Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लाल सिंग चढ्ढा

स
सोत्रि
Sun, 08/14/2022 - 11:28
💬 207 प्रतिसाद
बहिष्काराच्या गदारोळात अडकलेला आणि त्यामुळे गाजावाजा झालेला लाल सिंग चढ्ढा सिनेमा पाहायचा की नाही ह्या वादात न पडता एक सिने कलाकृती म्हणून जमलेच तर हा सिनेमा बघायचे ठरवले होते. पण ह्या बहिष्काराच्या गदारोळाने माझाही किंचितसा बेंबट्या झाला होता बरं का, उगाच खोटं का बोला. अमिरमुळे नाही, पण करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर ते एक असो. काल हा सिनेमा बघितला. ज्या मूळ सिनेमाचे, फॉरेस्ट गंपचे, रीतसर हक्क विकत घेऊन हिंदीत पुनर्निर्मिती केली, तो सिनेमा बघून बराच काळ लोटल्याने तो सिनेमा विस्मृतीत जाऊन तपशील आठवत नव्हते. पण ते बरंच झालं, लाल सिंग चढ्ढा फॉरेस्ट गंपच्या छायेत न बघता स्वतंत्र सिनेमा म्हणून बघता आला. सिनेमा प्रचंड आवडला. अतिशय शांत वाहणाऱ्या नदीप्रमाणे प्रवाही आणि संयत कथानक एक स्वच्छ आणि मन शांत करणारा अनुभव देऊन जातं. आलिकडच्या वेब सिरीजच्या अंगावर येणाऱ्या अतिरंजित कथानकांच्या पार्श्वभूमीवर ह्या सिनेमाचे कथानक एका मंद हवेची झुळूक यावी तसे वाटते. अतुल कुलकर्ण्यांना लेखनाचे पैकीच्या पैकी मार्क. १९७१ ते २०१८ ह्या काळातल्या महत्त्वाच्या घटनांची गुंफण कथानकात एकजीव होऊन एकदम फक्कड जमलीय. ह्या सगळ्या घटनांचा साक्षीदार असल्याने त्या जुन्या आठवणी जाग्या होऊन दर्शक सिनेमात (पक्षी: लालसिंगच्या गोष्टीत) गुंतत जातो. लाल सिंग चढ्ढा पंजाबी असल्याने सिनेमात पंजाबी भाषेचा तडका आहे आणि तो त्या भाषेच्या लहेजामुळे लाल सिंग चढ्ढाच्या व्यक्तिमत्त्वाला उचलून धरून खुलवतो. सर्वच कलाकारांनी समरसून कामं केलीत. अमीर त्याचं काम चोख पार पाडणार होताच आणि तो ते तसंच पार पाडतो. लाल सिंग चढ्ढाच्या पात्राची निखळता, वेगळेपण आणि त्यातले पैलू दाखवणं आमिरसारख्या कसदार अभिनेत्याला काय कठिण जाणार? मोना सिंग छाप पाडण्यात यशस्वी झाली आहे. कणखर आई अतिशय ताकदीने उभी केलीय तिने. करीना ठीकठाक. पैसा हाच एकमेव निकष लावून आयुष्याकडे बघण्याच्या नादात होणारी रूपाच्या आयुष्याची फरपट तिने ठीकठाक उभी केलीय, दिग्दर्शकाने जितकं सांगितलं तितकं आणि तसं! . बाकीचे सगळे कलाकार आपापली कामं चोख पार पाडतात. जे काही आक्षेप ह्या सिनेमावर घेतले आहेत (लष्कराचा, शिखांचा, देशाचा अपमान वगैरे...वगैरे...) ते सिनेमा बघताना कुठेही जाणवत नाहीत. कथानकाच्या अनुषंगाने त्या घटना येतात आणि सिमेना कथानकात गुंतवून ठेवण्यात यशस्वी होत असल्याने त्या घटना घडताना कुठेही काही खटकत नाही. लाल सिंग चढ्ढा हे पात्र फारच निष्पाप आहे. त्याची निरागसता आणि त्याचं ते निष्पाप असणं सिनेमा बघताना लक्षात आलं की ह्या सगळ्या बाबी गौण होऊन जातात. सोशल मीडियाच्या गदारोळात सहभागी न होता, कुठलेही पूर्वग्रह न ठेवता, कोरी पाटी घेऊन सिनेमा पाहायला गेल्यास एक नितांत सुंदर सिनेमाचा अनुभव पदरी पडेल. लाल सिंग चढ्ढा त्या दर्जाचा सिनेमा नक्कीच आहे!

प्रतिक्रिया द्या
66892 वाचन

💬 प्रतिसाद (207)
ह
हेमंतकुमार Sun, 08/14/2022 - 14:46 नवीन
पूर्वग्रहविरहित परिचय आवडला.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 08/14/2022 - 14:54 नवीन
परिचय आवडला. सिनेमा उत्तरार्धात विस्कळीत आहे असे वाचले, सोत्री, असं काही जाणवलं का ? छान लिहिलं आहे, ज्यामुळे सिनेमा पाहायला प्रवृत्त होऊ शकेल. बाकी बॉयकॉट करणाऱ्यांनी करावे, ज्यांना पाहायचा आहे ते त्यातली सशक्त कथानक आणि अभिनय, दिग्दर्शन इत्यादी बद्दल ऐकून पहातीलच.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sun, 08/14/2022 - 15:35 नवीन
नाही, कथानक प्रवाही आहे, त्यामुळे विस्कळीतपणा कुठे असा जाणवत नाही. आज फॅारेस्ट गंप पाहिला आणि त्याचं भारतियकरण, लाल सिंग चढ्ढात कसलं चपखलं केलंय हे पदोपदी जाणवत गेलं. हा सिनेमा चुकवण्यात काहीच पॅाइंट नाही, नक्की बघाच!! -(सिनेप्रेमी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
म
मित्रहो Sun, 08/14/2022 - 15:00 नवीन
हा पूर्वग्रह विरहित परिचय आवडला. हल्लीच्या सोशल मिडियाच्या काळात काय खरे आणि काय खोटे ते समजत नाही. अशात असा परिचय आवडला.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 08/14/2022 - 15:12 नवीन
लोक काय म्हणतील ? किंवा बँन करून देशभक्ती दाखवायच्या जमान्यात असा रीह्यू टाकणे अभिनंदनीय आहे .
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 08/14/2022 - 15:38 नवीन
सोकाजी, उत्तम लिहीले आहेस या सिनेमाबद्दल. अनेकदा सिनेमा न बघताच कॉन्ट्रोव्हर्सी बनवली जाते अशी शन्का आहे.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sun, 08/14/2022 - 16:11 नवीन
रिव्य आवडला. प्रतिसाद केवळ सोत्रिंच्या लेखासाठी. बाकी चित्रपट जेव्हा फुकटात उपल्ब्ध होईल तेव्हाच पाहिल्या जाईल.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 08/14/2022 - 16:49 नवीन
सहजसोपा रिव्ह्यू.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sun, 08/14/2022 - 18:20 नवीन
अभिनिवेश विरहित रिव्ह्यू आवडला, लालसिंग चढ्ढा नक्की पाहण्यात येईलच.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 08/14/2022 - 18:25 नवीन
धन्यवाद... आजकाल न बघता बाजारबुनग्यांच्या आरोळ्या मध्ये शांत, पूर्वग्रह विरहित मत नक्कीच आनंददायी आहे.. सिनेमा आवडू वा ना आवडू हे व्यक्ती सापेक्ष असु शकते, परंतु प्रमाणिक मत महत्वाचे.. नक्की पाहण्याचा प्रयत्न करतो
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 08/15/2022 - 06:22 नवीन
आजकाल न बघता बाजारबुनग्यांच्या आरोळ्या मध्ये हेच तत्व काश्मीर फाईल बघताना लागू होतं .... तेवहा मात्र काही लोकांची हि टकळी चालू होती कि " काश्मीर फाईल म्हणजे हिंदुत्ववाद्यांचा प्रचार मानकर्णिक, पानिपत , तान्हाजी ... बाजीराव मस्तानी .. यावर पण मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या सर्वधर्मभावी लोकांनी न बघता बहिष्कार घातला होता ! ते चालत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ज
जेम्स वांड Mon, 08/15/2022 - 06:38 नवीन
लाल सिंग चढ्ढा हा सेन्सॉर बोर्डाने पास केला वगैरे वाचनात येतं आहे पुरोगामी जनतेकडून, त्यांना माझे एकच म्हणणं आहे की सेन्सॉरने तर काश्मीर फाईल्स पण certify केला होता की ! तेव्हा सेन्सॉर बोर्ड मेंबर्स फारच उजवे सरकार प्रेमी अन् लाल सिंग चढ्ढा वेळी लिबरल होते असे होऊ शकत नाही. प्रॉब्लेम हा आहे की भारतात धर्म जात प्रांत याच्या पलीकडे जाऊन लोक सोयीने लिबरल अन् सोयीने उजवे असतात आपापल्या सोयीनुसार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
च
चौकस२१२ Mon, 08/15/2022 - 09:59 नवीन
हो ना आणि आँधी वर बंदी आणली होती तेव्हा किंवा किस्सा कुर्सी का यावरील बंदी आणली तेव्हा कुठे होते " लिबरल्स " "सध्या हुकूमशाही चालू आहे भारतात " असे सतत गुणगुणणे या "टुल किट " मधील हे अजून एक टुल असो आमीर खान ने मेहनत घेऊन चित्रपट बनवला असणारं यात शंका नाही आणि काम हि चांगले केले असणार मुद्दा फक्त मूळ हेतूचा असतो .... तरी सुद्धा आधी बघून मग पुढेच बोलेन असे म्हणतो पिके सुद्धा "मूळ हेतू अंधश्रदेला खत पाणी घालू नका" या संदेशामुळे आवडला पण तेव्हाच मनात हा हि विचार आला "अरे पण हा संदेश इस्लाम आणि ख्रस्ती धर्मावर पण तेवढ्याच जोराने त्या चित्रपटात दाखवलं असता तर "खर्या अर्थाने तो चित्रपट सर्वधर्म समभावी झाला असता "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
क
कर्नलतपस्वी Mon, 08/15/2022 - 11:31 नवीन
किस्सा कुर्सी का मला वाटते ७८ साली हा सीनेमा प्रदर्शित झाला होता. जोधपूर मधे असताना बघीतला.एकच शो झाला व बंद झाला. शबाना आझमी चे नाव जनता व ती गुंगी असते. शहरात प्लेग झाला म्हणून सरकार उंदीर मारण्याची योजना काढते. प्रती उंदीर काही मोबदला मीळायचा. जनता दहा उदिर मारून सरकारी कार्यालयात मोबदला मागायला येते. उंदीर तीनेच मारले हे तीला सिद्ध करावयास सांगतात. मागून एक जण येतो पन्नास टक्के कमीशन देऊन उंदीर न मारता पैसे क्षणात घेऊन जातो. एवढाच प्रसंग आठवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
क
कॉमी Mon, 08/15/2022 - 07:36 नवीन
मानकर्णिक, पानिपत , तान्हाजी ... बाजीराव मस्तानी .. यावर पण मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या सर्वधर्मभावी लोकांनी न बघता बहिष्कार घातला होता !
बहिष्कार ? ह्या सिनेमावर सर्वधर्मभाव वाल्यांनी बहिष्कार घातलेला ? हायला मला सांगितले पण नाही. मी तर चुकून बाजीराव मस्तानी बघून पण आलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
ध
धर्मराजमुटके Mon, 08/15/2022 - 08:17 नवीन
हायला मला सांगितले पण नाही. मी तर चुकून बाजीराव मस्तानी बघून पण आलो.
चुकून बघीतला ना ? मग तुम्हाला एक डाव माफी देऊन टाकू :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
च
चौकस२१२ Mon, 08/15/2022 - 10:01 नवीन
जरा मिपावरचे जुने धागे वाचा .. ओळीने असे चित्रपट फक्त भाजप च्या काळात कसे निर्माण झाले असा सुर होता काश्मीर फाईल ५०० करोड घेऊन गेला तेव्हा कितीजणा च्या नाकाला मिरच्या झोंबलया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
क
कॉमी Mon, 08/15/2022 - 15:20 नवीन
बॉयकोट झालेला हे पटवण्यासाठी "मिपाचे धागे वाचा" असा सल्ला असेल तर त्या बॉयकॉटला कसला अर्थ? इथे राहुल देशपांडेने सिनेमा बघितला तर त्याच्या वॉल वर जाऊन ओरडणे चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
ग
गणेशा Tue, 08/16/2022 - 05:48 नवीन
चौकस साहेब, हो सर्वच कलाकृतीना माझे म्हणणे लागू आहे, त्यात "काही लोकांनी तेंव्हा " असे फलाना सांगण्याची काय गरज? मी स्वतः या काही लोकात येत नाही.. आणि मणिकर्णिका, तान्हाजी, बाजीराव मस्तानी हे चित्रपट मी सिनेमा गृहात जाऊन पाहिलेत.. कोण काय बहिष्कार घालत होते यावर मी विश्वास का ठेवावा? आणि माझे बोलणे general एकच आहे, सर्वांना सेम, उगाच याला एक आणि दुसऱ्या वेळेस दुसरे असे नाही.. अवघड आहे.. म्हणजे मत मांडायचे का नाही...? काश्मिर फाईल्स बद्दल न बघता मी बोललो होतो का? काही पण कुठे जोडता आहात.. बाकी त्यात मणिकर्णिका आणि तान्हाजी हे दोन्ही सिनेमे मला अजिबात आवडले नव्हते, बाजीराव मस्तानी भारी होता.. हे माझे वयक्तिक मत आहे.. कारण मी ते पाहिलेले आहेत. लाल सिंग चड्डा मात्र मी अजून पाहिला नाही.. वेळ नाहीये सध्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
च
चौकस२१२ Tue, 08/16/2022 - 06:49 नवीन
मग माझे म्हणणे हि जनरल आहे तुम्हाला का झोंबतंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
स
सुजित जाधव Mon, 08/15/2022 - 04:21 नवीन
आजकाल सिनेमा बघायच्या आधीच शुल्लक कारणावरून त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची घाणेरडी प्रथा चालू झाली आहे. चित्रपट हे एक मनोरंजनाचे साधन आहे आणि त्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहायला हवं असं वाटतं. तुमचा पूर्वग्रह विरहित रिव्ह्यू आवडला..
  • Log in or register to post comments
ट
टिलू Mon, 08/15/2022 - 04:21 नवीन
मी हि कोणताही पूर्वग्रह न ठेवता हा चित्रपट पाहिला. आमिर खान आणि मोना सिंगचा अभिनय आवडला. आमिर खान ने पंजाबी लहेजा अतिशय सहजतेने आत्मसात केला आहे. पण चित्रपट अतिशय संथ वाटला. काही गोष्टी पटल्या नाहीत - जसं कि एवढ्या low IQ वाल्या निरागस, इमोशनल (थोडयाश्या वेडसर) अशा माणसाला भारतीय सैन्यांत कसे काय घेतले जाते आणि कारगिल सारख्या युद्धात एवढी मोठी जबाबदारी कशी काय दिली जाते. युद्धात त्याने केलेली घोडचूक कशी काय खपून जाते हे अजून एक कोडं. कदाचित यामुळेच कोणीतरी या चित्रपटावर केस दाखल केली असे ऐकले. भारतीय सैन्याबाबत अशा गोष्टी दाखवताना आमिर खान आणि टीम ने अजून थोडा अभ्यास करायला हवा होता असे वाटून गेले. असो.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 08/15/2022 - 06:17 नवीन
काही गोष्टी पटल्या नाहीत - जसं कि एवढ्या low IQ वाल्या निरागस, इमोशनल (थोडयाश्या वेडसर) अशा माणसाला भारतीय सैन्यांत कसे काय घेतले जाते आणि कारगिल सारख्या युद्धात एवढी मोठी जबाबदारी कशी काय दिली जाते. या बाबत हि प्रतिक्रिय हि बघवि https://www.youtube.com/watch?v=aVscKmEtDUQ
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 08/15/2022 - 09:44 नवीन
@ चौकस२१२ लिंक बद्धल धन्यवाद. चड्डी सिंग च्या वादात अतुल कुलकर्णी चे नाव काही दिवसां पासुन येत आहे. व्हिडियोत [ तुम्ही दिलेल्या ] अतुलचे काही जुने ट्विट्स आहेत. काही काळा पूर्वी त्यांच्या ट्विटर अकाऊंट मध्ये त्यांनी एक छोटा बदल केलेला काही लोकांच्या लक्षात आला [ तो मी खाली देत आहे. ] या सर्व घटनाक्रमांमुळे अतुल कुलकर्णी ची "दुसरी बाजु " माझ्या आणि अनेक इतर जणांच्या लक्षात आली हे मात्र नक्की !

