काथ्याकूट

१८५७ चे स्वातंत्र्य समर

Primary tabs

इंग्रजांच्या विरुद्ध लढलेल्या १८५७च्या स्वातंत्र्यसमराला बरीच वर्षे लोटली. इंग्रजांशी झुंजून त्यांना मागे रेटण्यात आपले स्वातंत्र्यवीर सफल झाले व आजच्याच दिवशी १६५ वर्षापूर्वी दिल्ली इंग्रजांपासून मुक्त झाली.
मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे ह्यांच्या सारख्या असंख्य हुतात्म्यांमुळे बहादूर शहा जफर भारताचा राजा झाला. भले सहाच दिवसांकरता पण झाला. इंग्रजांनी त्याचा पराभव करून दिल्लीवर परत ताबा मिळवला आणि भारताचे पहिले स्वातंत्र्य समर अयशस्वी ठरले.
इंग्रजांनी ह्या स्वातंत्र्य लढ्याला “काडतुसाला लागलेल्या गायीच्या व डुकराच्या चरबीमुळे झालेला उठाव” असे घोषित केले. इंग्रजांनी त्यांना सोयीस्कर असा इतिहास आपल्या गळी उतरवला. खरे काय घडले व किती प्रमाणात घडले ह्याचे आपल्या लोकांना अज्ञान होते व त्यामुळे ह्या लढ्याचे आपल्या लोकांना विस्मरण होऊ लागले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गेल्या शतकाच्या पहिल्या दशकात इंग्रज अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्रांचा व तपशिलांचा अभ्यास करून खरा इतिहास भारता समोर ठेवला. चरबीमुळे झालेला छोट्या स्वरूपाचा उठाव नव्हे तर १८५७चे स्वातंत्र्य समर हा इतिहास लोकांना दाखवून त्यांचे अज्ञान दूर केले. प्रयत्न केले तर स्वराज्य मिळू शकते हे लोकांना पटले. भारतीय जनतेला राणी लक्ष्मी, टोपे व मंगल पांडे ह्यांच्या हौतात्म्याचे स्मरण करून दिल्यामुळे पुढे प्रोत्साहित होऊन त्यांच्या नावाचा जयजयकार करीत व ओठावर बंकीम चंद्रांच्या वंदे मातरमचा उद्घोष करीत कित्येक भारतीयांनी आपले जीवन समर्पित केले.
स्वराज्य भिकेत मिळत नाही तर हिसकावूनच घ्यावे लागते हे समजावण्याचे काम १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याने केले. ह्याचे स्मरण म्हणून ११ मे हा दिवस भारतीय स्वातंत्र्य समर दिन म्हणून दर वर्षी साजरा झाला पाहिजे.

मला वाटते सावरकरांचे १८५७ च्या इतिहासाचे प्रयत्नां मुळेच मंगल पांडे राणी लक्ष्मी ह्या तेव्हाच्या लोकांच्या विस्मृतीत गेलेल्या स्मृतींना जाग आणून दिली गेली. आपल्याला काय वाटते

रणजित चितळे

विजूभाऊ मला लिंक दिल्या बद्दल धन्यवाद. वाचायला घेतले आहे

सहमत,
विजूभाऊंचे धागे वाचण्यास मीळाले.
स्वातंत्र्य लढा हे एक प्रेरणास्थान आहे. या मधे लखनौचे एक विषेश स्थान आहे. तत्कालीन ब्रिटिश मुख्यालय रेजीडेन्सी मधे झालेल्या भीषण लढाई वर अल्फ्रेड टेनिसन यांच्या "The defence of Lucknow ",पोवाड्यातील शब्द फिरंग्याची अगतिक आणी हतबल परीस्थीतीचे सटिक वर्णन करतात.

"Every man die at his post—and the foe may outlive us at last—
Better to fall by the hands that they love, than to fall into theirs!’

प्रत्येक जागेचा इतिहास वाचल्यानंतर अंगावर काटे उभे रहातात.

कंजूस

पण इथे विजुभाऊंनी एवढी चांगली लेखमाला लिहिली होती ते आताच कळले. संपूर्ण वाचेन.

सध्याच्या परिस्थितीत ब्रिटिशांना धुडकावले, धडा शिकवला पण जफर गेला हेसुद्धा बरेच झाले. दोन्ही शत्रूच होते.

विजुभाऊ

एक काव्यगत न्याय हुमायून चा मकबरा हे भारतातले मुघल साम्राज्यातले पहिले मॉन्यूमेंट.
बहादूरशहा जफरच्या समोर इंग्रजांनी त्याच्या मुलांना इथेच फाशी दिले आणि त्याला मंडाले येथे पाठवून मुघलांचे साम्राज्य कायमचे संपवले.

रणजित चितळे

विस्मृतीत गेली होती म्हणा मला दिसली नव्हती. अत्यंत सुंदर सुरवात. मी एक एक धागा वाचत आहे

सुरसंगम

कमाल आहे!
तुम्ही स्वतः २०११ तिथं प्रतिसाद दिलाय आणि नंतर ११ वर्षांनी मला दिसली नव्हती म्हणताय.
दोन सभासद रणजित चितळे आहेत काय?

चौथा कोनाडा

सहमत आहे. हा विजय साजरा झाला पाहिजे.

स्वा सावरकर यांच्यामुळे १८५७ कडे बघण्याची दृष्टी बदलली हे महत्त्वाचे आहे

जेम्स वांड

इंग्रजांनी ह्या स्वातंत्र्य लढ्याला “काडतुसाला लागलेल्या गायीच्या व डुकराच्या चरबीमुळे झालेला उठाव” असे घोषित केले. इंग्रजांनी त्यांना सोयीस्कर असा इतिहास आपल्या गळी उतरवला.

१८५७ साली हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये विरोधीपक्ष नेते आणि दोनवेळा ब्रिटिश पंतप्रधान असलेल्या बेंजामिन डीझरॅली ह्यांनी निःसंदिग्ध शब्दांत १८५७ चा उठाव हा एक राष्ट्रीय उठाव (नॅशनल अपरायझिंग) असल्याचे ब्रिटिश पार्लमेंटच्या कामकाजात बोलून ठेवलेले आहे.

अर्थात आपल्या गळी इतिहास चुकीचा उतरवलेला आहे हे नक्की, पण ब्रिटिश राजकीय व्यवस्थेतील एका महत्वाचा अधिकारी व्यक्तीने त्याच काळी भारतात विकासित झालेली (आधुनिक परिभाषेनुसार) राष्ट्रीय जाणीव ही नीट आकलन करून त्यांच्या संसदेत मांडली होती असे म्हणायला पूर्ण वाव आहे.

sunil kachure

हे ब्रिटिश विरुद्ध होते पण हेतू स्वतःचे राज्य वाचवणे हाच हेतू होता.
परकीय आक्रमण विरुद्ध भारतीय राजे महाराजे लढलेच नाहीत.
सत्य आहे मान्य करा.
अतिशय कमी संख्येने असणाऱ्या ब्रिटिश लोकं नी सहज भारत जिंकला.
अती स्वार्थी,भारतीय सत्ता धारी राजे महाराजे,बादशाह .
असल्या मुळेच

प्रचेतस

ह्या विषयावर कट्टर सावरकरवादी डॉ. शेषराव मोरे ह्यांनी लिहिलेलं १८५७ चा जिहाद हे पुस्तक वाचण्यासारखे आहे. मोरेंनी काढलेला निष्कर्ष कित्येकांना पटणार नाही पण ते संदर्भांशिवाय बोलत नाहीत.

हे पुस्तक वाचनात आलेले नाही पण तरीही माझ्या मोजक्या अभ्यासानंतर माहेही हेच मत बनले आहे कि १८५७ हे संनिकांचे बंड आणि त्यातही जिहादच होता !
अमेरिकन रिवोल्युशनरी वॉर च्या आसपासही जात नाही १८५७ चे जिहाद. १८५७ मध्ये एत्तद्देशीय लोकांचा पराभव झाला हे उत्तमच जाहले. मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले , दिल्ली ताब्यात घेतली तरीही हिंदुस्थान वरील मुघलांचा पगडा कमी झाला नव्हताच . मध्य भारतात निजामाचा माज होताच , दख्खन मध्ये हैदर आणि टिपु होतेच .
इंग्रजांनी भारतावरील इस्लामचा प्रभाव आणि वर्चस्व हटवण्याचे जे पुण्य कर्म केले आहे ते पेशव्यांना , राजपुतांना , जाट, अन शिखांना कदापि जमले नसते , बंगाली , अवधी , कन्नडिग तमिळ वगैरे लोकांचा विषयच सोडुन द्या !
इंग्रजांनी जाता जाता भारताची फाळणीही करुन दिली . आता आपले लोकं त्याचे खापर गांधी नेहरु सावरकर जिना वगैरे लोकांच्या माथी मारायचा प्रयत्न करतात पण प्रत्यक्षात हा इंग्रजांनी मारलेला मास्टरस्ट्रोक आहे . पाकिस्तानातील २२ अन बांग्लादेशातील १७ करोड लोकं आज जर भारतात असती ग्तर भारत अफगाणिस्तान इराण सिरीया सारखा असता ह्यात शंका नाही!

१८५७ चे बंड मोडणे हे ब्लेसिंग इन डिसगाईज आहे . तेव्हा इंग्रज जिंकले हेच उत्तम झाले. इव्हन २०० वर्षांची गुलामगिरी अन ४३ ट्रिल्यन डॉलरची लूट अन त्या बदल्यात भारताची फाळणी करुन देणे अन इस्लामचा प्रभाव नामशेष करुन देणे ही आजच्या काळातही उत्तम डील आहे ! नो बार्गेन नीडेड !!

