काथ्याकूट
समजा महायुती ला बहुमत मिळाले तर मुम कोण ?
By स्वरुपसुमित
·
Primary tabs
मित्रानो
महायुती ला बहुमत मिळेल कि नाही ते जाऊ द्या
समजा मिळालं तर ?
फडणवीस ह्याची इच्छा नाही
तावडेंच्या गेम झाला
गडकरी केंद्रात
मुंडे भाऊ बहीण बीड पुरते
पूर्ण महाराष्ट्र भर असा चेहरा नाही
एकनाथ शिंदे वेळो वेळी डोईजड झालेत
अजित पवार मु मा सध्या शक्य नाही
शकयतो मराठा समाजाचा चेहरा पाहिजे
आणि ज्यांना प्रशासचनाचा दांडगा अनुभव आहे तेच होणार
अजून कोणती नावे सुचतात
मीच होणार मुक्येमंत्री...
श्री. फडणवीस हाच भाजपचा मुख्यमंत्र्याचा चेहरा आहे. दुसरा कोणी आणून यांना केंद्रात मंत्री करतील असे काही वाटत नाही. पण, आता फडणवीसांच्या राजकारणातून सध्या भाजपाचा फार मोठा फायदा भविष्यात दिसत नसला तर, दुसरा चेहरा जो विनोद तावडेंचा होता त्याला पद्धतशीरपणे मातीत घातला, असे वाटते.
आत्मसंतुष्टी माणूस नाही. राजकारणात थोडाही मागे पडला तर करीयर संपेल. त्यामुळे त्यांची इच्छा नाही याला काही अर्थ नाही. मागेही असेच काही तरी आणले होते. मला नै राजकारण वगैरे पण कायम फोकस आपल्यावर.
-दिलीप बिरुटे
"फडणवीस ह्याची इच्छा नाही
तावडेंच्या गेम झाला
गडकरी केंद्रात
मुंडे भाऊ बहीण बीड पुरते
पूर्ण महाराष्ट्र भर असा चेहरा नाही"
मला मुख्यमंत्री व्हायचे आहे असे फक्त उद्धव ठाकरेच म्हणून शकतात. हुशार राजकारणी नेहमी 'कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून.." असेच म्हणत असतो. महाराष्ट्रभर चेहर्याची काहीही आवश्यकता नसते.२००१ ऑक्टोबरमध्ये मोदी मुख्यमंत्री झाले . ते गुजरातचा तेव्हा चेहरा होते का? ते सगळे नंतर करावे लागते. शरद पवार १९७८ साली मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना कोणता दांडगा अनुभव होता? ते तेव्हा बारामतीचा चेहरा होते आणि आजही बारामती+पुणे चा चेहरा आहेत.
किंतू परंतू भरपूर आहेत. व्यवस्था आहे कुणीही बसले तरी खुर्ची चालते. राबडीदेवी फार मोठे उदाहरण आहे.
किरण बेदी म्हणतात लोक मला घाबरत नाही खाकी वर्दीला घाबरतात.
बघू कोण आपल्या नशिबात आहे.
कुणीही बनो. पण ताठ ठाकरेंसारख ताठ कण्याचा मामू व्हावा. किंवा ठाकरेच व्हावे.
मनोरंजक प्रतिसाद...
ऊबाठा आणि त्यांची कार्यक्षमता... ह्या विषयी मौन पाळणेच उत्तम.
मनोरंजक आयडी.
तुम्ही फार उत्तम मनोरंजन करत आहात.
प्रगती आहे.
ही प्रगती अशीच राहू दे.
बाय द वे,
प्रतिसादात योग्य मत मांडणे जमत नसेल तर, काही वयाने वाढलेली माणसे, व्यक्तिगत पातळीवर उतरतात. हे आता पटले......
मनोरंजक प्रतिसाद.
पालथ्या घड्यावर पाणी...
चालायचेच....
मनोरंजक प्रतिसाद.
अति झाले आणि हसू आले....
अबा, काही हीं हं अबा, तुम्हांला माहीत नाही उठांचा कणा लवचीक आहे.
किलित तोमय्याना मुक्यमंत्ली कलावे ;-)
याला बोलतात आत्मविश्वास!!

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच अजित पवारांच्या विजयाचे पोस्टर पुण्यात लावण्यात आले होते.
बातमी-https://www.loksatta.com/maharashtra/ajit-pawar-poster-as-chief-ministe…
यांना मोदींनी मुख्यमन्त्री होण्यासाठि विनन्ति करावि!
कारण त्यांच्या सभेला लोकांनी सर्वात जास्त गर्दी केली होती.
अमित शहांना मुख्यमंत्री बनवावे,
हे ५ वर्षे स्थिर सरकार, पुढची ५ वर्षे स्थिर सरकार...
सरकारला कोणीच फोडू शकणार नाहीं (फक्त ट्रम्प फोडू शकतात, पण ते मोदींचे दोस्त त्यामुळे तिथून धोका नाही)
फक्त क्षी जिनपिंग फोडू शकतात.. पण त्यांचं महाराष्ट्राकडे लक्ष नाहीं....
इडी ची लोकं झोपा काढतील...
:)
मी पुन्हा येइन.
आणी महाराष्ट्राचे वाटोळे करेन.
उगी उगी
बर्नोल आणून ठेवा
फडणवीस साहेब आले
लोकशाही मार्गाने?
मनोरंजक प्रतिसाद....
मनोरंजक आयडी.
बाय द वे,
फडणवीस कुठल्या मार्गाने आले? हे जरा विस्कटून सांगितले तर उत्तम....
कारण, आमच्या मते तरी, सगळे आमदार लोकशाही मार्गानेच विधानसभेत निवडून आले आहेत.
अर्थात, तुम्ही हे असे इतरांच्या ओंजळीने पाणी पिणे किती दिवस चालणार आहे?
मनोरंजक प्रतिसाद.
अरे वा
भुजबळांची रेकॉर्ड मनोरंजक प्रतिसादावर अडकली आहे .
त्या मुविकाकानी किती वात आणला पाहिला का?
अहो,
तुमचे प्रतिसाद खुपच मनोरंजक असतात.
ना शेंडा ना बुडखा, असे प्रतिसाद वाचले की मी सरळ, "मनोरंजक प्रतिसाद" असे लिहून मोकळा होतो.
RSS ची स्थापना का झाली? हेच माहिती नसेल तर, वक्फ बोर्डाच्या बाबतीत तर तुमचे ज्ञान नक्कीच अगाध असणार.
लोकशाही फक्त
बॅलेट वर असते
नकली छापून
जिंकता येते.
ईव्हीएम नकली
बनत नाही।
निवडणूक आम्हाला
जिंकता येत नाही
ase फक्त भाजप नी निवडणूक आयोगालाच वटतेक. नक्की काळेबेरे आहे.
भाजपचे धक्कातंत्र! माधव भंडारी राज्याचे नवे मुख्यमंत्री! अमित शहा पत्रकार परिषदेतून लाइव्ह.
महायुतीच्या नेत्यांचा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा; उद्या होणार शपथविधी
शिवसेनेचे एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते आज राजभवनावर दाखल झाले आहे. यावेळी ह्या तीन नेत्यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत राज्यात सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
तसेच भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमुखाने निवड करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाला आहे. त्यामुळे उद्या मुंबईतील आझाद मैदानवर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत.
राज्यपालांच्या भेटीनंतर महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सत्ता स्थापनेविषयी माहिती दिली. ''आम्ही आज राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेसाठी पत्र दिले. महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला आहे. आम्हाला उद्या सायंकाळी साडेपाचची वेळ शपथविधीसाठी दिली आहे. राज्यपालांनी आम्हाला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे.'' असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
संपादक मंडळ !
हागणदारी धाग्यांना कुलूप लावा आता ! घाणीत पाय ठेवायला जागा राहिली नाही. एक ठराविक मर्यादेपर्यंत ठीक आहे पण दरवेळी धागा उघडून पाहीले की निराशा पदरी पडते.
नाही तेव्हा धागा राहिल आणि प्रतिसाद उडेल असे देखील व्हायला बसलेय.