुतूहल होतं पण तो निरर्थक आहे.
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
क
कोहंसोहं१० Tue, 06/02/2020 - 23:02 नवीन
शून्यच सर्व चराचर व्यापून होतं ---> शून्य असेल तर ते चराचर कसा व्यापेल? ते चराचर व्यापलेला जे काही आहे त्याव्यतिरिक्त दुसरं काही नाही म्हणूनच अद्वैत हे जास्त बरोबर वाटत. कारण शून्याचा व्यापणं किंवा असणं हेच शून्य या संकल्पनेला छेद देतं. शंकराचार्यांच्या युक्तीवादाचं मलाही आजपर्यंत कुतूहल होतं पण तो निरर्थक आहे.>>>>> हे सांगितल्याबद्दल आणि माझा वेळ वाचवल्याबद्दल धन्यवाद. कारण यापुढे तुमच्याबरोबर या विषयावर चर्चा करणेही निरर्थकच आहे
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 06/02/2020 - 22:04 नवीन
कसा मोडून काढला ? शून्याचा प्रतिवाद असंभव आहे. तुम्ही शंकराचार्यांचा युक्तीवाद इथे मांडाल का ? किंवा वेगळा धागा काढा आपण शंकराचार्यांचा युक्तीवाद कितपत टिकतो ते पाहू.
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
स
संजय क्षीरसागर Tue, 06/02/2020 - 22:30 नवीन
वरच्या प्रतिसादात दाखवून दिली आहे.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
क
कोहंसोहं१० Tue, 06/02/2020 - 23:04 नवीन
वर लिहिल्याप्रमाणे तुमच्याबरोबर चर्चा करून मी माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही. तरीही शंकराचार्यांनी शून्यवादाचा खंडन कसा केलं ते वर अगदी थोडक्यात मी सांगितलं आहे. अजून माहिती असल्यास तुम्ही नेटवरून किंवा पुस्तके वाचून समजून घ्या.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 06/03/2020 - 06:34 नवीन
शंकराचार्यांचा तर्क निराधार आहे हे मी प्रतिसादात दाखवून दिलं आहे आता अधिक माहितीची मला तरी आवश्यकता नाही.
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 06/02/2020 - 20:12 नवीन
Image removed.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 06/02/2020 - 13:01 नवीन
> मिपा काही दिवसांसाठी बंदच केला पाहिजे. ते धारणांचं निस्सरण आहे. एकदा सर्व धारणा संपल्या की समोर सदैव उभा ठाकलेला निर्गुण दिसेल. तरी येत रहा.
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Tue, 06/02/2020 - 13:12 नवीन
हो. तो निराकार नामस्मरणातून कसा प्राप्त होतो. प्राप्त झाला तरी आपण काही त्यासाठी काही केले आहे असे न वाटल्याने कृपाभाव निर्माण होऊन कृतज्ञता कशी निर्माण होते. हे सगळे माझे तुम्हाला १० वर्षांपूर्वीच गिता दातारांच्या धाग्यावर मनोगतावर सांगून झालंय. म्हणूनच मी मला सारखे बजावतोय की बाबारे आता थांब. सत्याचे आकलन झाल्यावर लोकेषणा पचवणे जड असते. आता तोच त्रास मला होतोय. मी थांबतोय.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 06/02/2020 - 14:22 नवीन
सत्याचं आकलन झाल्यावर लोकेषणा उरत नाही. जे आपल्याला समजलंय, तो आनंद वाटून टाकावासा वाटतो ! > आता तोच त्रास मला होतोय. मी थांबतोय. तुमची इच्छा. पण त्रास धारणा निसटण्याचा होतो. जी शांतता ढळतेयं असं वाटतं तो वैचारिक कोलाहल असतो. शांततेचा कसा त्रास होईल ? ते तर आपलं स्वरुप आहे.
