जे न देखे रवी...
कळते जगत जाताना
Primary tabs
युगायुगांचे असते एकटेपण
लाखोंच्या सोबतीने जगताना
खोल खोल भासते आयुष्य
रितेपन भरून काढताना
अनामिक नात्याची वीण
दिसते कधी घट्ट बसताना
नकळत मग तुटते काही
तिथे मनापासून गुंफताना
डोळ्यादेखत ढळते, ज्यात
वेचले आयुष्य रचताना
हे असे घडू नये वाटते
नेमके तेच घडत असताना
पतंग विसरतो दाहकता
पिंगा घालून जळताना
आयुष्यही असते असेच
कळते जगत जाताना
- संदीप चांदणे
ओ- माय- गॉड कविता.
:)
असो, सक्तीच्या विश्रांतीचा नकारात्मक प्रभाव कवितेवर पण जाणवतोय.
आवडली
ठणठणीत बरे झाल्याचा खणखणीत पुरावा,
पैजारबुवा,
+१
खूप छान!
वाटतं असं कधी कधी, पण शब्दात मांडता येत नाही!
एकदम सुरेख रचना संदीपशेठ.
कुणी कुणासाठी थाबंत नाही
कुणी कुणाच्या आयुष्याला पुरत नाही
आस म्हणाल तर काही अर्थच उरत नाही
असेल तोवर मस्त रहायचं
नंतर फक्त आठवणींत जगायचं