Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लाल सिंग चढ्ढा

स
सोत्रि
Sun, 08/14/2022 - 11:28
💬 207 प्रतिसाद
बहिष्काराच्या गदारोळात अडकलेला आणि त्यामुळे गाजावाजा झालेला लाल सिंग चढ्ढा सिनेमा पाहायचा की नाही ह्या वादात न पडता एक सिने कलाकृती म्हणून जमलेच तर हा सिनेमा बघायचे ठरवले होते. पण ह्या बहिष्काराच्या गदारोळाने माझाही किंचितसा बेंबट्या झाला होता बरं का, उगाच खोटं का बोला. अमिरमुळे नाही, पण करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर ते एक असो. काल हा सिनेमा बघितला. ज्या मूळ सिनेमाचे, फॉरेस्ट गंपचे, रीतसर हक्क विकत घेऊन हिंदीत पुनर्निर्मिती केली, तो सिनेमा बघून बराच काळ लोटल्याने तो सिनेमा विस्मृतीत जाऊन तपशील आठवत नव्हते. पण ते बरंच झालं, लाल सिंग चढ्ढा फॉरेस्ट गंपच्या छायेत न बघता स्वतंत्र सिनेमा म्हणून बघता आला. सिनेमा प्रचंड आवडला. अतिशय शांत वाहणाऱ्या नदीप्रमाणे प्रवाही आणि संयत कथानक एक स्वच्छ आणि मन शांत करणारा अनुभव देऊन जातं. आलिकडच्या वेब सिरीजच्या अंगावर येणाऱ्या अतिरंजित कथानकांच्या पार्श्वभूमीवर ह्या सिनेमाचे कथानक एका मंद हवेची झुळूक यावी तसे वाटते. अतुल कुलकर्ण्यांना लेखनाचे पैकीच्या पैकी मार्क. १९७१ ते २०१८ ह्या काळातल्या महत्त्वाच्या घटनांची गुंफण कथानकात एकजीव होऊन एकदम फक्कड जमलीय. ह्या सगळ्या घटनांचा साक्षीदार असल्याने त्या जुन्या आठवणी जाग्या होऊन दर्शक सिनेमात (पक्षी: लालसिंगच्या गोष्टीत) गुंतत जातो. लाल सिंग चढ्ढा पंजाबी असल्याने सिनेमात पंजाबी भाषेचा तडका आहे आणि तो त्या भाषेच्या लहेजामुळे लाल सिंग चढ्ढाच्या व्यक्तिमत्त्वाला उचलून धरून खुलवतो. सर्वच कलाकारांनी समरसून कामं केलीत. अमीर त्याचं काम चोख पार पाडणार होताच आणि तो ते तसंच पार पाडतो. लाल सिंग चढ्ढाच्या पात्राची निखळता, वेगळेपण आणि त्यातले पैलू दाखवणं आमिरसारख्या कसदार अभिनेत्याला काय कठिण जाणार? मोना सिंग छाप पाडण्यात यशस्वी झाली आहे. कणखर आई अतिशय ताकदीने उभी केलीय तिने. करीना ठीकठाक. पैसा हाच एकमेव निकष लावून आयुष्याकडे बघण्याच्या नादात होणारी रूपाच्या आयुष्याची फरपट तिने ठीकठाक उभी केलीय, दिग्दर्शकाने जितकं सांगितलं तितकं आणि तसं! . बाकीचे सगळे कलाकार आपापली कामं चोख पार पाडतात. जे काही आक्षेप ह्या सिनेमावर घेतले आहेत (लष्कराचा, शिखांचा, देशाचा अपमान वगैरे...वगैरे...) ते सिनेमा बघताना कुठेही जाणवत नाहीत. कथानकाच्या अनुषंगाने त्या घटना येतात आणि सिमेना कथानकात गुंतवून ठेवण्यात यशस्वी होत असल्याने त्या घटना घडताना कुठेही काही खटकत नाही. लाल सिंग चढ्ढा हे पात्र फारच निष्पाप आहे. त्याची निरागसता आणि त्याचं ते निष्पाप असणं सिनेमा बघताना लक्षात आलं की ह्या सगळ्या बाबी गौण होऊन जातात. सोशल मीडियाच्या गदारोळात सहभागी न होता, कुठलेही पूर्वग्रह न ठेवता, कोरी पाटी घेऊन सिनेमा पाहायला गेल्यास एक नितांत सुंदर सिनेमाचा अनुभव पदरी पडेल. लाल सिंग चढ्ढा त्या दर्जाचा सिनेमा नक्कीच आहे!