↩ प्रतिसाद: शाम भागवत
स
सोत्रि Tue, 06/02/2020 - 16:36 नवीन
मान्य! कारण उलगडा सत्याचाच होतो आणि सत्य एकच आणि अंतिम आहे!! मला तो उलगडा होण्याच्या मार्गाबद्दल आणि प्रक्रियेबद्दल म्हणायचं होतं. व्यक्ति तितक्या प्रवृत्ती. त्यामुळेच ज्ञानयोग, कर्मयोग आणी भक्तीयोग हे वेगवेगळे मार्ग आहेत सत्याचा शोध घेण्याचे. प्रत्येकाच्या आकलनशक्तीप्रमाणे ज्याने त्याने जमेल तो मार्ग अनुसरायचा आहे. त्या त्या मार्गावर येणारे अनुभाव (सत्याचा उलगडा होईपर्यंत, कारण तो एकदा झाला की सगळं शून्य आहे हा बोध झालेला असतो.) हे वैयक्तिक असतात आणी त्याचे दुसर्‍याने मूल्यमापन करणे योग्य नाही असं मला म्हणायचं होतं. - (साधक) सोकाजी
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
क
कानडाऊ योगेशु Tue, 06/02/2020 - 07:57 नवीन
जबरदस्त प्रतिसाद आहे.अर्धवटराव दंडवत स्वीकारा.
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
क
कंजूस Tue, 06/02/2020 - 11:02 नवीन
संजय क्षीरसागर क्राउड पुलर.
क
कोहंसोहं१० Tue, 06/02/2020 - 12:58 नवीन
जर परमहंसाना काली दिसते आणि खरी वाटते तर हनुमानाला राम का दिसतो आणि तितकाच का खरा वाटतो ? तुकारामांना विठ्ठल भेटतो तर त्यांना राम का दर्शन देत नाही ? महाप्रभूंना कृष्ण भेटतो तेंव्हा काली कुठे गेलेली असते ? ---------> याचे उत्तर श्रीकृष्णांनी गीतेत दिले आहे. श्रीकृष्ण म्हणतात जो मला ज्या रूपात/भावात पुजतो त्याला मी त्या रूपात किंवा भावात दर्शन देतो. मग भक्तमंडळी समन्वयाचा मार्ग शोधतात ते म्हणतात काली म्हणजे राम आणि राम म्हणजे विठ्ठल आणि कृष्ण म्हणजेच काली ! कशाला हवा हा कल्पनेचा गुंता ? --------> हे कल्पना आणि हा गुंता आपल्यासाठी असेल. त्यांच्यासाठी ते सत्य होते. आणि आहेच. निर्गुण असले म्हणून सांगून असूच नये असे आपले म्हणणे आहे. द्विरुक्तीचा दोष पत्करून पुन्हा लिहितो- "एकच मनुष्य पण नात्यामध्ये कोणाचा मुलगा असतो, कोणाचा भाऊ, कोणाचे वडील, तर कोणाचा मित्र पण शेवटी माणूस म्हणून एकच. जरी माणूस एकच असला तरी व्यवहाराच्या दृष्टीने तो वेगवेगळ्या नात्यांमध्ये पण बांधला गेला आहे आणि त्या अनुरूप जाणला जातो तसेच देव आणि ब्रह्मन यांचे आहे. त्यामुळे तुम्ही जो दृष्टिकोन ठेवता त्यावर अवलंबून पण त्याचा अर्थ दुसरा दृष्टिकोन चुकीचा आहे असे समजणे हे चुकीचे. हा एकांगी विचार झाला."
स
संजय क्षीरसागर Tue, 06/02/2020 - 14:05 नवीन
परमहंसांची गोष्ट आहे. तोतापुरी त्यांचाकडे आले तेंव्हा परमहंस कालीपूजेत दंग होते. त्यांना साक्षात काली दिसायची आणि ते तिच्याशी बोलायचे सुद्धा ! तोतापुरी त्यांना म्हणाले तू त्या कालीला संपव ! त्याशिवाय तुला गती नाही. परमहंस अवाक झाले काली त्यांचं परम दैवत आणि तिला संपवणं म्हणजे प्राणघात ! परमहंस म्हणाले कालीला विचारतो. तोतापुरी म्हणाले, तू काहीही कर. ती फक्त तुला दिसायला लागली की हात वर कर. परमहंस ध्यानस्थ झाले. काली डोळ्यासमोर आल्यावर त्यांनी हात उचलला.. तत्क्षणी तोतापुरींनी एका धारदार शस्त्रानी त्यांच्या आज्ञाचक्रावर वार केला ! तदनंतर परमहंसांना साक्षात्कार झाला म्हणजे डोळ्यासमोर असलेला निराकार; जो काली सारखा अडवत होती, तो दिसला ! असं सांगतात. म्हणजे आधी काल्पनिक देव निर्माण करा आणि मग तो खलास करा ! ____________________________ कशाला पाहिजेत इतक्या भानगडी ?