Atul immediately removed this as his pinned tweet right after attack on #SalmanRushdie.

It was his pinned tweet till yday night.

Courage. pic.twitter.com/H3natO8X3f

— Eminent Intellectual (@total_woke_) August 13, 2022
@ सोत्रि तुम्ही इथे परिक्षण टाकले फार उत्तम झाले, कोणत्या मिपाकरांचे या विषयावर काय विचार आहे हे समजायला मदत झाली. मी चित्रपट पाहिला नाही आणि पाहणार नाही. [ अगदी फुकट उपलब्ध झाला तरी ] परंतु जालावरचे अनेक रिव्हूज वाचुन गेल्या २-४ दिवसात या चित्रपटा बद्धल बरीच माहिती समोर आली आहे आणि अजुनही येत आहे. तुमची वरती एक प्रतिक्रिया वाचली ती अशी :- आज फॅारेस्ट गंप पाहिला आणि त्याचं भारतियकरण, लाल सिंग चढ्ढात कसलं चपखलं केलंय हे पदोपदी जाणवत गेलं. कारगिल युद्धातील अतिरेक्याला वाचवुन त्याच्याशी व्यवसाय करणार्‍या व्यक्तिरेखेला तुम्ही चपखलं भारतियकरण समजत आहात हे जाणवतं. ज्या पकिस्तानने त्यांच्या अतिरेकी आणि सौनिकांचे मृतदेह परत घेण्यास नकार दिला ! कॅप्टन कालिया आणि त्याच्या सहकार्‍यांना अमानविय यातना देऊन ठार केले. अश्याच एका पाकिस्तानी अतिरेकी व्यक्तीरेखेला या चित्रपटात नायक ? वाचवतो ? हे कुठल्या विचारसरणीचे भारतियकरण करणे आहे ? जरा सांगा ना प्लीज ! बर मूळ चित्रपट मी पाहिला आहे, त्यात फॉरेस्ट स्वतःच्याच सैन्यातील लोकांना वाचवतो, मग हे चपखल पद्धतीने दाखवायला पाहिजे होते ना ? हा सीन अश्या पद्धतीने चित्रित करुन त्यांनी कारगिल युद्धात वीरगतीस प्राप्त झालेल्या सौनिकांचा अपमान केला आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे.

#AamirKhan shows Love for Pakistan Terrorist in #LalSinghChadha

He wants people to see this movie where Terrorist is being Glorified. #BoycottLaalSinghChaddha pic.twitter.com/PLPtWnaC2P

— Hemir Desai (@hemirdesai) August 15, 2022
जाता जाता :-

Any one who considers our Special Forces personnel are like McNamara moron, is a moron himself.

— Ved Malik (@Vedmalik1) August 10, 2022

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime Minister
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
च
चौकस२१२ Mon, 08/15/2022 - 10:14 नवीन
त्यात फॉरेस्ट स्वतःच्याच सैन्यातील लोकांना वाचवतो, मग हे चपखल पद्धतीने दाखवायला पाहिजे होते ना ? हा सीन अश्या पद्धतीने चित्रित करुन त्यांनी कारगिल युद्धात वीरगतीस प्राप्त झालेल्या सौनिकांचा अपमान केला आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे. हे असे असेल तर आमिर कितीही चांगला कलाकार असला तरी त्याचा आणि लेखकाचा धिक्कार हिंदी चित्रपटात सृष्टीत ओढून ताणून "सरहद के ऊस पार से प्यार जताना" असल्या आत्मघातकी विचारसरणीचा हा अजून एक भाग.. हिंमत असेल तर अमीर ने मराठीतील "हलाला " चा रिमेक करावा आणि एर्दोगन मॅडम ना पहिल्या प्रीमियर ला बोलवावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
स
सौंदाळा Mon, 08/15/2022 - 10:34 नवीन
सहमत. ढिसाळ कथानक आहे. सुरुवातीला थोडा बरा वाटला पण नंतर पाकिस्तानी सैनिकाला वाचवून त्याचा भारतीय लष्कराला पत्ता पण नाही. वरून त्याला बिजनेस पार्टनर करणे. अर्धवट असून करोडोंचा धंदा उभा करणे. पाहिजे तेव्हा करीना किंवा अमीर एकमेकांसमोर हजर होणे मग ते मुंबई, दिल्ली, पंजाब काहीही असो. यामुळे नंतर इंटरेस्ट संपला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
क
कॉमी Mon, 08/15/2022 - 18:21 नवीन
मायबोलीवर अमितव ह्यांनी दिलेल्या प्रतिसादातून-
त्या पाकिस्तानी मेजरच्या तोंडून पाक विरोधी, मुस्लिम धर्माविरोधी कित्येक संवाद आहेत. तो पाकिस्तान कसा हलकट आहे हे सांगतो. तो भारतीय आर्मी मधला मेजर न दाखवता शत्रूचा मेजर दाखवणे हे फारच स्मार्ट आणि फॉ.ग. पेक्षा वेगळं आणि वरचढ आहे. त्या कॅरेक्टरचा ग्राफ काहीच प्रसंगातून इतका सुरेख आला आहे. तुम्हाला म्हणून सांगतो, तो मेजर पाकिस्तानात जाऊन त्यांची मदरसा शिक्षण पद्धती सुधारुन त्यांना खरं जग कसं आहे ते दाखवतो. कूप मंडूकांना बाहेर काढतो असं ही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
म
मदनबाण Mon, 08/15/2022 - 18:54 नवीन
तो पाकिस्तान कसा हलकट आहे हे सांगतो. तो भारतीय आर्मी मधला मेजर न दाखवता शत्रूचा मेजर दाखवणे हे फारच स्मार्ट आणि फॉ.ग. पेक्षा वेगळं आणि वरचढ आहे. त्या कॅरेक्टरचा ग्राफ काहीच प्रसंगातून इतका सुरेख आला आहे. तुम्हाला म्हणून सांगतो, तो मेजर पाकिस्तानात जाऊन त्यांची मदरसा शिक्षण पद्धती सुधारुन त्यांना खरं जग कसं आहे ते दाखवतो. कूप मंडूकांना बाहेर काढतो असं ही आहे. हे तत्वज्ञान / उपरती इडियन आर्मीने पाय छाटल्या नंतर आली का ? एव्हढ होत तर कारगिल युद्धात काय लपाछुपी किंवा पकडापकडी खेळाला आला होता काय ? इंडियन आर्मी ही जगात शौर्य, पराक्रम,साहस यासाठी जगविख्यात आहेत, ते अतिरेक्यांना ७२ हुरांकडे डायरेक्टच पाठवतात. बरं मूळ कथानकात असे काही नसताना हे मुद्दामुन केले गेले आहे यात तीळमात्र शंका नाही. जाता जाता:- इंडियन आर्मीवरील माझे आवडते कोट्स देऊन जातो. १] “May God have mercy on our enemies, because we won't.” २] “It is God's duty to forgive the enemies, but it's our duty to convene a meeting between the two."

