असंही व्हॅलेंटाइनचं सेलिब्रेशन...
Primary tabs
उगवला प्रेमिकांच्या सोहळ्याचा दिन वाजत गाजत
त्याच्या हृदयाची वाढली होती धडधड
तिच्याही काळजात होत होतं लकलक
कारण तो होता ट्रेडमिलवर धावत
आणि तिच्या लेकीच्या व्हॅनचा हॉर्न होता वाजत
दिले तिने त्याला आवर्जून फूल
पण होतं ते डब्यातलं कोबीचं फूल
निघाला मग तो एकटाच लॉंग ड्राईव्हवर
कारण होतं त्याचं ऑफिस नगर रोडवर
पोहोचला एकदाचा तो ऑफिसला
होतीच 'ती' तिथे सोबतीला
सुरु झालं त्याचं आणि तिचं गूज
म्हणला तो तिला दिवसभराची राणी माझी तूच
तिचाही 'तो' होता घरात सोबतीला
देईना तिला एकही क्षण फुरसतील
कॉम्प्युटरची सिस्टीम होती त्याची 'शिरीन'
अन घरकामाचा रगाडा तिचा 'फरहाद'
मावळला दिनकर अन झाला त्यांचा कॅन्डल लाईट डिनर
कारण होती MSEB ची कृपा त्यांच्यावर
तो शिरला निद्रादेवीच्या कुशीत अन ती बसली लेकीचा प्रोजेक्ट करीत
म्हणे उगवला होता प्रेमिकांच्या सोहळ्याचा दिन वाजत गाजत...
कविता उत्तमच आहे, कविता आणि कवितेतील व्यथा वास्तव असूही शकतात.
पण ..
१४ फेब २०२१ ही तशी रविवारी , सहसा शाळा ऑफीसला सुट्टी असण्याच्या दिवशी आली होती, अर्थात कवि कवियत्रींवर काळाचे बंधन घालावेच असा अट्टाहास निश्चित नाही.
तुमचा मुद्दा बरोबर आहे. ही कविता २०१८ साली लिहिली होती. पूर्वप्रकाशित असा उल्लेख करायचा राहिला.
मस्त
ह्यामुळं एकदम रिलेट करता आलं!
एकदम संसारी "गृहस्था"च्या वास्तवाची जाणीव करून देणारी टोकदार कविता!