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
क
कोहंसोहं१० Tue, 06/02/2020 - 16:39 नवीन
छान. पण तुम्ही अर्धवट गोष्ट सांगितली. मला प्रतिसाद देताना त्यापुढील कथा अभिप्रेत होती. तुम्ही कदाचित ती विसरलात किंवा सोयीस्करपणे टाळलीत. - तोतापुरी महाराज हे अद्वैताचे खंदे पुरस्कर्ते आणि ते कालीला मानीत नसत. रामकृष्णांनी बरेच समजावून पहिले परंतु त्यांच्यामध्ये फरक पडला नाही. शेवटी कालीमातेने एक लीला रचली आणि तोतापुरींना पोटदुखीचा त्रास सुरु झाला आणि अनंत यातना होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना ध्यान देखील नीट लावता येत नसे. शेवटी तो त्रास सहन करण्यापेक्षा तोतापुरी यांनी देह सोडायचे ठरवले आणि जलसमाधीसाठी नदीमध्ये गेले तेंव्हा चमत्कार झाला आणि नदीच्या पाण्याची पातळी गुडघ्यापेक्षाही खाली आली. नदीपात्रात जेथे गेले तेथे हेच झाले. त्यांना साधी जलसमाधीपण घेता येईना. शेवटी नाईलाजाने परत आले तेंव्हा रामकृष्णांनी त्यांना एकदा दुखण्याबद्दल कालीमातेला विनंती करून पाहायला सांगितले. शेवटचा उपाय म्हणून नाईलाजाने तोतापुरींनी कालीमातेला विनंती केली आणि कालीमातेने विनंती स्वीकार करून आशीर्वाद दिला आणि पोटदुखीचा त्रास संपवला. त्यानंतर तोतापुरींनी कालीमातेचे अस्तित्व मान्य केले आणि तेथून प्रयाण केले. थोडक्यात काय तर सत्य एकच आहे यात दुमत किंवा वाद नाही परंतु त्याच सत्याचा नाम रूपात्मक स्वरूप हा भास आहे हे मानणे चुकीचे. तो भास नसून अभिव्यक्ती आहे. एकं सत विप्रा बहुदा वदन्ति कशाला पाहिजेत इतक्या भानगडी ?----> या भानगडी आहेत हा तुमचा दृष्टिकोन. बाकीच्यांसाठी तो त्या सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. या मार्गावरून अनेकजण गेले आहेत आणि सत्यस्वरूप जाणले आहे. याला तुम्ही भानगडी भास म्हणणे म्हणजे नाण्याची एक बाजू पाहून दुसरी नाहीच असे म्हणणे आहे. बाकी माझ्या काही सरळ प्रश्नाची उत्तरे तुम्ही द्याल हि अपेक्षा होती. चुकून दुर्लक्ष झाले असल्यास पुन्हा देतो: आता ज्या शून्याचा साक्षात्कार, किंवा सत्य गवसले वगैरे जे आपण म्हणालात तो शंकराचार्यांना, रामकृष्ण परमहंसांना, ज्ञानेश्वरांना झाला होता असे आपल्याला वाटते का? असल्यास तो होऊनही शंकराचार्यांनी १०० किंवा आधी देवीदेवतांची स्तोत्रे का बरे रचली असावीत? रामकृष्ण परमहंसांनी देह असेपर्यंत कालीमातेचे पूजा का बरे केली असावी? ज्ञानेश्वरांनी हरिपाठ का बरे सांगितलं असेल असे आपल्याला वाटते?
