Welcome to misalpav.com
लेखक: हेमंतकुमार | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

समाधान देणारे मुद्देसूद शंकासमाधान. तेही अधिकारी, विश्वासार्ह व्यक्तीकडून. अनेक अनेक धन्यवाद.
२. भाषाविकास, गणिते सोडवणे आणि विविध समस्यांची उकल ही कसबे कायमस्वरूपी होण्यात खळबळजनक झोपेचा वाटा महत्त्वाचा.
हे अनपेक्षित आहे. सत्य हे कल्पिताहून अद्भुत असते ते असे. छान लेखाबद्दल आणि उत्कृष्ट शंकासमाधानाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद. हिप्नॉसिस या विषयावर वाचायला आवडेल. आमच्या कॉलेजच्या कंपूतील मादक पदार्थांचे सेवन करणार्‍या एकाने एकदा एल एस डी घेतले. दोन महिने तो बेफाम व्हायचा आणि इस्पितळातच होता. नंतर कित्येक वर्षे त्याला चित्रविचित्र स्वप्ने पडत. शिक्षण अर्धवट सोडल्यावर तिशीपर्यंत तो काही कामधंदा करू शकला नव्हता. पुढे त्याच्याशी संपर्क आला नाही. 'पे एनी प्राईस' या कादंबरीत हिप्नॉसिस या विषयावरील सत्याचा आभास निर्माण करणारे काल्पनिक कथानक आहे. ते आठवले.