जे न देखे रवी...

ओल्या खुणा

Primary tabs

हळव्या झाल्या काळजातल्या ओल्या खुणा
हृदयातला रेशमी घाव दाखवू कुणा

फुले शोधता लागला जिव्हारी काटा
डोळ्यातल्या दर्यात उसळती अश्रूंच्या लाटा

नभाच्या वेशीवर उदास रंग उतरे
उरी लागलेला बाण घेऊन रावा फिरे

हरवून दूर गेली ओळखीची वाट
मोरपीशी स्वप्नांचा कोसळू लागे तट

मावळतीच्या वणव्यात सूर्यबिंब जळून गेले
प्राणाच्या शेजेवर निखारे उधळून गेले

सुरसंगम

मस्त.

आवडली कविता.

मावळतीच्या वणव्यात सूर्यबिंब जळून गेले
प्राणाच्या शेजेवर निखारे उधळून गेले

खास.

-दिलीप बिरुटे

श्रीगणेशा

हळव्या झाल्या काळजातल्या ओल्या खुणा
हृदयातला रेशमी घाव दाखवू कुणा

मस्त!

चित्रगुप्त

काळजातल्या ओल्या खुणा हळव्या होणे - रेशमी घाव - फुले - जिव्हारी काटा- अश्रूंच्या लाटा - नभाची वेस - उदास रंग - उरी लागलेला बाण घेऊन फिरणारा रावा - हरवून दूर जाणे - मोरपीशी स्वप्ने - मावळतीच्या वणव्यात सूर्यबिंब जळून जाणे - प्राणाच्या शेजेवर निखारे उधळून जाणे --- या सगळ्या शब्दांच्या पसार्‍यातून कवीला नेमके झाले तरी काय आहे, हे आमच्यासारख्या अगदी गद्य, दळभद्री, गधड्या माणसाला कळणे कधीच शक्य नाही बुवा. तरी एकंदरित कविता वगैरे सुचणे, लिहीणे हे काहीतरी भारी काम असते, ते करू शकणारे लोक प्रतिभावंत वगैरे असतात, असे आम्हास वाटते, सबब आमुचा रामराम घ्यावा.

राघव

तुम्ही म्हणताय ते खरंय.. पण अगदी असेच असते असे मात्र नाही. अनेक जण खूप साधे शब्द वापरूनही रचना करत असतात.
अर्थात् शब्द सोपे असोत वा जड.. जर मुळात गाभा पोहोचत नसेल तर रचना वाया जाते हे मान्य. :-)