प्रतिक्रिया द्या
66892 वाचन

💬 प्रतिसाद (207)
आ
आग्या१९९० Fri, 08/19/2022 - 08:49 नवीन
दुर्दैवाने याच जपु लोकाना पाकिस्तानी खेळाडूंनी/ कलाकारांनी भारतात येऊन पैसा कमावण्यात काही गैर वाटत नाही. कलेसाठी कला किंवा खेळासाठी खेळ हि भूमिका घेऊन त्यांना दाऊद इब्राहीमने सुद्धा निर्मिती केलेला सिनेमा पाहण्यास अनमान वाटत नाही. पाकिस्तानी गायक अदनान सामीला भारताचे नागरिकत्व आणि पद्मश्री कोणी व का दिले? त्यांना कोणत्या कॅटॉगरीत बसवणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 08/19/2022 - 09:09 नवीन
पाकिस्तानी गायक अदनान सामीला भारताचे नागरिकत्व आणि पद्मश्री कोणी व का दिले? त्यांना कोणत्या कॅटॉगरीत बसवणार? भारतीय नागरिकत्व दिल्यावर त्याने येथे कमावलेला पैसा आणि येथे भरलेला कर आपल्याच देशासाठी खर्च होतो. पाकिस्तानी खेळाडूंना आय पी एल मध्ये कोट्यवधी रुपये द्यायचे, त्यांनी ते पैसे पाकिस्तानात घेऊन जायचे, तेथे कर भरायचा आणि त्यातील काही अंश दहशतवाद्यांद्वारे आपल्या देशाविरुद्ध खर्च होणार. हे कशासाठी? आपली तुलना मुळातच चूक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०
आ
आग्या१९९० Fri, 08/19/2022 - 09:42 नवीन
कर तर येथील कलाकारही भरतात. पद्मश्री देण्यासारखे अदनानचे काय योगदान आहे? कर मिळवण्यासाठी इतकी लाचारी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 08/19/2022 - 14:59 नवीन
@ आग्या१९९० या बोटावरची थुंकी त्या बोटावर करू नका. पाकिस्तानी कलाकार आणि अधिकृत रित्या नागरिकत्व घेऊन येथे राहणारा आणि येथेच कर भरणारा भारताचा नागरिक यांची तुलना मुळातच चुकीची आहे कर मिळवण्यासाठी इतकी लाचारी? अदनान सामी कितीसा कर भरणार? यात लाचारी तुम्हाला कुठून दिसली? उगाच काहींच्या काही? बाकी पदमश्री मिळवणारे इतर बॉलिवूडच्या लोकांची काय लायकी आहे हे मला समजत नाही तसेच अदनान सामी ला का दिले हेहि मला सांगता येणार नाही. ते ज्याचे त्याने पाहावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०
आ
आग्या१९९० Fri, 08/19/2022 - 16:03 नवीन
आमिर खान देशाचा सामान्य नागरीक. परदेशात रितसर गेला. ज्याला भेटायचं त्याला भेटला. त्याने कोणाला कधी भेटावे हे ठरवणारे आपण कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 08/19/2022 - 16:10 नवीन
याचा या प्रतिसादाशी काय संबंध हो, पण त्याचा चित्रपट पाहायचा नाही आणि त्याच्या वर बहिष्कार टाकायचा हे ठरवणारे आपले आपण मुखत्यार आहोत कि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०
आ
आग्या१९९० Fri, 08/19/2022 - 16:24 नवीन
हो, पण त्याचा चित्रपट पाहायचा नाही आणि त्याच्या वर बहिष्कार टाकायचा हे ठरवणारे आपले आपण मुखत्यार आहोत कि ह्याचा माझ्या प्रतिसादाशी काय संबंध?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 08/20/2022 - 06:50 नवीन
त्याने कोणाला कधी भेटावे हे ठरवणारे आपण कोण? याचं उत्तर आहे ते तुम्हाला समजत नाही म्हणूनच मी लिहिलं होतं कि तुम्ही ताण घेऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०
M
Marathi_Mulgi Sat, 08/20/2022 - 21:11 नवीन
अदनान सामीने भारतिय नागरीकत्व स्वीकारल्याच्या व त्याला पद्मश्री मिळाल्याच्या बातम्या इतर भारतियांप्रमाणे मीही काहीश्या अचंब्याने पाहिल्या होत्या. कालांतराने अकलीम अख्तर उर्फ जनरल रानी, अर्शद सामी खान व १९७० च्या दशकातील त्यांची कारकीर्द, आरूसा आलम इ. विषयी थोडी फार माहिती मिळाली व काहीशी संगती लागली. जिज्ञासूंनी गुगलचा लाभ घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०
M
Marathi_Mulgi Sat, 08/20/2022 - 21:10 नवीन
अदनान सामीने भारतिय नागरीकत्व स्वीकारल्याच्या व त्याला पद्मश्री मिळाल्याच्या बातम्या इतर भारतियांप्रमाणे मीही काहीश्या अचंब्याने पाहिल्या होत्या. कालांतराने अकलीम अख्तर उर्फ जनरल रानी, अर्शद सामी खान व १९७० च्या दशकातील त्यांची कारकीर्द, आरूसा आलम इ. विषयी थोडी फार माहिती मिळाली व काहीशी संगती लागली. जिज्ञासूंनी गुगलचा लाभ घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०
च
चौकस२१२ Fri, 08/19/2022 - 00:56 नवीन
आमिरचे मुसलमान असणे ? का अजून काही ? शेजार्यांशी भाडंण चालू असले किंवा एखादा तुम्हाला बाहेरील जगात विरोध करीत असेल तर निंदान ते भांडण संपेपर्यंत किंवा निवळे पर्यंत त्याच्या गळ्यात गळे घालू नये .. एवढा शिष्टाचार असतो / पद्धत टर्की आणि मलेशिया सतत भारताचाय विरुद्ध बाजू घेतात ( वरणाने ( रेस या अर्थी) काह्ही संबंध नसलेली रोहिंग्या मुसलमानां ची बाजू घेताना भारताला विरोध करतात - कारण केवळ भारत हिंदू बहुसंख्यांक आह तेम्हणून ) हे उघड दिसत असतांना या दोघनपासून ४ हात लांब राहावे ... येवडः साधं तत्व आहे पण काय आहे भाजप सरकार करणार म्हणजे चूकच असे ठरवलेच आहे तर बोलणे खुंटते त्या दृष्टिने आमिर सारखया प्रसिद्ध भारतीयाने अशी भेट घेतली ती समजा खटकली तर लगेच "आमिर मुस्लिम म्हणून तुम्ही विरोध " करता हा आमच्यावर शिक्का का मारता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Fri, 08/19/2022 - 04:24 नवीन
तुमचा नेमका प्रॉब्लेम मला कळला नाही, अहो तुम्हीच माझा प्रश्न ठळक केला आहे ना ? प्रश्न आहे तो साहेब, with a question mark , नक्की कारण काय ? आमिर चे मुसलमान असणे ? का अजून काही ? असा प्रश्न आहे , इतर काही असल्यास मांडा, मला तुमच्यावर शिक्के मारून काही ४० पैसे मिळणार नाहीत इतकं खरं, त्यामुळे मला तो नाद पण नाही, मिसळपावचे नाद हमरीतुमरी वर लढवणे तर त्याहून नाही. त्यामुळे मांडण्यालायक काही असल्यास कृपया माझेही perspective lend करण्यास मदत करावी अन्यथा, शिक्का मारू असा शिक्का माझ्यावर न मारल्यास आभारी असेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
स
सुबोध खरे गुरुवार, 08/18/2022 - 09:55 नवीन
मी फारसे सिनेमे पाहत नाही याचे कारण अगोदरच दिलेले आहे परंतु जपु ( जमात - ए - पुरोगामी ) ज्या टोकाला जाऊन आमिर खानचे समर्थन करत आहेत ते पाहून शिसारी आली आहे. आमिर खानने सलाम केला कि नाही हे मला माहिती नाही परंतु सामान्य नागरिक सलाम करूच शकत नाहीत असा प्रॉटोकॉल आहे हे बेधडकपणे येथे लिहिले जाते तेथे त्याच कार्यक्रमात अमिताभ बच्चन आणि इत्तर सर्व सामान्य उपस्थित नागरिक सलाम करत आहेत हे त्यांना दिसत नाही का? प्रोटोकॉल प्रश्न त्यांनी इतर लोकांनी आणि अमिताभ बच्चनने सलाम करायला नको होता असे म्हणून काढला असतात तरी एक वेळ मान्य करता आले असते. असो मुळात हा सिनेमा चालला कि पडला याबद्दल मला अजिबात घेणे देणे नाही. परंतु या निमित्ताने सामान्य जनतेला पैशाच्या माजाने गृहीत धरणारे बॉलिवूडचे लोक थोडेसे जमिनीवर आले तर त्याबद्दल मला जास्त आनंद होईल. हीच गोष्ट मी शाहरुखखानच्या मुलाला रेव्ह पार्टीला गेल्याबद्दल अटक झाली तेंव्हाही लिहिलेले होते. शाहरूख खान च्या मुलाला जामीन मिळाला (तेंव्हा पण जपु लोकांनी भूभुक्कार केला होता) त्यात काही विशेष नव्हते. तो अमली पदार्थांचा व्यापार करत नव्हता हे सरकारला किंवा NCB ला माहिती होतेच परंतु असे लक्ष्मीपुत्र भित्रे आणि निर्ढावलेले नसतात त्यामुळे एक थप्पड मारली तरी हे पदार्थ कुठून मिळवले त्या सर्व दलालांची माहिती पोपटासारखी बोलू लागतात. हे दलाल पकडले गेल्यावर गेल्या वर्षभरात किती कोटींचे अमली पदार्थ पकडले गेले ते पाहून घ्या याशिवाय पैशाने आपण काहीही करू शकतो हा दंभ जरी कमी झाला तरी हेही नसे थोडके.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी गुरुवार, 08/18/2022 - 14:59 नवीन
अटक झालेल्या कुणाकडेही खटला भरावा एव्हडा मुद्देमाल सापडला नाही. उलट त्यांच्यामुळे जर इतका कोटींचा माल सापडला असेल तर खबरी लोकांना जसे ईनाम दिले जाते तसे द्यायला हवे. आणि ज्यांच्या गोदामात एव्हडा माल सापडला त्यांच्यावर काय कार्यवाही होत आहे म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 08/18/2022 - 16:25 नवीन
अटक झालेल्या कुणाकडेही खटला भरावा एव्हडा मुद्देमाल सापडला नाही ज्याच्याकडे ३ ए के ५६ सापडल्या ज्या दाऊद इब्राहिमच्या हस्तकाकडून आलेल्या होत्या त्या संजय दत्त यांच्यावर लावलेला टाडा काढल्यामुळे त्यांना जामीनही मिळाला आणि शिक्षा ६ वर्षे असताना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आणि अनेक वेळेस पॅरोल वर सुटका झाली होती. आपलेच सरकार असल्यावर आर्यन खान कडे असलेल्या चरसचा तंबाखू होणे किती कठीण आहे. मुळात त्याला "हर्बल तंबाखू"च म्हणत होते मग त्याच्याकडे काय पुरावा आणि कसा मिळणार? आणि इनाम देण्यासाठी खबर त्यांनी दिलेली नाही तर त्यांच्याकडून एन सी बी च्या लोकांनी काढली एप्रिल २०२१ पासून एक वर्षात थोडे थोडके नव्हे २६ हजार कोटी रुपयांचे हेरॉईन अमली पदार्थ नियंत्रण बोर्डाने छापे घालून जप्त केले आहे. Since April 2021, DRI has seized more than 3,800 kg of heroin valued at approximately Rs. 26,000 crores in the international illicit market https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1827064 यामुळे जगभरात किती तरुण नशाबाज होण्यापासून वाचले आणि किती दहशतवाद्यांचे आर्थिक नाकेबंदी झाली याचा हिशेब करा. भाजपचा सवंग द्वेष करताना सरकारी अधिकारी यांनी केलेल्या कामावर निदान बोळा फिरवू नका एवढीच कळकळीची विनंती आहे. जमल्यास एकदा व्यसनमुक्ती केंद्रात एक दिवस घालवून पहा म्हणजे हे लक्ष्मीपुत्र ज्या गोष्टींना प्रतिष्ठा देतात त्याचे किती भयानक परिणाम समाजावर होतात ते लक्षात येईल. संजय दत्त, फरदीन खान अरमान कोहली, प्रतीक बब्बर असे अनेक लक्ष्मी पुत्र नशा करणारे पदार्थ सेवन करताना पकडले गेले आणि त्यावर बॉलिवूडच्या लोकांची त्यांना मिळणारी सहानुभूती पहिली तर संताप होतो. लडका शौकीन है पासून उसे नशा से निकालने में कितनी तकलीफ हुई आपको क्या मालूम सारखी वक्तव्ये वाचली कि अंगाचा तिळपापड होतो. परंतु आपला संताप नपुंसक असतो. एका हलकट नटीने ताज वर झालेला हल्ला फार वाईट होता. माझी मेकअपची बॅग त्यात अडकली अशी मुक्ताफळे उधळली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
च
चौकस२१२ Fri, 08/19/2022 - 00:59 नवीन
तो अमली पदार्थांचा व्यापार करत नव्हता हे सरकारला किंवा NCB ला माहिती होतेच परंतु असे लक्ष्मीपुत्र भित्रे आणि निर्ढावलेले नसतात त्यामुळे एक थप्पड मारली तरी हे पदार्थ कुठून मिळवले त्या सर्व दलालांची माहिती पोपटासारखी बोलू लागतात. खरी गेम अशी आहे तर .. तर्क पटला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 08/18/2022 - 13:35 नवीन
आमिर खान ने केवळ हिंदूंच्या रुढींवर टिका केली असे इतर धर्मियांच्या बाबत करुन दाखव असे म्हणणारे त्याचा "सिक्रेट सुपरस्टार" हा सिनेमा विसरत आहेत का? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी गुरुवार, 08/18/2022 - 14:14 नवीन
आमिर खान ने केवळ हिंदूंच्या रुढींवर टिका केली असे इतर धर्मियांच्या बाबत करुन दाखव असे म्हणणारे त्याचा "सिक्रेट सुपरस्टार" हा सिनेमा विसरत आहेत का?
खरंच की.. चांगली आठवण करुन दिलीत. धन्यवाद पैजारबुवा झालंच तर आमिर खान "सिक्रेट सुपरस्टार" चा सहनिर्माता सुद्धा आहे आणि त्या उलट तो पीकेचा सहनिर्माता नाही. शिवाय दंगल (इथेही आमिर खान सहनिर्माता होताच) आणि सिक्रेट सुपरस्टार या दोन्ही चित्रपटांनी चीनमधूनही बराच पैसा कमावला. यामुळे चिन्यांचा पैसा भारतात आणून त्यावर झालेल्या नफ्यावर भारतात कर भरला असेल (तपशील मला माहित नाही).. म्हणजे अप्रत्यक्षपणे भारताच्या अर्थव्यवस्थेला हातभार व तसेच चीनमध्ये भारताची सॉफ्ट पॉवर वाढण्यास किंचित तरी मदत झाली असेल असे मानायला हरकत नसावी. [Secret Superstar was released on 11,000 screens in China - संदर्भ : विकीपिडीया]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
सतिश गावडे गुरुवार, 08/18/2022 - 15:15 नवीन
Secret Superstar was released on 11,000 screens in China
तिकडे कोण पाहते? तिकडील भारतीय? इतके भारतीय तिकडे असतील असे वाटत नाही. मग शक्यता उरते ते हे सिनेमे चिनी लोकच सब टायटल सहित किंवा त्यांच्या भाषेत डब करून पाहत असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
त
तर्कवादी गुरुवार, 08/18/2022 - 20:19 नवीन
मग शक्यता उरते ते हे सिनेमे चिनी लोकच सब टायटल सहित किंवा त्यांच्या भाषेत डब करून पाहत असावेत.
बरोबर.. सब टायटल्ससह भारतीय सिनेमे विविध ठिकाणी लोकप्रिय होतात. आमिर खानने चीनच्या बाजारपेठेत ठसा उमटवला पण जगभरात अनेक देशांत बॉलीवूडचे चित्रपट आधीपासूनच लोकप्रिय आहेत . अमिताभ , शाहरुख, राज कपूर यांचे चाहते विविध देशांत आहेत. पण आता सगळे तपशील नेमके आठवत नाहीत. राज कपूर - रशिया इतके समीकरण आठवते. आमिर खानची लेडी एदार्गेनशी भेट अशाच फॅन फॉलोइंग मुळे झाली असावी कदाचित पण पुढे त्यावर राजकारण झाले. तर अमेरिकेत ओहयो राज्याच्या गवर्नरनी २६ जून २०१० ह दिवस "श्रेया घोषाल डे" म्हणून घोषित केला होता (संदर्भ - विकी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
क
कानडाऊ योगेशु Fri, 08/19/2022 - 05:55 नवीन
>>आमिर खानची लेडी एदार्गेनशी भेट अशाच फॅन फॉलोइंग मुळे झाली असावी कदाचित पण पुढे त्यावर राजकारण झाले. तसंच जर असेल तर आपल्या सेलिब्रिटी स्टेटसचा एदार्गेनाला भारताला अनुकुल भूमिका घेण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल ही काही ऐकण्यात नाही आले. ते त्याचे काम नाहीये हे मान्य पण भारतात जिथे तिथे सामाजिक राजकिय घडामोडीत नाक खुपसत असताना भारताबाहेर ही जर असे काही प्रयत्न केले असते तर त्याच्याबद्दल्चा वाटणारा दुटप्पीपणा कमी नक्कीच झाला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
त
तर्कवादी Fri, 08/19/2022 - 09:58 नवीन
तसंच जर असेल तर आपल्या सेलिब्रिटी स्टेटसचा एदार्गेनाला भारताला अनुकुल भूमिका घेण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल ही काही ऐकण्यात नाही आले.
पण त्यांच्यात काय बोलणे झाले काय चर्चा झाल्यात याबद्दलही काहीच माहित नाही. त्यामुळे त्याच्या भेटीचा प्रत्यक्ष /अप्रत्यक्षपणे काहीच उपयोग होणार नाही असेही नाही. खरंतर सध्या आपल्याला इतकंच माहित आहे की तो त्या एदार्गेनाला वा त्याच्या बायकोला भेटला... ठीक आहे भेटू दे बुवा , आता गेला तिकडे चित्रीकरणाला तर भेटला. जी काही भेट झाली ती जगजाहिरच आहे...गुपचूपपणे तर नाही ना भेटला , किंवा भेटून देशाबद्दलची कुठली तरी गोपनीय माहिती त्यांना दिली असे तर नाही ना ? मग "भेटला तर भेटू देत बुवा" अशी साधी सरळ भूमिका आपण का नाही घेवू शकत ? इतकं कठीण आहे का ते ? आणि अशा भेटीचा काही ना काही प्रमाणात देशाची सॉफ्ट पॉवर वाढवण्यास मदत होवू शकते हे पटत नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
स
सुबोध खरे Fri, 08/19/2022 - 15:06 नवीन
मग "भेटला तर भेटू देत बुवा" अशी साधी सरळ भूमिका आपण का नाही घेवू शकत ? लालसिंग हा सिनेमा आमिर खान यांच्या तुर्कस्तानच्या भेटीमुळे बहिष्कार टाकला गेला नाही हे सत्य आहे तसेच याचे अंशतः: योगदान आहे हेही नाकारता येणार नाही. आमिर खान यांनी तुर्कीच्या अध्यक्षांच्या पत्नीची भेट घेतली ती वेळ चुकीची होती. जसे श्री सिद्धू यांनी इम्रान खान यांची भेट घेतली हे सामान्य माणसांना पचले नाही तसेच हे आहे. दोघांनी वैयक्तिक पातळीवर भेट घेतली इथपर्यंत ठीक आहे. त्याला प्रसिद्धी दिली( कि दिली गेली) हे लोकांना पचले नाही. दोन्ही गोष्टीत बेकायदेशीर किंवा देशद्रोह म्हणण्यासारखे काहीच नाही परंतु अनुचित( inappropriate) आहे. एखाद्या विद्यर्थ्याने गुरुपत्नीशी संबंध ठेवणे जसे बेकायदेशीर नाही पण अनुचित आहे तसेच हे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
त
तर्कवादी Fri, 08/19/2022 - 16:21 नवीन
जसे श्री सिद्धू यांनी इम्रान खान यांची भेट घेतली हे सामान्य माणसांना पचले नाही तसेच हे आहे.
तसे पाहिले तर यातही गैर असे काही नाही. दोघे एके काळचे क्रिकेटर - हा पण समान धागा आहेच, आणि प्रत्यक्ष भेट घेतली तर जगाला दिसून येते. व्हिडिओ कॉन्फरस वर कोण कोणाशी कधी बोलतो हे इतरांना समजेल तरी का ? पण तरीही पाकिस्तान आणि टर्की यांची थेट तुलना करता येणार नाही. टर्कीने जरी काही वेळा भारताविरोधी भूमिका घेतली असली तरी टर्कीला सरसकटपणे शत्रूराष्ट्र मानण्यात आलेले नाही. किंवा चीनशी सीमेवर थेट कुरबूरी चालू होत्या तशीही परिस्थिती टर्कीबाबत नाही. त्यामुळे टर्की बाबत भारतीयांच्या टोकाच्या भावना नाहीत. फार काय .. टर्कीच्या नागरिकांना भारताचा व्हिसा सहज मिळू शकतो तेच भारत व पाकिस्तान एकमेकांच्या नागरिकांना व्हिसा सहजपणे देत नाहीत. केसरीच्या टुर्समध्ये टर्किची टूर आहे, पण कोणतीही कंपनी पाकिस्तानची टूर देईल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
B
Bhakti गुरुवार, 08/18/2022 - 15:45 नवीन
इतर धर्मियांच्या बाबत करुन दाखव असे म्हणणारे त्याचा "सिक्रेट सुपरस्टार" हा सिनेमा विसरत आहेत का?
मला हा सिनेमा खूपच आवडतो, दरवेळी ‌पाहते ‌आणि खुप रडते. माझ्या घरी खानावळीचे सिनेमा पाहायचे म्हणले की थोडा त्रास सहन करावा लागतो हे हे :) असो.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 08/19/2022 - 05:43 नवीन
फ्लॉप सिनेमाचा सुपरहिट धागा, अशी या धाग्याची मिपाच्या इतिहासात नोंद घेतली जाईल. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Fri, 08/19/2022 - 10:05 नवीन
फ्लॉप सिनेमा? सिनेमा जोरात चालू आहे हे वर एका मान्यवरानी दिलेले सर्टिफिकेट वाचले नाही तुम्ही :=) दोन्हीबाजूकडल्या टोटल दहाबारा प्रेक्षकांनी भसाभसा तिकिटे काढून धागा सुपरहिट केला याच्याशी आपण सहमत. च्यामारी एवढा सगळा कुटाणा वाचूनपण सिनेमा बघायचा का नाही बघायचा हे काय समजलं नाही बघा :=)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
च
चांदणे संदीप Fri, 08/19/2022 - 10:36 नवीन
परतिसाद लाईकल्या गेला आहे. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ग
गामा पैलवान Fri, 08/19/2022 - 10:55 नवीन
जेम्स वांड,
पण आमिर खान टर्किश फर्स्ट लेडीला भेटला त्यावर गहजब मात्र उडलाच पाहिजे असा आग्रह दिसला की तो उडवणाऱ्यांच्या हेतूवर शंका येते.
सुमारे शतकभरापूर्वी १९१९ साली मुस्तफा कमाल पाशा यास ऑटोमन खलीफाला पदच्युत करून ती खिलाफत संपवायची होती. एका तथाकथित महात्म्याने त्याला पत्र लिहून खिलाफत वाचवा म्हणून विनंती केली. अशा रीतीने भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली. तिच्यातून पुढे केरळात मोपल्यांचं बंड उद्भवलं आणि त्यात असंख्य हिंदू विनाकारण ठार मारले गेले. आजचा महात्मा अमीर त्याच इस्तंबूलात जाऊन तीच भारतद्रोही कृत्ये करीत नाही हे कशावरून? पश्चात्तापापेक्षा सावधपणा परवडला ( I would like to be safe than sorry. ). बाकी आपापली मर्जी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Fri, 08/19/2022 - 11:56 नवीन
मधेच कुठं गांधी अन् आमिर तुलना ? आधी राहुल झाली आता थेट मोहनदास, कश्याचा कसाही कुठेही संबंध ! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
त
तर्कवादी Fri, 08/19/2022 - 12:10 नवीन
आजचा महात्मा अमीर त्याच इस्तंबूलात जाऊन तीच भारतद्रोही कृत्ये करीत नाही हे कशावरून?
मग त्याकरिता भारताच्या गुप्तहेर खात्याने आमिर खान वर नजर ठेवायला हवी होती, किंवा अजूनही गुप्त्तपणे अशी काही कृत्ये त्याने केलीत किंवा कसे त्याचा कसून छडा लावायला हवा. केली असल्यास त्याच्या मुसक्या आवळण्यात याव्यात...भारतद्रोही कृत्ये केली असल्यास त्याला कठोरात कठोर शासनही व्हायलाच हवे. नुसतंच लालसिंग चढ्ढा च्या बॉयकॉटचे नारे लावून भारद्रोही कृत्ये कशी थोपवणार ? देशविरोधी शक्तींच्या विरोधात नुसताच देशभक्तीचा टिळा लावणार की काही करणार सुद्धा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 08/19/2022 - 14:22 नवीन
तर्कवादी,
नुसतंच लालसिंग चढ्ढा च्या बॉयकॉटचे नारे लावून भारद्रोही कृत्ये कशी थोपवणार ?
अमीरखानाचं मतपरिवर्तन करून. प्रस्तुत बहिष्कार हे मतपरिवर्तनाचं साधन आहे. आता भारतद्रोही पावलं उचलायच्या आधी अमीर हजारदा विचार करेल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
व
वामन देशमुख Fri, 08/19/2022 - 14:39 नवीन
अमीरखानाचं मतपरिवर्तन करून. प्रस्तुत बहिष्कार हे मतपरिवर्तनाचं साधन आहे. आता भारतद्रोही पावलं उचलायच्या आधी अमीर हजारदा विचार करेल.
ही एक फेबु पोस्ट - मेरे प्रिय देशवासियों! वैसे हमीद अंसारी को भारत का उपराष्ट्रपति बनाया.... क्या उसके विचार बदले..? शाहरुख आमिर नसीरुद्दीन शाह को अपार प्रेम देकर फिल्म स्टार बनाया.... क्या उसके विचार बदले...? मुनव्वर राणा के शेर शायरी को सुन तव्वजो देकर उसे शायर बनाया... क्या उसके विचार बदले...? जावेद अख्तर ,सैफ अली खान, शबाना आजमी को सम्मान देकर पदम श्री जेसे और अन्य अवार्ड दिए गए.... क्या उनके विचार बदले..? यू तो मोहम्मद गौरी को पृथ्वीराज चौहान ने 17 बार माफ किया... क्या उसके विचार बदले..? एक बार सोचे जरूर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
त
तर्कवादी Fri, 08/19/2022 - 15:38 नवीन
अमीरखानाचं मतपरिवर्तन करून
वा वा क्या बात है !! मानलं गांधीवाद अजूनही जिवंत आहे. अगदी असहकार चळवळीची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
व
वामन देशमुख Fri, 08/19/2022 - 14:34 नवीन
मग त्याकरिता भारताच्या गुप्तहेर खात्याने आमिर खान वर नजर ठेवायला हवी होती, किंवा अजूनही गुप्त्तपणे अशी काही कृत्ये त्याने केलीत किंवा कसे त्याचा कसून छडा लावायला हवा. केली असल्यास त्याच्या मुसक्या आवळण्यात याव्यात...भारतद्रोही कृत्ये केली असल्यास त्याला कठोरात कठोर शासनही व्हायलाच हवे.
अंशतः सहमती. लोकांना बहिष्कार करायचा / बहिष्काराचे आवाहन करायचा अधिकार आहे. पण जर कुणी देशद्रोही कृत्य / देशद्रोहसदृश्य कृत्य करत असेल / आधीही केलेले असेल तर त्यांना शासन करण्याची जबाबदारी कोणाची? मिपाची की मोदींची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
त
तर्कवादी Fri, 08/19/2022 - 15:36 नवीन
लोकांना बहिष्कार करायचा / बहिष्काराचे आवाहन करायचा अधिकार आहे. पण जर कुणी देशद्रोही कृत्य / देशद्रोहसदृश्य कृत्य करत असेल / आधीही केलेले असेल तर त्यांना शासन करण्याची जबाबदारी कोणाची? मिपाची की मोदींची?
अर्थातच कायद्यानुसार कारवाई करण्याची सगळी जबाबदारी सरकारची किंवा सरकारी यंत्रणांची (मोदी म्हणण्यापेक्षा - सरकारी यंत्रणा म्हणणे अधिक योग्य नाही का ? - सरकारला एक चेहरा - एक नाव नसावे. एक विचारप्रवाह/वैचारिक बैठक असू शकते. असो) मिपाची काहीच जबाबदारी नाहीये. पण सरकारी यंत्रणांनी ज्याच्यावर कोणताही ठपका ठेवला नाहीये अशा व्यक्तीवर जबाबदार मिपाकरांनी अधिक देशद्रोहाचा आरोप अधिक विचारपुर्वक करणे उचित (appropriate) होईल.
लोकांना बहिष्कार करायचा / बहिष्काराचे आवाहन करायचा अधिकार आहे
याबद्दल मी साशंक आहे. "बहिष्काराचे आवाहन करणे" हा मुलभूत अधिकार असू शकेल काय याचा कायदेशीर दृष्ट्या उहापोह व्हायला हवा. एखाद्याने एखादा चित्रपट न बघणे ही ज्याची त्याची निवड तसेच चित्रपटाची समी़क्षा करणे , त्यातील दोष दाखवणे हे पण भाषणस्वातंत्र्याचा एक भागच. तसेच एखाद्या व्यक्तिवर वस्तुस्थितीच्या आधारे उचित टीका करणे हे पण स्वातंत्र्य आहेच. पण एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या उद्योगावर, चरितार्थाशी संबंधित साधनावर/ उपक्रमांवर सार्वजनिक बहिष्कार करण्याचे आवाहन करणे, त्यातही त्याकरिता लोकांच्या धार्मिक अस्मितांना चुचकारणे हे घटनेने दिलेल्या मुलभूत स्वातंत्र्याचा भाग होवू शकेल काय याबद्दल मी साशंक आहे. कारण यामध्ये सदर व्यक्तीच्या(ज्याच्या उपक्रमावर / व्यवसायावर बहिष्काराचे आवाहन केले गेले आहे) "स्वातंत्र्याच्या मुलभूत हक्कावर" (राईट टू फ्रीडम) गदा येते कारण यात "व्यवसाय स्वातंत्र्य" आहे. अर्थात मी काही कायदेतज्ञ नाही. पण मिपावर कुणी कायदेतज्ञ असतील तर त्यांनी याबाबत अधिक खुलासा करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
ड
डँबिस००७ Fri, 08/19/2022 - 15:36 नवीन
नुसतंच लालसिंग चढ्ढा च्या बॉयकॉटचे नारे लावून भारद्रोही कृत्ये कशी थोपवणार ? देशविरोधी शक्तींच्या विरोधात नुसताच देशभक्तीचा टिळा लावणार की काही करणार सुद्धा ? महात्मा गांधीनी आपल्या असहकार चळवळीने (पक्षी बॉयकॉट) ब्रिटीश साम्राज्य हलवल , तरीही तुम्हाला त्याच बॉयकॉट ह्या अस्राच्या ताकदीची कल्पना नसावी ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
त
तर्कवादी Fri, 08/19/2022 - 15:47 नवीन
महात्मा गांधीनी आपल्या असहकार चळवळीने (पक्षी बॉयकॉट) ब्रिटीश साम्राज्य हलवल , तरीही तुम्हाला त्याच बॉयकॉट ह्या अस्राच्या ताकदीची कल्पना नसावी ??
अगदी अगदी.. आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ग
गामा पैलवान Fri, 08/19/2022 - 17:13 नवीन
तर्क्वदि,
वा वा क्या बात है !! मानलं गांधीवाद अजूनही जिवंत आहे. अगदी असहकार चळवळीची आठवण झाली.
गांधीवादाचा असहकार चळवळीशी असलेला संबंध ती बंद करण्यापुरताच आहे. च महत्त्वाचा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 08/19/2022 - 18:39 नवीन
अनूराग कश्यप व तापसी पन्नु चा "दोबारा"च्या निम्मीत्याने प्रमोशनच्या वेळेला एका कार्यक्रमाच दोन्ही कलाकारांनी "बॉयकॉट" ट्रैंडची खिल्ली उडवली होती, ईतकी की आम्हाला व आमच्या सिनेमाला सुद्धा "बॉयकॉट" कराना, प्लिज "बॉयकॉट" चा ट्रैंड चालवाना, वैगेरे !! आजच दोबारा रिलीज झाला, कोणत्याही "बॉयकॉट"चा ट्रैंड चालवल्या शिवायच पडला. तो पण असा पडला की सिनेमा झळकलेल्या २१५ चित्रपट गृहातुन एका शो नंतर शो बंद केले गेले. अति अंहंकारी अश्या ह्या लोकांना जनतेने चांगलीच अद्दल घडवलेली आहे. https://www.google.ae/amp/s/www.indiatoday.in/amp/movies/bollywood/story/dobaaraa-registers-2-3-per-cent-occupancy-shows-cancelled-1990045-2022-08-19
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 08/19/2022 - 18:53 नवीन
सातत्याने ग़ुस्ताख़-ए-हिंदू करत राहणारे बॉलिवूड मोडकळीस येत आहे ही चांगली बाब आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ग
गामा पैलवान Fri, 08/19/2022 - 18:55 नवीन
शाब्बास, हिंदूंच्या रुस्तुमीची दिलेरीची आणि सफेजंगीची. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
य
यश राज Fri, 08/19/2022 - 23:49 नवीन
अनूराग कश्यप व तापसी पन्नु चा "दोबारा"च्या निम्मीत्याने प्रमोशनच्या वेळेला एका कार्यक्रमाच दोन्ही कलाकारांनी "बॉयकॉट" ट्रैंडची खिल्ली उडवली होती, ईतकी की आम्हाला व आमच्या सिनेमाला सुद्धा "बॉयकॉट" कराना, प्लिज "बॉयकॉट" चा ट्रैंड चालवाना, वैगेरे !!
मी पण त्या दोघांचा हा इंटरव्ह्यू पाहिला होता. अगदी निर्लज्जपणे बॉयकॉट ट्रेण्डची खिल्ली उडवत होते. पण त्यांच्या या पडेल चित्रपटासाठी कोणत्याही ट्रेण्ड ची गरजच पडणार नाही हे अवघ्या पहिल्या शो मध्येच कळून चुकले. खऱ्या अर्थाने हे सगळे "तारे(?) जमीन पर" यायला सुरुवात झालीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
स
सुबोध खरे Sat, 08/20/2022 - 06:57 नवीन
तापसी पन्नू चा व्हिडीओ पहिला तर ती कदाचित दारूच्या नशेत असावी असा संशय येतो. ज्या तर्हेने अकारण हसत ती आमच्या सिनेमावर सुद्धा बहिष्कार टाका म्हणून लोकांची खिल्ली उडवते ते पाहून हा नशेचा परिणाम असावा असे वाटते. परंतु असा माज दाखवल्याबद्दल लोकांनी तिचा नक्षा उतरवला हे अत्यंत उचित झाले असे माझे मत आहे. आतापर्यंत आम्ही वाटेल ते बोलू आमचे कुणीही काहीही वाकडे करू शकत नाही हा या सर्व लोकांचा माज होता. अगोदर करीना खान आता हि तापसी पन्नू यानंतर कोणीही नट नटी समाजाची खिल्ली उडवण्याची हिम्मत करणार नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यश राज
ध
धर्मराजमुटके Sat, 08/20/2022 - 06:08 नवीन
मस्त विनोदी चित्रफीत
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी गुरुवार, 08/25/2022 - 08:09 नवीन
२०२२ च्या हिंदी चित्रपटांच्या आंतरराष्ट्रीय कमाईच्या आकडेवारीत लालसिंग चढ्ढा चित्रपटाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार की नाही हे अद्दाप स्पष्ट झालेले नाही. https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/aamir-khan-laal-singh-chaddha-highest-grossing-hindi-film-internationally-8106535/
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 08/25/2022 - 22:00 नवीन
बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ बाबत याआधी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आपलं मत मांडलं होतं. आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॅा. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत एक ट्वीट केलं आहे. पण हे ट्वीट करत असताना त्यांनी एक मोठी चूक केली. जितेंद्र आव्हाड यांच्या ही चूक लक्षात येताच त्यांनी लगेचच ट्वीट डिलीट केलं. “भक्तांनी डोक्यावर घेतलेल्या ‘काश्मीर फाईल्स’पेक्षा, त्यांनी बहिष्कार घातलेल्या ‘लालसिंग चढ्ढा’ने जास्त पैसा कमावला. ७.५ दशलक्ष डॉलर्स, म्हणजे साधारण ६००० कोटी रुपये! भक्तांच्या मताला फारशी किंमत राहिलेली नाही असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. हॅशटॅग फेक बॉयकॉट.” असं ट्वीट त्यांनी केलं. https://www.google.ae/amp/s/www.loksatta.com/manoranjan/jitendra-awhad-tweet-on-aamir-khan-lal-singh-chaddha-movie-and-he-badly-trolled-for-mistake-on-twitter-see-details-kmd-95-3092155/lite/ आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढा ने परदेशात ६००० कोटी रु कमावले ??
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Fri, 08/26/2022 - 13:00 नवीन
७.५ दशलक्ष डॉलर्स हा आकडा खरा आहे. रुपयात करताना गणित चुकले. ते सुमारे ६० कोटी होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
च
चिंतामणी Wed, 11/09/2022 - 10:08 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
च
चिंतामणी Wed, 11/09/2022 - 10:08 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा