Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लाल सिंग चढ्ढा

स
सोत्रि
Sun, 08/14/2022 - 11:28
💬 207 प्रतिसाद
बहिष्काराच्या गदारोळात अडकलेला आणि त्यामुळे गाजावाजा झालेला लाल सिंग चढ्ढा सिनेमा पाहायचा की नाही ह्या वादात न पडता एक सिने कलाकृती म्हणून जमलेच तर हा सिनेमा बघायचे ठरवले होते. पण ह्या बहिष्काराच्या गदारोळाने माझाही किंचितसा बेंबट्या झाला होता बरं का, उगाच खोटं का बोला. अमिरमुळे नाही, पण करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर ते एक असो. काल हा सिनेमा बघितला. ज्या मूळ सिनेमाचे, फॉरेस्ट गंपचे, रीतसर हक्क विकत घेऊन हिंदीत पुनर्निर्मिती केली, तो सिनेमा बघून बराच काळ लोटल्याने तो सिनेमा विस्मृतीत जाऊन तपशील आठवत नव्हते. पण ते बरंच झालं, लाल सिंग चढ्ढा फॉरेस्ट गंपच्या छायेत न बघता स्वतंत्र सिनेमा म्हणून बघता आला. सिनेमा प्रचंड आवडला. अतिशय शांत वाहणाऱ्या नदीप्रमाणे प्रवाही आणि संयत कथानक एक स्वच्छ आणि मन शांत करणारा अनुभव देऊन जातं. आलिकडच्या वेब सिरीजच्या अंगावर येणाऱ्या अतिरंजित कथानकांच्या पार्श्वभूमीवर ह्या सिनेमाचे कथानक एका मंद हवेची झुळूक यावी तसे वाटते. अतुल कुलकर्ण्यांना लेखनाचे पैकीच्या पैकी मार्क. १९७१ ते २०१८ ह्या काळातल्या महत्त्वाच्या घटनांची गुंफण कथानकात एकजीव होऊन एकदम फक्कड जमलीय. ह्या सगळ्या घटनांचा साक्षीदार असल्याने त्या जुन्या आठवणी जाग्या होऊन दर्शक सिनेमात (पक्षी: लालसिंगच्या गोष्टीत) गुंतत जातो. लाल सिंग चढ्ढा पंजाबी असल्याने सिनेमात पंजाबी भाषेचा तडका आहे आणि तो त्या भाषेच्या लहेजामुळे लाल सिंग चढ्ढाच्या व्यक्तिमत्त्वाला उचलून धरून खुलवतो. सर्वच कलाकारांनी समरसून कामं केलीत. अमीर त्याचं काम चोख पार पाडणार होताच आणि तो ते तसंच पार पाडतो. लाल सिंग चढ्ढाच्या पात्राची निखळता, वेगळेपण आणि त्यातले पैलू दाखवणं आमिरसारख्या कसदार अभिनेत्याला काय कठिण जाणार? मोना सिंग छाप पाडण्यात यशस्वी झाली आहे. कणखर आई अतिशय ताकदीने उभी केलीय तिने. करीना ठीकठाक. पैसा हाच एकमेव निकष लावून आयुष्याकडे बघण्याच्या नादात होणारी रूपाच्या आयुष्याची फरपट तिने ठीकठाक उभी केलीय, दिग्दर्शकाने जितकं सांगितलं तितकं आणि तसं! . बाकीचे सगळे कलाकार आपापली कामं चोख पार पाडतात. जे काही आक्षेप ह्या सिनेमावर घेतले आहेत (लष्कराचा, शिखांचा, देशाचा अपमान वगैरे...वगैरे...) ते सिनेमा बघताना कुठेही जाणवत नाहीत. कथानकाच्या अनुषंगाने त्या घटना येतात आणि सिमेना कथानकात गुंतवून ठेवण्यात यशस्वी होत असल्याने त्या घटना घडताना कुठेही काही खटकत नाही. लाल सिंग चढ्ढा हे पात्र फारच निष्पाप आहे. त्याची निरागसता आणि त्याचं ते निष्पाप असणं सिनेमा बघताना लक्षात आलं की ह्या सगळ्या बाबी गौण होऊन जातात. सोशल मीडियाच्या गदारोळात सहभागी न होता, कुठलेही पूर्वग्रह न ठेवता, कोरी पाटी घेऊन सिनेमा पाहायला गेल्यास एक नितांत सुंदर सिनेमाचा अनुभव पदरी पडेल. लाल सिंग चढ्ढा त्या दर्जाचा सिनेमा नक्कीच आहे!

प्रतिक्रिया द्या
66892 वाचन

💬 प्रतिसाद (207)
त
तर्कवादी Wed, 08/17/2022 - 08:48 नवीन
डँबिसजी मी कुठेही अडखळलो नाही.
हा दोन तीन आठवड्यासाठी जेल मध्ये बंद होता. हिंदु भावना दूखावणार्या ट्विट कल्याबद्दल त्याच्यावर केस चालु आहे डायरेक्ट सुप्रीम कोर्टाकडुन त्याला अंतरीम बेल मिळालेला आहे.
अतिसंक्षिप्त माहितीबद्दल धन्यवाद !! हो बेल मिळालेला आहे , म्हणजे गुन्हा अजून सिद्ध झाला नाही ना ? बरं तो ट्वीट नेमका काय होता ? इथे बघता येईल ते ट्वीट. म्हणजे झुबेरने किसि से ना कहना या चित्रपटातले एक दृष्य ट्वीटमध्ये वापरले. त्याने त्यात काही फेरफार केला काय ? ते ही बघता येईल YouTube वर चित्रपट आहे. मग किसि से ना कहना या चित्रपटाचे लेखक सचिन भौमिक व दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांनाही हिंदूविरोधी ठरवायला हवे. अभिनेता फारुक शेख तर बाय डिफॉल्ट हिंदू विरोधी असेलच !!
नूपुर शर्माच्या व्यक्तव्याला मोडुन तोडुन ईस्लाम विरुद्ध दाखवुन वायरल करण्यात ह्या महम्मद झूबेरचा हात आहे.
अच्छा, मग नूपुर शर्माचे मूळ वक्तव्य काय होते त्याची चित्रफीत आपण देवू शकता का ? आणि जर नूपुर शर्माचे काहीच चुकले नाही तर भाजपने तिला पदावरुन दूर का केले असावे, शिवाय तुम्ही म्हणता तसे झुबेरने वक्तव्य तोडून मोडून दाखवले असेल तर त्याच्याविरोधात त्याबद्दल खटला दाखल करायला हवा, त्याबद्दल त्याला अटक व्हायला हवी. .. पण त्याला २०२२ मध्ये अटक करायला २०१८ च्या ट्वीटची गरज का भासली. असो,नुपूर शर्मा हे पुर्णतः वेगळे प्रकरण आहे. मदनबाण यांनी उपस्थित केलेला मूळ मुद्दा IPSMF मुख्यतः बद्दल होता, त्याबद्दलही आपण अधिक माहिती दिलीत तर आवडेलच.
"द वायर " "कारवान" सारख्या बद्दल भरपुर माहीती जालावर आहे.
खरंय.. मी पण द वायर बद्दलची काही माहिती वर दिली आहेच पण आपण त्या मुद्द्यावर काहीच बोलला नाहीत. असो.
अभ्यास वाढवा ईतकच म्हणेन !!
हेटाळणीजनक टिप्पणी टाळावी. "अभ्यास वाढवा ", "तुम्हाला काय कळतं ?" वगैरे अर्थाची वाक्ये टाकून उगाच समोरच्याला चिडविण्याचा प्रयत्न करु नये. आपणास जी माहिती आहे ती आपण द्यावी. सगळ्या जगाचं सगळं ज्ञान कुणालाच नसतं. आपल्याकडे समोरच्यापेक्षा काही अधिक माहिती असेल तर आपण नक्कीच सांगावी पण त्यात समोरच्याची हेटाळणीकरण्याचा सूर नसावा. आपण ज्येष्ठ मिपाकर आहात आणि मिपावर सकारात्मक वातावरणात मुद्देसूद चर्चा कशा कराव्यात हे आपणास अवगत असेलच असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
स
सुरिया Wed, 08/17/2022 - 10:20 नवीन
@तर्कवादी, युक्तीवाद, वादसंवादाची पध्दत आणि भाषाप्रयोग आवडलेला आहे. कीपीटप. "अभ्यास वाढवा, आपली लायकी पहा" आदी शेरे मारणारे स्वलालधन्य 'हुशारी के पेड' छाटण्याची मिपाला फार गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
त
तर्कवादी Wed, 08/17/2022 - 11:30 नवीन
युक्तीवाद, वादसंवादाची पध्दत आणि भाषाप्रयोग आवडलेला आहे.
धन्यवाद सुरियाजी..
"अभ्यास वाढवा, आपली लायकी पहा" आदी शेरे मारणारे स्वलालधन्य 'हुशारी के पेड' छाटण्याची मिपाला फार गरज आहे.
आणखी ते "वाढदिवसाच्या शुभेच्छा" पण. हे सर्व हेटाळणीजनक / चिथावणी देणारे वाक्य टाळून सकारात्मक चर्चा व्हायला हवी,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया
ड
डँबिस००७ Wed, 08/17/2022 - 10:53 नवीन
तर्कवादीजी, हो बेल मिळालेला आहे , म्हणजे गुन्हा अजून सिद्ध झाला नाही ना ? अहो बेल मिळालेला आहे ह्याचा अर्थ जर "गून्हा सिद्ध झाला नाही ना ?" असा लावायचा असेल तर "कोर्टाने अंतरीम बेल दिलेला आहे, म. झुबेर हा निर्दोष आहे असा आदेश दिलेला नाही" असा पण ह्याचा अर्थ होउ शकतो. झुबरवर ८ केस दाखल झालेल्या आहेत. झुबेरला अटक करण्यासाठी २०१८ पासुन केसेस पेंडीग असताना २०२२ च्या केसवर अटक कशी करता येईल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
त
तर्कवादी Wed, 08/17/2022 - 11:27 नवीन
अहो बेल मिळालेला आहे ह्याचा अर्थ जर "गून्हा सिद्ध झाला नाही ना ?" असा लावायचा असेल तर "कोर्टाने अंतरीम बेल दिलेला आहे, म. झुबेर हा निर्दोष आहे असा आदेश दिलेला नाही" असा पण ह्याचा अर्थ होउ शकतो.
अर्थात आपण आपणास हवा तो अर्थ काढू शकता ? आणि स्वतःच्या सद्सदविवेकबुद्धीने विचार करुन सदर ट्वीट खरेच हिंदू विरोधी / हिंदूंच्या भावना दुखावणारे आहे का हे पण ठरवू शकता. बाकी झुबेर हाच चर्चेचा केंद्रबिंदू करण्यात मला रस नाही. मदनबाण यांनी शेअर केलेल्या ट्विट मधील IPSMF आणि IPSMF ला देणगी देणे हा प्रमुख मुद्दा होता त्याबद्दल अधिक चर्चा होवू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
न
निनाद गुरुवार, 08/18/2022 - 05:58 नवीन
Altnews, The Wire, The Caravan यावर मी तरी विश्वास ठेवत नाही. फार चतुराईने खर्‍या खोट्याची मिसळ करतात. आणि त्यांना हवे तेच मुद्दे चर्चेत आणायचा प्रयत्न करतात. वरदराजन तसेच शेखर गुप्ता हे लोक विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहेत. The Caravan तर अनेकदा खोटी वृत्ते देतांना पकडला गेला आहे असे म्हणतात. टकले यांचे प्रकरण आठवते आहे. The Wire हे तर कोंग्रेस चे मुखपत्र असावे असे वागते. संदर्भ देणार नाही, शोधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
त
तर्कवादी गुरुवार, 08/18/2022 - 08:57 नवीन
Altnews, The Wire, The Caravan यावर मी तरी विश्वास ठेवत नाही. फार चतुराईने खर्‍या खोट्याची मिसळ करतात. आणि त्यांना हवे तेच मुद्दे चर्चेत आणायचा प्रयत्न करतात. वरदराजन तसेच शेखर गुप्ता हे लोक विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहेत.
असेलही कदाचित. Altnews, The Wire, The Caravan ह्यापैकी प्रत्येकी वेगळ्या धाग्यांचे विषय होवू शकतील. सहजपणे मिळालेल्या माहितीत The Wire च्या देणगीदारांत टाटा ट्रस्टचे नाव सापडले ते मी लिहिले बाकी या प्रत्येकाच्या खोलात जाण्याकरिता हा धागा योग्य नाही असे माझे मत आहे. असो. पण मदणबाण यांनी शेअर केलेल्या ट्विट्मध्ये केलेला मूळ मुद्दा आमिर खानच्या IPSMF ला देणगी देण्यासंदर्भात होती. त्या IPSMF बद्दल मी बरीच माहिती दिली आहे. त्या संस्थेच्या विश्वस्तांमध्ये अमोल पालेकर आणि इतर काहि दिग्गजांची नावे आहेत. देणगीदारांत अनु आगा, अजिम प्रेमजी यांच्या ट्रस्टची नावेही आहेत. पण या मुद्द्यांवर पुढे चर्चा झालीच नाही.. असो.
The Caravan तर अनेकदा खोटी वृत्ते देतांना पकडला गेला आहे असे म्हणतात. टकले यांचे प्रकरण आठवते आहे.
असे म्हणतात का ? म्हणत असतील बुवा ...
The Wire हे तर कोंग्रेस चे मुखपत्र असावे असे वागते.
शक्य आहे. वरील ट्वीट ज्यांचे आहे ते विजय पटेल भाजपचे कार्यकर्ते आहेत. तर राजकीय पक्षांच्या नेते / कार्यकर्ते स्वतःच्या संस्था, युट्युब चॅनेल चालवू शकतातच की.
संदर्भ देणार नाही, शोधा.
नाही देणार तर नका देवू संदर्भ.. आग्रह नाही..मला जेवढी शोधाशोध कराविशी वाटली तेवढी केली आणि इतके मला समजले की IPSMF ला देणगी देणे हा काही गुन्हा नाही की पाप नाही !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद
त
तर्कवादी Tue, 08/30/2022 - 12:25 नवीन
पीके चित्रपटामुळे अभिनेता आमिर खानला (फक्त अभिनेताच हं.. लेखन, दिग्दर्शन , निर्मितीत त्याचा सहभाग नव्हता) बहिष्काराला सामोरे जावे लागत असेल तर जितेंद्र जोशींनी (अभिनेते आणि निर्मातेसुद्धा - चित्रपट गोदावरी) या एकाच दृष्यातून त्यांच्या पुढील सात जन्माच्या चित्रपटांवर बहिष्कार घालायची सोय करुन ठेवलीये असे म्हणता येईल... अरे हो पण इतके पाप केल्यावर त्यांच्या आत्म्याला गती वगैरे मिळून पुनर्जन्म लाभेला का हा देखील प्रश्नच आहे म्हणा !! असो.. दृष्य बघा.. हॅव फन !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
म
मदनबाण Tue, 08/30/2022 - 13:51 नवीन
जाता जाता :- च्यामारी आमिरच्या बुडास लागलेली आग विझली असेल मला वाटले होते, पण त्याच्या डाव्या भक्तांची अजुन मजबुत जळतेय इतकं मात्र नक्की ! :))) ते काय म्हण हाय ? हं, गिरे तो भी टांग उप्पर ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tim Tim Timbali - Ravindra Sathe & Anupama Deshpande (Paravtichya Bala)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
ड
डँबिस००७ Mon, 08/15/2022 - 21:38 नवीन
"मदनबाण" तुम्ही इथे परिक्षण टाकले फार उत्तम झाले, कोणत्या मिपाकरांचे या विषयावर काय विचार आहे हे समजायला मदत झाली. अगदी नेमक्या शब्दात तुम्ही लिहीलत. ईतक असुन सुद्धा काही आपलच कस खर हे सांगत आहेत. काश्मिर फाईल्स वरच्या धागा आल्या आल्या, तो सिनेमाचा विषय राहीला बाजूला तर "विवेक अग्नीहोत्री" कसा वाईट हे सांगण्यासाठी ह्यांनी किती आटापीटा केला होता ते आठवले.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 08/16/2022 - 05:04 नवीन
दाभोलकरांना फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धा दिसतात, इतर इतर धर्मातील दूर करायची हिम्मत करत नाही असे काही आक्षेप घ्यायचे. आमिर खान हिंदूंच्या अंधश्रध्दाबद्दल काही बोलला तर त्यालाही नावं ठेवायची. म्हणजे एका हिंदूंनी दुसऱ्या धर्मात ढवळाढवळ केली तर ते ह्यांना चालणार ,फक्त आमच्या धर्मात करू नका.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 08/16/2022 - 07:01 नवीन
आग्या ... म्हणणे एवढेच आहे की दाभोलकर असोत नाही तर आमिर खान जर अंधश्रद्धा उघड करायची हा शुद्ध हेतू आहे ना मग तर सर्व धर्मातील समतोल पने करा ... ती हिंमत नाही यांच्यात मग ते समाज कार्यातून असो, समाजप्रबोधनातून असो , कलाकृतीतून असो , चित्रपट / नाटक / साहित्यातून असो काह्ही माध्यम असले तरी हा नियम पाळावा पिके मधील हिंदू धर्मातील अंधश्रद्धा बाहेर आणली यात माझ्यसारख्याला चांगलेच वाटते .. पण ते करताना इतर धर्मातील अश्या चालिरीनवर जास्त बोलण्याची हिंमत हे लोक दाखवत नाहीत .. हा ढोंगी पणा आता उघडकीला आलाय .... दिसला हिंदू कि मार टपली .. लै सहन केलं मिपावरच्या किती लोकांनी शिवाजी लोटन पाटील यांनी निर्मिलेला "हलाला" पाहिलंय पहा एकदा .
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 08/16/2022 - 17:31 नवीन
म्हणणे एवढेच आहे की दाभोलकर असोत नाही तर आमिर खान जर अंधश्रद्धा उघड करायची हा शुद्ध हेतू आहे ना मग तर सर्व धर्मातील समतोल पने करा ... ती हिंमत नाही यांच्यात अनिसचे संबंधित धर्माचे कार्यकर्ते त्यांच्या धर्मातील अनिष्ट रूढी निर्मूलनाचे कार्य करत आहेत. शुद्ध हेतू ठेवून तुम्हीही हे काम करण्याची हिम्मत करू शकता. फक्त बोटं दाखवण्याचा शुरपणा सोडावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
स
सुखी Tue, 08/16/2022 - 18:16 नवीन
एखाद उदाहरण आहे का? माझ्यासाठी हिंदू व्यातरिक्त बाकी कुठे अश्या सुधारणा होत आहेत ही न्यूज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०
आ
आग्या१९९० Tue, 08/16/2022 - 19:05 नवीन
https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/mumbai-news/controversial-miracle-man-passes-away-in-vasai/story-7ffxk1zATKeY2xQaZSOKQM_amp.html अनिसला साथ द्या. त्यांच्या सोबत काम केले की बऱ्याचशा शंका दूर होतील. अनिस फार गाजावाजा करत नाही त्यांच्या कार्याचा. बऱ्याचदा भोंदूबाबांना लेखी हमी घेऊन माफ करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखी
व
वामन देशमुख Tue, 08/16/2022 - 19:56 नवीन
अनिस फार गाजावाजा करत नाही त्यांच्या कार्याचा. बऱ्याचदा भोंदूबाबांना लेखी हमी घेऊन माफ करतात.
हमीद दाभोलकरांनी लेखी हमी दिलीय का? अंनिस ने हमीद दाभोलकरांना माफ केलंय का? संदर्भः http://www.misalpav.com/node/37392 तिथून साभारः विचारवंत श्री हमीद दाभोळकर ह्यांनी 'मातीची बकरी' ह्या मोहिमेवरचे त्यांचे मौलिक विचार नुकतेच व्यक्त केले. सकाळमध्ये आलेल्या बातमीनुसार बकरी ईदला खरीखुरी जिवंत बकरी कुर्बान न करता त्याऐवजी 'मातीची बकरी' करून ती कुर्बान करावी अशी एक मोहीम काही लोकांनी राबवली होती. थोर्थोर विचारवंत श्री दाभोळकर ह्यांच्या मते ही मोहीम चुकीची असून 'धर्माधर्मात तेढ वाढवण्याच्या खोडसाळ उद्देश्याने चालवलेली आहे'. 'धार्मिक संकल्पनांचे निव्वळ स्वतःला हवेतसे अर्थ लावण्याऐवजी त्यातील भावार्थ समजून घेण्याचा लोकांनी प्रयत्न करायला हवा' असे समंजस, मानवतावादी वगैरे आवाहनही त्यांनी लोकांना केले. हमीद गुर्जींचे म्हणणे आहे की ईदला बकरा कापणे ह्या धार्मिक संकल्पेनाला भावार्थ आहे, पण दसऱ्याला बळी दिला तर ती मात्र अंधश्रद्धा असून त्या अंधश्रद्धेचा कसून विरोध करायला पाहिजे बर्का मुलांनो? आणि हो, ह्याला दुटप्पीपणा म्हणत नाहीत, हा एक थोर पुरोगामी विचार आहे. तेव्हा वाजवा आता जोरदार टाळ्या! बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०
न
निनाद गुरुवार, 08/18/2022 - 05:59 नवीन
मर्मभेदी प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
आ
आग्या१९९० Wed, 08/24/2022 - 11:24 नवीन
आपली वाटचाल ब्लासफेमी लॉ कडे चालली आहे का? असेल तर ते कितपत योग्य आहे? https://www.aksharnama.com/client/article_detail/6265
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
त
तर्कवादी Tue, 08/16/2022 - 21:09 नवीन
मिपावरच्या किती लोकांनी शिवाजी लोटन पाटील यांनी निर्मिलेला "हलाला" पाहिलंय पहा एकदा .
हलाला तर नाही पाहिला पण शिवाजी लोटन पाटील यांचा भोंगा (मशिदीवरील भोंग्याचा विषय) पाहिला, अतिशय आवडला आणि या चित्रपटाबद्दल (तसेच हलालाबद्दलही) मुस्लिम संघटनांनी शिवाजी पाटील यांचा निषेध केल्याचे ऐकिवात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
म
मदनबाण Wed, 08/17/2022 - 07:30 नवीन
मिपावरच्या किती लोकांनी शिवाजी लोटन पाटील यांनी निर्मिलेला "हलाला" पाहिलंय मी हा चित्रपट पाहिला आहे.उत्तम चित्रपट आहे. जेव्हा या चित्रपटा बद्धल बोलले जात होते तेव्हा या चित्रपटाच्या निर्म्याताचा एक व्हिडियो मी मिपावर दिल्याचे स्मरते. आज तो व्हिडियो इथे परत देतो. चित्रपट प्रदर्शीत झाल्यावर काही आंदोलने झाली की नाही या बद्धल माहिती नाही,परंतु सेंसर बॉर्डातुन सर्टीफाईड होऊन बाहेर पडण्यासाठी काय दिव्यातुन जावे लागले ते या व्हिडियोतुन कळते. सनी देओल आणि अमिशा पटेल चा गदर चित्रपटाच्या प्रदर्शना नंतर हिंदूस्थानात अशांती दुतांनी हैदोस घातला होता. एका शीख व्यक्तीचे मुस्लिम मुली बरोबर लग्न होऊन ती नंतर गर्भवती होऊन मुलास जन्म घालते, तसेच तीचे नाव सकीना होते हे सुद्धा अशांती दुतांना सहन झाले नव्हते. जितक मला माहित आहे त्यानुसार बहुतेक भोपाळ मध्ये थेटर देखील जाळण्यात आले होते. संदर्भ :- Religious protests against period film Gadar put free speech on the boil Gadar Protests In Lucknow 'Disruption of 'Gadar' part of sinister plan'

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Main Nikla Gaddi Leke... :- Gadar
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
त
तर्कवादी Wed, 08/17/2022 - 12:23 नवीन
,परंतु सेंसर बॉर्डातुन सर्टीफाईड होऊन बाहेर पडण्यासाठी काय दिव्यातुन जावे लागले ते या व्हिडियोतुन कळते.
२०१६ साली चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून त्रास झाला हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. RC मध्ये चित्रपट पास केला त्यावेळी ८ मुस्लिम व्यक्तीही ज्युरी म्हणून आल्या होत्या हे पण निर्माता कागणे याने सांगितले आहे. आणि त्यानंतर निर्मात्याने भोंगा चित्रपट बनवला. असो.
सनी देओल आणि अमिशा पटेल चा गदर चित्रपटाच्या प्रदर्शना नंतर हिंदूस्थानात अशांती दुतांनी हैदोस घातला होता.
हे खरंय.आणि सर्वच धर्मातील माथेफिरु धर्मांधाचा निषेध करायला हवाच. गदरच्या वेळी गदारोळ झाला होता हे मलाही आठतंय. तसेच बॉम्बे चित्रपटातही नायिका मुस्लिम व नायक हिंदू असल्याने काही मुस्लिम संघटनांकडून विरोध झाला होता. मुंबई दंगलींचा विषय तसा ताजाच होता, अतिशय संवेदनशील विषय होता. काही निदर्शने हिंसकही असावीत बहुधा. पण या सगळ्यांची व्याप्ती किती होती ते आता आठवत नाही. मी हे दोन्ही चित्रपट चित्रपटगृहात जावून बघितले होते. बॉम्बे प्रदर्शित झाला तेव्हा मी पंधरा वर्षांचा होतो. तेव्हा माझ्या आई वडिलांनी काळजीपोटी आधी मला चित्रपटगृहात जाण्याची परवानगी दिली नाही. पण नंतर पुण्यात तरी काही गडबड झाल्याच्या विशेष काही बातम्या आल्या नाहीत तशी मला परवानगी मिळाली आणि मी दापोडीच्या अरुण या चित्रपटगृहात एकट्याने जावून बॉम्बे चित्रपट पाहिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ग
गवि Tue, 08/16/2022 - 09:38 नवीन
अनेक प्रतिसाद सिनेमा न बघताच आल्याचे (नेहमीप्रमाणे) दिसते. हे रोचक आहे. कोणाची तरी मते, अर्धवट सीन, ट्रेलर असे पाहून फायनल आग्रही आणि तपशीलवार मत देणे. स्टाम्प मारणे हे अनाकलनीय आहे. पुलंचे अंतूशेट जसे झापे बाजूला करुन घटकाभर एकच प्याला नाटक झलक रुपात बघतात आणि "सिंधूचा पार्टी कन्डम, यापेक्षा दशावतारी बरे" अशी निर्णायक मते देतो तसे काहीसे सर्वत्रच घडताना दिसते. मग मत अति समर्थक असो किंवा अति विरोधी.. चित्रपट प्रत्यक्ष बघितला की बहुतांश वेळा जी हवा केली गेली होती तसे तितके त्यात काहीच आक्षेपार्ह नव्हते असे सिद्ध झाल्याचीच उदाहरणे आहेत. अर्थात अद्याप चित्रपट बघितला नसल्याने चित्रपटाबद्दल निवाडा देणे शक्य नाही. केवळ निरीक्षण नोंदवले.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 08/16/2022 - 10:04 नवीन
चित्रपटाची ओळख आवडली. पाहणे आहेच. पण, चित्रपट न पाहता लोक वाद उभा करीत आहेत, असे जे वाटायचे त्याची परिक्षण वाचून खात्री पटली. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 08/17/2022 - 06:50 नवीन
बिरुटे सर चित्रपट न पाहता लोक वाद उभा करीत आहेत, सॅटॅनिक व्हर्सेस साठी सलमान रश्दी याना "सर तन से जुदा" म्हणणाऱ्या किती टक्के लोकांनी वाचले असणार? एक टक्का सुद्धा नाही याची मला १०० % खात्री आहे. पुरोगामी दुटप्पीपणा हा असा असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आ
आग्या१९९० Wed, 08/17/2022 - 07:07 नवीन
अरेरे! चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांचे समर्थन करतोय ह्याचे काही कारण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ज
जेम्स वांड Wed, 08/17/2022 - 11:41 नवीन
सॅटॅनिक व्हर्सेस साठी सलमान रश्दी याना "सर तन से जुदा" म्हणणाऱ्या किती टक्के लोकांनी वाचले असणार?
असे वाचन वगैरे न करणारे अजून काही उपरे आता दिल्लीत राहणार आहेत रेफ्युजी म्हणून. रोहींग्या म्हणतात बुआ त्यांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आनन्दा Tue, 08/16/2022 - 12:37 नवीन
आयला म्हणजे सिनेमा खरच बॉयकॉट campaign मुळे पडला? This is interesting!!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 08/16/2022 - 13:00 नवीन
>>> आयला म्हणजे सिनेमा खरच बॉयकॉट campaign मुळे पडला? नै नै...लोकांनी बायकॉट केला म्हणून सिनेमा अजिबात पडणार नाही. पडत तर अजिबात नसतो. सिनेमा प्रेक्षकांना किती अपिल होतो त्यावर आपल्याकडे सिनेमा चालतो-पडतो, असे वाटते. उलट या बायकॉटमुळे सिनेमा उरलेल्या दिवसात सिनेमा अधिक चर्चेत राहील. आज सिनेमा पाचव्या दिवशी पन्नास कोटीच्या जवळ जवळ पोचला आहे. माध्यमांमधून सिनेमाला 'मिला जुला रिस्पॉन्स मिल रहा है' अशा बातम्या आहेत त्यामुळे सिनेमा नफ्यात राहणार आहे. सिनेमा शौकीन पब्लिक तर, सिनेमा पाहिल्याशिवाय अजिबात राहणार नाहीत, असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
ह
हणमंतअण्णा शंक… Wed, 08/17/2022 - 00:42 नवीन
लोकांनी बायकॉट केला म्हणून सिनेमा अजिबात पडणार नाही. पडत तर अजिबात नसतो. सिनेमा प्रेक्षकांना किती अपिल होतो त्यावर आपल्याकडे सिनेमा चालतो-पडतो, असे वाटते.
हा सिनेमा कारणांमुळे पडला ( म्हणजे अपेक्षित यश नाही )- १. खान मंडळींविरुद्ध / प्रस्थापित बॉलिवूड कलाकरांबद्दलचा रोष २. काश्मीर फाईल्स नंतर प्रस्थापित हिरो हिरविनी 'खर्‍या' म्हणजे आधुनिक हिंदू अस्मितेच्या प्रश्नांना भिडत नाही हा पसरलेला समज ३. नेत्रदीपक दाक्षिणात्य चित्रपटांपुढे बॉलीवूड फिके आहे असा पसरत चाललेला समज ४. आमीर खान/ किरण राव यांची तथाकथित देशद्रोही वक्तव्ये ( जी इथून पुढे आयुष्यभर त्यांना छळत राहणार ) ५. बॉयकॉट मोहीम शिवाय या बॉयकॉट मोहीमेने "एनी पब्लीसिटी इज गुड पब्लिसिटी" अशी जाणीवपूर्वक वाद निर्माण करणारी मार्केटिंग स्ट्रॅटेजिदेखील चालतेच हा गैरसमज खोडून काढला. अर्थात हे चित्रपट निर्मात्यांनाच लागू आहे. स्वतः आमिर खानचे इन्स्टा/ट्विटर अनुयायी वाढलेच असतील. नवराष्ट्रवादी अदलित लोकांनी झुंड देखील असाच मुद्दामहून नाकारला. त्यात राष्ट्रद्रोही, देशद्रोही, धर्मद्रोही, जातद्रोही, पंथद्रोही, भाजपद्रोही, मोदीद्रोही, रास्वसद्रोही काहीही नव्हते. त्यामुळे इथून पुढे "रंग दे बसंती", "लगान", "दिल चाहता है" सारखे एखादी पिढी झपाटणारे चित्रपटसुद्धा तयार होतील का नाही याची मला खात्री वाटेनाशी झाली आहे. तुलनेने दक्षिणी प्रेक्षकांत एखाद्या हिरोप्रती निष्ठा जास्त ठळक असल्याने आणि त्याचवेळी प्रयोगशीलतेचे चाहते असणारे लोकही अनेक असल्याने तेच अशी रिस्क घेऊ शकतात. त्यामुळे उत्तरेकडचे किंवा बॉलीवूडचे चित्रपट आता गायपट्ट्यातील अदलित नवराष्ट्रवादी भारतीयांना शरण जाणार हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ड
डँबिस००७ Tue, 08/16/2022 - 15:34 नवीन
लाल सिंग चढ्ढा मुळे बरेच सेलिब्रीटी आता लाईनीवर आलेत. काही दिवसांपुर्वी ला.सिं.च. च्या बॉयकॉटची खिल्ली उडवत एका कार्यक्रमात कॅमेरा समोर "आम्हाला सूद्धा बॉयकॉट कराना प्लिज" म्हणणार्या अनुराग कश्यप व तापसी पन्नु ला आता ऊपरती झालेली आहे. तापसी पन्नु सारख्या अत्यंत अहंकारी हिँंदु हेटर अभिनेत्रीचे आता तेवर बदलले दिसत आहे. बॉयकॉटची भिती र्‍हितीक रोशनला सूद्धा भेडसावत आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 08/16/2022 - 18:02 नवीन
बॉयकॉट गँग मुळे पिक्चर चालात किंवा पडत असते तर भाजप क्वीन कंगनाचे पिक्चर सुपरहिट झाले असते.. खुद्द शेठ चा पिक्चर सुपर फ्लॉप आहे तर बाकीच्यांची काय कथा... भूल भू २ हिट झालाच की... लोकांना वेगळा विषय , फ्रेश चेहरे हवे आहेत... आणि सध्या इकॉनॉमी चे ल लावले असल्याने लोक थिएटर मध्ये जाऊन पैसे खर्च करत नाहीत
  • Log in or register to post comments
स
सुखी Tue, 08/16/2022 - 18:22 नवीन
काश्मीर फाईल्स सुद्धा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ड
डँबिस००७ Tue, 08/16/2022 - 19:21 नवीन
ला. सि. चढ्ढा सिनेमाच्या शुटींग करता तुर्कस्तानात जाऊन लेडी एर्दोगनला तिच्या महालात जाऊन भेटलेला आमिर खान स्वःताला देश प्रेमी म्हणवतो. कौन बनेगा करोडपती मध्ये झेंड्याला सलाम न करणारा आमिर खान आपल्या घरावर तिरंगा फडकवतो, ह्यांना वाटत जनतेला (हिंदु) सहज मुर्ख बनवता येते.
