राजकारण
५ राज्यातील निवडणूक निकाल
Primary tabs
उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर विधानसभा निवडणून निकालांविषयी हा धागा.
प्राथमिक कलचाचणीनुसार सध्याची उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजप पुढे दिसतोय, गोव्यात भाजप आणि कॉन्ग्रेसमध्ये जोरदार टक्कर दिसतेय, मगोप येथे किंगमेकर ठरणार असे दिसते, पंजाबात आप कॉग्रेसपेक्षा थोडा पुढे आहे तर मणिपूरातही भाजपने आघाडी घेतल्यासारखी दिसतेय.
पुढे काय होतेय ते लवकर कळेलच.
रागा यांना कुशल सल्लागार हवा आहे. बघा तिथे काही जमते का?
बाकी जिथे भाजपा चे सरकार आहे तिथले नागरीक परिपक्व नाहीत. जिथे भाजपा चे सरकार आहे तिथे परिपक्व नागरीक असतात. खुश?
हायला ... यांच्या नादाला लागुन मी पण कायपण लिवायला लागलो.
"बाकी जिथे भाजपा चे सरकार आहे तिथले नागरीक परिपक्व नाहीत. जिथे भाजपा चे सरकार नाही तिथे परिपक्व नागरीक असतात. खुश?"
असे वाचावे ..
क्या शॉल्लेट मारा भइ!
;)
रागा यांना कुशल सल्लागार हवा हे कोणी सांगीतलं ? जर खरंच त्यांना हवा असता तर तो त्यांनी दहा वर्षांपुर्वीच आणला असता.
रागा ने काही केले/ बोलले तरी त्याचे समर्थन करणारे प्रवक्ते आहेत मग सल्लागार कश्याला हवा ? उलट त्यांना अजुन हुजरेगिरी करणारे लोक हवेत.
अगदी खरं बोलायचे तर देशातल्या १३० कोटी लोकांनी हेच करावे अशी त्यांची इच्छा आहे.
लई भारी, चुन्नीलाल मुन्नीलाल
यूपी आणि उत्तराखंड येथील मतदार अजून पण भावनिक प्रश्नावर मतदान करतात.
आणि हे चिंता जनक नक्कीच आहे.
उ हा ब क
उचला हात
बडवा कळफलक
भाजपने देवबंद जिंकला आहे. देवबंद हा मुस्लिमबहुल मतदारसंघ आहे. या मतदारसंघात ब्रिजेश यांनी समाजवादी पक्षाच्या कार्तिकी राणा यांचा ७१०४ मतांनी पराभव केला.
दारुल उलूम देवबंदच्या प्रमुखाशी संबंधित असलेले AIMIM चे बहुचर्चित उमेदवार उमेर मदनी यांना केवळ ३५०१ मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या राहत खलील यांना अवघी १०९६ मते मिळाली आहेत. या निवडणुकीच्या एक महिना आधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देवबंद येथे एटीएस प्रशिक्षण केंद्राची पायाभरणी केली होती
उत्तर प्रदेशमध्ये पक्षाने लढवलेल्या १०० जागांपैकी ९९ जागांवर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) ने डिपोझिट गमावले!
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत, ओवेसीच्या इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाने ३८ जागांवर निवडणूक लढवली होती आणि ३७ जागांवर त्यांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.
--
हैदराबादमध्ये मुस्लिम राजवट टिकवून ठेवण्यासाठी आणि भारतात एकीकरणास विरोध करण्यासाठी ब्रिटिश राजवटीत हैदराबाद संस्थानात मुस्लिम राष्ट्रवादी मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) ची स्थापना धार्मिक मुस्लिम धर्मांध सय्यद कासिम रझवी द्वारे केली गेली. हे एक इस्लामी सशस्त्र दल होते. रझाकार हे मुस्लिम फुटीरतावादी होते ज्यांनी निजामाची राजवट चालू ठेवण्याची इच्छा होती. या झवी ने जाहीरपणे हिंदूंना गुलाम बनवण्याच्या मुस्लिमांच्या अधिकाराचा आग्रह धरला होता!
रझवीने हिंदूं वर गुन्हेगारी हल्ले सुरू केले होते आणि त्याच्या रझाकार फौजा महाराष्ट्रातही लुटालूट करत असत.
कोण का हरले असावेत यावर मतं मांडणारा धागा काढा.
------
माझ्या मते कांग्रेसचे रागा नेतृत्व कुणाला विश्वासक वाटत नाही.
इथे महाराष्ट्रात जेव्हा थोडे कांग्रेसी निवडून आले त्यांचे कौतुक न करता प्रदेश कांग्रेस कमिटीला शाबासकी पाठवली त्यांनी.
रागांना कंट्रोल खुर्चीत बसवण्याचे सोनियांचे प्रयत्न कायम असफल होत आहेत.
पंजाबमध्ये सर्व सरदार शीख समान असा माझा भ्रम होता. तो इंडिया टुडे (२१ फेब्रुवारीच्या) अंकातून दूर झाला. शीख, आणि हिंदूंनी नवीन आप पार्टीला संधी द्यायचा निर्णय घेतला.
( हा प्रतिसाद फेब्रुवारी निवडणुका निकाल आणि संभाव्य कारणे असा नवा धाग्यासाठी. धागा काढा.)
कांग्रेस चे जे काही लोक निवडुन येतात ते स्वतःच्या प्रभावाने येतात. प्रभाव ईतका आहे की विरोधी उमेदवाराला संधीच मिळत नाही. ते निवृत्त होण्याचीच वाट पहावी लागेल.
कांग्रेस चा काही संबंध नाही. खरेतर त्यांच्या मतदार संघात राहुल गांधीला फिरकु न देण्ञाची त्यांनी काळजी घेतलीय.
आज पन्नास दिवस पूर्ण झाले.
मी गेले ५० दिवस श्रीयूत कचुरे यांचा प्रतिसाद न वाचता पुढे जाऊ शकलो आहे.
आता ते सहज जमायला लागले आहे.
फक्त त्यांच्या प्रतिसादावर आलेला प्रतिसाद वाचून पूर्ण समाधान होते.
श्री कचुरे यांनी मला या कलेत पारंगत केल्याबद्दल.
_/\_
शालजोडे
कचुरे उर्फ राजेश उर्फ हेमंत हा 40 पैसे वाला राष्ट्रवादी चा कार्यकर्ता आहे असे माझे मत आहे.
ज्या प्रकारे सकाळ वगैरे बुद्धीभेद करत असतात त्याच प्रकारे तो देखील करत असतो.
दोन म्हणी सांगतो, कचुरेंचे व्यक्तिमत्व त्यातून उलगडत जाईल
ताकाला जाऊन भांडे लपवणे
मी नाही त्यातली नि कडी लावा आतली.
मी आताशा प्रतिसदातली पहिली दोन वाक्ये वाचल्यावर सरळ सोडून देतो.
अभिनंदन!!!!
कारण प्रयत्न करूनही मला हे जमलेले नाही. मी वाचायला सुरवातच करू शकत नाही.
तर....
थोडक्यात, तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन!!!!
;)
काय आहे, मला वर नाव बघून खाली वाचायची सवय नाही.
त्यामुळे मी वाचायला सुरुवात केली की कळतं की हा राजेश चा आहे.
मग मी स्क्रोल करतो. ☺️
:)
लोकसत्ता अग्रलेख वाचणीय आहे. भाजप का जिंकले हे सांगण्यापेक्षा, इतर का हरले ह्यावर पुर्ण लेख आहे.
----------------
श्री सरदेसाई यांचे विश्लेषण तसलेच आहे.
लोकशाही मध्ये सत्ताधारी पक्ष पेक्षा विरोधी पक्ष सक्षम असणे हे खूप महत्त्वाचे आहे .काँग्रेस चे अस्तित्व टिकणे पण खूप गरजेचे आहे
यूपी मध्ये वेगवेगळे लढण्या पेक्षा सर्व विरोधी पक्षांनी एकत्र लढायला हवं होते.
मतांची टक्केवारी आज नाही तर उद्या माहीत पडेलच .
भले विरोधी पक्षणा जागा कमी मिळाल्या असतील पण त्यांची मतांची टक्केवारी नक्कीच वाढलेली असेल.
हा माझा अंदाज
विकास हाच निवडणुकी चा मुद्धा असणारी राज्य आणि भावनेवर आरूढ होवून मतदान करणारी राज्य .
असे वर्गीकरण केले पाहिजे
आंध्र,तेलंगणा,तमिळ nadu,केरळ, आणि कर्नाटक सुद्धा .
कधीच प्रचंड बहुमत भावना भडकावून मत मागणाऱ्या पक्षांना दिले नाही
राजस्थान ,पंजाब,दिल्ली,बंगाल ही पण राज्य योग्य विचार करूनच मतदान करतात.
यूपी हे खूप वेगळे राज्य आहे
ह्या नोकऱ्या नकोत,वीज नको,विकास नको.
फक्त धार्मिक आणि जातीय वाद च खूप आवडतो.
पोट भरायला बाकी उत्तम राज्य आहेत च फक्त ट्रेन मध्ये बसायचे आणि तिकडे जायचे.
भाषा, प्रांत ह्यावर दिले आहे मते.
गुजरात आणि महाराष्ट्र कशात बसतात?
हो ना. तिकडे साड्या एकदा साड्या फेडणारा पक्ष जिंकतो तर दुसर्यांदा म्हातार्यांना रात्रीचे खसाखस ओढून नेणारा पक्ष जिंकतो. खुपच विचारपुर्वक निर्णय घेतात तिकडे.
अम्माला स्त्री मतदारांची नेहमीच साथ मिळत होती ...
तमिळनाडू मध्ये लोक व्यक्ती पूजक आहेत. NTR ज्या स्मारकाजवळ अम्माचा फोटो पूजतात. असे मी चार पाच शहरात(होसुर, कोईमतूर, सालेम ETC) चौका चौकात पाहिलं. तिथे भाषा आणि पक्ष इतकंच समीकरण आहे.
दुर्दैवाने, महाराष्ट्र राज्यात देखील, आजकाल हे लोण पसरत चालले आहे...
आमच्या डोंबोलीत देखील, आजकाल मोठे मोठे बॅनर लागायला लागले आहेत ...
देवबंदमधे भाजपा विजयी झाला.
याचा अभ्यास झाला पाहिजे
समान नागरी कायदा आणण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग होऊ शकतो असे वाटते.
?
कसला अभ्यास ?
ते निवडणूक चाणक्य यंदा कोणत्या पक्षाच्या बाजूने होते ? त्यांचे काय विश्लेषण आहे सद्याच्या निकालांबद्दल ?
श्री प्रशांत किशोर यांची माहीती मीपण शोधत आहे.
श्री प्रशांत किशोर
हि व्यक्ती साहेबांसारखी फुकटची फार उदो उदो झालेली व्यक्ती आहे असे माझे मत आहे.
तृणमूलसाठी गोव्याचे डावपेच रचणारे हे महाशय तेथील निकाल पाहून मी त्या गावचा नाहीच म्हणून पाठ फिरवतील याबद्दल मला अजिबात शंका नाही.
कारण प्रत्येक कानाकोपऱ्यात पोस्टर लावलेलय तृणमूल काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे ( शून्य जागा मिळवून)
https://timesofindia.indiatimes.com/india/wrong-pass-by-prashant-kishor…
हातरस आणि लखीमपूर खेरीमध्ये भाजपचा विजय.
या दोन मतदारसंघांवर मीडिया आणि डाव्या-उदारमतवादाचे अनुयायी यांनी जास्त लक्ष केंद्रित केले होते. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अजिबात सुधारलेली नाही हे सांगण्यासाठी त्यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला होता. पण बाजी उलटलेली दिसून येते आहे. भाजपच्या अंजुला सिंग महौर यांनी हातरस मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजय मिळवून इतिहास रचला. सुमारे ५८% मते त्यांना मिळाली आहेत.
https://www.tv9marathi.com/videos/mim-leader-asaduddin-owaisi-conceded-…
ओवेसींचे निरीक्षण ......आक्षेप त्या ईव्हीएमवर नाही तर लोकांच्या मेंदूत जी एक प्रकारची चिफ बसवली आहे त्याची ही चूक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
--------
हिंदू हितवादी लोक जर एकत्र येत असतील तर चांगलेच आहे की .....
निकाल लागून दोन दिवस झाले पण अजून चंद्रसूर्यकुमाराचं अभ्यासपूर्ण विश्लेषण नाही आल. लवकर लिव्हा
चंद्रसूर्यकुमारांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण यायला हवे.
इकडे आहेत विश्लेषणं.
इंडिया टुडे मासीक अजूनही बेस्ट.
Jionews app वर फ्री डाउनलोड आहे.
इथे बऱ्याच जणांनी दिल्लीची वेल्फेअर कामे केंद्राच्या पैश्यातून होतात असे दिले आहे. दिल्लीचा महसूल किती, वेल्फेअर वर खर्च किती, केंद्राकडून किती मिळतात वैगेरे गणित मांडले तर बरे होईल.
पण आपल्याला दुरून कळणार कुठून? म्हणजे दिल्लीचा महसूल कुठून किती येतो आणि कसा खर्च करतात ते. केंद्रशासित राज्य म्हणजे काय आणि त्याचे हिशोब मलाही जाणून घेण्यास आवडेल.
केजरीवालांनी काय आश्वासनं दिली आणि कशी अमलात आणली ते लेख पूर्वी वाचलेले सापडले ते दिले. आता पंजाबातही हेच मॉडेल आणणार म्हटल्यावर मतदार सुखावले.
महाराष्ट्रातही हेच होवो. भ्रष्टाचाराची गळती थांबली तर दोनशे युनिटस वीज आणि वीस हजार लिटरस पाणी जनतेला फुकट मिळेल. परदेशी शिक्षणाचा बाजार थांबेल. इथे घेईल त्यास प्रवेश देऊन एंजिनिअर करून ठेवले पण त्यांना सामावून घेणाऱ्या मोठ्या कंपन्या कुठे आहेत? आणि अण्णा हजारेंना उपोषण करण्याचं कारणच उरणार नाही. दिल्लीतील त्यांचा जाण्यायेण्याचा,राहण्याचा उपक्रमही प्रायोजित होता म्हणतात
बरोबर. पण माहित नसताना दिल्ली सगळी इतर राज्यांच्या पैश्यावर चालते कसे म्हणता येईल समजत नाही. दिल्लीचा महसूल सुद्धा दणकट असणार असा अंदाज आहे..
एनिवे, इथे माहिती उल्पब्ध आहे.
अगदी वरकरणी तपासावरून दिसते की एकूण उत्पन्नापैकी १७-२०% उत्पन्न केंद्राकडून येते.
(Break up of state government receipts हा तक्ता पहावा.)
तुलना करायची झाल्यास,
उत्तर प्रदेश- १२ ते १८%
महाराष्ट्र- १५-१५.५०%
गुजरात- १८-२४%
त्यामुळे दिल्ली इतर राज्यांपेक्षा इतर राज्यांच्या महसूलावर अवलंबून आहे असं या माहितीवरून तरी दिसत नाही. यापेक्षा वेगळे काही माझ्याकडून राहत असल्यास जाणकारांनी प्रकाश टाकावा.
दिल्लीचे पोलिस केंद्रसरकरच्या under असल्यामुळे त्यांचा पगार आणि निवृत्तीवेतन, पोलिस स्टेशन प्रशिक्षण इत्यादींचा खर्च बराच वाचत असणार. तसेच दिल्लीमध्ये ग्रामीण भाग नाही आणि हा दिल्लीसाठी advantage असेल (हा माझा अंदाज आहे).
वाचत असल्यास त्याचे क्वांटिफिकेशन हवे. नक्की किती वाचतो ? हा वाचलेला पगार वि. वेल्फेअर कामांवर किती खर्च झालेत इत्यादी.
असे वर्गीकरण कारणे अयोग्य आहे असे माझे तरी मत आहे
सरकार योग्य ठिकाणी खर्च करत आहे का?
दहा रुपयांची योजना आणि आठ रुपये आपसात वाटून तर घेत नाही ना?
हे दोनच प्रश्न महत्वाचे आहेत.
भारत संघ राज्य आहे
नियम नुसार ,कायद्या नुसार महसूल कोणता कोणी गोळा करायचा ह्याचे सूत्र ठरलेले आहे.
कोठून किती महसूल जमा होतो हेच सूत्र वापरायचे झाले तर महारष्ट्र मालामाल होईल.
केंद्र राज्यांना पैसे देते ह्याचे पण नियम आहेत त्या नुसार च देत असणार .
शेवटी महसूल हा देशाचा .
केजरीवाल ज्या लोकहितवादी योजना चालवत आहेत त्याचे पैसे भारत सरकार कडून जरी येत असतील तरी ऑब्जेक्शन का असावे.
दिल्ली भारतात च आहे ना.
गल्ली चुकली...
काही आयडी हुकलेले आहेत काय.
मला पण.
( हुकलेला ) जेपी
sunil kachure,
तुमच्या या विधानाशी पूर्णपणे सहमत आहे.
हेच बघा ना की, उत्तरप्रदेशाच्या लोकांनी २०१२ साली अखिलेश यादवास तरुण नेता म्हणून मोठ्या कौतुकाने निवडून दिलं होतं. सत्तेत आल्यावर लगेच मुझफ्फरनगरात दंगली झाल्या. जीवनावश्यक बाबींची पूर्ती करण्यासाठी लोकांचं जीवन ठिकाणावर हवं, बरोबर? पण त्याची हमी अखिलेश देऊ शकंत नाही. योगी आदित्यानाथ मात्र ती देतात. म्हणून लोकं योगींना मतं देतात. साधा हिशोब आहे.
आ.न.,
-गा.पै.
२०१२ मध्ये अखिलेश यादव मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नव्हता. निवडणूक झाली तेव्हा कधीही कुठेही अखिलेशचे नाव मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून पुढे नव्हते. तर पूर्वी मुख्यमंत्री असलेले आणि पक्षाध्यक्ष असलेले मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री होतील हेच चित्र होते. पण निवडणूक जिंकल्यावर आयत्या वेळी मुलायमसिंगांनी आपल्या मुलाचे नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे आणले.
चंद्रसूर्यकुमार,
तुमचं बरोबर आहे. अर्थात अखिलेश हा तरुण चेहरा म्हणून वापरण्यात आला होता हे नक्की. त्याच्या जोरावर मतं मिळालेली असावीत. मुलायम काय व अखिलेश काय, दोघेही पक्के हिंदूद्वेष्टे.
एक बातमी सापडली : https://www.firstpost.com/politics/akhilesh-yadav-sps-poster-boy-who-wo…
आ.न.,
-गा.पै.
बाकी सगळे जाऊ दे पण या निकालाच्या निमित्ताने शेतकरी आंदोलनवाले ग्रामीण अर्थरेकी तोंडावर आपटले आणि आमच्यासारखे शहरी अर्थरेकी ज्या बाजूने आहेत ती बाजू जिंकली.
गर्व से कहो हम शहरी अर्थरेकी है.
हा नवीन वाद निर्माण करून महानगर पालिका जिंकायच्या आहेत का?
जगातील एक देश अस्थिर झाला तर पूर्ण जग संकटात येते
ग्रामीण भाग योग्य स्थिती मध्ये नसतील से शहर नरक होतील
आणि शहर नसतील तर ग्रामीण भाग स्मशान होईल इतके ते एकमेकावर अवलंबून आहेत.
इतके किरकोळ गोष्ट समजत नसेल .
जगातील सर्वात खतरनाक अतिरेकी संघटना पेक्षा bjp समर्थक म्हणून जे असे मत व्यक्त करतात ते जास्त धोकादायक आहेतं.
ह्या लोकांच्या विचार समोर लादेन पण शांती प्रिय वाटावा.