मला हे पटत नाही. शिख किंवा मराठे हळू हळू ताकदवान होत होते. काही काळाने त्यांनी ईस्लाम चा पगडा कमी केलाच असता ह्यात ईंग्रजांना धन्यवाद देण्याची गरज नाही. मुस्लिमेतर कुणीही सत्तेवर बसला असता तर त्याने माज दाखवनार्या मुस्लिमाना धडा शिकवलाच असता. ईंग्रज जास्त ताकदवान होते म्हणून त्यांनी ही संधी लवकर साधली. काही काळाने मराठे नी शिखांनीही हे केलंच असतं.

माझा इतिहासाचा जास्त अभ्यास नाही पण जगात अन्यत्र कुठेही असे झाल्याचा पुरावा माझ्यातरी पाहण्यात नाही. हिंदुस्तानावरील इस्लामचा प्रभाव हटवणे शीख राजपुतांच्या जाट वगैरे लोकांच्या बस ची बात नव्हती आणि मराठ्यांच्या तर अजिबातच नव्हती.

एक स्पेन मध्ये मूर ह्या इस्लामी राजवटीला किंग ऑफ अ‍ॅरॅगॉन ने संपुर्ण संपवले तरीही स्पेन वर आजही इस्लामी प्रभाव आहे असे म्हणतात (ऐकीव माहीती. मला माहीत नाही मी स्पेन ला गेलेलो नाही.)
तुर्कस्तान इस्लाम सोडुन धर्मनिरपेक्ष झाला खरा पण त्यांच्यावरील इस्लामचा प्रभाव किती ठळक आहे हे सारी दुनिया जाणते .
स्थानिक सत्तांनी / धर्मानी इस्लामचा प्रभाव हटवुन दाखवल्याचे एक जरी उदाहरण आपल्या पाहण्यात असेल तर जरुर सांगा !

इस्लामचा प्रभाव हटवणे अशक्यप्राय आहे. जगात आजवर हे फक्त २ ठिकाणी घडले आहे आणि दोन्ही ठिकाणी फक्त इंग्रजांनीच करुन दाखवले आहे - एक म्हणजे भारत अन दुसरे म्हणजे इस्त्रायल !

इस्लाम हा निर्विवादपणे जगातील सर्वोत्तम "रीलीजन" आहे ह्यात शंका नाही , पुढील ३ ते ४ हजार वर्षात संपुर्ण जग (अस्तित्वात असेल तर) इस्लामी असेल ह्यात शंका नाही.

कंजूस

'म्युटिनी पेपर्स" फाईलींतून मिळालेला इतिहास "White Mughals" मधे दिला आहे. यामधे कुणाचा हेतू काय होता ते समजतंच. आणखी कुणी निष्कर्ष काढण्याची जरुरी नाही.

पण . . ASI कार्यालयाचा निषाकाळजीपणा पाहून darlymple चिडला होता. ओपन वरांड्यात कपाटे मांडून दिल्लीचा उन्हाळा सौम्य करण्याची युक्ती कर्मचारी वर्गास आहेच. मग अवकाळी पावसाने भिजलेले कागद वाळवायला ठेवले होते ते पाहून बरेच ग्रंथ ब्रिटिशांनी नेले ते बरेच म्हणायचे.

sunil kachure

ब्रिटिश लोकांनी भारत ताब्यात घेणे ही गोष्ट भारतासाठी फायद्याची ठरली.
भारत च नाही तर अनेक देश ब्रिटिश सत्तेखाली होते .
त्यांचा पण इतिहास भूगोल त्या मुळे बदलला.
पण भारता विषयी बोलायचे झाले तर..
ब्रिटिश नी भारत जिंकला नसता तर आज पण जितक्या भूमी वर एका केंद्रीय सत्तेचा अधिकार चालतो.
आणि देश म्हणून जो देशाचा भूगोल आहे तो ब्रिटिश आले नसते तर तसा नसता.
अनेक राजे महाराजे भारतात असते.
प्रतेक चे राज्य वेगळे म्हणजे वेगळे देश च.
मुस्लिम लोकांनी भारत ताब्यात घेण्याची शक्यता पण होतीच..लोकशाही ही ब्रिटिश लोकांचीच देणगी आहे.
ते आले नसते तर. भारतात लोकशाही आज पण आली नसती.
आणि दुसरी दैवी घटना म्हणजे पाहिले आणि दुसरे महायुध्द..ही दोन्ही युद्ध झाली नसतो तर ब्रिटिश नी कोणत्याच देशावर्चा ताबा सोडला च नसता.

sunil kachure

भारतीय लोकांची वृत्ती दाखवणारे उदाहरण आहे.
काल च यूट्यूब वर व्हिडिओ बघितला.
सत्य असत्य माहीत नाही.
लोकमान्य टिळकांच्या मुलाने टिळक गेल्या नंतर आठ वर्षात च आत्महत्या केली .
त्या वर तो व्हिडिओ होता.