राजकारण

ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ५)

Primary tabs

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती. अन्यथा महिन्याच्या २७ तारखेला नवा भाग काढला नसता पण यावेळी घडामोडी खूप वेगाने होत असल्याने या भागातही १५० प्रतिसाद झाले तर नवल वाटायला नको.

काल लोकसभेच्या ३ जागा आणि विविध राज्यातील विधानसभांच्या ७ जागांच्या पोटनिवडणुकांसाठी मतमोजणी झाली. लोकसभेच्या तीनही जागांचे निकाल धक्कादायक लागले आहेत.

२०१९ मध्ये पंजाबमधील संगरूर लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे भगवंत मान निवडून गेले होते. ते पक्षाचे लोकसभेतील एकमेव खासदार होते. मार्च महिन्यात पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ही पोटनिवडणुक आम आदमी पक्षासाठी प्रतिष्ठेची होती. तिथून माजी आय.पी.एस अधिकारी आणि अकाली दल (अमृतसर) या गटाचे नेते सिमरनजीतसिंग मान यांनी आम आदमी पक्षाचे गुरमेल सिंग यांचा ५८२२ मतांनी पराभव करून खळबळ माजवून दिली. या मतदारसंघातून शिरोमणी अकाली दलाने पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिअंतसिंग यांच्या हत्येसाठी तुरूंगात असलेल्या बलवंतसिंग राजोनाची बहिण कमलजीत कौर राजोनाला उमेदवारी दिली होती तर भाजपने २०१९ मध्ये भगवंत मान यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार म्हणून पराभूत झालेल्या केवलसिंग धिल्लो यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसने माजी आमदार दलवीरसिंग खंगुरा (गोल्डी) यांना उमेदवारी दिली होती. इतर तीनही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. सिमरनजीतसिंग मान यांनी १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टारच्या निषेध करण्यासाठी त्यांनी आय.पी.एसचा राजीनामा दिला होता. नंतरच्या काळात ते खलिस्तानचे समर्थक आहेत असे आरोपही झाले होते आणि त्यात तथ्यही होते. २०१८ मध्ये उत्तर प्रदेशात गोरखपूर आणि फुलपूर या अनुक्रमे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी रिकाम्या केलेल्या जागेवर भाजप उमेदवारांचा पराभव झाला त्याच्या आदल्याच वर्षी भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक जवळपास चार-पंचमांश बहुमताने जिंकली होती. तशीच आम आदमी पक्षाने २०२२ ची पंजाब विधानसभा निवडणुक जिंकली आहे. २०१८ मध्ये योगींना दणका, योगींची (आणि मोदींची) लाट ओसरली वगैरे बरेच चर्वितचर्वण झाले होते तसे आम आदमी पक्षाचा तीन महिन्यातच हा पराभव झाल्यानंतर होते का हे बघायचे.

उत्तर प्रदेशात आझमगड आणि रामपूर या दोन लोकसभा जागांचे निकालही असेच खळबळजनक आहेत. २०१९ मध्ये आझमगडमधून अखिलेश यादव अडीच लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकले होते. त्या जागेवर भाजपच्या दिनेशलाल यादव निरहुआ यांनी यादव कुटुंबातील धर्मेंद्र यादव यांचा जवळपास ८ हजार मतांनी पराभव केला. अखिलेशना २०१९ मध्ये मोठे मताधिक्य मिळाले होते त्यात बहुजन समाज पक्षाच्या मतांचा वाटा मोठा होता असे दिसते. या मतदारसंघात बसपाचा जोर आहे. पूर्वी ही जागा बसपाने जिंकली पण आहे. आता पक्षाची बरीच पडझड झाली असली तरी बसपाने आपली मते राखली आहेत. सपा-बसपा मधील मतविभागणीचा फायदा भाजपला मिळाला असे दिसते.

रामपूरमधील निकाल अजून धक्कादायक आहेत. हा लोकसभा मतदारसंघ मुस्लिमबहुल आहे. इथून भाजपने पूर्वी विजय मिळवला आहे पण त्यावेळेस सपा/बसपा/काँग्रेस यांच्यातील मुस्लिम मतदारांमध्ये मते विभागली जाऊन त्याचा फायदा भाजप उमेदवाराला मिळाला आहे. पण यावेळेस तसे झालेले नाही. बसपा आणि काँग्रेसने इथून उमेदवार दिला नव्हता. तसेच तीन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बघितलेल्या कलाप्रमाणे समाजवादी पक्षामागे मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होणे अपेक्षित होते. तसेच २०१९ मध्ये ही जागा समाजवादी पक्षाच्या आझमखानने जिंकली होती त्याचाही त्या भागात जोर आहे. असे असताना सपाचा उमेदवार आरामात जिंकेल असे वाटत होते. पण भाजपच्या घनश्याम लोधींनी जवळपास ५२% मते मिळवत ही जागा आरामात जिंकली.

विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये त्रिपुरात ४ पैकी ३ जागा सत्ताधारी भाजपने तर एक जागा काँग्रेसने जिंकली. भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री माणिक साहा यांचाही समावेश आहे. काँग्रेसने आगरतळ्याची जागा जिंकली. या जागेवरून २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये जिंकलेल्या भाजप उमेदवाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याने ही पोटनिवडणुक जिंकली. उरलेल्या तीन विधानसभा जागा त्या त्या राज्यातील सत्ताधारी पक्षांनी जिंकल्या. आंध्र प्रदेशातील आत्माकूरमधून वाय.एस.आर काँग्रेसने, दिल्लीतील राजिंदर नगरमधून आम आदमी पक्षाने तर झारखंडमधील मंदार या जागेवर काँग्रेसने विजय मिळवला.

गामा पैलवान

लोकहो,

गुवाहाटी येथे गेलेले वा नेलेले आमदार सुस्थितीत नाहीत म्हणे ? हे खरंय का ? : https://www.loksatta.com/mumbai/maharashtra-political-crisis-congress-n…

हे जर खरं असेल तर संजय राऊत म्हणतात ते चाळीस मुडदे वगैरेचा अर्थ वेगळा होतो.

आ.न.,
-गा.पै.

क्लिंटन

१. अनास्थशायी? याचे मराठी भाषांतर कुठे करून मिळेल?
२. त्याहूनही महत्त्वाचे- नाना पटोलेना तुम्ही इतक्या गांभीर्याने घेता?

सुबोध खरे

हायला

संपादक महाशय भरपूर हवेत बार काढत होते आता नाना सुद्धा?

या आमदारांना मारहाण होत असेल किंवा इंजेक्शन देत असतील तर त्यांच्या एक तरी नातेवाईकाने उच्च न्यायालयात रिट अर्ज केला आहे का?

कुठल्या तरी भिन्न जाती धर्माच्या जोडप्याला त्यांचे नातेवाईक वेगळे करत असतील तरी उच्च न्यायालये रिट अर्ज दाखल करून घेउन ताबडतोब जोडप्याला संरक्षण देण्याचा हुकूम देतात.

इथे कुणाच्याहि नातेवाईकाने महाराष्ट्रात कोणत्याही पोलीस स्थानकात खंडपीठासमोर असा रिट अर्ज केलेला नाहीये.

नाना पटोले असे धडधडीत खोटे अडाणी लोकांसाठी बोलत आहेत हे सरळ आहे

आणि

@गामा पैलवान तुम्हाला ते खरे आहे असे वाटतंय?

धन्य आहे

सुक्या

पुर्वी म्हणजे काही वर्षापुर्वी जेव्हा दळणवळण आतासारखे गतीमान नव्हते तेव्हा ह्या बाता खपुन जात. एखाद्या नेत्याने केलेल्या अशा विधानांची सत्यासत्यता तपासणे अवघड असे. आतच्या काळातही काही लोक अशी बेताल वक्त्यव्ये करतात तेव्हा त्यांच्या अडाणीपणाची कीव येते.

गामा पैलवान

सुबोध खरे,

अहो, शंकानिरसन करून घेतलेलं बरं. नाहीका?

आ.न.,
-गा.पै.

विजुभाऊ

मुख्यमंत्री म्हणतात की या समोर बसून बोलुया. चर्चेने प्रश्न सोडवता येतात.
आणि तिकडे अलिबागला राउत म्हणतात शिवसैनीक तयार आहेत. यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे.
यात खरे कोण आणि खोटे कोण तेच कळायला मार्ग नाही.
दुसरे महत्वाचे म्हणजे राउत असे बोलत राहिले तर कोण येईल मुख्यंत्र्यांशी चर्चा करायला
राउतांनाच ते आमदार परत यायला नको आहे असे दिसतेय.

श्रीगुरुजी

राउतांनाच ते आमदार परत यायला नको आहे असे दिसतेय.

हेच मी आधी लिहिलंय.

Doga

ते भाजप चा कार्यक्रम करणार आहेत. शिवाजी महाराजान्ना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा त्यान्निच दिली. पवार साहेबान्च्या मदतीने ते उद्धव्जीन्ना पन्तप्रधान बनवणार आहेत.
-टमरेलेन्द्र खाउगल्ली

श्रीगुरुजी

खैरेंना ठाकरेंनी केव्हाच अडगळीत फेकून दिलंय. त्यांना आता राजकारणात भवितव्य नाही. परंतु ते राऊतांचे अनुकरण करून ठाकरेंना खुश करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

https://www.loksatta.com/maharashtra/chandrakant-khaire-allege-7-thousa…

सुक्या

एकंदरीत शिवसेना नेत्यांची भाषा पाहता राउतांना भविष्यात नंबर एक राहण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील असे दिसतेय!!

श्रीगुरुजी

३० जूनला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून त्यात विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्या - राज्यपालांचा आदेश

श्रीगुरुजी

ही बातमी खोटी आहे असं राजभवनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.

अटलबिहारी वाजपेयी व सोनिया गांधी सुध्दा ह्या अश्या परिस्थितीतुन गेल्या आहेत.अटलबिहारी वाजपेयींचे सरकार केवळ १ मताने कोसळले तेव्हा अटलजींनी ग्रेसफुली पायउतार व्हायचा निर्णय घेतला होता. त्यावेळे त्यांनी केलेले त्यांचे भाषण गाजले. हीच गोष्ट सोनियाजींची.अंतरात्मा कि आवाज आठवत असेल. स्वतः पुढे न येता मनमोहनसिंगजींना पंतप्रधान केले. हीच संधी उध्द्वजींना पण होती पण बहुदा सत्तेला चिकटुन कसे राहायचे ह्या एकाच बाबतीत वाकबगार असलेल्या नेत्याच्या संगतीमुळे अथवा त्यांच्याच सल्यामुळे असेल कदाचित सध्याची परिस्थिती ओढवुन ठेवली आहे. माझ्यामते मा.बाळासाहेबांनी सुध्दा एकेकाळी शिवसेनेशी माझा संबंध संपला अशी एकदा भूमिका घेतली होती व त्यानंतर शिवसैनिकांना त्यांची मनधरणी करावी लागली होती. इथेही त्याग करुन मोठेपण घेण्याची उध्द्ववजींना संधी होती असे वाटते.

अश्या सर्व संध्या त्यांनी लाथाडाव्यात, तिकडे ते मनोहर पर्रीकर चालता येत नव्हते तर सलाईन ची बाटली हातात धरून सभागृहात आले होते पण मामूपद सोडलं नव्हतं, पण सत्तेत चिकटून राहन्याची वगैरे टिका नेहमी अभाजपेयींवर होते म्हणून महान वगैरे न बनायचा प्रयत्न करता ऊध्दव ठाकरेंनी शेवट पर्यंत लढावं. पाहुयात, ईडी, भाजप, बंडखोर, सीबीआय, राज्यपाल जिंकतात की महाराष्ट्र.

यश राज

ऊध्दव ठाकरेंनी शेवट पर्यंत लढावं. पाहुयात, ईडी, भाजप, बंडखोर, सीबीआय, राज्यपाल जिंकतात की महाराष्ट्र.

ठाकरे जिंकले म्हणजे महाराष्ट्र जिंकला का किंवा हरले तर महाराष्ट्र हरला का? कै च्या कै लॉजिक.
उ ठा किंवा म वि.आघाडी म्हणजे काही महाराष्ट्र नाही. आम्ही म्हणजे महाराष्ट्र, भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई म्हणजे महाराष्ट्राचा अपमान ,पुरोगामित्व ई ई हे फक्त मेळाव्यात भाषणं जडबदक करण्यासाठी वापरलेले शब्दच आहेत बाकी काही नाही.

मुंबईतून कार्यालये गुजरातला हलवणे हे भाजपचे काम. त्याला विरोध केला शिवसेनेने म्हणून सेना म्हणजे महाराष्ट्र.

सुबोध खरे

सेना म्हणजे महाराष्ट्र.

आणि इन्दिरा इज इन्डीया

शिवाजी महाराज, संभाजी महाराज , बाजीराव पेशव्यापासून अहिल्याबाई होळकर,

ज्ञानेश्वर तुकाराम पासून गाडगेबाबा पर्यंत सर्व संत,

शाहू, फुले आंबेडकर

वासुदेव बळवंत फडके पासून सावरकर लोकमान्य टिळक पासून ते संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले बलिदान देणारे हुतात्मे,

श्री पा वा काणे पासून श्रीमती लता मंगेशकर, श्री भीमसेन जोशी सारखे भारतरत्न या सर्व महाराष्ट्रातील दिग्गजांना

आणि

तळागाळातील सामान्य जनता पासून महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणाऱ्या सर्व लहान मोठ्या माणसांपर्यंत

आपण एका लेखणीच्या फटकार्यात नष्टप्राय करून टाकलेत

बाळा साहेब ठाकऱ्यांच्याच शब्दात

अरे चाटायची तरी किती ? जिभेला काही विश्रांती तरी द्याल कि नाही

अरे चाटायची तरी किती ? जिभेला काही विश्रांती तरी द्याल कि नाही हेच म्हणतो. किती भाजपमाता की जय म्हणाल?? कधीतरी भारत माता की जय देखील म्हणा.

अहो साहेब इतकेही सैरभैर होऊ नका. वर मी प्रतिसादात सोनियाजींबद्दल हि लिहिलेले आहे.त्यांनीही वेळेची नजाकत ओळखुन असा निर्णय घेतला कि त्यात फक्त भाजपेयीच नव्हे तर सारेच विरोधी चारी मुंड्या चीत झाले व पुढची १० वर्ष बोटे मोडत बसले.

गामा पैलवान

वविजुभौ,

राउत असे बोलत राहिले तर कोण येईल मुख्यंत्र्यांशी चर्चा करायला

मला वाटतं हे Carrot and Stick Policy च्या जवळपास जाणारं धोरण आहे. निक्सनच्या वेळेस ही संज्ञा प्रचलित केली गेलेली होती (चूभूदेघे).

आ.न.,
-गा.पै.

कंजूस

तो तरी ऐका.
उद्ववला वाचवा.
महाराष्ट्राला वाचवा.
(आम्हाला ही वाचवा.)

निनाद

अलीकडे, ट्विटर इंडियाने लिंक्स आणि ट्विटसह अनेक पाकिस्तानी खाती ब्लॉक केली आहेत . ही सर्व खाती पाकिस्तान सरकारची आहेत. याशिवाय, ट्विटर इंडियाने यूएन, तुर्की, इराण आणि इजिप्तमधील पाकिस्तानी दूतावास आणि देशाचे सार्वजनिक प्रसारक, रेडिओ पाकिस्तान यांच्या खात्यांवरही बंदी घातली आहे.

भारतीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यापूर्वी YouTube बातम्यांचे व्हिडिओ ब्लॉक केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. पाकिस्तान आधारित चॅनेल होते ज्यात भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या विरोधात प्रपोगंडा पसरवला गेला होता. ब्लॉक केलेले यूट्यूब चॅनेल भारतामध्ये असंतोष भडकवून दहशत निर्माण करण्यासाठी आणि लोकांना चिडवण्यासाठी दिशाभूल करणारी माहिती पसरवत होते.

आजही जगात पाकिस्तान प्रणित फेक न्यूजची समस्या सध्या वाढत आहे. याचा उगम पाकिस्तान आहे. हे सर्व भारतविरोधी सामग्रीने भरलेले आहेत असे दिसून येते.

मदनबाण

बहुतांशी आमदार विरोधात गेले तरीही मुख्यमंत्रीपदाला लोंंब़कळून राहणारे देशातच्या ईतिहासातले उद्धव एकमेव मुख्यमंत्री असावेत. ५% जरी स्वाभीमान असता तर राजीनामा दिला असता.
दर चार वाक्यांमागे शाहू-फुले आंबेडकरांचे नाव घेणारे महान पत्रकार निखिल वागळे अजूनही गप्प आहेत.
लोकांना' तेलाचे जागतिक अर्थकारण' शिकवणार्या दीड शहाण्या गिरीश कुबेराना ई.डी.ने केलेली कारवाई 'ईडीचा दट्ट्या' वाटतो.

क्लिंटन

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या सरकारने उद्याला (३० जूनला) विधानसभेत बहुमत सिध्द करावे असे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी दिले आहेत. काल रात्री असा आदेश आल्याचे वृत्तवाहिन्यांवर सांगितले गेले होते पण त्या बातमीचे राजभवनमधून खंडन केले गेले. त्याचे कारण बहुदा त्या आदेशावर राज्यपालांची सही व्हायच्या आधीच 'सूत्रांच्या' हवाल्याने वृत्तवाहिन्यांनी ती बातमी दिली हे असावे.

सभागृहाचे कामकाज सकाळी ११ ला सुरू झाल्यानंतर संध्याकाळी ५ पर्यंत संपवावे आण्णि कोणत्याही परिस्थितीत सभागृहाचे कामकाज स्थगित करू नये असे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. जुलै २०१९ मध्ये कर्नाटकात ह.दो.कुमारस्वामींच्या सरकारवर असाच विश्वासदर्शक ठराव आला असताना वेळकाढूपणा चालू होता त्याची पुनरावृत्ती व्हायला नको म्हणून राज्यपालांनी हे आदेश दिलेले दिसतात.

बाकी वृत्तवाहिन्यांवर काहीकाही गोष्टी अगदी चुकीच्या सांगतात त्याचे प्रत्यंतर ही बातमी बघताना आहे. The house shall not be adjourned for any reason चे मराठी भाषांतर अबप माझावाल्यांनी 'कोणत्याही परिस्थितीत विधानसभा बरखास्त केली जाऊ नये' असे केले. Adjournment म्हणजे विधानसभेची बरखास्ती नव्हे तर कामकाजाला दिलेली स्थगिती. दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे.

क्लिंटन

एकनाथ शिंदे त्यांच्या गटाच्या सगळ्या आमदारांना घेऊन उद्याच मुंबईत दाखल होणार आहेत. खरं तर ते आजच मुंबईत आले तर चांगले होईल. आसामात पाऊस दणकून पडतो नेमका तसा पाऊस उद्या पहाटे पडला आणि विमानाचे उड्डाण होऊ शकले नाही किंवा मुंबईतही पाऊस असेल आणि विमान उतरवता आले नाही म्हणून ते दुसरीकडे वळवले असे काही झाल्यास सगळ्या आमदारांना सभागृहाच्या कामकाजापासून वंचित राहायची वेळ येऊ शकेल. अशा वेळी एक दिवस किंवा निदान काही तास तरी अंगावर असलेले चांगले.

एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या मंदिरात दर्शनाला गेले होते त्यानंतर वार्ताहारांशी बोलताना त्यांनी उद्या मुंबईत येत असल्याची माहिती दिली.

श्रीगुरुजी

राज्यपालांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन बोलावले आहे. ठाकरे सरकारला उद्या संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वी सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. कोणत्याही परिस्थितीत बहुमत चाचणी प्रक्रिया पुढे ढकलता येणार नाही. तसेच सभागृह तहकूब करता येणार नाही. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात येणार आहे, अश्या सूचनाही राज्यपालांनी पत्रात दिल्या आहेत.

उद्या अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ठाकरे राजीनामा देतील असं वाटतंय. त्यापूर्वी आज मंत्रीमंडळाची बैठक घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी, कोणत्या तरी समाजगटावर सवलतींची खैरात असे काहीतरी सवंग लोकप्रियतेचे निर्णय घेऊन पुढील सरकारला सत्तेत येण्याआधीच संकटात टाकण्याची व्यवस्था करतील.

इरसाल

मोठ्ठ्ठ्ठ्त्ठा कोरोना, माईल्ड हार्टअटॅक, गुवाहाटी रिटर्न आमदार गायब केले किंवा मोठी दंगल याने बहुमत चाचणी पुढे ढकलता येईलच ना? (नाही चाणक्यांचे चाणक्य श्री श्री श्री प. पु. काका आहेत सोबतीलाम्हणुन एक आपली (कु) शंका))

क्लिंटन

राज्यपालांच्या आदेशाचे पालन करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य असते. जर ते कर्तव्य पार पाडण्यात राज्य सरकार चुकले तर कलम ३५६ अंतर्गत राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावता येऊ शकेल. सगळ्या मंत्र्यांना एकाच वेळेस कोरोना किंवा इतर काही वैद्यकीय समस्या उद्भवणार नाही.

इरसाल

धन्यवाद.
म्हणजे नाटकं करायचा चान्स नाही एकंदरीत. भारीच.

सुबोध खरे

MVA will have to move SC against Governor's letter for floor test, says Congress' Prithviraj Chavan

हे म्हणजे

धरलं तर चावतं

आणि

सोडलं तर पळतं

अशी स्थिती झाली आहे.

बाहेर मोठा भूभू:कार करायचा आमच्या कडे बहुमत आहे

आणि

बहुमत सिद्ध करायला सांगितलं कि सर्वोच्च न्यायालयात आवस मागायला जायचं

श्रीगुरुजी

अजित पवार व भुजबळांना कोरोना झाल्यामुळे ते उद्या अधिवेशनात येणार की नाही याविषयी संभ्रम आहे. अर्थात त्यांना मत देण्यासाठी काही तास अधिवेशनात आणण्याची विशेष व्यवस्था करता येईल.

मलिक व देशमुख तुरूंगात असले तरी त्यांना मत देण्यासाठी काही तासांपुरते तुरूंगातून सोडतील असा माझा अंदाज आहे.

महाराष्ट्रात यापूर्वी कधीही विश्वासदर्शक किंवा अविश्वासदर्शक ठरावावर मतविभागणी होऊन सरकार पराभूत झाले नव्हते. यावेळी काय होईल ते उद्या समजेलच.

उद्याचे अधिवेशन रद्द करावे यासाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

सुबोध खरे

उद्याचे अधिवेशन रद्द करावे यासाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

पहा

मी काय म्हणत होतो ते

क्लिंटन

अपेक्षेप्रमाणे उध्दव ठाकरे आजच राजीनामा देतील असे 'सूत्रांच्या' हवाल्याने लोकमत न्यूजवर आले आहे. माझीच माणसे माझ्याविरोधात मतदान करताना मला बघायचे नाही असे त्यांनी जवळच्या लोकांशी बोलताना म्हटले आहे अशी 'सूत्रांची' बातमी आहे.

विजुभाऊ

हे म्हणजे एका आठवड्यात तिसर्‍यांदा राजिनामा देण्याचे ठरवतात. दरवेळेस बारामतीच्या काकांमुळे देण्याचे टाळतात

श्रीगुरुजी

पक्षफूट टाळायची असेल ठाकरेंनी राजीनामा देऊन भाजप सरकारला पाठिंबा द्यावा. तसेही त्यांना अडीच वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्रीपद मिळाले आहे जी त्यांची मूळ मागणी होती. तसेच भाजप सरकारला यांच्या पाठिंब्यावर अवलंबून रहावे लागेल.

जर विश्वासदर्शक ठराव मान्य झाला नाही तर पक्षही फुटलेला असेल व मुख्यमंत्रीपद व सत्ताही गेलेली असेल.

Trump

पक्षफूट टाळायची असेल ठाकरेंनी राजीनामा देऊन भाजप सरकारला पाठिंबा द्यावा. तसेही त्यांना अडीच वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्रीपद मिळाले आहे जी त्यांची मूळ मागणी होती. तसेच भाजप सरकारला यांच्या पाठिंब्यावर अवलंबून रहावे लागेल.

+१
दुर्देवाने श्री उठा यांना चांगले सल्लागार नाही आहेत. त्यामुळे ते श्री सरा आणि श्री शप ह्यांच्यावर अवलंबुन आहेत.

पक्षफूट टाळायची असेल ठाकरेंनी राजीनामा देऊन भाजप सरकारला पाठिंबा द्यावा
आजीबात नको. ठाकरेंनी काही झाले तरी भाजपला पाठींबा देऊ नये. नाहीतर ठाकरे आमदारांपुढे झूकले असा संदेश सामान्य शिवसैनिकात जाईल, त्यामुळे सेनेत ठाकरेंपेक्षा आमदारांचे वजन वाढेल. हे आमदार गेले तरी चालतील ह्यातील बहुतांश सोनेच्या जिवावर जिंकलेले आहेत. सेना त्या जागी नवे आमदार निवडूण आणू शकते. ठाकरे आमदार किंवा भाजप पुढे झूकले की सेना संपलीच म्हणून समजा.

जर विश्वासदर्शक ठराव मान्य झाला नाही तर पक्षही फुटलेला असेल व मुख्यमंत्रीपद व सत्ताही गेलेली असेल. ते चालेल. सत्ता येत जात असते. पण सेनेच्याच आमदारांमुळे सत्ता गेली तर ह्या आमदारांची चांगलीच बदनामी होनार. त्यातही विश्वासदर्शक ठरावावेळी किती आमदार खरोखर भाजप नी बंडखोरांसोबत आहे हे देखील कळेल. सुदैवाने काही आमदारानी मविआ च्या बाजूने मतदान केले नी सरकार तरले तर मग एकनाथ शिंदे नी ईतरांचे काय होते हे पाहणे मजेशीर असेल.

सुरसंगम

आजीबात नको. ठाकरेंनी काही झाले तरी भाजपला पाठींबा देऊ नये. नाहीतर ठाकरे आमदारांपुढे झूकले असा संदेश सामान्य शिवसैनिकात जाईल, त्यामुळे सेनेत ठाकरेंपेक्षा आमदारांचे वजन वाढेल.>>>>

१००% सहमत आता ती वेळ निघून गेलेली आहे.
त्यात निष्ठासाठी दोन्ही बाजूच्या सा. का. नी एकमेकांची डोकी फोडलीत.

इरसाल

दुर्देवाने श्री उठा यांना चांगले सल्लागार नाही आहेत. त्यामुळे ते श्री सरा आणि श्री शप ह्यांच्यावर अवलंबुन आहेत.
असं कसं असं कसं, इथेच मिपावर आहेत ना ते दोन जण "झुल्पिकार तलवारी" घेवुन फिरत असतात ते. ते चांगले सल्लागार होवु शकतील "उठां"चे (ज्यांना त्यांचेच आमदार " आता तरी उठा...(तुमचा बाजार उठण्या आधी उठा)अस म्हणत आहेत)

कोशारी यांनी फडणीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १४ दिवस दिले होते...
https://www.hindustantimes.com/india-news/in-his-quiet-invite-governor-g...
त्याच कोशारी यांनी आज उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ १ दिवसाची मुदत दिली आहे.

राज्यपालपद हे तटस्थपद असते असं मा आतापर्यंत वाचले होते.
आपल्याला खोटा ईत्हास शिकवला जातो असं आता पर्यंत ऐकून होतो. खोटं नागरीकशास्त्रही शिकवलं जातं का?

सुबोध खरे

सेना म्हणजे महाराष्ट्र आहे ना ?

मग उद्धव साहेब म्हणतात ती पूर्व दिशा नाही का?

नागरिकशास्त्र तर कुठेच नाही

शाम भागवत

मंत्री मंडळात खालील नामांतर प्रस्ताव मंजूर झाले
औरंगाबादचे संभाजीनगर
नवी मुंबई विमानतळाचे दि बा पाटील विमानतळ
उस्मानाबादचे धाराशीव

विजुभाऊ

पुण्याचे नाव जिजाऊनगर करा असा एक प्रस्ताव काँग्रेसकडून आला होता

श्रीगुरुजी

एखाद्या शहराचे किंवा विद्यापीठ वगैरे संस्थांचे नामांतर केले किंवा एखाद्या समाजगटाला राखीव जागा दिल्या तर पुढील निवडणुकीत सरकार जाते हे इतिहासात अनेकदा घडलंय.

उदा. १९७८ व १९९४ मध्ये मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर, २०१४ मध्ये पुणे विद्यापीठाचे नामांतर, २०१९ मध्ये सोलापूर विद्यापीठाचे नामांतर.

डँबिस००७

नुपुर शर्माच्या तथाकथित प्रेषिताच्या अवमानना केस नंतर त्याचा बदला घेण्यासाठी राजस्थान मधिल उदयपुर ईथल्या कन्हय्या नावाच्या सामान्य टेलरला आपला जिव गमवावा लागला.
महम्मद रियाझ व मुहम्मद गौस नावाच्या दोन ईसमांनी कन्हय्याच्या दुकानात घुसुन क्रुरपणे त्याचा जिव घेतला. जिव घेतला म्हणजे त्याचे डोके उडवुन टाकले.

ह्या प्रकारानंतर व्हिडीयो बनवुन उघडपणे ह्या गुन्ह्याची कबुली दिली. हे दोघेही कन्हय्याच्या शेजारीच रहातात. कन्हय्याने नुपुर शर्माचा वक्तव्याला पाठींबा दिला किंवा नाही हा प्रश्नच नव्हता. तो हिंदु होता हाच त्याचा गुन्हा होता.

हे दोघेही स्लिपर सेलचे सभासद असुन त्यांना कराचीतुन आदेश येतात. ह्यातला मुहम्मद गौस नावाच्या माणसाने पाकिस्तानात जाऊन ट्रेनिंग घेतलेली होती. त्या नंतर तो नेपाळा, साऊदी अरेबिया ईथे जाऊन आलेला आहे.

राजस्तान सरकारने ह्या गुन्ह्यानंतर नेहमी प्रमाणे आपले हात झटकुन टाकलेले आहेत. उलट केंद्र सरकारलाच राज्य सरकारने जवाबदार धरलेल आहे.

राजस्तान सरकारने ह्या गुन्ह्यानंतर नेहमी प्रमाणे आपले हात झटकुन टाकलेले आहेत. उलट केंद्र सरकारलाच राज्य सरकारने जवाबदार धरलेल आहे. शेवटी आलंच. मुख्यमंत्री गेहलोत ह्यानी ह्या दोघाना पकडनार्या पाच पोलिसांना बढती दिलीय.

वामन देशमुख

शेवटी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे.