जे न देखे रवी...
मुर्ख
Primary tabs
आयुष्याच्या उतरणीला
सगळे बोट दाखवतात
तु किती मुर्ख आहे
म्हणून सारे हीणवतात
माणुसकीच्या नात्यानं
जमेल तेवढे करत होतो
स्वतःच्या स्वार्था आधी
जबाबदारीला पुढं ठेवत होतो
तीच जबाबदारी आता
मुर्खपणा ठरते
ज्यानां आधार दिला
त्यांच्याच कडुन कळते
जेव्हां चुकत होतो
तेव्हां बरोबर म्हणायचें
गणित नाही कळाले
आता बरोबर वागताना
मार्क शुन्य पडले
आता काय उपयोग
हे सगळं बोलून
जेव्हा हातातले सारे
पक्षी गेले उडून
मेल्या सगळ्या भावना
बोथट झाल्या संवेदना
पण आतला माणुस
काही मरत नाही
माणुसकीचा लळा
काही सुटत नाही
शहाण्यांच्या जगात
हे आसचं चालायच
"शहाण्या" लोकां कडून
कस जगायचं
हे नव्यानं आता शिकायचं
माणुसकीच्या नात्यानं
जमेल तेवढे करायचं........
१५-२-२१
मस्त
तीच जबाबदारी आता मूर्खपणा ठरते.
अगदी बरोबर
धन्यावाद
छान सरळ लिहिलीये कविता...
तुम्हाला रिप्लाय देताना तुमच्या कवितेसाठी उगाच दोन शब्द लिहीत गेलो आणि वेगळीच कविता झाली.. मरणाचे तोरण
देतोय या विभागात separate.
-
धन्यवाद,आपया कवीतेवर सविस्तर प्रतिसाद दिला आहे,