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime Minister
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
क
कॉमी Mon, 08/15/2022 - 19:09 नवीन
तुम्ही उगाचच संतापून ओव्हर द टॉप प्रतिसाद दिल्याने दुर्लक्षणीय प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Tue, 08/16/2022 - 06:56 नवीन
तुम्ही उगाचच संतापून ओव्हर द टॉप प्रतिसाद दिल्याने दुर्लक्षणीय प्रतिसाद. तुमची कल्पनाशक्ती दाणगी दिसतेय ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tip tip barsa paani- Fingerstyle cover| Mihika Sansare
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
क
कॉमी Mon, 08/15/2022 - 19:20 नवीन
मुळात हा सिनेमा एक काल्पनिक गोष्ट सांगतो आहे हे लक्षात घ्या. त्यात पाकिस्तानी सैनिक घेऊन काहीही चुकीचा संदेश दिलेला नाहीये, उलट चांगलाच संदेश आहे. मूळ सिनेमाचे आहे तसे कॉपी पेस्ट करणे मूर्खपणाचे झाले असते. नवी गोष्ट लिहायलाच हवी. मूळ फॉरेस्ट गंप मध्ये सुद्धा त्याचे स्पिरिट आहे- गंप सरकारविरोधी अँटी वॉर प्रोटेस्ट मध्ये गेला असतो, आणि तिथे चक्क एक सैन्याचा अधिकारी येऊन त्याच्या भाषणाच्या वेळेस वायरी उचकटून जातो. मूळ सिनेमात काही फक्त आर्मीचा उदोउदो नाहीये. आणि मुळात चढ्ढा मधून भारतीय सैन्याचा अपमान झाला असे म्हणणे म्हणजे फारच मोठी उडी आहे, असे सिनेमातल्या प्रसंगाच्या वर्णनावरून वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Tue, 08/16/2022 - 06:56 नवीन
मुळात हा सिनेमा एक काल्पनिक गोष्ट सांगतो आहे हे लक्षात घ्या. काय सांगता ? काल्पनिक गोष्टीत देखील काहीतरी लॉजिक असले पाहिजे ना ? अतिरेक्या बरोबर बिझनेस करणे हा देशद्रोह आहे ही साधी गोष्ट जर कोणाला माहित नसेल / समजत नसेल किंवा तसा मुद्दामुन आव आणत असेल, तोच व्यक्ती असा काल्पनिक वायझेड पणा करु शकतो आणि त्याचे समर्थन करु शकतो. मूळ सिनेमाचे आहे तसे कॉपी पेस्ट करणे मूर्खपणाचे झाले असते. अतिरेक्या बरोबर मैत्री करुन, व्यवसाय करुन करोडो छापणे हे तुमच्या मते बद्धिमानपणाचे लक्षण असावे ! :))) मूळ फॉरेस्ट गंप मध्ये सुद्धा त्याचे स्पिरिट आहे- मी देखील हेच म्हणतो... सैन्याचा अधिकारी येऊन त्याच्या भाषणाच्या वेळेस वायरी उचकटून जात असला तरी ज्या देशाशी युद्ध चालले आहे त्यांच्याच सैनिका बरोबर बिझनेस करण्याचा वायझेडपणा त्यांनी अजिबात केलेला नाही. मुळात चढ्ढा मधून भारतीय सैन्याचा अपमान झाला असे म्हणणे म्हणजे फारच मोठी उडी आहे, असे सिनेमातल्या प्रसंगाच्या वर्णनावरून वाटते. मुळात काल्पनिक कथानकाच्या नावावर अतिरेक्याला ग्लोरिफाय करण्याचा प्रयत्न म्हणजे सैन्याचा अपमान आणि राष्ट्रद्रोह देखील आहे. तुम्ही कितीही कल्पना शक्ती लावली आणि ती हवी तशी ताणली तरी अतिरेक्याचे समर्थन करु शकत नाही. उध्या अश्या कल्पनाशक्तीचा वापर करुन कसाबचे आणि अफजल गुरु चे देखील ग्लोरिफिकेशन केले जाईल ! जाता जाता :- चकली प्रतिसाद देऊन फुकाचा बद्धीभेद करण्याचा प्रयत्न आता तरी सोडा, कारण मी "कॉमी" नाही. हा माझा तुम्हाला या धाग्यावरचा शेवटचा प्रतिसाद !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tip tip barsa paani- Fingerstyle cover| Mihika Sansare
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
क
कॉमी Sat, 08/20/2022 - 07:27 नवीन
चकली प्रतिसाद देऊन फुकाचा बद्धीभेद करण्याचा प्रयत्न आता तरी सोडा, कारण मी "कॉमी" नाही. हा माझा तुम्हाला या धाग्यावरचा शेवटचा प्रतिसाद !
इतके कष्ट होत असताना तुम्ही ह्या धाग्यावर पो टाकण्याची गरज नव्हती. पुढच्या वेळेस पो टाकणार नसाल तर थेट थांबा, नोटीस देण्याची आवश्यकता नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मुक्त विहारि Mon, 08/15/2022 - 08:33 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 08/15/2022 - 09:49 नवीन
समतोल, पूर्वग्रहविरहित परीक्षण फार आवडले. आमिरचा फॅन असल्याने चित्रपट पाहणार आहेच. पण पीके पासून आमिरच्या अभिनयात एक तोच तोच पणा जाणवतोय.
  • Log in or register to post comments
च
चिन्मना Mon, 08/15/2022 - 13:04 नवीन
खरे आहे. आमिर खानच्या अभिनयात आता तोचतोचपणा जाणवू लागला आहे. त्यामुळे आमिर खान आवडत असूनही हा पिक्चर कदाचित पाहणार नाही. ओटीटीवर आल्यावर ठरवू. मात्र परीक्षण नक्कीच आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
व
विवेकपटाईत Mon, 08/15/2022 - 14:55 नवीन
पूर्वी हिंदी सिनेमात प्राण हिरोईनच्या कोल्ड ड्रिंक्स मध्ये अफूची गोळी मिसळायचा. पण हिरो सावध असल्यामुळे हिरोईन नेहमी वाचायची. तसाच हा सिनेमा आहे. सोशल मीडियाने सिनेमाचा हेतू उघड केला. कलाकार उत्तम असेल तर टूल किटचा उद्देश साध्य होतो. जसा माचिस सिनेमात झाला होता. तो सिनेमा पाहिल्यावर अनेकांचे मत झाले सरकार, प्रशासन, पोलीस अत्याचारामुळे लोक आतंकवादी बनतात. आतंकवादी कोमल हृदयाचे चप्पा चप्पा गाणारे असतात. ज्या सिनेमात मंद बुध्दीचा सैनिक दाखविला आहे. त्या सिनेमाची प्रशंसा करणारा लेख इथे चालतो. शेवटी विचार स्वतंत्रता महत्वाची. फक्त इतिहासाचे सत्य दाखविणारा माझा लेख मात्र संपादकांनी उडविला होता. किमान आता तरी पुन्हा धाग्यावर संपादकांनी दाखविण्याचे धारिष्ट्य दाखवावे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 08/15/2022 - 18:51 नवीन
लाल सिंग चढ्ढा सिनेमाचा भारतीय जनतेने लोकशाहीत मान्य अश्या पद्धतीने बॉयकॉट करुन फ्लॉप यशस्वी केल्याने सगळ्या पुरोगाम्यांचे व लिबरल्सचे धाबे दणाणले आहेत. एक तर शांततापुर्ण खळ्ळ खट्याक न करता सुद्धा आपला विरोध दाखवु शकतो हे प्रकर्शाने जाणवले. भारतात गोदी मिडीया चालवणार्या उजवीकडे कलंडलेल्या केंद्र सरकारचा ह्या सिनेमाविरुद्ध कोणत्याही निर्देश नसतानाही असा बॉयकॉट यशस्वी केल्याने जनतेचे अभिनंदन ! लाल सिंग चढ्ढा सिनेमा पुर्ण डब्ब्यात गेल्यावरही तो सिनेमा म्हणजे अप्रतिम कलाकृती होती अस सांगणारे मिडीयातले "ध्रुव राठी" सारखे लोक पैसे घेऊनच आपले मत मांडतात हे पुन्हा एकदा सप्रमाण सिद्ध झाले. आमिर खान हा "देश प्रेमी" आहे त्यामुळे माझ्या सिनेमाचा बॉयकॉट करु नका अस विनवत राहीला पण त्याच्या सिनेमाचा बॉयकॉट हा तो हिंदु हेटर आहे म्हणून हिंदु जनतेने केलेला आहे हेच त्याला उमगले नाही. स्वःताला देश प्रेमी आहे अस जनतेला समजवणार्या आमिर खानने "कौन बनेगा करोडपती" कार्यक्रमात तो "वंदे मातरम " न गाणारा व झेंड्याला सलाम न करणारा मुसलमान आहे हे दाखवुन दिलेच. काही वर्षांपुर्वी उप राष्ट्रपती असलेल्या हामिद अंसारी ने सुद्धा १५ ऑगस्टला झेंड्याला सलाम न करण्याचा हक्क बजावला होता. त्यावेळेला ही लिबरल्सनां त्यात काही गैर वाटल नाही. पण फक्त मुसलमानांसाठी जन्मलेल्या पाकिस्तानातले लोक नेते, मौलवी, अध्यक्ष सर्वेच पाकिस्तानच्या सब्ज परचमला ( हिरव्या झेंड्याला) सलाम करतात. त्यावेळेला त्यांचा ईस्लाम धर्म त्यांच्या अश्या वागण्याच्या आड येत नाही. मग भारतातल्याच मुसलमानांना तिरंग्याला सलाम करताना ईस्लाम का आड येतो ? सलमान रश्दी ह्यांच्या वर सॅटॅनिक वर्सेस (१९८८) नावाच पुस्तक लिहील्यानंतर तब्बल ३४ वर्षांनंतर व त्यांच्यावरच्या ईराणच्या खोमेनीने काढलेल्या फतव्या नंतर १० वर्षांनी एका २४ वर्षांच्या युवकाने ( हादि मतार) चाकुने न्युयॉर्क मध्ये हल्ला केला. सॅटॅनिक वर्सेस कधीही न वाचलेल्या ह्या युवकाच्या भावना मात्र दुखावल्या गेल्या व त्याने अश्या लेखकाची हत्या करण्याचा प्रयत्न केला ज्याच्या बद्दल काहीही माहीती सुद्धा नव्हते. आमिर खानच्या सिनेमांनी ह्यांच्या भावना कश्याकाय दुखतात अस विचारणार्या लोकांना माझा प्रश्न एकच आहे. हिंदुंच्या भावनाना केराची टोपली आणी ३४ वर्षांनंतरही त्यांच्या दुखर्या भावना आपला डुक सोडत नाहीत ?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 08/15/2022 - 23:42 नवीन
हिंदुंच्या भावनाना केराची टोपली आणी ३४ वर्षांनंतरही त्यांच्या दुखर्या भावना आपला डुक सोडत नाहीत ? हाच तर मंत्र आहे स्वतःला पुरोगामी न्हाणवून घेणाऱ्यांचा आता यावर अरुंधती रॉय ताई / महेश भट इत्यादी काय म्हणतात हे बघणे रोचक ठरेल का यात हि त्यान्ना फॅसिष्ठ हात दिसेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
अ
अर्धवटराव Mon, 08/15/2022 - 19:01 नवीन
म्हणजे आम्हि शितावरुन भाताची केलेली परिक्षा चुकली म्हणायची.. ट्रेलर वरुन तर चित्रपट फारच गचाळ वाटला. आमिर खानचा म्हणुन धूम-३, ठग्स ऑफ हिन्दुस्तान, मंगल पांडे वगैरे चित्रपट बघितले तेंव्हा उगाच पैसा/वेळ वाया गेल्याचा फील आला होता. लाल सिंगचा ट्रेलर बघुन तर निदान खास टिकीट काढुन सिनेमा बघायला जायचं नाहि हेच ठरवलं होतं.. पण आता सोत्रींनी तारीफ केली आहे म्हटल्यावर परत विचार करतोय...
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Mon, 08/15/2022 - 21:28 नवीन
पीके सिनेमातील काही दृष्य ही हिंदूंच्या भावना दुखावणारी आहेत आणि त्यामुळे आमिर खान हा हिंदू विरोधी ठरवला गेला !! .. पीके सिनेमातली दृष्य ही खरेच हिंदूंच्या भावना दुखावणारी आहेत असं मानूयात. पण तरी त्याचा दोषी आमिर खान ? म्हणजे निर्माता-दिग्दर्शक-लेखक विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, अभिजात जोशी यांनी फक्त झोपा काढल्यात आणि "कर रे बाबा तुला वाटतील ती दृष्य आणि तुला आवडेल ते संवाद तू म्हण" असं आमिरला मोकाट सोडलं होतं का ? चित्रपटातील कथा/पटकथा/संवाद /आशय ही लेखक दिग्दर्शक आणि निर्मात्याची जबाबदारी असते की अभिनेत्याची ? पीके नंतर चोप्रा-हिरानी-जोशी या त्रयींचा संजू नावाचा - एके ५६ रायफल बाळगणार्‍या संजय दत्तचे काहीसे उदात्तीकरण करणारा चित्रपट आला आणि ५८६ कोटी कमावून गेला. पण त्यावेळी बॉयकॉटची हाक आली नाही ते कसे ? बाकी लालसिंग चढ्ढा मी पाहिला नाही - आणि बहुधा बघणारही नाही- कारण एकतर आमिर खानचा अतिरेकी अभिनय - मला आमिर खानचा "तलाश" मधला अभिनय जास्त आवडतो- पण त्याने तसा अभिनय केला की चित्रपट फ्लॉप होतो - तर ते असो. आणि दुसरी गोष्ट - मी बघितलेल्या चित्रपट परिक्षणाच्या एका चित्रफितीनुसार कमी बुद्ध्यांकचा व्यक्ती भारतीय लष्करात भरती केलेला दाखवणे हे मुळातच गंडलेले कथानक आहे. फॉरेस्ट गम्प या अमेरिकी चित्रपटासाठी ते कथानक योग्य ठरते कारण अमेरिकेने व्हिएतनाम युध्दाच्या वेळी असला भयंकर प्रकार केला होता त्यामुळे त्यांची युद्धात खूप जीवित हानीही झाली होती (मी याबद्दल मुळातून वाचलेलं नाही सदर चित्रफितीत जे सांगितलंय ते मी लिहित आहे, त्यामुळे तपशीलात काही त्रुटी असू शकतील). पण भारतीय सैन्यात असला काही भयंकर प्रकार कधी घडलेला नाही. त्यामुळे अतुल कुलकर्णींना मूळ अमेरिकी चित्रपट कितीही आवडला असला तरी त्याचे भारतीयीकरण करण्याची कल्पना मुळातच चुकलेली आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 08/16/2022 - 01:24 नवीन
चोप्रा-हिरानी-जोशी तर्कवादी तुम्ही निदर्शनास आणून दिलेला हा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे हे मान्य पिके मधील एकांगि पणा बद्दल अर्थातच चोप्रा-हिरानी-जोशी जबादार आहेत , आमिर वर टिका होते कारण तो " मौथपीस " म्हणून वावरतो ... यौग्य नाही माहित आहे पण आपण जर असे सुचवत असाल कि जोशी आणि हिरानी हिंदू असल्यामुळे त्यावर टिका होत नाही आणि "खानावर" होते तर तसे नाही किंवा तसा हेतू नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
त
तर्कवादी Tue, 08/16/2022 - 14:18 नवीन
आपण जर असे सुचवत असाल कि जोशी आणि हिरानी हिंदू असल्यामुळे त्यावर टिका होत नाही आणि "खानावर" होते तर तसे नाही किंवा तसा हेतू नाही
निदान मिपाकरांमध्ये तशी प्रवृत्ती नाही हे समजून बरे वाटले. पण इतर समाजमाध्यमांवर अशी प्रवृत्ती ही आढळून येते. मग या वेळी ट्रोलर्स हे विसरुन जातात की आमिर खानने सरफरोश मध्ये मुस्लिम अतिरेकी / त्यांना मदत पुरवणारे पाकिस्तान धार्जिणे मुस्लिम यांच्याविरोधात लढणार्‍या पोलीस अधिकार्‍याची भूमिका रंगवली होती. बाकी या विषयावरही ध्रुव राठीची चित्रफीत बघण्याजोगी आहे.
आमिर वर टिका होते कारण तो " मौथपीस " म्हणून वावरतो .
आमिर, शाहरुख, सलमान व अक्षय कुमार या चौघांचे चित्रपट हे मुख्यतः त्यांचे चित्रपट म्हणूनच ओळखले जातात. चित्रपटाच्या यशापयाशाचे श्रेय (वा दोष) दिग्दर्शकापेक्षा या नायकांना जास्त दिले जाते त्यामुळे असेल कदाचित. शाहरुख व सलमान हे अनेकदा त्यांच्या चित्रपटाचे निर्माते/सहनिर्मातेही असतात. तर सलमान सारखा अभिनेता चित्रपट करताना स्वतःच्या चाहत्यांचा खूप विचार करतो हे ही दिसून येते. पण तरी काहीही असले तरी माझ्या मते अंतिम जबाबदारी ही दिग्दर्शक व निर्माता यांचीच असली पाहिजे. खास करुन पीके बद्दल बोलायचे तर विवि चोप्रा, हिरानी हे स्वतः प्रथितयश व्यावसायिक आहेत. मुन्नाभाईच्या चित्रपटांमुळे हिरानीचे नाव आधीच खूप मोठे झाले होते. त्यामुळे अगदी आमिर खान सारखा अभिनेताही पटकथेत काही ढवळाढवळ करु शकला असेल असे संभवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
म
मदनबाण Tue, 08/16/2022 - 18:31 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
म
मदनबाण Tue, 08/16/2022 - 18:32 नवीन
मग या वेळी ट्रोलर्स हे विसरुन जातात की आमिर खानने सरफरोश मध्ये मुस्लिम अतिरेकी / त्यांना मदत पुरवणारे पाकिस्तान धार्जिणे मुस्लिम यांच्याविरोधात लढणार्‍या पोलीस अधिकार्‍याची भूमिका रंगवली होती. आपणास माहित नसल्यास एक माहिती देतो :-

Don't forget that Amir Khan is also one of the donors of IPSMF.

Yes, the same IPSMF which funds anti-India and anti-Hindu propaganda websites including Altnews, The Wire, The Caravan, etc...

If you buy a ticket for #LaalSinghChaddha it means you are funding indirectly IPSMF.

— Vijay Patel (@vijaygajera) August 1, 2022

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tip tip barsa paani- Fingerstyle cover| Mihika Sansare
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
त
तर्कवादी Tue, 08/16/2022 - 20:45 नवीन
आपणास माहित नसल्यास एक माहिती देतो :
अतिसंक्षिप्त माहितीबद्दल धन्यवाद. पण आता थोडी अधिक माहिती घेवूयात. पण त्या आधी काही प्रश्न : Anti India म्हणजे काय ? हे काही देशविघातक कृत्त्य असेल आणि देशविघातक कृत्त्य करणार्‍यांना आमिर खान पैसे पुरवत असेल तर काही गंभीर गुन्हे दाखल होवू शकतात , मग तसे का होत नाही ? NIA , CBI ईत्यादींकडून आमिर खानची चौकशी का होत नाही ? गेला बाजार आपल्या ED वा Income Tax चीही धाड नाही असे का ? आता थोडी अधिक आणि अगदी सहज मिळू शकलेली माहिती - आपण आणखी खोलवर ही जावू शकता सदर ट्विटमध्ये नमूद केलेली IPSMF ही संस्था काय आहे ? IPSMF अर्थात INDEPENDENT AND PUBLIC-SPIRITED MEDIA FOUNDATION च्या साईटवर गेल्यास काय दिसते ?Chief Executive Officer आहेत सुनील राजशेखर. बाकी टीम मधली नावे आहेत जयक्रिष्न ई, आदित्य नडिग, अविनाश हुकेरी , अपर्णा अय्यर, ग्रीष्मा सुकुरामन ईत्यादी. The Board of Trustees ची नावे बघू १) अमोल पालेकर (अरे बापरे !!) २) सी बी भावे [Mr. Bhave was Chairman of the Securities and Exchange Board of India (SEBI), as well as Chairman and Managing Director of National Securities Depository Limited (NSDL)[] ३) मुकूंद पद्मनाभन ४) रुक्मिणी बॅनर्जी ५) श्याम दिवाण ६) टी एन निनाण या पैकी प्रत्येकाचा संक्षिप्त परिचय या दुव्यावर आहे आणि तो आवर्जुन वाचण्याजोगा आहे. प्रतिसादाची लांबी आणखी वाढू नये म्हणून मी सगळंच पेस्ट करत नाही. बर संस्थेच्या देणगीदारांची नावे पण साईटवर आहेत. ती आता मराठीत टंकण्याचा कंटाळा करुन कॉपी-पेस्ट करतो, माफी असावी Azim Premji Philanthropic Initiatives Pvt Ltd Pirojsha Godrej Foundation Cyrus Guzder Rohini Nilekani Philanthropies Kiran Mazumdar Shaw Rohinton and Anu Aga Family Discretionary No.2 Trust, RDA Holdings Pvt Ltd Lal Family Foundation Sri Nataraja Trust Manipal Education and Medical Group India Pvt Ltd Piramal Enterprises Ltd Tejaskiran Pharmachem India Pvt Ltd, Viditi Investment Pvt Ltd, Unimed Technologies Ltd, Quality Investment Pvt Ltd यातील काही संस्थांबद्दल आपणास थोडीफार माहिती असू शकते. पण मग या सगळ्या Anti India / Anti Hindu आहेत काय ?
If you buy a ticket for #LaalSinghChaddha it means you are funding indirectly IPSMF.
मग याच न्यायाने अजिम प्रेमजींच्या विप्रोमध्ये वा अनु आगांच्या थर्मॅक्स मध्ये काम करणे म्हणजे सदर कंपन्याना नफा मिळवून देणे व पर्यायाने IPSMF देणगी मिळवून देणे झाले की !! [ Lal Family म्हणजे बहुधा Eicher Motors कंपनीचे मालक असावेत - म्हणजे बुलेट घेणंही IPSMF देणगी मिळवून देणे .. असो] तर प्रखर देशभक्त म्हणून या देणगीदार सर्व संस्थांशी संबंध तोडायला हवेत नाही का ? पण या यादीत आमिर खानचे नाव का नाही ? म्हणजे तो बहुतेक इतर देणगीदारांच्या तुलनेत खूप कमी देणगी देत असावा काय ? कंजूष कुठला.. मग त्याकरिताही त्याचा निषेध करायला हरकत नाही. बाकी IPSMF चा पत्ता बंगळूरुचा आहे. मग आणि केंद्र आणि कर्नाटकातील राज्य सरकारांनी मिळून सदर Anti India / Anti Hindu संस्थेच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत तातडीने. बाकी ट्वीट मध्ये नमूद Altnews, The Wire, The Caravan यापैकी Alt news च्या काही चित्रफिती मी पाहिल्या आहेत, FactCheck प्रकारचे त्यांचे काम आहे. मला तरी त्यात Anti India / Anti Hindu असे काही दिसले नाही. बाकीच्या २ साईट्स अजून फारशी माहिती घेतलेली नाही. पण एक गंमत म्हणजे द वायरला टाटा ट्रस्टकडूनही देणगी मिळालेली आहे (आली का पंचाईत) Image removed. मदनबाणजी आपण एक ज्येष्ठ मिपाकर आहात. आपल्या आसपास चालणार्‍या प्रोपागंडावर किती विश्वास ठेवायचा याचा विचार करायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ड
डँबिस००७ Tue, 08/16/2022 - 22:46 नवीन
तर्कवादी, Altnews, The Wire, The Caravan यापैकी Alt news च्या काही चित्रफिती मी पाहिल्या आहेत, FactCheck प्रकारचे त्यांचे काम आहे. मला तरी त्यात Anti India / Anti Hindu असे काही दिसले नाही. मदनबाण साहेबांच्या प्रतिसादाला मूद्देसुद प्रतिसाद देताना ईथे येऊन तुम्ही अडखळलात !! Alt News जर तुम्हाला Anti India / Anti Hindu असे काही दिसले नाही तर तुमच्या नजरेत जरूर काही तरी गडबड आहे. Alt News चा मालक महम्मद झूबेर हा दोन तीन आठवड्यासाठी जेल मध्ये बंद होता. हिंदु भावना दूखावणार्या ट्विट कल्याबद्दल त्याच्यावर केस चालु आहे डायरेक्ट सुप्रीम कोर्टाकडुन त्याला अंतरीम बेल मिळालेला आहे. https://www.google.ae/amp/s/m.thewire.in/article/law/supreme-court-mohammed-zubair-bail-uttar-pradesh/amp https://www.google.ae/amp/s/www.thehindu.com/news/national/bail-sought-for-alt-news-founder-mohammed-zubair-lawyer-says-he-is-facing-death-threats/article65610739.ece/amp/ नूपुर शर्माच्या व्यक्तव्याला मोडुन तोडुन ईस्लाम विरुद्ध दाखवुन वायरल करण्यात ह्या महम्मद झूबेरचा हात आहे. त्याच्यामूळेच नूपुर शर्मा विरुद्ध मुसलमानात रोष निर्माण झाला व त्याची परिणीती म्हणुन १८-२० हिंदुंच्या निघृण हत्त्या झाल्या. हे तर फक्त अल्ट न्यूज बद्दल आहे. "द वायर " "कारवान" सारख्या बद्दल भरपुर माहीती जालावर आहे. अभ्यास वाढवा ईतकच म्हणेन !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
स
सर टोबी Wed, 08/17/2022 - 07:07 नवीन
कसा दिला हे नीट समजावून घेतले असते तर तो अजूनही गुन्हेगार आहे हे आडून आडून सुचवण्याचा प्रयत्न केला नसता. त्याला बंदिवासात ठेवण्याचे कुठलेही सबळ कारण सरकार पक्षाकडे नव्हते आणि त्याला या उप्पर बंदिवासात ठेवता येणार नाही इतकी कणखर भूमिका न्यायालयाने घेतली आहे. एवढेच नाही तर न्यायालयाच्या आदेशाची प्रत अजून मिळाली नाही या कारणास्तव वेळकाढूपणा पोलिसांनी करू नये हे देखील न्यायालयाने पहिले. एरवी भक्त अशा बाबतीत काय म्हणतात? ते सणसणीत चपराक वगैरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
च
चांदणे संदीप Wed, 08/17/2022 - 07:09 नवीन
Altnews चा co founder प्रतिक सिन्हा आहे, यावर आपले काय मत आहे? सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
म
मदनबाण Wed, 08/17/2022 - 08:22 नवीन
मी जे वरती ट्विट दिले आहे त्याचा संदर्भ पत्रकार अजीत भारती यांच्या व्हिडियोतुन घेतला आहे, ते पत्रकार आहेत तेव्हा त्यांनी दिलेली माहिती योग्यच असावी असा विचार करुन मी हा संदर्भ इथे दिला. मोहम्मद ज़ुबैर वर अधिक माहिती घेताना मला २ संदर्भ मिळाले ते इथे देऊन ठेवतो. या प्रोपागंडा न्ञुज नसाव्यात अशी अपेक्षा आहे. ताबीज का हुआ 'उल्टा असर' तो बुजुर्ग से 'जय श्री राम' बुलवाकर काट दी दाढ़ी: Alt News के वायरल Video का सच Unremorseful after triggering a hate wave that claimed the lives of Hindus, Mohammed Zubair returns on Twitter to whitewash Jihadi violence

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Main Nikla Gaddi Leke... :- Gadar
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा