जे न देखे रवी...

सख्या रे..

Primary tabs

न्हाऊ कशी सख्या रे
तनु चंद्र जाहलेली
काया अजून आहे
स्पर्शात माखलेली..

न्हाऊ कशी सख्या रे
आताच फूल झाली,
कळी काल मोग-याची
केसांत माळलेली.

न्हाऊ कशी सख्या रे
अंगांग पेटलेले,
ते तेवतात अजुनी
तू दीप लावलेले.

न्हाऊ कशी सख्या रे
मृद्गंध आसपास,
जो कोसळून गेला
पाऊस काल खास.

न्हाऊ कशी सख्या रे
देही चितारलेले,
जे शब्द जाफरानी
ओठी तुझ्या न आले..

कविता मोरपीस सारखी आहे.

सख्या कदाचित असे उत्तर देईल.

धुंद आठवणी त्या
साठव मन कुपीत
सांगू नकोस कोणा
तू कालचे गुपीत

कविता एकांगी वाटते. परवानगी असेल तर दुसरी बाजू डकवतो. तयार आहे.

सख्याचे म्हणणे आहे,विडंबन नाही.

परवानगी कसली त्यात! डकवा की खुशाल. आणि विडंबन असेल तरीही चालेल. सृजनाचंं नेहमीच स्वागत

आणखी एक सुंदर रचना. सैल असावी मिठी... ची आठवण झाली. :)

सं - दी - प

राघव

नको रे असा दूर जाऊ सख्या तू..
सुगंधाविना, मोगरा, पोरका तू..
सांगू कसे, का फुले - रातराणी!!
तुला ना कळे लोचनांची कहाणी..

नको रे असा, दूर जाउ वड्या तू
चटणीविना बालका ,पोरका तू
पावाविना डिश का ये हाताशी
तरीही तुला हादडी मी अधाशी!!

चित्रगुप्त

मस्त आहे रचना. 'जाफरानी शब्द' या जाफरानी संकल्पनेबद्दल आमच्याकडून एक जाफरानी तोहफा कुबूल कीजियेगा:

.

अवतार

अतिशय तरल आणि नेमक्या शब्दांत आशय व्यक्त केला आहे.

किल्लेदार

न्हाऊन घे सखे तू ...
का अशी आळशी
येतो पुनः निशेला
राहू नको पारोशी...

न्हाऊन घे सखे तू...
दाव थोडी कसोशी
वा मीलनात अपुल्या
उगा शिंकेल माशी...

राघव

न्हाऊन घ्या दोघेही..
का उगा मखलाशी??
पुनःपुन्हा कशाला..
त्या आंघोळीची काशी!! 😉

राघव

वाह! चांगलंय की!

@किल्लेदार, उपाशी आणि अधाशी वापरायचे राहिलेत हो.. येऊं देत!

स्वगतः त्या प्राचीतैने फोडून काढले नाही म्हणजे मिळवली! ;-)

किल्लेदार

अरे ते "न्हाऊन" आहे "खाऊन" नव्हे. हे शब्द वापरायचे असतील तर...

खाऊन घे सखे तू...
राहू नको उपाशी
पुरे पोह्यांची बशी
होऊ नको अधाशी ...

शी शी शी !!!
पडल्या-पडल्या उशाशी...
काहीतरीच सुचले मघाशी