जे न देखे रवी...
तुझे चालणे दरवळून जाते.......
Primary tabs
उन्हाला कसा थांगपत्ता नाही
कसे झाकले नभाला धुक्याने
इथे अतृप्त सुर्य व्यक्त होतो
जराशा कवडश्यातूनी मुक्याने ............
प्रवासा पुन्हा हाक अस्तित्व देते
गंधीत मृदाचे तृणांचे शहारे
इथे स्पर्श ओला निळ्या सागराचा
गगनातूनी जणू थव्यांचे पहारे .............
इथे धुंद असते अशी शर्वरी की
कुठे चांदणे विरघळून जाते
किती बोलणे ते चमकत्या विजेचे
तुझे चालणे मात्र दरवळून जाते ..............
- किरण कुमार
सुंदर कविता.आवडली.
मीटर थोडे अधिक सांभाळले तर आणिक सुबक होईल.
बाकी मृदा, तृण, शर्वरी, कवडसा हे सहसा न वापरले जाणारे शब्द वाचून छान वाटले. पुलेशु.
अगदी असेच वाटले
कवितेतला भाव मात्र भावला,
पैजारबुवा,
सुचनेचे स्वागत आहे.
इथे धुंद असते अशी शर्वरी की
कुठे चांदणे विरघळून जाते
किती बोलणे ते चमकत्या विजेचे
तुझे चालणे मात्र दरवळून जाते
वा भारी
पुलेशु
खुपच छान. आवडली