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 08/18/2022 - 06:08 नवीन
ह्यांना वाटतं हिंदु जनतेला सहज मुर्ख बनवता येते.- पण समाज जागा झाला आहे आणि हेच त्यांना पचत नाहीये. हे समाजद्रोही ठेचलेच पाहिजेत. मी पैसे देऊन खान लोकांचा पाहिलेला एकमेव चित्रपट म्हणजे अंदाज अपना अपना. त्यानंतर यांना पैसे कधीही दिलेले नाहीत, मरेस्तोवर कधी देणारही नाही! सिनेमा पडेल आहे अभिनेता उघडा पडलेला आहे. तेच ते व्हिएफएक्स चे तारुण्य आणि तोच तो माकडछाप अभिनय लोक तरी कितीकाळ पाहणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
व
वामन देशमुख Tue, 08/16/2022 - 19:59 नवीन
सदर चित्रपटाचे समर्थन करणाऱ्यांनी "मज़हब से मलेरिया फैलता है" हे कसे हे समजावून सांगावे.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 08/16/2022 - 19:59 नवीन
सदर चित्रपटाचे समर्थन करणाऱ्यांनी "मज़हब से मलेरिया फैलता है" हे कसे हे समजावून सांगावे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 08/17/2022 - 07:06 नवीन
आमीर खान ने आपला दुटप्पीपणा अनेक वेळेस सिद्ध केलेला आहे. इरोडगन यांच्या बायकोला भेटल्यापासून तर तो लोकांच्या मनातून साफच उतरला आहे कुठेही कधीही समाजसुधारक लोकाना केवळ हिंदू धर्मातीलच अंधश्रद्धा कशा काय दिसतात? हे एक कोडे आहे. भेकड पणा हा पुरोगामी लोकांचा स्थायीभाव असल्याने इस्लाम मधील सरळ सरळ दिसणाऱ्या अन्धश्रद्धा आणि अमानुषपणा बद्दल त्यांची तोंडे कायमच बंद असतात. भारतात प्रत्येक माणसाच्या वैयक्तिक अधिकारांबद्दल उच्चरवाने बोम्ब मारणाऱ्या पुरोगाम्यांनी तलाकपीडित महिला भारतात किती आहेत याची साधी आकडेवारी सुद्धा उपलब्ध नाही या बद्दल कधी तोंड उघडलेले मी पाहिलेले नाही. भारतीय राज्यघटनेबद्दल दुहाई देणारे सर्वच पुरोगामी समान नागरी कायदा सारख्या घटनेच्या मूलभूत कलम ४४ बद्दल गेली ७५ वर्षे कधीही आग्रहाने बोलताना दिसत नाहीत. Article 44 in The Constitution Of India 1949 44. Uniform civil code for the citizens The State shall endeavour to secure for the citizens a uniform civil code throughout the territory of India शेवटी एकच म्हणावेसे वाटते. उद्या दाऊद इब्राहिम ने जर चित्रपट काढला आणि त्यात दिग्गज कलाकार असतील तरी कलेसाठी कला म्हणून मी तो कधीही पाहणार नाही. हि एकच वृत्ती आहे कि जे म्हणतात पाकिस्तानी क्रिकेटर्सची काय चूक आहे? त्यांना पण भारतात बोलवा आणि आय पी एल मधून कोट्यवधी रुपयांची खैरात करा. बॉलिवूड कडे एकंदर पैसा कुठून आणि कसा येतो याची माहिती मिळाल्यानंतर गेली कित्येक वर्षे एकंदर सिनेमे पाहणेच मी बंद केले आहे. त्यामुळे लालसिंग चड्ढा कसाही असला तरी मला शष्प फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 08/17/2022 - 07:14 नवीन
" होईना काही, जीवाची लाही ". सध्या पुरोगाम्यांचे सरकार नाही ना? करा ना अहिंदू धर्मातील अंधश्रद्धा दूर. किती दिवस पुरोगाम्यांचे तुणतुणे वाजवणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 08/17/2022 - 07:19 नवीन
तुमच्या पातळीच्या वर आहे तुम्ही ताण घेऊ नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०
आ
आग्या१९९० Wed, 08/17/2022 - 07:26 नवीन
डोळे बंद करून पातळी कशी समजते? काही सिद्धी प्राप्त झाली का? उपाय योजना करा प्रत्येक समस्येवर. सतत दुसऱ्याकडून अपेक्षा करणे सोडून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 08/17/2022 - 07:34 नवीन
आँ मंदिर वही बनायेंगे तारीख नाही बतायेंगे हे उच्च रवाने ओरडल्यानंतर मंदिर निर्मिती दृष्टी टप्प्यात आल्यावर दातखिळी बसलेले लोक परत सक्रिय झालेले दिसतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०
ह
हणमंतअण्णा शंक… गुरुवार, 08/18/2022 - 00:38 नवीन
एकदा प्रतिगाम्यांनी काय करायचं असतं किंवा काय करत असतात ते तरी उलगडून सांगा. पुरोगामी लोकांचा स्थायीभाव भेकडपणा आहे हे मान्य करू. मग प्रतिगामी लोक कसे भेकड नाहीत तेही सांगा. मुळात भेकड पुरोगामी सोडून दुसरे कोणते गामी असतात हे तरी तुम्हाला मान्य आहे का सांगा. म्हणजे तुम्हाला नेमकं हवं तरी काय आहे? या प्रश्नांची उत्तरे नाही असतील तर एखाद्याला प्रतिगामी म्हणायचं की पुरोगामी? या गोष्टींचे माईल्डर वर्जन असेल तर काय म्हणणार? १. मला स्त्रीशिक्षण, विधवापुनर्विवाह वगैरे अजिबात मान्य नाही. स्त्रियांनी मुळात शिकायचीही गरज नाही. त्यांनी चूल आणि मूल सांभाळलेलंच बरं. बालविवाह तर बेस्टच. २. जात हा भारतीय समाजव्यवस्थेचा मानबिंदू आहे. माझी जात नि:संशय श्रेष्ठ आहे. माझी विष्ठा साफ करण्याची जबाबदारी इश्वरानेच काही जातींना दिली आहे हे मला पुरेपूर पटले आहे. २. गड्या आपला आयुर्वेदच बरा. (पण एनिमा वगैरे नको बरंका, तिथे काहीतरी खुपसायचे हे जरा जास्तच होतंय). आधुनिक वैद्यक वगैरे थोतांडाच्या नादी लागलेलं वाईटच. शिवाय आप्ल्या पूर्वजांनी टेस्ट ट्यूब बेबी वगैरे तर ५००० वर्षांपूर्वीच करून ठेवलं आहे. ३. माझी मुलं गे वगैरे झाली तर मी त्यांचा जीवच घेईन. असली पैदासच नको. सरकारने तर अशा लोकांची लिंगे जाहीरपणे कापली पाहिजेत. ४. वैज्ञानिक दृष्टिकोण वगैरे काय आचरटपणा असतो? ग्रह गोलांचा मानवी जीवनावर परिणाम घडतच असेल. ५. इस्लाम हा मानवी अस्तित्त्वाला लागलेला कलंक आहेच. परंतू त्याच्यावर एकच उपाय. विश्वगुरु भारताने आधी एकेक करत अखंड भारत पार जावा-सुमात्रा पर्यंत ते काबूल कंदाहार पर्यंत केला पाहिजे. आणि मग सौदी अरेबिया वगैरे काबीजकरून सगळीकडे हनुमानाची मंदिरे बांधली पाहिजेत. ते एकेश्वरवाद वगैरे सोडून द्यायला पाहिजे. वाटल्यास ते एकेश्वरवाद वगैरे स्वीकारू शकतात पण अट एकच शूद्र म्हणून त्यांनी आमची वर्णव्यवस्था निमूटपणे मान्य केली पाहिजे. ६. ७० वर्षांत केवळ आमच्या जीवावरच आम्ही जगलो. सरकारचा एक पैसाही स्वतःवर खर्च करू दिला नाही. शिक्षण वगैरे सगळं स्वतःच्या खाजगी पैशांनी झालंय. कॉंग्रेससारख्या भिकारचोट पक्षाने चालवलेल्या सरकारकडून पैसे घ्यायचे म्हणजे महापाप. २०१४ नंतरच खरे स्वातंत्र्य मिळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 08/18/2022 - 06:58 नवीन
तुम्ही एकदम डावे नसलात तर एकदम उजवेच असले पाहिजे हा हट्टाग्रह कशासाठी? १. मला स्त्रीशिक्षण, विधवापुनर्विवाह वगैरे अजिबात मान्य नाही. स्त्रियांनी मुळात शिकायचीही गरज नाही. त्यांनी चूल आणि मूल सांभाळलेलंच बरं. बालविवाह तर बेस्टच. असे कोणता माणूस म्हणालाय? माझी आई शाळेची मुख्याध्यापिका होती. तिचे एम ए बी एड हे शिक्षणसुद्धा आमच्या जन्मानंतर केलेले. २. जात हा भारतीय समाजव्यवस्थेचा मानबिंदू आहे. माझी जात नि:संशय श्रेष्ठ आहे. माझी विष्ठा साफ करण्याची जबाबदारी इश्वरानेच काही जातींना दिली आहे हे मला पुरेपूर पटले आहे. असे कोणता माणूस म्हणालाय? २. गड्या आपला आयुर्वेदच बरा. (पण एनिमा वगैरे नको बरंका, तिथे काहीतरी खुपसायचे हे जरा जास्तच होतंय). आधुनिक वैद्यक वगैरे थोतांडाच्या नादी लागलेलं वाईटच. शिवाय आप्ल्या पूर्वजांनी टेस्ट ट्यूब बेबी वगैरे तर ५००० वर्षांपूर्वीच करून ठेवलं आहे. मी स्वतः आधुनिक वैद्यकाचा एम बी बी एस, एम डी आहे आणि अजून तरी आमच्या घरच्या कोणत्याही आजारपणासाठी आधुनिकच औषधे घेतलेली आहेत. ३. माझी मुलं गे वगैरे झाली तर मी त्यांचा जीवच घेईन. असली पैदासच नको. सरकारने तर अशा लोकांची लिंगे जाहीरपणे कापली पाहिजेत. असे कोणता माणूस म्हणालाय? गे म्हणजे काय हे तुम्हाला नीट समजलंय का? आधुनिक वैद्यकशास्त्रात त्याबद्दल काय लिहिलंय हे एकदा वाचून पहा आणि मग अशी बेफाट वक्तव्ये करा ४. वैज्ञानिक दृष्टिकोण वगैरे काय आचरटपणा असतो? ग्रह गोलांचा मानवी जीवनावर परिणाम घडतच असेल. माझा ज्योतिष शास्त्रावर विश्वास नाही. आणि आमची आई ४५ दिवस व्हेंटी लेटर वर होती तेंव्हा मी कोणत्याही देवळात किंवा ज्योतिषाकडे गेलो नव्हतो. ५. इस्लाम हा मानवी अस्तित्त्वाला लागलेला कलंक आहेच. परंतू त्याच्यावर एकच उपाय. विश्वगुरु भारताने आधी एकेक करत अखंड भारत पार जावा-सुमात्रा पर्यंत ते काबूल कंदाहार पर्यंत केला पाहिजे. आणि मग सौदी अरेबिया वगैरे काबीजकरून सगळीकडे हनुमानाची मंदिरे बांधली पाहिजेत. ते एकेश्वरवाद वगैरे सोडून द्यायला पाहिजे. वाटल्यास ते एकेश्वरवाद वगैरे स्वीकारू शकतात पण अट एकच शूद्र म्हणून त्यांनी आमची वर्णव्यवस्था निमूटपणे मान्य केली पाहिजे. असे कोणता माणूस म्हणालाय?इस्लामच काय कोणताही धर्म हा केवळ घरापुरताच मर्यादित असायला हवा. आणि सगळ्या मदरशात सरकारी शाळेत किंवा कॉन्व्हेंट मध्ये धार्मिक शिक्षण बंद करून केवळ शास्त्रीय शिक्षणच दिले पाहिजे याबद्दल मी आग्रही आहे. ६. ७० वर्षांत केवळ आमच्या जीवावरच आम्ही जगलो. सरकारचा एक पैसाही स्वतःवर खर्च करू दिला नाही. शिक्षण वगैरे सगळं स्वतःच्या खाजगी पैशांनी झालंय. कॉंग्रेससारख्या भिकारचोट पक्षाने चालवलेल्या सरकारकडून पैसे घ्यायचे म्हणजे महापाप. २०१४ नंतरच खरे स्वातंत्र्य मिळाले. ७० वर्षे भारत हि काय काँग्रेसच्या बापाची जहागीर होती का? कि सर्व शिक्षण संस्था काँग्रेसने आपल्या पैशातून निर्माण केल्या. कॉन्ग्रेस हा हत्ती नसून माहूत होता पण आपणच हत्ती आहोत असा खोटा दंभ निर्माण त्यांनी केला आणि तुमच्यासारखे लोक त्याला बळी पडले. खा खा पैसे खाल्ल्यावर जनतेने त्यांना माहुतपदावरून हाकलले आहे आणि श्री मोदी याना बसवले आहे. उद्या श्री मोदी हे डोईजड झाले तर जनता त्यांना सुद्धा पायउतार करायला लावून दुसऱ्याला बसवतील. मुळात सध्या असलेली काँग्रेस हि स्वातंत्र्याच्या वेळची काँग्रेस नाहीच इंदिराजीनि स्थापन केलेल्या काँग्रेसने तिचे तिच्या इतिहासासकट अपहरण केले आहे. हा इतिहास वाचला नसेल तर वाचूनही घ्या आम्ही शिक्षण घेतले ते भारतीय जनतेच्या पैशातूनच काँग्रेसच्या खैरातीतून नाही. माझ्या बद्दल म्हणाल तर मला ४ थी आणि ७ वि ची शिष्यवृत्तीची मिळाली होती. एम बी बी एस आणि एम डी लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयातून झाले ज्यासाठी मी कायम लष्करात नोकरी करण्याचा (permanent commission) बॉण्ड लिहून दिला होता तेंव्हा माझ्या वर कुणाचे हि उपकार नाहीत. बाकी आपला प्रतिसाद टिपिकल अज्ञानजन्य आणि द्वेषमूलक असून उजवा माणूस म्हणजे पुराणमतवादी, आधुनिक विज्ञानाचा द्वेष्टा, जुन्या जमान्यत रमणारा अशी एक मनात प्रतिमा निर्माण केल्यामुळे झापडबंद असा आलेला आहे. कम्युनिस्ट माणसांना जसे आपण सोडून सगळे क्रांतीचे विरोधक आणि बुर्ज्वा वाटतात तसे स्वयंघोषित पुरोगामी हे निधर्मांधतेचा अतिरेक करणारेच दिसतात. माझा प्रतिसाद हा अशा निधर्मांध स्वयंघोषित पुरोगामी माणसांबद्दल होता परंतु तुम्ही वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणून एवढे स्पष्टीकरण दिले अन्यथा तुमचे पूर्वग्रह आणि तुमचे चष्मे तसेच राहू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर
अ
अगम्य Wed, 08/17/2022 - 10:09 नवीन
काही जण म्हणत आहेत की चित्रपटात आक्षेपार्ह काही नाही. बऱ्याच जणांचा असा गैरसमज झाला आहे की लाल सिंग चड्डा वर बहिष्काराचे आवाहन त्या चित्रपटातील काही आक्षेपार्ह content मुळे करण्यात आले आहे. परंतु बहिष्काराचे आवाहन करणाऱ्या बहुतेकांच्या मते, ह्या चित्रपटाचा कन्टेन्ट कसा आहे हा मुद्दा नाहीच (किंवा असलाच तर तो आणखी एक वेगळा मुद्दा आहे). आमिर खान च्या चित्रपटावर बहिष्काराचे आवाहन त्याने पूर्वी केलेल्या राजकीय वक्तव्यांमुळे करण्यात आले आहे. त्याची वक्तव्ये: १) मोदींना २००२ च्या नरसंहारासाठी जबाबदार धरणे: https://www.freepressjournal.in/india/when-aamir-khan-slammed-modi-over-2002-riots-in-2005 २) भारतात असुरक्षितता वाढत असल्याचे सांगणे : https://www.youtube.com/watch?v=eQiabMknhTU ३) भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या तुर्कस्तानच्या पंतप्रधानांच्या पत्नीला जाऊन भेटणे: https://www.indiatoday.in/movies/bollywood/story/politics-aamir-khan-emine-erdogan-meet-turkey-laal-singh-chaddha-1712111-2020-08-17 ४) PK ह्या सिनेमात फक्त हिंदू धर्माची टवाळी करणे, पर्यायाने इतर धर्मांच्या तुलनेत हिंदू धर्म वाईट दाखवणे. तसेच करिनावर सुद्धा करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर आमिर खानला राजकीय वक्तव्ये करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे . त्याचप्रमाणे त्याचे कुठलेही वक्तव्य किंवा कृती आवडली नसल्यास, ते न आवडणाऱ्या लोकांना त्याच्या सिनेमाला न जाण्याचा, तसेच इतरांनाही न जाण्याचे शांततापूर्ण आवाहन करण्याचा अधिकार आहे (अर्थात सिनेमाला जाणाऱ्या लोकांना मारणे, धमकावणे वगैरे मार्ग ना चोखाळता). हे काहीसे नाना पाटेकरवर मी टू चा आरोप झालेला आहे म्हणून मी त्याचा चिपत्रपट पाहणार नाही. किंवा सलमान खानने लोकांना गाडीखाली उडविले असावे (जरी कोर्टात तो निर्दोष सिद्ध झाला) म्हणून मी त्याचा चिपत्रपट पाहणार नाही. अशासारखे आहे. तर मला समजल्याप्रमाणे भूमिका काय आहे हे मी फक्त इतरांना कळावे म्हणून जनहितार्थ मांडले आहे. ते खरे/खोटे चूक/बरोबर ह्याबद्दल मी मत मांडलेले नाही.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Wed, 08/17/2022 - 12:55 नवीन
>>तसेच करिनावर सुद्धा करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! एरवी चढ्ढा मी चित्रपट गृहात पाहुन तसाही पाहिला नसता. (चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पाहण्यासाठी उतावीळ होण्याचे वय केव्हाच मागे पडले.). पण जर संधी आली असतीच तर केवळ करिना कपूर-खान ह्या तोंडाळ अभिनेत्रीमुळे तो नक्कीच पाहिला नसता. भले तिने कितीही मदर इंडिया टाईप अभिनय केला असो. प्रेक्षकांना गृहीत धरणारा कोणताही कलाकार जाम डोक्यात जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 08/17/2022 - 10:38 नवीन
Image removed. चित्रसौजन्य : मिपाकर किसन शिंदे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 08/17/2022 - 11:48 नवीन
तुम्ही बसा सगळे इथे इस्लाम मधील अंधश्रद्धा, ७० वर्षे, बॉयकॉट अन् सिनेमा सारख्या इतर सगळ्याला विषयांना शिव्या घालत तिकडे केंद्र सरकारने रोहिंग्याया मुसलमान शरणार्थी लोकांना आसरा द्यायचा निर्णय केला फायनल, दिल्लीत रोहिंग्या निर्वासितांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत कोट्यातील फ्लॅट, मूलभूत सुविधा आणि २४/७ दिल्ली पोलिस प्रोटेक्शन देणार आहे सरकार. समर्थक अन् विरोधक दोघांचे अभिनंदन सोत्रीने काही पाप केले नाही सिनेमा पाहून म्हणजे &#129315 &#129315 &#129315 &#129315 &#129315 &#129315
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… गुरुवार, 08/18/2022 - 00:08 नवीन
आता खरे साहेब मोदींना पुरोगामी (भेकड) वगैरे म्हणणार की काय मग? चक्क रोहिंग्या? निदान ते अहमदिया तरी घ्यायचे.. मोदींनाच बायकॉट करण्याची वेळ आली म्हणजे. पुरोगामी कुठले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड गुरुवार, 08/18/2022 - 02:33 नवीन
भाजपच्या हैदराबाद मध्ये झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आदरणीय मोदींनी "पासमंदा मुसलमान" उर्फ मुस्लिम जातीय उतरंडीत असणाऱ्या खालच्या जातीतील किंवा ओबीसी मुसलमानांना आपलेसे करा असा गुरुमंत्र दिला आहे. त्या बरहुकुम ही रणनीती बनली आहे म्हणतात बुआ . आता ऑप इंडियाला कळते ते मोदींना कळत नाही का मोदींना लिब्रांडू वगैरे म्हणायचे तितके उत्तर मिळाले का जरा स्पष्ट होईल चित्र. हे सगळे सुरू असताना भाजप दिल्ली ने मात्र आपल्या कार्यक्षमतेचा पूर्ण परिचय देत एक पासमंदा रीच आऊट प्रोग्राम केला म्हणतात ५ ऑगस्टला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर
य
यश राज Wed, 08/17/2022 - 12:01 नवीन
येन केन प्रकारेण लाल सिंह चढ्ढा डब्ब्यात गेल्यामुळे बॉयकॉट गँग खुश आहेच. त्यांना आता जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज भासत नाही. पण सगळ्यात जास्त गोची लाल सिंह चढ्ढा ला सपोर्ट करणार्यांची झाली आहे. कारणे. १. चित्रपट कसा चांगला आहे त्याबद्दल भरभरुन सांगावं लागतयं २. त्याबरोबर चित्रपट आपटलाय पण त्याचं क्रेडीट बॉयकॉट गँग ला न देता सुमार चित्रपट असल्यामुळे चित्रपट कोसळु शकतो हे सांगावं लागतयं. त्यामुळे मुळात वरचा मुद्दा १ बाद होतो. ३. अगोदर हवेत असलेल्या अमिर/करीना सारख्यंना आता प्रेक्षकांसाठी भवनिक आवाहन करावे लागतेय. ४. आजुन काही जणांचे मत ऐकले की. जर हा चित्रपट पडला तर नुकसान मोदींच्या मित्राचे म्हणजे अंबानींच्या वायकॉम१८ कंपनीचे होइल पण मग अमिरचा चित्रपट पाहण्याचे आवाहन करताना मग मोदींच्या मित्राचा फायदा होईल याने हे लोकच जास्त दुखी झाले पाहीजेत. ५. वरील एका प्रतिसादात आल्याप्रमाणे सध्या इकॉनॉमी चे ल लावले असल्याने लोक थिएटर मध्ये जाऊन पैसे खर्च करत नाहीत,तर मग सध्या जे इतर चित्रपट सुपरहीट झालेत ते कशामूळे? आणि बाकीच्या चैनीच्या गोष्टी कशा परवडतात? ६. स्वलालधन्य परफेकट्निष्ट आमिर ला जसे लोकांनी डोक्यावर चढवले होते तसेच ते त्याला त्याच्या मग्रुरी मुळे खाली पाडु शकतात हे सिध्द झाले आहे आणि हा सगळ्या बोलघेवड्या सेलिब्रिटिजना मोठा धडा आहेच. समाजात वावरताना भान ठेवुन व्यक्त व्हावे लागते हे त्यांना समजावुन घ्यावे लागेल. पण हे ते करतील अशी अपे़क्षा करणे पण चुकीचे आहेच. लाल सिंह चढ्ढा आपट्ल्याने त्यातल्यात्यात अगोदर हवेत असणारे इतर कलाकार आता तंतरल्याने भावनिक आवाहन करु लागलेत
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा