काथ्याकूट

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २०२०

Primary tabs

नमस्कार,

https://upload.wikimedia.org/wikipedia/en/1/1d/2020_Summer_Olympics_logo_new.svg

दर चार वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा होतात, आपण दरवर्षी एक मोठ्ठा संघ पाठवतो. आणि दोन-चार पदके कमावतो.
१९९६ मध्ये लिअँडर पेसने टेनिस पुरुष एकेरी मध्ये कांस्य जिंकलं आणि खूप वर्षांचा पदकांचा आणि खूप दशकांचा वैयक्तिक पदकांचा दुष्काळ संपवला. त्यानंतर दरवर्षी वैयक्तिक पदके १-२-३-४ मिळत आहेत.
२०१६ रियो ऑलिम्पिक : एक रजत, एक कांस्य
२०१२ लंडन ऑलिम्पिक : दोन रजत, चार कांस्य
२००८ बिजिंग ऑलिम्पिक : एक सुवर्ण, दोन कांस्य
२००४ अथेन्स ऑलिम्पिक : एक रजत
२००० सिडनी ऑलिम्पिक : एक कांस्य
असा या शतकातील प्रवास आहे.

यंदा देखील मोठा संघ, मोठा सपोर्ट स्टाफ, मोठ्या आशा आणि अपेक्षासह भारताच्या ऑलिम्पिक प्रवासाला सुरुवात होत आहे.
मिपाचे लोकप्रिय क्रीडा लेखक जे पी मॉर्गन यांनी गार्‍हाणं मांडून शुभेच्छा दिलेल्या आहेत.

तर स्पर्धेचे अपडेट्स, विशेष बातम्या आणि अर्थातच भारतीय खेळाडूंचा सहभाग असलेल्या स्पर्धांविषयी येथे चर्चा करुयात.

shashu

रवीकुमार २-९ ने पिछाडीवर असून सुद्धा हार न मानता एका पकडीत खेळ खल्लास करून टाकला.

पैलवान रविकुमार.... अभिनंदन!!
सुवर्णपदक जिंकण्यासाठी शुभेच्छा!

उपांत्य फेरीत पराभूत झाला असला तरी अजून कांस्य पदकाची आशा आहे

३० मिनिटांचा खेळ बाकी. १ -१ अशी बरोबरी आहे, आक्रमक खेळ आणि बचाव उत्तम आहे त्यामुळे सामना जिंकू असे वाटत आहे.

-दिलीप बिरुटे

शेवटची १५ मिनिट बाकी आहेत. अर्जेंटीना २ -१ ने पुढे आहेत. आता काही वेगवान खेळी करून पेनल्टी कॉर्नर मिळाले तर गोल होतील वाढतील. चमत्कारी खेळ व्हावा.

-दिलीप बिरुटे

अर्जेंटीना २ भारत १
आता कास्य पदकासाठी जिंकू किंवा मरू....!
शुभेच्छा.!

-दिलीप बिरुटे
(निराश)

काल रविकुमार आणि दीपक पुनिया यांनी बाद फेऱ्यात धडक मारून दिवस गाजवला.
आजचा दिवस सुद्धा बराच इव्हेंटफुल्ल आहे.
एक सुवर्ण किंवा रजत पदक
दोन कांस्य पदके
गोल्फ आणि महिला कुस्ती मध्ये पुढे जायचो चांगली संधी.

१. गोल्फ महिला दुसरी फेरी
अदिती अशोक कालच्या दुसऱ्या स्थानावरून सुरुवात करेल. हे एक सुखद, अनपेक्षित, सरप्राइज आहे.
दिक्षा ५५व्या स्थानी असल्याने फक्त कामगिरी उंचावता येईल का ते पाहावं लागेल.