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 06/02/2020 - 21:35 नवीन
१. > आणि पोटदुखीचा त्रास संपवला ! २. >जलसमाधीसाठी नदीमध्ये गेले तेंव्हा चमत्कार झाला आणि नदीच्या पाण्याची पातळी गुडघ्यापेक्षाही खाली आली. नदीपात्रात जेथे गेले तेथे हेच झाले. त्यांना साधी जलसमाधीपण घेता येईना. शेवटी नाईलाजाने परत आले ! ३. > त्यानंतर तोतापुरींनी कालीमातेचे अस्तित्व मान्य केले आणि तेथून प्रयाण केले. ____________________________ देव या कल्पनेचा बाजा वाजू नये म्हणून भक्तांनी लावलेल्या या सगळ्या पश्चात स्टोर्‍या आहेत ! __________________________ तुम्ही इक्झॅक्टली माझा मुद्दाच सिद्ध केला आहे ! पाणी कायम समपातळीत रहातं तो वैज्ञानिक सिद्धांत आहे. हे आपण शिकलो नाही का ? ते तोतापुरी चालतील तशी पातळी कशी बदलेल ? भक्त अशा गोष्टींवर विश्वास कसा ठेवतात ? ---------------------- काली पोटदुखीचा त्रास संपवते ? मग इतक्या वैद्कीय संशोधनाची गरज काय ? इतके डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स कशासाठी लागतात ? पोट दुखायला लागल्यावर भक्त कालीला साकडं न घालता डॉक्टरकडे कशाला जातात ? ----------------------------------- आपण पब्लिक फोरमवर अशा गोष्टी लिहीण्याचं साहस कसं करु शकतो ? --------------------------------------- आता तुमच्या लक्षात आलं असेल की भक्तीमार्ग भक्तांना कसं भ्रमित करतो. परिणामी आपली वस्तुनिष्ठता हरवते. वैज्ञानिक दृष्टीकोन हरवतो. सगळ्या जगासमोर आपलं हसूं होतं !
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
क
कोहंसोहं१० Tue, 06/02/2020 - 22:10 नवीन
देव या कल्पनेचा बाजा वाजू नये म्हणून भक्तांनी लावलेल्या या सगळ्या पश्चात स्टोर्‍या आहेत !----> हाहाहा. उत्तर नसले की त्या स्टोर्‍या आहेत म्हणून मोकळे झालात. म्हणजे तुम्ही दिलेली कथा तीच खरी आणि तुम्हाला माहिती नाही किंवा तुमचे विचार खोडणारी ह्या पश्चात स्टोर्‍या. अश्या महाज्ञानी माणसाबरोबर मी पामर काय चर्चा करणार. ज्ञान वाढवा एवढेच म्हणेन. आपण पब्लिक फोरमवर अशा गोष्टी लिहीण्याचं साहस कसं करु शकतो ?---> तुम्ही स्वतःला ज्ञानेश्वर, रामकृष्ण परमहंस, शंकराचार्य यांनी काय करावे आणि काय करू नये हे सांगत सुटला आहेत त्यामुळे हा प्रश्न एकदा तुम्ही स्वतःला विचारून पहा. तुम्ही एवढ्यांदा ट्रोल का झालात हेही समजेल मग. आता तुमच्या लक्षात आलं असेल की भक्तीमार्ग भक्तांना कसं भ्रमित करतो. परिणामी आपली वस्तुनिष्ठता हरवते. वैज्ञानिक दृष्टीकोन हरवतो. सगळ्या जगासमोर आपलं हसूं होतं ! ------->>> हसं तर आपले होत आहे. याआधीही झालेले आहे. फक्त अजूनही ते तुम्हाला समजलेलं नाही
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
क
कोहंसोहं१० Tue, 06/02/2020 - 22:13 नवीन
देव या कल्पनेचा बाजा वाजू नये म्हणून भक्तांनी लावलेल्या या सगळ्या पश्चात स्टोर्‍या आहेत !----> हाहाहा. उत्तर नसले की त्या स्टोर्‍या आहेत म्हणून मोकळे झालात. म्हणजे तुम्ही दिलेली कथा तीच खरी आणि तुम्हाला माहिती नाही किंवा तुमचे विचार खोडणारी ह्या पश्चात स्टोर्‍या. अश्या महाज्ञानी माणसाबरोबर मी पामर काय चर्चा करणार. ज्ञान वाढवा एवढेच म्हणेन. आपण पब्लिक फोरमवर अशा गोष्टी लिहीण्याचं साहस कसं करु शकतो ?---> तुम्ही स्वतःला ज्ञानेश्वर, रामकृष्ण परमहंस, शंकराचार्य यांनी काय करावे आणि काय करू नये हे सांगत सुटला आहेत त्यामुळे हा प्रश्न एकदा तुम्ही स्वतःला विचारून पहा. तुम्ही एवढ्यांदा ट्रोल का झालात हेही समजेल मग. आता तुमच्या लक्षात आलं असेल की भक्तीमार्ग भक्तांना कसं भ्रमित करतो. परिणामी आपली वस्तुनिष्ठता हरवते. वैज्ञानिक दृष्टीकोन हरवतो. सगळ्या जगासमोर आपलं हसूं होतं ! ------->>> हसं तर आपले होत आहे. याआधीही झालेले आहे. फक्त अजूनही ते तुम्हाला समजलेलं नाही
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
स
संजय क्षीरसागर Wed, 06/03/2020 - 06:20 नवीन
१. पाणी समपातळीत राहातं हा वैज्ञानिक सिद्धांत अमान्य केला तरच ती स्टोरी तग धरेल. आणि इतकी उघड गोष्ट नाकारता येणार नाही काय प्रतिवाद कराल याचा तुम्ही ? २. काली जर पोट दुखी थांबवत असेल तर डॉक्टर, हॉस्पिटल्सची गरज काय ? देवभोळ्यांचं प्रमाण ९०% टक्के आहे तरीही मेडीकल सायन्सची गरज कशासाठी आहे ? व्यक्तिगत जीवनात शारिरिक त्रास सुरु झाल्यावर तुम्ही काय करता ? किंवा देवाला शरण गेल्यापासून तुम्ही डॉक्टर जीवनातून हद्दपार केला का ? > तुम्ही एवढ्यांदा ट्रोल का झालात हेही समजेल मग. देवभोळ्यांच्या अशा तर्कशून्य विधानांवर किंवा त्यांच्या चुकीच्या धारणांवर लिहीलं जातं, तेंव्हा निरुत्तर झाल्यावर, ट्रोलींग करण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय रहात नाही आणि तेच तुम्ही सांगतायं !
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
म
मामाजी Tue, 06/02/2020 - 19:38 नवीन
म्हणजे आधी काल्पनिक देव निर्माण करा आणि मग तो खलास करा ! कशाला पाहिजेत इतक्या भानगडी ? संक्षी साहेब, आपले तर्क हे असे अव्यवहारिक असतात.. ज्यांना कोणाला सीए, डॉक्टर, इंजीनियर वगैरे व्हायचे आहे त्यांनी पहिली, दुसरी चौथी, पाचवी अथवा दहावी बारावी च्या परिक्षा देत कशाला वेळ घालवत बसायचे आज्ञाचक्र तोडू शकणारा कोणीतरी तोतापूरी शोधून त्याच्याकडून एकदम त्या त्या विषयांची ची फायनल परीक्षा ऊत्तीर्ण करून घ्यायची.. आधी गहू आणा मग ते दळुन घ्या नंतर कणीक भिजवा, पोळ्या लाटा, तव्यावर भाजून घ्या मग त्या शेवटी पोटातच ढकलायच्याना कशाला पाहिजेत इतक्या भानगडी ? त्यापेक्षा सरळ पोटभर गहू खाऊनच मोकळ व्हाव..
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 06/03/2020 - 07:01 नवीन
आधी काली तयार केल्यामुळे आज्ञाचक्रावर वार करणारा तोतापुरी शोधावा लागला काली तयारच केली नसती तर कायम समोर उभा ठाकलेला निराकार सहज दिसला असता. असा मुद्दा आहे ! ________________________ > त्यांनी पहिली, दुसरी चौथी, पाचवी अथवा दहावी बारावी च्या परिक्षा देत कशाला वेळ घालवत बसायचे ? एवढं शिकून जर, तोतापुरीच्या चालण्यानं नदीच्या पाण्याची लेवल बदलायला लागली.... आणि त्या स्टोरीवर आपला विश्वास बसायला लागला तर पुन्हा कितवी पासून सुरुवात करायला हवी ? > त्यापेक्षा सरळ पोटभर गहू खाऊनच मोकळ व्हाव.. काली जर पोटदुखी थांबवू शकते तर भक्तच गहू खाऊन त्याच्या पोटात पोळ्या होतील.... या आशेवर राहू शकतील.
↩ प्रतिसाद: मामाजी
अ
अर्धवटराव Tue, 06/02/2020 - 15:21 नवीन
इथे ज्या निर्गुण निराकाराची चर्चा होते आहे ते अ‍ॅच्युअल निर्गुण निराकारापेक्षा भिन्न आहे. सत्य हे आदिम रहस्य आहे म्हटल्यावर इतर काहि बोलण्यात अर्थ उरत नाहि. इट बिकम्स अ ब्लॅक बॉक्स. आपले अनुभव एका मर्यादेपलिकडे वेध घेऊ शकत नाहि. आपल्या मर्यादेला अंतीम सत्य मानुन इतरांच्या अनुभवाला कल्पना मानण्यात काहि शहाणपण नाहि. आपण निर्गुणाला सिद्ध करु शकत नाहि. का ? तर तो एक ब्लॅक बॉक्स आहे. मग त्याला पोकळी, कशात काहि नाहि वगैरे भारंभार विशेषणं लावायची. हे म्हणजे आपल्याला हवा दिसत नाहि, म्हणु तिला कशात काहि नाहि वगैरे म्हणण्यासारखं आहे. त्यापेक्षा प्रामाणिकपणे स्वच्छ कबुल करावं ना कि माझी दृष्टी हवेचे मॉलिक्युल्स बघु शकत नाहि. सगुण साकार म्हणजे साधकाचा कल्पना विलास नसुन "अभावतुन, शुण्यातुन निर्मीती होऊ शकत नाहि" हि थेअरी आहे. अव्यक्तातुन काहिच व्यक्त होऊ शकत नाहि. शुण्यातुन पूर्ण निर्माण होऊ शकत नाहि. जीवनाचा उगम जीवनच आहे. ज्याला आपण अव्यक्त, शुण्य म्हणतो ति त्या व्यक्ताचीच एक प्रॉपर्टी आहे. हा सदा-सर्वदा व्यक्त असलेलाच 'व्यक्ती'. म्हणुन हि ऑर शी बिकम्स अ पर्सन. बुद्धीने त्याचा वेध घेता येत नाहि. पण त्याच्याशी असलेल्या एकरूपकत्वचा जॉइनींग पॉइण्ट म्हणजे प्रेम (प्रेम का कुठल्याही गोष्टीचा इंडक्शन पॉइण्ट असतो). इथपर्यंत थेरॉटीकल गोष्टी करता येतात. आता या जॉइनींग पॉइण्टचा विकास आपल्यामधे कसा करायचा (किंवा करायचा कि नाहि ) हे ज्याचं त्याने ठरवावं. नसेल करायचा तर उगाच ज्यांनी तो केला आहे त्यांना नावं ठेऊ नये. असो.
स
सोत्रि Tue, 06/02/2020 - 17:06 नवीन
सत्य हे आदिम रहस्य आहे म्हटल्यावर इतर काहि बोलण्यात अर्थ उरत नाहि
जर ते सत्य आहे तर रहस्य असूच शकत नाही! :) - (साधक) सोकाजी
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Tue, 06/02/2020 - 17:26 नवीन
एकसे बढकर एक कॉकटेल्स पेश करणारे सोत्री तुम्हीच का ?? =))
↩ प्रतिसाद: सोत्रि
श
शाम भागवत Wed, 06/03/2020 - 12:09 नवीन
आता हे काय नवीन? अर्थवटराव!!! एवढं तरी पूर्ण करा बॉ. :)
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
स
सोत्रि Wed, 06/03/2020 - 13:47 नवीन
अर्धवटराव, अध्यात्माचं कॉकटेलही 'सहजावस्था' देतं! त्यामुळे फिकर नॉट तोच सोत्रि आहे. :=)) - (कॉकटेलच्या पलिकडचा उलगडा झालेला) सोकाजी
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
स
सुबोध खरे Tue, 06/02/2020 - 21:01 नवीन
नर्मदा परिक्रमेच्या वेळेस (1956) रा भि जोशी यांनी आपला अनुभव लिहिला आहे. एक गुहेच्या बाहेर लिहिले होते 10 पैशात ब्रम्हदर्शन ! मी आत गेलो. तेथे एक साधू बसले होते. त्यांनी खूण केली इथे पैसे ठेवा. मी 10 पैसे ठेवले. त्यांनी एक खडीसाखरेचा खडा दिला आणि म्हणाले खा. मी खाल्ला त्यांनी विचारलं कसा लागला चवीला? मी म्हणालो गोड. ते म्हणाले गोड म्हणजे कसा गूळ की गुलाबजाम की बासुंदी? मी म्हणालो असं कसं सांगणार? तुम्हाला ते स्वतःखाऊन पाहायला लागेल! त्यावर ते साधू म्हणाले की ब्रम्हदर्शन असंच असतं. ते ज्यांचं त्यालाच व्हावं लागतं! दुसऱ्याचा अनुभव किंवा मार्ग कामाचा नाही! वरच्या चर्चेत मला *शून्य* कळलं (की कळलं नाही?)
स
सुबोध खरे Tue, 06/02/2020 - 21:01 नवीन
नर्मदा परिक्रमेच्या वेळेस (1956) रा भि जोशी यांनी आपला अनुभव लिहिला आहे. एक गुहेच्या बाहेर लिहिले होते 10 पैशात ब्रम्हदर्शन ! मी आत गेलो. तेथे एक साधू बसले होते. त्यांनी खूण केली इथे पैसे ठेवा. मी 10 पैसे ठेवले. त्यांनी एक खडीसाखरेचा खडा दिला आणि म्हणाले खा. मी खाल्ला त्यांनी विचारलं कसा लागला चवीला? मी म्हणालो गोड. ते म्हणाले गोड म्हणजे कसा गूळ की गुलाबजाम की बासुंदी? मी म्हणालो असं कसं सांगणार? तुम्हाला ते स्वतःखाऊन पाहायला लागेल! त्यावर ते साधू म्हणाले की ब्रम्हदर्शन असंच असतं. ते ज्यांचं त्यालाच व्हावं लागतं! दुसऱ्याचा अनुभव किंवा मार्ग कामाचा नाही! वरच्या चर्चेत मला *शून्य* कळलं (की कळलं नाही?)
स
संजय क्षीरसागर Tue, 06/02/2020 - 21:40 नवीन
मस्त स्टोरी आहे !
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
M
mrcoolguynice Wed, 06/03/2020 - 03:43 नवीन
Image removed.
च
चौकटराजा Wed, 06/03/2020 - 05:54 नवीन
मिपा काढण्याचा मूळ उद्द्देश काय ..... मराठीचे संवर्धन ? ज्ञानाची देवाण घेवाण ? की मीच शहाणा आहे याची मस्ती जिरवण्याची जागा ? हे स्पष्ट नाही. मी माझ्या व्यक्तीगत जीवनात बायका मुलांसकट सर्वाशी असे धोरण ठेवले आहे ...... एक दोनदा उपदेश करा .पुढे खड्डा आहे हे सांगा , काही फरक नाही पडला तर समोरच्या माणसाचे खड्यात पडणे एन्जॉय करा ! तरी मी सांगत होतो ... असे म्हणण्याचीही तसदी घेऊन नका ! बदलायचे तर स्वतः ला बदला इतराना बदलण्याच्या फन्दात पडू नका ! मस्त आयुष्य चालले आहे. ज्ञान ,सल्ला, उपदेश मागितला तरच त्याचे महत्व असते.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा