राजकारण

भाजप दक्षिण भारतात का जिंकत नाही?

Primary tabs

भाजप हा पक्ष उत्तरभारतातील राज्ये आणि महाराष्ट्र इथे मजबूत पकड ठेवून आहे. पण तितकी मजबूत पकड त्यांची दक्षिण भारतात नाही. अपवादात्मकरित्या तो एकदा कर्नाटकात आला होता. पण परत नाही. तमिळनाडू आणि केरळ इथे तर तो नगण्य आहे. कट्टर भाजपविरोधक म्हणतात की दक्षिण भारत हा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या उत्तरभारतापेक्षा बराच प्रगत आहे. आम्ही प्रगत आहोत म्हणूनच आम्ही दक्षिण भारतीय लोक भाजपला आमची दाक्षिणात्य राज्ये टाळतात. अन्यथा आमच्या राज्यांचीही अवस्था ही युपी बिहारसारखी मागासलेली होईल. उत्तरभारतातल्या लोकांना मागास राहणं चालत असेल. आम्ही शहाणे आहोत वगैरे. तिकडच्या सोशल मिडियावरही हेच सुरु असतं. आम्ही उत्तरभारतातल्यांसारखे धार्मिक अतिरेकाने पछाडलेले नाही आहोत. इकडे आम्ही हिंदू मुस्लिम ख्रिश्चन गुण्यागोविंदानेचराहतो. उत्तरेतला धार्मिक भेदभाव करणारा पक्ष आम्हाला नको वगैरे. आमची लोकसंख्या आटोक्यात आहे. इतकंच काय पण आम्ही भरलेल्या करांचा उपयोग उतरेतल्या मागास राज्यांना पोसण्यासाठी होतो आहे. जे स्वत:ची राज्ये समृध्द करु शकत नाहीत अशा पक्षाला आमची राज्ये आम्ही का द्यावीत? आमचे स्थानिक नेते पुरेसे सक्षम आहेत.

तर इथल्या राजकीय विश्लेषकांना विनंती की हेकाय प्रकरण आहे ते उलगडून सांगावं. भाजपला दक्षिणेतल्या राज्यांमधे मोठं यश का मिळत नाही?

रामचंद्र

विश्लेषण नाही पण अंदाज असा, की येत्या वीस वर्षांत भाजप बहुतेक सर्वच दक्षिण भारतात आपली मुळं भक्कम रुजवेल आणि ते निवडणुकांतूनही दिसून येईल.

शाम भागवत

देवनागरी लीपीमुळे आपल्याला उत्तर भारतीय हिंदीभाषकच समजत असावेत.
🤣

दक्षिण भारताला आदरणीय मोदीजींसारख्या नेत्याची किंमत नाही. त्यामुळे ते अविकसितच राहणार. मोदीजींची किंमत असलेले यूपी बिहार पहा. यूपी ची इकोनॉमी कॅलिफोर्निया तर बिहार ची जर्मनीला टक्कर देतेय. पण दक्षिणेतील लोकाना हे कळेल तेव्हा ना? त्यांना अविकसितच रहायचे असेल तर कोण सांगणार?? नमो नमो नमो नमो.

भाजप म्हणजे मोदी न्हवते.. आजही नाहीत आणि पुढेही नाहीत.

सध्या तरी, भाजपचा पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणजे मोदी.

बाय द वे,

तुमचे हे असे इतरांच्या ओंजळीने पाणी पिणे किती दिवस चालणार आहे?

विजुभाऊ

भाजप ने हिंदी भाषेचा आग्रह सोडला तर त्याना दक्षीण भारताचे प्रश्न समजतील.
भाजपचे बहुतेक नेते अपवाद वैंकय्या नायडू सोडले तर सर्वच्जण उत्तरभारतीय आहेत.
दक्षीण भारतातले कोणीच नाही.

चौथा कोनाडा

उत्तर भारत हा हेड क्वार्टर असलेला भाजप हा दक्षिण भारतीय लोकांना गैरसोयीचा आहे. नृसिंहराव पंतप्रधान होऊन सुद्धा मोजके दक्षिणात्य नेते देश पातळीवर आले... त्यांना पंतप्रधान होण्याची किंवा पुर्ण देशावर राज्य करण्याची इच्छा दिसत नाही.. फक्त उपद्रव मूल्य टिकवून ठेवायचं. आपण बरं की आपलं दक्षिण बरं अन उत्तरेकडचे कुणी इथं घुसायला नको..काँग्रेस आणि भाजप समान अंतरावर. हेच धोरण.

तर्कवादी

भाजप स्थानिक भाषा व अस्मिता यांचा आदर न करता हिंदीला लादू पाहते अशी शंका / संशय/ खात्री असल्याने बहुधा दक्षिणी राज्ये भाजपला दूर ठेवत असावीत