जनातलं, मनातलं

मी काय चुकीचे केले??

Primary tabs

मी काय चुकीचे केले??
“कुणी दहावीचा विद्यार्थी तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाताना दिसल्यास त्याला लिफ्ट द्या.” असा मॅसेज एकाने व्हॉट्सअप समूहात टाकला. त्याला “तुला दहावीत किती टक्के होते??” विचारले. त्याने मला फोन करुन शिव्या घातल्या.
मी काय चुकीचे केले??

भालाफेकीत भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. “निरज चोप्रा हा भारतातील दुसरा सर्वात लांब फेकणारा खेळाडू आहे.” मॅसेज मी व्हॉट्सअप समूहात टाकला. समूहसंचालकाने मला रिमूव केले.
मी काय चुकीचे केले??

एकाने लग्न झाल्यानंतर प्रिव्हेडिंग चे फोटो फेसबुक वर टाकले. मी “बारश्याला बोलव रे” अशी कमेंट केली. त्याचे आठ दहा फ़ोन आले पण मी उचलला नाही.
मी काय चुकीचे केले??

activa वर फेरफटका मारनाऱ्या काकांच्या गाडीचा एक स्क्रू ढिल्ला होता. “काका तुमचा स्क्रु ढिल्लाय” अस मी त्याना सांगितल. पण स्क्रू कडे न पाहता त्यांनी माझ्याकडे रागाने पाहण्यास सुरुवात केली.
मी काय चुकीचे केले??

संभाषणात मी मराठी नी तो हिंदी वापरत होता. “इतने दुर बीवी बच्चे किसके भरोसे छोडके आये??” विचारल्यावर “मी मराठीच आहे” अचानक मराठी बोलून तो संताप करू लागला.
मी काय चुकीचे केले??

सोसायटीत इतर “कम्युनिटी” असतील तर प्रॉब्लेम काय?? ह्यावर “तुम्ही कुठल्या सोसायटीत राहता?” मी विचारले.
“या तुम्ही” सांगून त्यानी मला निरोप दिला.
मी काय चुकीचे केले??

“मी पुण्यात राहतो.”
“पण तुमचा गाडी नंबर तर एमएच१४ आहे.”
“जास्त शहाणपणा करतोस का??” ते भडकले.
मी काय चुकीचे केले??

“मुंबईत अमुक नी मुंबईत तमुक”
“पण तुम्ही तर सानपाड्यात राहतात.”
ह्याला ह्या समूहात कोणी आणले ह्याला काढा नाहीतर मी जातो.” त्यांनी धमकी दिली.
मी काय चुकीचे केले??

पीएमटीत ज्येष्ठ नागरिक, अपंग, नी गर्भार महिला साठीच्या राखीव जागेवर मी बसलो. “उठा, महिला राखीव आहे.” ती येऊन बोलली.
“तुमच्या पोटाकडे पाहून वाटत नाही तुम्ही प्रेग्नेंट आहात.” मी बोललो. आजूबाजूचे हसले.
ती काहीतरी पुटपुटत निघून गेली.
मी काय चुकीचे केले?? :(
सांगा सांगा मी काय चुकीचे केले??<:(

अहिरावण

त्यांना नाही वाटत. पण मिपावरील बहुतांश लोकांना त्यांचे चुकते असेच वाटत आहे.

चित्रगुप्त

अहो, सकाळी उठल्यावर सर्वात आधी हाच धागा उघडला जातोय सध्या, तो वाचनमात्र करून कसे चालेल बरें ? कुणीतरी म्हटलेच आहे (म्हणे) -
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

अहिरावण

अगागागागा !! बाजार उठवला !! =)) =))

तसेही हे सगळ्याच गोष्टींची निंदा करत असतात आणि कुणीतरी म्हटले अहे निंदकाचे घर असावे शेजारी

आमची मागणी मागे घेतो. चालू द्या लवकरच १००० प्रतिसाद होतीलच

वर्तमानपत्र, नुक्कड मिटींगा एव्ढचं काय मंदिरात कीर्तनात सुद्धा हेच चालू आहे.

आजच दोन तरुण तुर्काचीं पत्रकार परिषद बघीतली. राम मंदिरात सुंठवडा कमी वाटला गेला असेल त्या पेक्षा जास्त खिरापत वाटली गेली. वर्तमानपत्र म. टा. मधे खरमरीत टिका,घणाघात, गुजरात मधे भाजप संपणार, काय वाटेल ते छापून येतयं. मला एक गोष्ट समजत नाही किती आत्मविश्वास टपकतोयं.....

चित्रगुप्त यांनी एक हिन्दीत चारोळी टाकून राय (मत) विचारले. जो प्रथम विचार डोक्यात आला तसाच कायप्पावर पुढे ढकलला.
सर्वांची क्षमा (भाषा हिन्दी आहे म्हणून) मागून खाली डकवतोय.
गोड मानून घ्या.....

जनता....

नेता पर ही भरोसा क्यों किया जाए???, जनता पर भी भरोसा करें...

सरकार आएगी, तो सभी महिलाओं के खाते में एक लाख दिए जाएंगे

मैं कहता हूं चुनाव के पहले ही डाल दो, आपकी सरकार नहीं आई, तो वापस कर दिए जाएंगे

भरोसा भी कोई चीज है, हर बार जनता ही नेता पर भरोसा क्यों करें।

आप सभी का क्या राय है???

नेताजी.....

वादों का दौर है
वादें ही किये जायेंगे
जब देने का दौर आयेगा
बहाने दिए जायेंगे

जनता का भरोसा नेतापर
*नेता का भरोसा जनता पर
हिंग लगे ना फिटकरी....*
यहाँ वादों के व्यंजन ही
परोसे जायेंगे.......

नेताजी आलवेज राॅक्स

या भाऊ गर्दीत अबा एकटेच नाहीत. तेव्हां चार जुन पर्यंत चर्हाट वळणं चालू द्यात .

अहिरावण

अखिलेशजी म्हणतात बीजेपी १५० पर्यंत जाईल

Trump

श्री अमरेंद्र बाहुबली, तुम्हाला तुम्ही काय चुकीचे करता ते आता चांगले समजेल. :)
अशी मिळालेले संधी बाकीचे लोक का सोडतील ?
कितीही म्हटले तरी तुम्ही मिपाचे संजय राऊत आहात.

सर संजय राऊत साहेबानी १०५ गुजरात वाद्याना घरी बसवुन महाराष्ट्र वाचवला अश्या महाराष्ट्र प्रेमी, कट्टर शिवसैनिक, निष्ठेचे दुसरे नाव संजय राऊत साहेबांची तुलना माझ्याशी?? इतका मोठा नाही हो मी सर _/\_

Trump

काही हरकत नाही. तुम्ही 'मिपाचे संजय राऊत' अशी पदवी म्हणुन वापरायला लागा.

सुबोध खरे

मीपाचा फडणवीस?

कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भटा ची तट्टाणी

घरी बसलेले १०५ अजून अभंग आहेत त्यातला एक तरी फुटला का?

आणि

५६ आणि ५४ जागा आलेले दोन्ही पक्ष दुभंगुन त्यांच्या नेत्यांना धरणी आपल्याला पोटात घेईल का अशी स्थिती करणाऱ्या श्री फडणवीस

यांच्या नखाची तरी सर आहे का आपली ?

"मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन" म्हणत ते आले सुद्धा आणि दोन्ही विरोधी पक्षाची शकले केली.

साहेब काहीही करू शकतात असे म्हणणाऱ्या लोकांच्या तोंडाला कुलूप लागलंय

कारण साहेब काहीही करू शकत नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झालंय.

बाकी तुमची इडी सीबी आय बद्दल ची बाष्कळ बडबड आता चालू होईल, त्याकडे मी साफ दुर्लक्ष करेनच.

फक्त बेडकी फुगली तरी तिचा बैल होत नाही पण फुटून झुरळ मात्र होतं एवढा लक्षात ठेवा म्हणजे झालं.

कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भटा ची तट्टाणी.
सहमत. कुठे ५५ आमदारांवर मुख्यमंत्री बनवणारे संजय राऊत नी कुठे १०५ आमदार घेऊन घरी बसणारे फडणवीस?? तुलना शक्यच नाही.
घरी बसलेले १०५ अजून अभंग आहेत त्यातला एक तरी फुटला का?
कुणाला हौस आहे इडी सीबीआय चौकश्या मागे लावून घायच्या?? भाजपमध्ये आलं की चौकश्या बंद होतात, फाइली क्लिअर होतात, भाजपमध्ये राहून “सुरक्षित” रीत्या भ्रष्टाचार करता येत असेल तर कुणी का फुटेल??

५६ आणि ५४ जागा आलेले दोन्ही पक्ष दुभंगुन त्यांच्या नेत्यांना धरणी आपल्याला पोटात घेईल का अशी स्थिती करणाऱ्या श्री फडणवीस

अशी गद्दारी हया आधी २ वेळा झालीय, ठाकरेंना ह्याचा अनुभव आहे त्यामुळे धरनी पोटात वगैरे अस काहीही झालेल नाही. उलट मुख्यमंत्री पदाऐवजी अमित शहानी उपमुख्यमंत्री केल्यामुळे श्री. फडणविसाना तस वाटलं असाव.
यांच्या नखाची तरी सर आहे का आपली?
आजीबात नाही. नी कुणाला हवी असेल असही आजीबात वाटत नाही.
"मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन" म्हणत ते आले सुद्धा आणि दोन्ही विरोधी पक्षाची शकले केली.
ते आले पण फौजदराचे हवालदार बनून. :)
साहेब काहीही करू शकतात असे म्हणणाऱ्या लोकांच्या तोंडाला कुलूप लागलंय
करुच शकतात की, सिंचन नी इतर घोटाळ्याच्या फायलि क्लिअर केल्या. आता कुणी भाजपेयी बोंबलतो का सिंचन घोटाळ्याच्या नावाने?? नाही ना? राष्ट्रपतीला रात्री २ वाजता उठवून राष्ट्रपती राजवट उठवायला लावली, १०५ घरी बसवून महाराष्ट्र वाचवला.. आणखी काय काय करावं साहेबानी?? :)
कारण साहेब काहीही करू शकत नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झालंय.
अस असतं तर “शरद पवार माझे गुरु” अस म्हणण्याची वेळ मोदींवर्क का आली असती?? १०५ आमदार घेऊन घरी का बसाव लागलं असतं?? :)
बाकी तुमची इडी सीबी आय बद्दल ची बाष्कळ बडबड आता चालू होईल, त्याकडे मी साफ दुर्लक्ष करेनच.

माहितीय तुम्हाला ईडी नी सीबीआय चा गैरवापर करुन सत्ता मिळवलीय तरी का आरती ओवाळताय नको त्याची??
फक्त बेडकी फुगली तरी तिचा बैल होत नाही पण फुटून झुरळ मात्र होतं एवढा लक्षात ठेवा म्हणजे झालं.
सहमत. पाय जमिनीवर असावे. :) उगाच कुणाला विश्वगुरू वगैरे म्हणू नये.

“मूर्ख --काहीतरी बोलायलाच पाहिजे म्हणून बोलणारा

सुशिक्षित --काहीतरी बोलण्यासारखे आहे म्हणून बोलणारा

ज्ञानी -- काहीच बोलत नाही.“
असे डॉक्टरांनी लिहिले.
“ह्यात मनमोहनसिंग, मोदी, नेहरू” ह्याना कुठे बसवायचे? असे मी त्याना विचारले.
डॉक्टर पुन्हा धाग्यावर फिरकले नाही.
मी काय चुकीचे केले?? :)

अमर विश्वास

डॉक्टरांनीच लिहिले आहे ना ...
ज्ञानी -- काहीच बोलत नाही.“..

म्हणूनच ते काही बोलायला आले नाहीत ...

बाकी तुमचं चालुद्या

अमर विश्वास

आम्ही इथेच आहोत हो ..

पूर्वी ते १८८ नंबरचे महान तज्ञ होते .. तुम्ही त्यांचे सांप्रत काळातले नवीन अवतार आहात का ते माहीत नाही ... पण तुमच्या अपार ज्ञानसागरातले शिंतोडे मिपा वर वारंवार उडत असतात हे मात्र खरे

कपिलमुनी एकदम सत्य बोलले. “जरा विरोधि सूर दिसला की भाजपच्या लोकांची जी जळते ते बघून मजा येते”
मला मजा येतेय.

सुबोध खरे

@अमर विश्वास

कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?

खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

अहिरावण

चला शंभर वेळेस सांगून झाले भगेंद्रा तुझे चुकले पण काही ऐकायला तयार नाही ... हद्द झाली हो...

वेडा बेडूक

लोकांनी कसोटी क्रिकेट चांगले असते असे म्हटले. कुणीही विचारलेलं नसताना मी "कसोटी क्रिकेट भिकार आहे" असं म्हणालो. माझं काय चुकलं?

-नापासेन्द्र इन्जिनियर्बलि

वेडा बेडूक

खादाडीच्या ग्रुप मध्ये बियर आवडणारे लोक कोणती बियर चांगली यावर चर्चा करत होते. मी बियर पीत नसलो तरी "बियर फालतू असते" अशी पिंक टाकली. मला ग्रुप मधून लाथ मिळाली. माझं काय चुकलं?

-नापासेन्द्र इन्जिनियर्बलि

वेडा बेडूक

टेक्नॉलॉजी च्या ग्रुप मध्ये लोक चॅट gpt चा वापर यावर चर्चा करत होते. मला गूगल वापरता येत नसलं तरी मी "chat gpt चा काहीच उपयोग नाही" अशी पिंक टाकली. मला ग्रुप मधून लाथ मिळाली.

माझं काय चुकलं?

-नापासेन्द्र इन्जिनियर्बलि

चॅट जिपीटी ग्राऊंड लेव्हल वर तितकं वापरलं जाणार नाही फक्त इतकच लिहिलं होतं सर.

वेडा बेडूक

यानंतर मी एका ग्रुप मेम्बरच्या युट्युब चॅनेल वर त्याच्या दिवंगत वडिलांविषयी असभ्य भाषेत अश्लाघ्य टिप्पणी केली, आणि मला सर्वच ग्रुप मधून लाथ मिळाली.

माझं काय चुकलं?

-नापासेन्द्र इन्जिनियर्बलि

तुमचं काहीच चुकलं नाही, मिपा मालकांनि तुम्हाला मिपावर घेतलं हे त्यांचं चुकलं.
-
कुजके हाडूक

त्य ग्रुप मेंबरने समुहात माझ्याबद्दल घाण घाण लिहिलं होतं ते विसरले असालच.
आणी नंतर गेलेल्या वडिलाना मध्ये आणून सहानुभूती मिळवू लागला तर मी तरी काय करणार सर?
कुणी काहीही घाण घाण लिहिल्यावर शांत बसायला काय मी संत आहे का?

वेडा बेडूक

वडिलांना कुणी मध्ये आणलं, आणि कुणाला लाथ बसली हे सर्वांना ठाऊक आहे. मांजरानं डोळे मिटले तरी जग बघत असतं!

कांदा लिंबू

काही लोक असे असतात की जे सगळ्यांकडून व सगळीकडून अपमानित होऊन देखील पुन्हा पुन्हा तसेच वर्तन करीत राहतात.

अहिरावण

+१^न

काही लोकाना डूआयड्या घेऊन यावं लागत कारण खऱ्या आयडीने त्यानी बरच “नाव” कमावलेल असतं.
टीप- सदर वाक्याचा आणी अहिरावण व कांदालिंबू हया आयडींचा काहीही संबंध नाही. :)

कांदा लिंबू

काही लोकाना डूआयड्या घेऊन यावं लागत कारण खऱ्या आयडीने त्यानी बरच “नाव” कमावलेल असतं.

सहमत.

काही लोकाना डूआयड्या घेऊन यावं लागत... जसं की अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे

कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?
........!!!!!!