२. हॉकी पुरुष कांस्य पदक सामना
भारत विरुद्ध जर्मनी

३. कुस्ती महिला फ्री स्टाईल ५७ किलो (दुसरी संधी)
अंशू विरुद्ध रशिया

४. कुस्ती महिला फ्री स्टाईल ५७ किलो (उप उपांत्यपूर्व फेरी)
विनेश फोगाट विरुद्ध स्वीडन

५. २० किमी चालणे : पुरुष अंतिम फेरी
संदीप कुमार
राहुल
इरफान थोडी

६. कुस्ती पुरुष फ्री स्टाईल ५७ किलो अंतिम सामना
रवी कुमार विरुद्ध रशियाचा Zavur Uguev

७. कुस्ती पुरुष फ्री स्टाईल ८३ किलो कांस्य पदक सामना
दीपक पुनिया

१. चीन ३२-२२-१६ एकूण ७०
२. अमेरिका २५-३१-२३ एकूण ७९
३. जपान २१-७-१२ एकूण ४०
.
.
.
६५. भारत ०-१-२ एकूण ३

एका सुवर्णपदकाची नितांत गरज आहे आपल्याला. पदकतालिकेत बर्यापैकी वर येईल भारत सुवर्णपदक मिळाल्यास.

श्रीगुरुजी

भारताने जर्मनीला ५-४ हरवून पुरूष हॉकीत कास्यपदक जिंकले.

श्रीगुरुजी

४१ वर्षांनंतर भारतीय पुरूष संघाने ऑलिम्पिक हॉकी स्पर्धेत पदक जिंकले.

shashu

Men's 20km walk
४ KM नंतर संदीप कुमार दुसऱ्या स्थानावर. एक इशारा मिळाला आहे.

१. गोल्फ महिला दुसरी फेरी
अदिती अशोक दुसऱ्या स्थानी,
उद्या तिसरी फेरी होईल.

२. हॉकी पुरुष कांस्य पदक सामना
भारत विजयी विरुद्ध जर्मनी
भारताला कांस्य पदक

३. कुस्ती महिला फ्री स्टाईल ५७ किलो (दुसरी संधी)
अंशू पराभूत विरुद्ध रशिया

४. कुस्ती महिला फ्री स्टाईल ५७ किलो (उप उपांत्यपूर्व फेरी)
विनेश फोगाट विजयी विरुद्ध स्वीडन
उपांत्यपूर्व फेरी पराभूत विरुद्ध बेलारूस

५. २० किमी चालणे : पुरुष अंतिम फेरी
संदीप कुमार २३
राहुल ४७
इरफान थोडी ५१

६. कुस्ती पुरुष फ्री स्टाईल ५७ किलो अंतिम सामना
रवी कुमार पराभूत विरुद्ध रशियाचा Zavur Uguev
रौप्य पदक

७. कुस्ती पुरुष फ्री स्टाईल ८३ किलो कांस्य पदक सामना
दीपक पुनिया पराभूत विरूद्ध सॅन मरिनो

१. चालणे पुरुष ५० किमी
अंतिम फेरी
गुरुप्रीत सिंग

२. गोल्फ महिला तिसरी फेरी
अदिती अशोक दुसऱ्या तर दिक्षा ५३व्या स्थानावरून पुढे सुरू ठेवतील.

३. हॉकी महिला कांस्य पदक सामना
भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन

४. कुस्ती महिला फ्री स्टाईल ५० किलो
उप उपांत्यपूर्व फेरी
सीमा विरुद्ध ट्यूनिशिया

५. कुस्ती पुरुष फ्री स्टाईल ६५ किलो
उप उपांत्यपूर्व सामना
बजरंग पुनिया विरुद्ध किर्गिजस्थान

६. २० किमी चालणे महिला
अंतिम फेरी
भावना जाट
प्रियांका

७. १००*४ रिले शर्यत पुरूष पहिली फेरी
अमोज जेकब
नागनाथन पंडी
अरोकिया राजीव
Noah Tom
मुहम्मद याहिया
असा संघ आहे

श्रीगुरुजी

महिला हॉकी स्पर्धेत ब्रिटनविरूद्ध भारताचा ३-४ असा पराभव झाला.

चौथा राऊंड सुरू होईपर्यंत ३-३ बरोबरी होती.
चौथ्या राऊंड मध्ये दोन मिनिटांत ब्रिटन ला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि तो तीनदा रिपीट होऊन शेवटी त्यांनी गोल केला. हा चौथा गोलच निर्णायक ठरला.
7 मिनिटे शिल्लक असताना भारताला सुद्धा एक पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्याचं गोलमध्ये रूपांतर करता आलं नाही.

बजरंग पुनिया कुस्तीचे सलग दोन सामने जिंकून सेमी फायनल मध्ये दाखल. सेमी फायनल जिंकली तर अजून एक पदक पक्के होईल.

गोल्फ महिला तिसरी फेरी
अदिती अशोक दुसऱ्या तर दिक्षा ५१व्या स्थानावर आहेत.
उद्या चौथी आणि शेवटची फेरी आहे. अदितीने सुरुवातीपासून दुसरे स्थान पक्के केले आहे. त्यामुळे आता पदकाची आशा पल्लवित झाली आहे :)

१. चालणे पुरुष ५० किमी
अंतिम फेरी
गुरुप्रीत सिंग शर्यत पूर्ण करू शकला नाही.

२. गोल्फ महिला तिसरी फेरी
अदिती अशोक दुसऱ्या तर दिक्षा ५२व्या स्थानी आहेत.
उद्या चौथी आणि अंतिम फेरी आहे.
पहिल्या फेरीपासून तिसर्‍या फेरीपर्यंत अदिती दुसर्‍या स्थानी कायम आहे.
उद्या हे एक सुखद सरप्राईज होऊ शकते!

३. हॉकी महिला कांस्य पदक सामना
भारत पराभूत विरुद्ध ग्रेट ब्रिटन

४. कुस्ती महिला फ्री स्टाईल ५० किलो
उप उपांत्यपूर्व फेरी
सीमा पराभूत विरुद्ध ट्यूनिशिया

५. कुस्ती पुरुष फ्री स्टाईल ६५ किलो
उप उपांत्यपूर्व सामना
बजरंग पुनिया विजयी विरुद्ध किर्गिजस्थान
उपांत्यपूर्व सामना
विजयी विरुद्ध इराण
उपांत्य सामना
पराभूत विरुद्ध अझरबैजान

कांस्य पदकासाठी सामन्यात एक संधी अजून आहे.

६. २० किमी चालणे महिला
अंतिम फेरी
भावना जाट ३२
प्रियांका १७

७. १००*४ रिले शर्यत पुरूष पहिली फेरी
अमोज जेकब
नागनाथन पंडी
अरोकिया राजीव
Noah Tom
मुहम्मद याहिया
असा संघ आहे

बजरंग पुनिया विजयी ८-०! अस उपांत्य फेरीत का नाही खेळला काय माहित....

एक सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदकांसहित भारत ४७व्या स्थानी.

हा भारताचा शेवटचा सामना होता. भारतासाठी आतापर्यंत सर्वाधिक यशस्वी स्पर्धा. एका दिवसात एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक जिंकून कदाचित आजचा दिवस सर्वाधिक यशस्वी दिवस.
मेरी कोम, महिला हॉकी संघ, दीपक पुनिया आणि अदिती अशोक यांची पदके हुकली.

Bhakti

आणि गोल्ड
भाला फेक
:)
अभिनंदन!

मदनबाण
गॉडजिला

नीरज साहेब मज्या असली अत्यंत कौतुकास्पद अन उत्साहदायक गोल्ड...

किप इट ऑन....

_/\_

सौंदाळा

धाग्यावर भारताचे रोजचे सामने, ओलिम्पिकमधले इतर महत्वाचे अपडेट्स खूपच छान मिळत होते.
तुषार काळभोर यांना धन्यवाद

तुषार काळभोर, तुम्ही हा धागा काढून वेळोवेळी update केल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद.

गॉडजिला

Paralympic मधे देखील भारत चांगली कामगिरी करत आहे.