Welcome to misalpav.com
लेखक: हेमंतकुमार | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

दैनंदिन झोपेची मूलभूत प्रक्रिया, त्या संदर्भातील मेंदूतील घडामोडी आणि वयानुसार झोपेत होणारे बदल यांचा आढावा या लेखात घेतला.
पौगंडावस्थेत 'कुंभकर्णाची' झोप म्हणुन ओळखली जाणारी माझी झोप आता अविश्वसनीयरित्या सावध झाली आहे 😀 नेहमीप्रमाणेच माहितीपुर्ण लेख!

झोप आता अविश्वसनीयरित्या सावध झाली आहे
स्वाभाविक आहे. हे स्थित्यंतर प्रत्येकाला जाणवते. मला तर आता रात्रीच्या प्रवासात अजिबात झोप येत नाही. म्हणून शक्यतो टाळतोच.

नेहमीप्रमाणेच ज्ञानवर्धक आणि उत्तम लेख. या निमित्ताने ऐच्छिक आणि अनैच्छिक क्रिया या संदर्भात एक माहिती आठवली. मनुष्य आणि इतर बहुतांश प्राणी यांना झोप लागली तरी श्वासोच्छ्वास आणि त्या अनुषंगाने हृदय चालू राहते. (अनैच्छिक श्वसन) व्हेल हा सस्तन समुद्री जीव मात्र असे करू शकत नाही. पाण्याखाली असताना श्वास घेतला तर फुफ्फुसांत पाणी जाईल. त्यामुळे व्हेल (ज्याला व्हेल मासा असेही म्हणतात) हा ऐच्छिक श्वसन करतो. त्याला सतत ठरवूनच श्वास घ्यावा लागतो. आता यामुळे होते असे की व्हेल कधीच झोपू शकत नाही. कारण मेंदू सतत जागृत हवा. आपण स्वतःहून श्वास घेत राहणे हे झोप लागली तर अशक्य. त्यामुळे झोप घ्यायची झाली तर व्हेलचा अर्धा मेंदू काहीशा सुप्तावस्थेत जातो आणि अर्धा मेंदू श्वास घेण्यासाठी जागा राहतो. अर्थातच व्हेल हा पूर्ण झोपेत कधीच नसतो.

सेवानिवृत्त झाल्यानंतर माझे झोपेचे प्रमाण वाढले आहे. दिवसा नाष्ट्यासाठी सोफ्यावर, खुर्चीवर रिकामे बसलो तर झोप येते. दुपारनंतर जेवण झाले की तास दिसतात झोप अनावर होते. रात्री दहा वाजेपर्यंत डोळे बंद होतात. रात्री सात तास झोप झाल्यानंतर पाच साडेपाच नंतर बिछान्यावर लोळत येत नाही. साधारण तीस टक्के गाढ ,तीन ते पाच टक्के जाग व बाकी हल्की झोप लागते. नोकरीत असताना मात्र फक्त चार ते पाच तासचं झोप येत असे. हे ठीक आहे का?

झोपेचे प्रमाण वाढले आहे. दिवसा
साठीच्या दशकातील सुमारे दहा ते पंधरा टक्के लोकांना दिवसा डुलक्या येतात. याची बरीच कारणे असू शकतात : 1. त्यांची रात्रीची झोप तुटक स्वरूपात होते. या मागे वारंवार लघवीला उठायला लागणे हे कारण असू शकते. 2. झोपेच्या दोन प्रकारांपैकी मंदतरंग झोप कमी होते 3. विविध सहव्याधी असल्यास ( वेदना, नैराश्य, इत्यादी).

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख! बाकी वयपरत्वे झोप कमी होत असावी हे विधान घरातील ज्येष्ठांकडे पाहून खरे वाटत नाही :)

मेलेटोनिन आणि झोप यांच्या संबंधाबद्दल सांगू शकाल का? छान झोप येते, जेटलॅगसाठी उपयोग होतो पासून प्लसिबो इफेक्ट आहे अशी मते वाचली/ऐकली आहेत.

