जे न देखे रवी...

और तुम्हारे कंधे का तील..

Primary tabs

तुझ्या नजरेतलं लाडीssक आमंत्रण स्विकारून,
गालावरच्या मिरीमिठाचा तो खरखरीत स्पर्श अनुभवत,
थोsडं खाली उतरलं की तुझ्या खांद्यावरचा तो एक धीटसा तीळ, खुणवून बोलवणारा.
त्याला आंजारायचं गोंजारायचं आणि मग तुझ्या पाठीवरून अजून खाली जायचं.
कंबरेवरच्या जुन्या व्रणांवर हळूच ओठ टेकवले की उमटणारी थरथर मुरवून घ्यायची अंगभर..
आणि मग ओठांनीच जोडत बसायचे तुझे सगळे तीळ.
अगदी निवांत...
जर थकले तर क्षणभर विसावायला असतोच की तुझ्या खांद्यावरचा तो हक्काचा तीळ..
....
मधेच मान वर करून पहावं तर मिशीतल्या मिशीत हसत
आभाळभर मायेनं मलाच निरखणारा तू..
किती गोड चित्र असतं हे माहितीये?
....
चंद्रमाधवीच्या एकशे सोळा रात्रींना एखादा तीळ उगीच नाही काही भारी पडत ...

(गुलज़ारच्या एका देखण्या कल्पनेचा विस्तार करायचा प्रयत्न)

मस्त जमलीये.
गालावरील मिरीमीठ प्रकार आवडला! आणि चंद्रमाधवीही!

मूळ गाणं छान आहेच. पण तेव्हाही एक सौ सोलह चांद की राते म्हणजे काय ते कळलं नव्हतं.

आवडली.

पल दो पल की थी मुलाकातें,
उतने में ले गयी मेरा दिल,
एक सौ सोलह चाँद की रातें,
एक ये तेरे काँधे का तिल।

इश्क ही इबादत है
इश्क ही शहादत है
सच पुछो, बाकी सब झुठ
इश्क ही इनायत है
फिर चाहे भगवान की .....
या माशूका की....
गर ना हो तो
कयामत ही कयामत है.

थोडी शोधाशोध केल्यावर एक सौ सोलाह चांद की रातें, यामागील अर्थ कळला.
चित्रपट पाहिलेला नाहीये. एक नायिका नायकाच्या सहवासात चार महिने व्यतीत करते. म्हणजे एकशे वीस दिवस. चार अमावस्या सोडून राहिल्या चंद्राच्या एकशे सोळा रात्री.

असा विचार ते एक गुलजारच करू जाणोत.

हे कुठून वाचलंय? मलाही लिंक द्याल का?
कारण प्रत्यक्ष गुलजार नी हे सांगितलेलं मी तरी ऐकलं नाही.
मी एक त्यांची मुलाखत ऐकलेली आठवते ज्यात ते म्हणाले होते की सहज सुचलेला आकडा आहे तो. पण आता मलाही ती मुलाखत कुठे पाहिलेली ते आठवत नाही.

जे लिहिले आहे ते फार मस्त आहे. काबिले तारीफ.
इष्कने निकम्मा कर दिया गालिब, वरना...