या विषयावर इथे चार वर्षांपूर्वी स्वतंत्र लेख लिहिलेला आहे. त्या धाग्यावर उत्तम चर्चाही झाली आहे. ती पाहता येईल.

या विषयावर इथे चार वर्षांपूर्वी स्वतंत्र लेख लिहिलेला आहे. त्या धाग्यावर उत्तम चर्चाही झाली आहे. ती पाहता येईल.

रात्री आजिबात झोप येत नाही लवकर, नी सकाळी लवकर आजिबात जाग येत नाहीं, कितीतरी वेळा अलार्म पुढे ढकलावी लागते. दिवसभर डोळेयांवर झोपच असते. मला आठवतंय साधारणण साताठ वर्षाआधी एका दिवशी माझी पुर्ण झोप झाल्याने दिवस चांगला गेला होता. पण नंतर तसा दिवस कधी आलाच नाही. दिवसा पेंगलेलोच असतो. बरं मोबाईल बाजूला ठेवून लवकर झोपा असा सल्ला अनेकांनी दिलाय. पण नूसतं पडूनही झोप येत नाही मग मोबाईल पकडून टाईमपास करावा लागतो. सकाळी ऊठणं महाकठीण काम असतं, अगदी गाढ झोपेतून स्वतला बळजबरी बेडवरून ऊठवावं लागतं. सूटीच्या दिवशी हमखास सकाळी १० ते ११ पर्यंत झोपतो. साधारण सकाळी ९ नंतर चित्रविचीत्र स्वप्न पडू लागतात तो सीग्नल असतो की आता ऊठायची वेळ झालीय. ह्यावर ऊपाय काय?? रात्री लवकर झोप यावी म्हणून काही टाॅनीक वगैरे घ्यावे का?? (दारू वगैरे नको.)

रात्रीच्या वेळेस छापील मजकुराचे टेबल लॅम्पच्या पिवळ्या प्रकाशाच्या दिव्यातले (incandescent bulb) वाचन हे नैसर्गिक असते. ते पुरेसे वाचन थकवा आणून झोप येण्यास पूरक ठरते. या उलट कुठल्याही इ-स्क्रीनवरचे वाचन किंवा खोलीतील आधुनिक एलईडी बल्बच्या प्रकाशातल्या वाचनातून डोळ्यांवर विशिष्ट तरंगलांबीचा नीलप्रकाश पडत राहतो, जो मेंदूतील मेलाटोनिन आणि झोपेच्या अन्य यंत्रणांवर विपरीत परिणाम घडवतो. तसेच स्क्रीनवरील माध्यमे, ज्यात आपण सतत स्क्रोल करत राहतो ती व्यसन लावणारी असतातच. म्हणून मी असे करतो : रात्री सव्वा नऊच्या दरम्यान मोबाईल लॅपटॉप वाय-फाय हे सगळं बंद करून टाकतो. त्यानंतर छापील माध्यमातले क्लिष्ट वाचन करायला घेतो आणि त्याच्या जोडीला मंद आवाजात विविध भारती रेडिओ लावून ठेवतो. त्या वेळेतले संगीत साधारण ‘जुनं ते सोनं’ या प्रकारातले असते. त्यातली एखादी छान सुरावट सोबतीला घेऊन पलंगावर जातो. याने मला उत्तम झोप लागते.

अरे वा. हा प्रयत्न करतो. मला झोप यायला सुरूवात १२.१५ ते १२.३० च्या दरम्यान होते. तशी नैसर्गीकपणे झोप येणे साधारण ११ च्या आधी व्हायला हवे.

नींद नावाचे यू ट्युब चॅनल / नींद अ‍ॅप वर झोप येऊ देणा-या श्राव्य गोष्टी असतात. सावकाश गतीने गोष्ट सुरु झाली १ दीड मि. नंतर शरीर शिथीलीकरणाच्या सुचना देतात... झोप लागुन जाते. हा उपाय करून बघा.

अहो अबा, निद्राराणीचा प्रियकर होणं इतकंही सोपं नाही हं ;-) --- ईश्वरकृपेने मला झोपण्याची-उठण्याची काही तक्रार नाही तरीही काही गोष्टी मी कटाक्षाने पाळतो - झोपण्यासाठी - रात्री ९:५५ चा अलार्म* (हो, विश्वास ठेवा!) उठण्यासाठी - सकाळी ५:५५ चा अलार्म (शक्यतो अलार्म वाजण्याआधीच साडेपाच-पावणेसहा पर्यंत उठतो.) *साडेनऊ-पावणेदहानंतर कटाक्षाने फोन लॅपटॉप वापरत नाही. क्वचित एखादेवेळी दहानंतरही झोप येत नसेल तर युट्युब वर एखाद्या अर्ध्या तासाचा कंटाळावाणा ज्व्हिडिओ लावून बाजूला ठेवून देतो, दहा पंधरा मिनिटात हमखास झोप लागून जाते.
ह्यावर ऊपाय काय?? रात्री लवकर झोप यावी म्हणून काही टाॅनीक वगैरे घ्यावे का?? (दारू वगैरे नको.)
मद्यप्राश == निद्रानाश भरपूर खोबऱ्याच्या तेलाने तळपाय, पावले, पेंढऱ्या यांना चांगली मालिश करा, अतीगाढ झोप लागेल. --- माझ्या मते आदर्श झोप म्हणजे, अंथरुणावर पडल्यावर पाच-दहा मिनिटांत झोप लागावी, सकाळी उठल्यावर लगेच अंथरून सोडावे. अगदी ताजेतवाणे वाटावे आणि "अरे, आत्ताच तर झोपलो होतो, लगेच उठलो?" असे वाटावे.

अगदी असाच अनुभव. पहाटेनंतर अगदी चित्रपट पाहिल्यासारखे स्वप्न पडते. ते पडले नाही तर झोप नीट झाल्यासारखे वाटत नाही. पूर्वी परीक्षा जवळ आली की भरपूर झोप येत असे. पहाटे उठून कुठे जायचे असल्यास हटकून पहाटे तीन-चारपर्यंत झोप येत नाही. आणि चांगली झोप झाली नाही तर दिवसभर उत्साहही रहात नाही. अर्थात मधल्या काळात पूर्णवेळ रात्रपाळीत (१० ते ७) काम करताना फारसा त्रास झाला नाही.

जायफळामधील myristin या रसायनामुळे बहुधा झोप येते. त्याचे अन्य काही गुणधर्मही आहेत. त्यावरील काही संशोधन संदर्भ पाहिले. पण त्या रसायनामुळे झोप नक्की कशी येते याचे स्पष्टीकरण सापडले नाही.

म्हणूनच त्याची योग्य मात्रा अतिशय महत्त्वाची आहे. पाच ग्रॅम जायफळ पावडर एकदम खाल्ल्यास खूप उलट्या आणि अन्य काही दुष्परिणाम दिसू शकतात

' झोपेबद्दलच्या आधीच्या लेखाप्रमाणेच हा लेख ही आवडला. शरीरातील रासायनिक प्रक्रियांचे विवेचन आवडले. --- माझा सर्वात आवडता टाईमपास म्हणजे झोप! माझे सर्वात आवडतं पेय म्हणजे पाणी! --- बाकी, एकेकाळी मिपावर व्यायाम करण्याचं फ्याड आलं होतं त्याहीवेळीही मी झोपेचाच पुरस्कार केला होता याची या प्रसंगी, या निमित्ताने व या माध्यमातून झैरात करून घेतो.

माझा सर्वात आवडता टाईमपास म्हणजे झोप! माझे सर्वात आवडतं पेय म्हणजे पाणी!
शत प्रतिशत सहमत. यात एक भर घालतो : माझा सर्वात आवडता चित्रपट म्हणजे मला झोपेत पडणारी स्वप्ने ! .. जाहिरात पाहतो सवडीने.. :)

शरीर आणि/मेंदू थकलेला हवा. माझं दिवसभरात ८०००-१०००० पावलं चालणं होतं. मेंदूदेखील दिवसभर काम करून थकतो. घरी जायला साडे सहा होतात. साडे सातला सगळ्यांची जेवणं. नऊ साडे नऊला आपोआप झोप यायला लागते. दुपारी बारानंतर कॉफी घेतली, तर मला झोप लागते, पण मेंदू सुरू राहतो. उठल्यावर कळते, की रात्रभर स्वप्ने किंवा विचार चालू होते. आधी सुट्टी असल्यावर मी दुपारच्या जेवणानंतर हमखास दोन अडीच तास झोपायचो, आता दुपारची झोप लागत नाही. रात्री झोपायच्या आधी मोबाईल, टिव्ही वगैरे पाहण्याने झोप लागण्यावर परिणाम होतो, असे जाणवत नाही. कदाचित जास्त सुखवस्तू जीवनशैली, मेंदू आणि शरीराला पुरेसे कष्ट नसणे, अशा गोष्टी शांत झोपेच्या आड येत असतील!

घरी जायला साडे सहा होतात. साडे सातला सगळ्यांची जेवणं..... नऊ साडे नऊला आपोआप झोप यायला लागते.
अतिशय उत्तम जीवनशैली. ज्याना असे जमू शकते ते खरेच भाग्यवान ! हे नैसर्गिक जैविक चक्राला पूरक राहते. .. .. ज्यांना पुरेशी आणि वेळेत झोप लागत नाही त्यांच्यासाठी तज्ञ डॉनी सुचवलेला " झोपेच्या आधी ३:२:१ हा नियम " उपयुक्त आहे. तो जीवनशैलीशी निगडित आहे. जरूर वाचा .

झोपेच्या बाबतीत मी परमभाग्यवान आहे. ठार मेल्यागत झोपतो. बसल्या जागी मुंडी लटकती ठेवूनही झोपू शकतो. फक्त उभ्याने झोपता येत नाही. जगास लागो आग, तरी नाय यायची जाग ! -इति माझं ब्रीद. झोप ही माझ्या आईने मला दिलेली सर्वोत्तम ( आनुवंशिक ) भेट आहे. ;-) -नाठाळ नठ्या

शरीराच्या मूलभूत जैविक चक्राला circadian rhythm (circa = day) असे शास्त्रीय नाव आहे. त्यानुसार ते 24 तासासाठी “सेट” झालेले असते. परंतु काही जणांच्या बाबतीत त्यांच्या रोजच्या कार्यालयीन वेळा (रात्रपाळी, अर्धरात्रपाळी इत्यादी), इतर उद्योग आणि काही वैयक्तिक सवयी यांच्यामुळे त्या दैनिक चक्रात काहीसा बदल (किंवा बिघाड) होतो. जर हा बदल जर नित्याचाच राहू लागला तर मग सुट्टीच्या दिवशी मनात एक निवांतपणाची भावना येते. त्यानुसार थोडेफार चेतारासायनिक बदल मेंदूच्या पातळीवर होतात. परिणामी, सुट्टीच्या दिवशी फक्त झोपच नव्हे तर अन्य काही शरीरधर्मांमध्ये सुद्धा बदल दिसू शकतात. असे काही लोक सुट्टीच्या दिवशी बऱ्याच काळ झोपू शकतात. याला "झोपेचे कर्ज " असे म्हणतात. पुढे चालू .....

झोपेचे कर्ज हा जो विषय आहे त्यावरील शास्त्रीय संकल्पना गेल्या एक-दोन दशकांमध्ये बदलत गेलेल्या दिसतात. “झोपेचे कर्ज : सत्य की मिथक?” या स्वरूपाचे स्फुट लेखन जालावर वाचायला मिळते. यावर सखोल विश्वासार्ह माहिती मिळावी म्हणून काही विज्ञान-निबंधांचा शोध घेतला. त्यातून असे मुद्दे मिळाले : १. झोपेचे कर्ज “वसूल” करण्याबाबत व्यक्तीभिन्नता आहे. काही लोक ते आठवड्याच्या अखेरीस वसूल करतात आणि काही जण करू शकत नाहीत. अशा दोघांचाही शास्त्रीय अभ्यास झालाय. २. जर आठवड्यातली अपुरी झोप भरून काढली गेली नाही तर शरीरावर जे दुष्परिणाम होतात ते आठवड्या-अखेरीस “वसूल” करण्याने देखील होतात(च) असं दिसलं आहे. म्हणजेच, रोज नियमित स्वरूपात पुरेशी झोप मिळालेली चांगली. ३. झोपेचे कर्ज “वसूल” झालेच नाही तर आकलनावर आणि मेंदूच्या तत्सम कार्यांवर खरंच परिणाम होतो का ? याबाबतीत एक महत्त्वाची माहिती अशी मिळाली :
These experiments also reveal that individuals differ markedly in their cognitive vulnerabilities to sleep restriction, which suggests a trait-like (possibly genetic) basis for the response.
म्हणजेच, प्रत्येकाच्या शरीरधर्मानुसार (? जनुकीय घटनेनुसार), कमी झोप मिळण्याचे दुष्परिणाम हे सुद्धा व्यक्तीसापेक्ष आहेत.

2010 च्या दशकात चीनमध्ये बहुतेक खाजगी उद्योगांमध्ये आठवड्याला 72 तास काम करणे हा नियम झाला होता. त्यातून कर्मचाऱ्यांचे ताणतणाव वाढले. दिवसभर शिणल्यामुळे स्वतःसाठी विरंगुळ्याचा असा वेळच काढता येईना. बरं, प्रत्येकाला आंतरजालावरील करमणुकीची ओढ तर लागलेलीच ! याचा परिणाम म्हणून लोक रात्री जाणीवपूर्वक उशिरापर्यंत जागू लागले. अंथरुणावर पडले तरी हातातल्या मोबाईलवर सतत स्क्रोल चालू. या प्रकारातून त्यांच्या झोपेवर परिणाम झाला. हा प्रकार त्यांनी जाणीवपूर्वक अवलंबिला असल्यामुळे त्याला revenge bedtime procrastination असे एक विचित्र नाव दिले गेले. अलीकडे या विषयावर संशोधन आणि विचारमंथन होत आहे :

ते विधान वाचल्यावर मनांत म्हंटलं की मुंबईला या, आणि सकाळी कर्जत लोकल पकडून अंबरनाथहून घाटकोपरपर्यंत येऊन दाखवा. मग बघूया किती तास काम करता ते. -नाठाळ नठ्या जाताजाता : प्रवासाचा वेळ सत्तर तासांच्या हिशोबात धरावा का?

बंगळूरमध्ये जर कंपनीच्या बसने जात असाल तर त्यात बसल्या बसल्या लोक लॅपटॉप उघडून काम चालू करतात अशी बातमी पाच वर्षांपूर्वी वाचली होती. (प्रवास साधारण दीड तास). म्हणजे बसमध्ये बसल्यापासूनचा वेळ कामाचा धरत असावेत का ? जाणकारांनी सांगावे

झोपेचं प्रत्येकाचं वेगळं चक्र असतं. ते बदलता येत नाही. परंतू तशी झोप आणि जागे होण्याला जे व्यवसाय साजेसे आहेत ते पत्करणे हा एक उपाय आहे. हॉटेलिंग, मनोरंजन हे काही रात्री तीन ते सकाळी नऊ झोपेसाठी बरे. रेल्वेचे मोटारमेन कधी तक्रार करत नाही असं ऐकून आहे. रात्रीच्याच गाड्या बऱ्याच असतात. झोप बदलण्यापेक्षा व्यवसाय बदलणे सोपे नाही का?

रेल्वेचे मोटारमेन कधी तक्रार करत नाही असं ऐकून आहे.
गणेश कुलकर्णी या ट्रेन लोकोपायलटनी त्यांच्या व्यवसायिक अनुभवावर हे पुस्तक लिहिलेले आहे. पूर्वी मी त्यांचे दोन लेख अंतर्नाद मासिकात वाचले होते. त्यातला एक मुद्दा सांगतो. त्यांच्या झोपेच्या वेळा कामानुसार कुठल्याही आणि बदलत्या असायच्या आणि आजूबाजूला प्रचंड कोलाहल असलेल्या वातावरणातच त्यांना झोपावे लागे. त्याचा परिणाम ते सुट्टीवर घरी असतानाही झाल्याचा जाणवला. कधी कधी त्यांची बायको त्यांना प्रेमाने हलकेच जागे करायला जायची तेव्हा ते एकदम दचकून ओरडल्यासारखे करायचे. त्यावर बायको म्हणायची की, अरे मीच आहे, घाबरलास कशाला? हे पाहता, झोपेच्या वेळा कायमच अनियमित राहिल्यास वागण्यात असे काही बदल होऊ शकत असावेत. .. एखाद्या व्यवसायात पडल्यानंतर दहा-पंधरा वर्षांनी व्यवसाय बदलणे किती जणांना शक्य होईल ? सांगता येत नाही..
लेखक: Bhakti वेळ: गुरुवार, 02/15/2024 - 12:24 Permalink

याविषयी खुप मतमतांतरे वाचत आहे. एका गटाचे म्हणणे आहे की हे बरोबर आहे याने मुलांची झोप व्यवस्थित होईल. तर दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की असं कसं 'सकळी लवकर उठण्याची योग्य सवयींपासून मुलांना दूर करतं आहोत.' मी पहिल्या गटात जाईन, वयानुसार लहान मुलांना झोप १० तास हवीच. शरीर तापमान ही झोप चांगली यावी यासाठी कमी पाहिजे असं आत्ताच वाचलं , तेव्हा यासाठी काय करता येईल.गैजट झोपेच्या १ तास आधी वापरणं खरोखरच फायदेशीर आहे. अतिशय बहुमूल्य कसा लेख आहे _/\_

धन्यवाद. अजून एक मुद्दा ७.३० च्या शाळेसाठी स्कूल बसने जाणारी मुले जवळजवळ ६.३०-६.४५ ला घरून निघतात. त्याआधी "शी" चा कार्यक्रम उरकणे सुद्धा लहान मुलांसाठी तापदायक असते. ९ अगदी योग्य.

या झोपेदरम्यान मेंदूत काही महत्त्वाचे दीर्घकालीन रचनात्मक आणि रासायनिक बदल होतात. त्यातून आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभते. तान्ह्या मुलांच्या बाबतीत तर ही झोप आकलन व स्मरणशक्ती जोपासण्यासाठी पूरक ठरते.
१. दिवसभरात मिळविलेली माहिती झोपल्यावर मेंदूच्य्या रॅमवरून व्यवस्थित मांडणी करून मेंदूच्या एचडी ड्राईव्हमध्ये नोंदली जाते असे कुठेसे मी वाचले होते ते खरे काय? २. सायकल चालवणे, चित्रकला, खेळातली कसबे इ. दिवसभरात शिकलेल्या गोष्टीदेखील झोपल्यावरच कायम होतात हे खरे काय? ३. डायाझीपाम, लॉरेझीपाम, बार्बीच्युरेट्स, क्लोरप्रोमिझीन्स इ. औषधांनी झोप येते त्यात शांतनिद्रा वाढते की खळबळनिद्रा वाढते.? अ‍ॅन्टीअ‍ॅन्गझायटी औषधांनी पण झोप येत असावी. या विविध झोपेत गुणात्मक फरक काय आतो? ४ अनंत काणेकरांवरून आठवले. एका लघुनिबंधात 'निद्रा ही प्रीति आणि किर्ती यांची सख्खी बहीण आहे. जों जों तिची आराधना करावी तों तों ती दूर पळते.' अशा अर्थाची वाक्ये आहेत. नीट आठवत नाही पण बहुधा वि. स. खांडेकरांच्या पारिजातकाचीं फुलें या लघुनिबंधात. असो. छान लेखाबद्दल धन्यवाद.

सर्वप्रथम उत्तम मुद्देसूद प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
'निद्रा ही प्रीति आणि किर्ती यांची सख्खी बहीण आहे.
हे केवळ अप्रतिम ! आवडले म्हणजे आवडलेच. बाकी पहिल्या तीन प्रश्नांची उत्तरे शांतपणे वाचून सवडीने देतो.

१. दिवसभरात मिळविलेली माहिती झोपल्यावर मेंदूच्य्या रॅमवरून व्यवस्थित मांडणी करून मेंदूच्या एचडी ड्राईव्हमध्ये नोंदली जाते
होय, ते याच तत्वावर आहे. हे पाहा : ok

२. सायकल चालवणे, चित्रकला, खेळातली कसबे इ. दिवसभरात शिकलेल्या गोष्टीदेखील झोपल्यावरच कायम होतात हे खरे काय?
होय, यांच्यात पण झोपेचा वाटा आहे. आपण ज्या निरनिराळ्या कला आणि कसबे आत्मसात करतो त्यांच्याबाबत असे म्हणता येईल : १. सायकल चालवणे हे ‘motor’ या प्रकारचे कसब आहे. त्याची कायमस्वरूपी स्मृती मंदतरंग झोपेच्या तिसऱ्या टप्प्यात - म्हणजेच गाढ झोपेत- होते . २. भाषाविकास, गणिते सोडवणे आणि विविध समस्यांची उकल ही कसबे कायमस्वरूपी होण्यात खळबळजनक झोपेचा वाटा महत्त्वाचा.

३. डायाझीपाम, लॉरेझीपाम, बार्बीच्युरेट्स, क्लोरप्रोमिझीन्स इ. औषधांनी झोप येते त्यात शांतनिद्रा वाढते की खळबळनिद्रा वाढते.?..... या विविध झोपेत गुणात्मक फरक काय?
वरील औषधांचे दोन गटात वर्गीकरण होते : १. मन शांत करणारी औषधे (sedatives , उदा. डायझीपाम) : यांच्यामुळे गुंगी आल्यासारखे वाटते पण मूलतः ती झोप आणणारी औषधे नव्हेत. २. झोप आणणारी औषधे (hypnotics, उदा. बार्बीच्युरेट्स) : ही झोपेच्या बहुतेक सर्व प्रक्रियांवर परिणाम करतात आणि झोपेच्या नैसर्गिक संरचनेत बदल घडवतात. या विविध औषधांच्या गुणधर्मांमध्ये काही ना काही फरक आहे. काही औषधे खळबळजनक झोपेच्या तर अन्य काही मंद झोपेतील गाढनिद्रेच्या कालावधीवर परिणाम करतात. या औषधांचे परिणाम व्यक्तीसापेक्ष असू शकतात. या औषधांमुळे येणारी झोप बऱ्याचदा तुटक स्वरूपात असू शकते. परिणामी रुग्ण मध्येच वारंवार जागा होऊ शकतो.