काथ्याकूट

अदानी,उर्जा आणि अमेरिका

Primary tabs

अमेरिकेत गौतम अदानी ह्यांच्याविरोधात वॉरंट निघाले आणि भारतात एकच खळबळ माजली. दोषारोपात(INDICTMENT) गौतम अदानी आणि त्यांच्या सहकार्यांनी भारतातील चार राज्यांत २००० कोटींची लाच दिली होती. अदानी एनर्जीची सौर उर्जा ह्या राज्यांनी विकत घ्यावी म्हणून ही लाच २०१९ ते २०२४ ह्या काळात दिली गेली. अर्थात हे आरोप आहेत पण त्याचे पुरावे देखील देण्यात आले आहेत असे समजते.https://www.justice.gov/usao-edny/media/1377806/dl?inline
लगेच राहुल गांधी ह्यांनी अदानीना अटक करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. ही चार राज्ये- छत्तीसगड, आंध्र प्रदेश,तामिळ नाडु आणि ओडिशा. ह्यात सर्वाधिक लाच,१२५० कोटी, आंध्रप्रदेशमध्ये २०१९-२०२४ मध्ये देण्यात आली होती असा आरोप आहे. रोख अर्थात जगन मोहन रेड्डि ह्यांच्यावर आहे. कारण मुख्य्मंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय अशी मोठी कंत्राटे मंजूर केली जात नाहीत.
आता ह्यावरुन राजकारण तापणार होतेच. भाजपातर्फे ह्या सगळ्या मागे 'जॉर्ज सोरोस'च आहेत असे ठामपणे सांगण्यात आले. खरे तर हे असे बोलायची गरजच नव्हती. कारण ह्या चारही राज्यांमध्ये तेव्हा भाजपा सत्तेवर नव्हता. पण 'पाश्चिमात्य देशांना भारताचे बरे झालेले बघवत नाही' ही थियरी अनेक मध्यम वर्गीयांना सहज पटते. 'चारही राज्यांतील तत्कालीन अधिकार्यांची चौकशी करा' असे सांगितले असते तरी हरकत नव्हते पण अदानीवर संकट म्हणजे भारतावर संकट असे भाजपावाले मानत असावेत. असो.
मुख्य प्रवाहातील चॅनेल्सनी सावध पवित्रा घेत बातमी दिली आहे. मराठी चॅनेल्सवर तर बोलायलाच नको. 'दादा निवडुन येणार की भाउ की अण्णा' ह्यातच ती रमली आहेत.
अदानी आणि ट्रम्प ह्यांचे चांगले संबंध आहेत असे बोलले जाते. ट्रम्प निवडुन आल्यावर अदानी ह्यांनी ट्रंप ह्याच्या 'धैर्य आणि चिकाटीचे' कौतुक केले होते. १३ नोव्हेंबरला अमेरिकेत मोठी गुण्तवणुक करण्याची घोषणाही केली होती.
In his congratulatory post, Mr Adani said, "If there is one person on Earth who stands as the embodiment of unbreakable tenacity, unshakeable grit, relentless determination and the courage to stay true to his beliefs, it is Donald Trump."
ट्रम्प सत्तेवर यायच्या आत अदानीला अडकवायचे असा प्लान बायडेन सरकारमधील लोकांचा होता आणि तो यशस्वी झाला असेही म्हंटले जाते. आता ट्रम्प ह्यांनी शपथ घेतल्यावर ते ह्या दोषारोपाला आणि संबंधीत अधिकार्यांना कसे बाजुला काढतील ते पहावे लागेल.

अदानीवर संकट म्हणजे भारतावर संकट असे भाजपावाले मानत असावेत. असो. खिक्क. अदानीने आपले हस्तक सरकारात पेरले. सर्वोच्च पदावरील मोदीही अदानीना मदत करतात, मोदीनी चंगच बांधलाय की अदानीना भारतातील सर्वात श्रीमंत माणूस बनवेल त्या साठी जमेल तसे नियम मोडून अदानीना एयरपोर्ट ते धारावी झोपडपट्टी सर्वच दिलं जातंय. हिंडेनबुर्ग सारख्या कंपन्या सत्य बाहेर काढून अदानीची हवा काढतात नी मोदींच्या मेहनतीवर पाणी फिरवतात. मग मोदीना चरफडत बसण्याशिवाय पर्याय नसतो, कारण हिंडनबुर्ग भारतात नाही की त्याच्यावर इडी सोडू की हिंडनबर्ग राजकीय पक्ष नाही की निवडणूक आयोगाला वापरून त्याचा काटा काढू, ना हिंडेनबर्ग कंपनीतलं कुणी आहे की खोके पोहोचवून कंपनीची दोन शकले करू. :)
अंधभक्तात अडाणींचे एक वेगळे स्थान आहे. आपल्या मालकाचे मालक असल्याने अदानीवर संकट म्हणजे राष्ट्रावर संकट असे अंधभक्त मानत असावेत. शिवाय दोघेही गुजराती, मराठी भक्तांनी गुजरातचरणी निष्ठा व्हायल्याची शपथ खाल्ली असल्याने अदानी म्हणजे त्यांचा जीव की प्राण. थोडावेळ जाउद्या अंधभक्त येतीलच समर्थनाला.
रच्याकने थेट मालकाशी मैत्री करावी म्हणजे नोकर आपल्यालाही मुजरा करतात हे ओळखूनच पवारानी सरळ अडाणीशी मैत्री केली असावी का?

चौथा कोनाडा

गेल्या एक दोन दशकांपासुन अमेरिकेचे राजकारण (किंवा अनेक देशांचे राजकारण) भारतीय थोर लोकशाही परंपरेनुसार चालले आहे असे दिसते.

सत्तेवर आले की आपल्याला धार्जिणे असणारे उद्योगपती, लष्करशहा यांना पाठीशी घालून त्यांच्या विरोधातले पुरावे कमकुवत करून शुद्धिपत्र अर्थात "क्लीन चीट" देऊन आपण सत्ता गाजवत राहायची हेच धोरण. त्यामुळे अदानी काय किंवा इतर न प्रकाश प्रकाशात आलेली मंडळी काय, निरपराध सुटणार यात काही आश्चर्य वाटायचे कारण नाही आणि हे सुरू झाले की त्यांना पाठिंबा द्यायला निर्दोष ठरवायला माध्यमातले घटक पुढे येतीलच !

जय अदानी
जय अंबानी
जय मोदी
जय अमित शहा
जय राहुल गांधी
जय सोनिया गांधी
जय केजरीवाल आणि
....... जय जय .... सर्वांचा जयजयकार
आणि आंतरराष्ट्रीय भारतीय राजकारणाचा विजय असो !

कंजूस

सामान्य माणसाच्या दृष्टीने -
१)मोठ्या कामांची आंतरराष्ट्रीय निविदा म्हणजे कोण हे काम किती रकमेत किती दिवसांत करणार याची लिखीत झलक. तर खूप कमी रकमेची दिल्याने कंत्राटे अडानी गटाच्या कंपन्यांना मिळत आहेत.
२) राजकारण झालेच तर ते कंत्राट मिळाल्यावर होणार.
३) कुणी सांगितले म्हणून तशा रकमा अदानी मांडत असेल का?
४) अशी मोठी कामे न मिळालेल्या कंपन्यांची पोटदुखी वाढत आहे का?
....
५) बांगला देशाला वीज पुरवणाऱ्या काही भारतीय कंपन्या आहेत . वीज देत आहेत पण बिले थकली आहेत. या पार्श्वभूमीवरसुद्धा अदानीने एक वीज पुरवण्याचे( कोळशावर वीज उत्पादन याच पद्धतीची आहेत सर्व) कंत्राट घेतले आहे हे समजले. एवढी जोखमीची उडी कोण घेणार.
६) चीनच्या कंपन्यांच्या उत्पादनामुळे अमेरिकी कंपन्यांवर दबाव येत आहे. त्यात भर म्हणजे आता भारतही शर्यतीत उतरला तर दिवाळं जवळच आहे.
७) ट्रंपने MAGA( make America great again) नारा दिला आहे - गरीब स्थानिकांना काम देणे. पण याचबरोबर "no wars" आहे. म्हणजे शस्त्रे बनवणाऱ्या कंपन्या तोट्यात. युद्ध बंद झाली तर काय कसं होणार? मग बाईडन जाताजाता मदतीला धावले झेलेन्स्कीच्या " मार तू मोठे अग्निबाण" युद्ध चिघळेल आणि मग मजाच. पण तसं ट्रंप होऊ देणार नाही.
८) एकूण अदानी आणि भारताला सतावणे हाच उद्देश दिसतो आहे.

९) नेहमीप्रमाणे राहुलबाबाने उडी घेतली आहेच.

"एकूण अदानी आणि भारताला सतावणे हाच उद्देश दिसतो आहे."
सध्याच्या माहितीनुसार अदानीने बिगर-भाजपा सरकारमधील लोकांना लाच दिली होती. २०१९-२०२४ ह्या काळात. जगभरात उर्जा आणि संरक्षण कंत्राटात 'हमाममे सब नंगे' स्थिती असते. अमेरिकाही सोयीनुसार नैतिकतेवर बोलत असते. आमच्य अंदाजाप्रमाणे अदानी आणि बायडेन सरकार ह्यांच्यात काहीतरी बनाव निर्माण झाला असावा. म्हणूनच जाता जाता बायडेन ह्यांच्या प्रशासनातील अधिकार्यानी बदला घेतला असावा. कारण आता व्हाईट हाउसने आता निवेदन दिले आहे-
Asserting that the relationship between India and the U.S. is built on a strong foundation, the White House has expressed confidence that it can navigate the ongoing crisis surrounding bribery charges against Indian billionaire Gautam Adani.
म्हणजे 'हे ही दिवस जातील'! असेच त्यांना म्हणायचे आहे.

शाम भागवत

अदानी आणि बायडेन सरकार ह्यांच्यात काहीतरी बनाव निर्माण झाला असावा.

ते ठीक आहे हो.

पण राहूल गांधी का त्यांच्या तालावर नाचताहेत. जर यातली माहिती बाहेर आली तर अगोदरची सरकारे गोत्यात येतील ना? ती भाजपाची असती तर राहूल गांधी बरोबर राजकारण खेळताहेत असं वाटलं असतं. पण जर भाजप विरोधी किंवा कधीकाळी कॉंग्रेसची सहयोगी सरकारे त्यामुळे गोत्यात येणार असतील तर ते राहूल गांधींच्या भारतातल्या राजकारणाला पूरक कसे हे काही कळत नाही.

बायडेन सरकारला ती राज्य सरकारे कोणती याचे काही घेणे देणे नसल्याने ते त्यांचे राजकारण बरोबर खेळताहेत. ते ट्रंम्प पाहून घेतील.

टीपीके

तितकी समज त्यांना किंवा त्यांच्या समर्थकांना असती तर मोदींच्या अनेक चुकांचा वापर करून आत्ता पर्यंत सत्तेत आले असते.

टीपीके

तपशीलवार बातमी वाचली नाही अजून, पण कंपनी भारतीय, कंत्राटं भारतीय राज्य सरकारांची, मग यात अमेरिका कुठून आली? अटक वॉरंट काढायचा अधिकार त्यांना कुणी दिला? हे भारतीय सार्वभौमत्वाला चॅलेंज नाही का? की यातही परत आंतरराष्ट्रीय राजकारणच आहे? अडाणी हिंडेनबर्ग मधून सुटले म्हणून हा नवीन आरोप?

टीपीके

समज नसेल तर फक्त अडाणी गोत्यात येतात म्हणून काहीही फालतू बोलू नका आणि स्वतःचे हसे करून घेऊ नका. फक्त मोदींना शिव्याच घालायच्या असतील तर वरील वाक्यात मी २ -३ फुलटॉस दिले आहेत त्यांचा वापर करून मारा सिक्स. (जर समजले तर )

शाम भागवत

अटक वॉरंट काढायचा अधिकार त्यांना कुणी दिला?

ते कोणताही देश करू शकतो हो. आपणही पन्नूविरोधात काढलं असेलच की. अनेक पाकिस्तानी अतिरेक्यांविरूध्द नक्कीच काढलं असेल. त्याला महत्व नाही.

कोर्टाच्या मागे लपून, अमेरिका त्या अटक वॉरंटमागे आपली ताकद उभी करू शकते. त्यामुळे त्या अटक वॉरंटला महत्व येतं किंवा द्यायला लागतं असं मला वाटतं.

टीपीके

काहीही

अहो फिर्यादी कोण आहे? त्याला फिर्याद करायचा हक्क आहे का? असेल तर कुठे? गुन्हा कुठे घडला हे पण प्रश्न आहेत ना?

जितके मला समजले त्या प्रमाणे, अडाणीने अमेरिकन बाजारातून पैसे उभे केले पण त्या वेळी पुरेशी माहिती दिली नाही किंवा चुकीची माहिती दिली त्यामुळे अमेरिकन गुंतवणूकदारांची दिशाभूल झाली किंवा त्यांचे नुकसान झाले म्हणून ही केस आहे. खरं तर लाच देणाऱ्याबरोबर घेणाऱ्यांवर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, पण अमेरिका फक्त त्यांच्या गुंतवणूकदारांचा विचार करते आहे (आणि ते तितकेच करू शकतात कारण लाच घेणारा त्यांच्या जुराडिक्शन मध्ये येत नाही) म्हणून फक्त अडाणीचे नाव. लाच घेण्याऱ्यावर भारत सरकार गुन्हा दाखल करू शकते. अमेरिकेकडे जर पुरावे असतील तर अडाणीला नक्कीच शिक्षा व्हायला पाहिजे. आणि भारत सरकारने लाच घेणाऱ्यांवर तेच पुरावे वापरून भारतात गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि शिक्षा केली पाहिजे. पण लाच घेणारी, विरोधकांची सरकारे असल्याने विरोधक लाच घेणाऱ्याबद्दल बोलणार नाहीत. त्यांची डबल ढोलकी ते निर्लज्जपणे बडवत राहतील.

विशेष म्हणजे अदानीने लाच दिली हे चूक केले असे कुठल्याही अंधभक्ताला वाटलेले नाहीये. :)

चौथा कोनाडा

:-)

विनोद तावडे क्याश वाटप प्रकरण .. यात समेट झाला की काय ?
नुसते आरोप आणि स्पष्टीकरण पत्रकार परिषद ... पुढं काय झालं ?

कंजूस

ट्रंपला पहिल्यांदा निवडून आणण्यात रशियाचा हात होता. कार्यक्रमाचे कोडींग करण्यात भारतीय कंपन्यांचा सहभाग(१३) होता म्हणे. त्यांना बाईडनने बाद करवले. मग आता पुन्हा मतदार ट्रंपला का निवडतात?

- अंधुक भक्त.

श्रीगुरुजी

एक जुनी आठवण. एनरॉनसाठी अमेरिकेच्या रिबेका मार्क यांनी भारतात येऊन कोणाला तरी ५० कोटी दिल्याचे जानूमस्तिष्क अनुयायांना स्मरत नसेलच.

समुद्रात बुडालेली Enron बाहेर काढली...

बाळासाहेब ठाकरे फार मोठे जादूगार होते....

जरा इतिहास वाचा...

बाय द वे,

हे असे इतरांच्या ओंजळीने पाणी पिणे किती दिवस चालणार आहे?

तुम्हाला पण तो किस्सा माहीत आहे, हे वाचून बरे वाटले...

बाय द वे,

एक रुपयाची झुणका भाकर कधी खाल्ली आहे का?

भीमराव

१. अदानी वर आरोप करायची परवानगी अमेरिका कोर्टाने बायडन सरकारच्या वकिलाला दिली आहे, अदानी अजुन दोषी आढळला नाही.

२. अमेरिका येथील न्यायव्यवस्था आपल्या पेक्षा भारी किंवा वरचढ आहे म्हणून अदानी वर खटला तिथं चालू नाही, अमेरीकन गुंतवणूकदांची गुंतवणूक अदानी मधे होती ती धोक्यात आली आहे म्हणून खटला सुरू आहे.

३. यात सगळ्यात हिंडेनबर्ग चा सहभाग लपलेला नाही. अदानी वर हिंडेनबर्ग चे आरोप झाले तेव्हा म्हणावा असा आर्थिक फायदा हिंडेनबर्ग ला झाला नाही, त्यावेळी त्यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये अदानी ला नुकसान होईल असे भाकीत केले होते.

शाम भागवत

कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय मांडला आहे. तीन ओळीत वस्तूस्थिती स्पष्ट होते आहे. धन्यवाद.
🙏

शाम भागवत

एक शक्यता अशीही आहे की, बायडेन सरकारचा युनूस सरकारला पाठींबा आहे. अडानीने बांगला देशची वीज तोडली. मग अदानीच्या अमेरिकेतील धंद्याला त्रास होईल असं काहीतरी करायचं. डाव प्रतिडाव.
ट्रंप सरकार आल्यावर अमेरिकेत गुंतवणूक करण्याबाबत अदानी बोलले होते. पण या समन्समुळे अदानींंना अमेरिकेत पैसे उभे करणे अवघड जाऊ शकेल. या पध्दतीने मग
अदानींना बार्गेनिंगच्या टेबलावर आणायचा प्रयत्न असू शकतो. शेवटी कोणते तरी हितसंबंध असल्याशिवाय हे घडलेले नसणार. वेळ जात नाहीये तर जिंकणाऱ्या ट्रंपच्या मित्रांना करा ट्रोल असा काही प्रकार नक्कीच नसणार.

शेवटी कोणते तरी हितसंबंध असल्याशिवाय हे घडलेले नसणार

१००%. अमेरिकन सरकार काय किंवा कंपन्या काय, नैतिकता,तत्वनिष्ठा.. सोयीनुसार वापरतात. अमेरिकेत पुर्वी किकबॅक हा शब्द लोकप्रिय होता. कोकाकोला,पेप्सी,औषधी कंपन्या ह्या सर्वानी दक्षिण अमेरिकेत धंद्यासाठी नितीमत्ता गुंडाळून ठेवली होती. शिवाय अमेरिकेत न्यायाधीशाची नियुक्तीही राजकारणी करतात असे वाचले आहे. सौर उर्जेच्या कंत्राटांमध्ये जिकडे अदानी जिंकले तेथे कोणत्या कंपन्या स्पर्धक होत्या ते पाहिले तर अंदाज येऊ शकेल. असो.
आता महाराष्त्रातील निकाल लागले की मग हा मुद्दा चर्चेला येइल.

शाम भागवत

सौर उर्जेच्या कंत्राटांमध्ये जिकडे अदानी जिंकले तेथे कोणत्या कंपन्या स्पर्धक होत्या ते पाहिले तर अंदाज येऊ शकेल.

स्पर्धक कंपन्यांची शक्यता मला तरी वाटत नाही. स्पर्धक कंपन्या एवढ्या काही मोठ्या नसतीत की त्या उगवत्या ट्रंपला पुढची ४ वर्षे पुरून उरून उरतील. त्याचा विरोध पत्करूनही आपला धंदा आरामात करू शकतील. कारण साधारणत: व्यावसायीक कंपन्या उगवत्या सूर्याला सुरवातीपासूनच विरोध करायला लागतील हे संभवत नाही.
बायडेन जेंव्हा आले तेंव्हा त्यांनी हे केले असते तर हा मुद्दा पटण्यासारखा होता.

त्यामुळे यामागे जास्ती मोठे कारण असले पाहिजे. मोठी शक्ती कार्यरत असली पाहिजे. जसे की डीप स्टेट किंवा सद्याचे अमेरिकन धोरणातील अडथळे दूर करणे वगैरे.

हा अदानी कुठेना कुठे काहीना काही गैरउद्योग करतच असतो, आपल्या पैशाने सरकार बसलंय हे त्याला माहित आहे त्यामुळे कारवाईची भीतीही नाही. भाजप पक्ष अडाणीच्या पैशांनी मिंधा झाला आहे. त्यामुळे भारत सरकार ह्या अडाणीच्या गैरकृत्यांवर कारवाई करेल ही शक्यता शून्य. अमेरिका आरकार कारवाई करतंय ह्याचं मी एक भारतीय म्हणून स्वागत करतो. अमेरिकेने ह्याच्या नांग्या ठेचाव्यात.
हा महाराष्ट्रात सरकार बनवायच्या उद्योगासाठी लुडबुड करत असतो म्हणे.
कुठे ते खानदानी अंबानी कुटुंब नी कुठे हे….

टीपीके

अहो अबा, हे अंबानी आपल्या दृष्टीने खानदानी कधी झाले? इतके वर्ष तर आपण त्यांना शिव्या देत होतो ना? आपणच त्यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवली होती ना? तुम्ही पण देशद्रोही झालात का? मनुवादी झालात का?

आपण? मी नव्हतो ब्वा त्यात. तुम्ही किंवा तुमचे कुटुंब असेल तर मला माहित नाही.

टीपीके

अहो, असे काय करता, साहेबांनीच निलंबित वाझेना परत नियुक्त केले होते ना. मग त्याने ती गाडी ठेवली खंडणीसाठी. उघडकीला आले तेव्हा आपण पहिल्यांदा त्याला वाचवायचा प्रयत्न केला? मग त्याने त्याच्याच मित्राचा खून केला आपला गुन्हा लपवायला. असे कसे विसरता तुम्ही. आणि आपण म्हणतो तेव्हा मी आपल्या दोघांच्या राजकीय पक्षाबद्दल बोलतोय.

बरं नसेल सांगायचे तर सोडून द्या. उगाच तुम्हाला माझी अडचण नको

बाय द वें मी तुमच्या सांगण्याप्रमाणे माझा upi आयडी बनवला आहे, migulam_178359@ybl. माझा नोव्हेंबर चा आलाऊन्स कधी मिळणार? उरलेले गुलामीचे, खोटे बोलण्याचे ट्रेनिंग कधी देणार तुम्ही?

टीपीके

नाही हो, तिथे काहीच पैसे आणि ट्रेनिंग नाही मिळाले. म्हणून तुमच्याकडे आलो. पण 40 पैसै खूप कमी नाही वाटत? म्हणून तुम्ही इतके फालतू प्रतिसाद देता का?

चला ते जाऊ दे, अंबानिंचे बोला ना, तिकडे काय गेम झाला? आता ते वंदनीय कसे झाले?

आता,

परमपूज्य, राहुल गांधी जर गप्प बसले असतील तर, गुलाम पण गप्पच बसणार...

राजकारण आणि त्या 'सोरोस'च्या थियर्या बाजुला ठेवू. आपली 'सेबी' काय करत आहे? हिंडेनबर्ग प्रकरणातही सेबीने हात झटकले होते. अदानीने भारतात लाच दिली आहे असा आरोप आहे. Adani gave bribes to high ranking govt officials. हे विधान दुसर्या देशाने करणे गंभीर नाही का ?निदान तोंडदेखलेपणासाठी तरी सेबीने 'प्रकरण गंभीर आहे. चौकशी करू' असे तरी म्हणायला काय हरकत आहे? कारण ते आरोप तेथील न्यायालयाला पटले आहेत. मुख्य म्हणजे दुसरा देश तुमच्या देशावर/व्यवस्थेवर लाचखोरीचे आरोप करत आहे. किती दिवस अशी उडवाउडवी करणार? उद्या अदानीने भारतात चार खून केले आहेत, असा आरोप अमेरिकेने केला तरीही गप्पच बसणार का?

माई, भाजप सरकार अडाणीच्या पैश्यानी बसलंय. त्यामुळे भाजप पक्ष अडाणीचा मिंधा आहे. भाजप सरकारात निवडणूक आयोग, इडी, सीबीआय, गृहखाते ह्याना किती स्वायत्तता आहे हे आपल्याला माहित आहेच. अश्या काळात सेबीने कारवाई करावी अशी अपेक्षा काशिकाय? सेबी स्वायत्त आहे असे समजणे हे भाबडेपणाचे लक्षण आहे.
भारताला फुकट नाही पाश्चात्य देश बनाना रिपब्लिक म्हणतात.

ED, Election Commission, CBI ह्या स्वायत्त संस्था आहेत... त्यात गृहखाते ऍड करू नये....

आग्या१९९०

ज्या राज्यात बिजेपीची सत्ता आहे त्यांना अदानी लाच कशाला देईल? मोटा भाय कशासाठी बसलाय? बिच्चारे!
भ्रष्टाचारी विरोधी पक्षांनी अदानीकडून पैसे घेतले असतील तर त्यांची चौकशी करण्यास राहुल गांधींनी विरोध कुठे केलाय? राज्य सरकारे दोषी असतील तर अदानीही दोषी ठरतो. संबित पात्राने सेल्फ गोल केलाय हे त्याच्या उशीरा लक्षात आले.

कंजूस

गुंतवणूकीसंबंधी वाद कोणत्या कोर्टात चालेल हे कंपनीच्या स्थापनेच्या किंवा तिचा उपक्रम कोणत्या नावाने कुठे सुरू झाला त्यात विशद असते. ते कुणाला माहीत झाले का? अदानी ग्रीनचे मुख्य नोंदणीकृत कार्यालय किंवा उपक्रमाची जागा जिथे आहे तिथे असे असू शकते.

अमेरिकेतल्या कोर्टात हा खटला चालू शकतो का?

आग्या१९९०

जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल तर भारतात चालू शकतो. निदान विरोधी पक्षांच्या राज्यांविरुद्ध नक्कीच चालवता येईल.

निदान विरोधी पक्षांच्या राज्यांविरुद्ध नक्कीच चालवता येईल. लाच देणे हा देखील गुन्हा असल्याने सरकारचे हात बांधले आहेत.

खरे आहे. आता 'बटेंगे तो कटेंगे' चे नारे वॉट्स-अ‍ॅपवर कधी फिरायला लागतील ते बघुया. उदय निरगुडकर्/अविनाश धर्माधिकारी सारखे विद्वान काय थियरी मांड्तात ते बघुया. भाउ तोरसेकर/आबा माळकर ह्यांचे व्हिडोयोज पाहणे बंद केले आहे.

शाम भागवत

मी आत्ता जरा माहीती मिळवली त्यानुसार लाच कुणी दिली नाहीये व कुणी घेतलीही नाहीये. लाचेची ऑफर दिली हा दोषारोप केलाय. वॉरंट व समन्स या दोन्हीला अमेरिकेत वॉरंटच म्हणतात. त्यामुळे आणखीनच गोंधळ उडाला आहे.
समन्स बजावायला पाहिजे की नाही हे अमेरिकेत ज्युरी ठरवतात. मग त्यानुसार जज्ज निर्णय घेतो.
त्यामुळे ११ पैकी कमीतकमी ६ ज्युरींना अदानींना त्यांची बाजू मांडायच समन्स बजावायला हवं असं वाटलं. मग जज्ज साहेबांनी समन्स बजावलं. हे ज्युरी कायद्यातले तज्ञ वगैरे असत नाहीत.

तर मस्तच राजकारण चाललंय.
असो.

https://www.justice.gov/usao-edny/media/1377806/dl?inline
इकडे स्पष्ट सांगितले आहे. अदानी आणि त्यांचे सहकारी कधी/कुठे भेटले. लाच कशी द्यायची,कोणत्या मार्गाने द्यायची.. ह्याचे पॉवर पॉइट सादरकरणही बनवण्यात आले. त्या आरोप्पत्रात तारीख-वार सगळे तपशील देण्यात आले आहेत. ह्यात राजकारण कुठे आले? आरोप हे आरोप असतात.
अदानी आणि त्यांचे सहकारी "असे काहीही घडलेले नाही" असे सांगतील का? नाही वाटत कारण एफ बी आय ने त्यांचे एस एम एस आणी ईतर संभाषणही टॅप करुन ठेवले असणार. ह्याची खात्री अदानी ह्यांना आहे. म्हणून ते आता गप्प राहतील आणि ट्रम्प ह्यांनी शपथ घेतली की मग न्यूयॉर्कमधील मग हरीश साळवेंसारखा वकिल नेमतील.

शाम भागवत

अदानीने भारतात लाच दिली आहे असा आरोप आहे.

हे तुमचे म्हणणे आहे.
मी म्हणालोय की लाच देण्याघेण्याचा प्रत्यक्ष व्यवहार झालेली नाही. तर फक्त लाच देण्याचे ठरलाय. मी ही वस्तुस्थिती फक्त पुढे आणलीय.
😁
पण एवढे सगळे पुरावे असताना भारतात केस दाखल करायची सोडून अमेरिकेत केली. त्यामुळे राजकारणाचा वास यायला लागला. तसं असेल तर अमेरिकेला काय साधायचं असेल ते शोधण्याचा प्रयत्न केला.
😁

इकडे स्पष्ट सांगितले आहे. अदानी आणि त्यांचे सहकारी कधी/कुठे भेटले. लाच कशी द्यायची,कोणत्या मार्गाने द्यायची.. ह्याचे पॉवर पॉइट सादरकरणही बनवण्यात आले.

इतके पुरावे बनून लाच देण्यात येते? अदानीला काकांची शिकवणी लावणे अतिशय गरजेचे आहे.

अदानीला काकांची शिकवणी लावणे अतिशय गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीत मोदीना गोवणे चुकीचे आहे हे सांगून खाली बसतो.

तुम्हाला धड "काका" पण माहीत नाहीत.

बाय द वे,

हे असे इतरांच्या ओंजळीने पाणी पिणे किती दिवस चालणार आहे?

आंद्रे वडापाव

https://i.ibb.co/Gk17XZR/Screenshot-20241125-152139-Chrome.png

मम आत्मनः श्रुती स्मृती पुरणोक्त
सत्ता फल प्राप्यऱर्थ प्रधान पद प्रित्यर्थ
अहं अंधत्वकर्णबधिरत्वंच धारणमं करिष्ये

आंद्रे वडापाव

A

मम आत्मनः श्रुती स्मृती पुरणोक्त
सत्ता फल प्राप्यऱर्थ प्रधान पद प्रित्यर्थ
अहं अंधत्वकर्णबधिरत्वंच धारणमं करिष्ये

महाराष्ट्र अदानीने सॉरी भाजपने जिंकला असल्याने अदानीला चांगलाच दिलासा मिळालेला असेल.

शाम भागवत

पेन पेन्सिल ड्रा
पेन व पेन्सिलने काढलेले चित्र
मी तरी असा अर्थ लावलाय.
:)

सुबोध खरे

अमेरिकी कोर्टात अदानीच काहीही होणार नाही.

अजून नुसता आरोप केलाय तो सिद्ध व्हायला भरपूर वेळ जाईल.

मुळात ट्रम्प साहेबांवर दोषारोप सिद्ध होऊन सुद्धा ते अध्यक्ष होणार आहेत आणि हे खटले ४ वर्षे बासनात राहणार आहेत .

तेंव्हा अडाणी यांचं अमेरिकेत काहीही होणार नाही हे शंभर टक्के सत्य आहे.

For the US to bring Adani to trial, extradition is key. The US has jurisdiction ONLY over crimes that occur on US soil or against US citizens. For extradition to take place, the alleged crime must be considered illegal in both the US and India.

Apart from that, the US must present sufficient evidence to Indian authorities.

The Indian authorities would then evaluate the request under domestic laws and the treaty’s terms, and Indian courts may be tasked with conducting hearings to decide if the evidence supports extradition.

बसा बैलाच्या खाली दूध काढायला

Extradition can be denied under certain conditions, such as if the charges are political, human rights concerns exist, or the evidence is insufficient.

कसाबला पकडून पूर्ण खटला चालवून तुम्ही फाशी दिली पण अजूनही पाकिस्तान पुरावा द्या म्हणून सांगतंय कि.

तो पनून तेथे बसून भारतविरोधी वक्तव्ये करतोय त्यासाठी रेड कॉर्नर नोटीस नाकारली गेली आहे. भारताची विनंती अमेरिका मान्य करत नाहीये तर भारत त्यांची विनंती का मान्य करेल

भारत अमेरिकेला अदानी बाबतीत भीक घालेल असं कुणाला वाटत असेल तर ती बालबुद्धी असेल

If the case proceeds, it would lead to a trial where prosecutors must prove guilt beyond a reasonable doubt.

https://www.indiatoday.in/india/story/gautam-adani-bribery-case-what-ar…

यातील काहीही होणार नाहीये.

तेंव्हा मी फक्त भुजबळांची बिनबुडाची विधाने वाचून हसण्यासाठी पॉपकॉर्न घेऊन बसलोय

शाम भागवत

आणि मी शेअर्स घेऊन बसलोय. भुजबळांमुळे आणखी खाली येण्याची वाट बघतोय,

भुजबळांची बिनबुडाची विधाने वाचून हसण्यासाठी पॉपकॉर्न घेऊन बसलोय.....

हो ना,

त्यांचे प्रतिसाद मनोरंजक असतात.

अगदी अगदी.

तुमचे प्रतिसाद मनोरंजक असतात, हे तुम्हीच मान्य केले हे उत्तम...

बाय द वे,

हे असे इतरांच्या ओंजळीने पाणी पिणे किती दिवस चालणार आहे?

साधे गल्लीतल्या रस्त्याचे कंत्राट घ्यावयाचे झाले तरी लाच द्यावी लागते, मग असे मोठे प्रकल्प लाच दिल्या / घेतल्याशिवाय मिळतात हि समजूत नक्की कोणत्या भाबड्या बाळांची आहे?
प्रत्येक भक्ताला आपले देव हे धुतले तांदूळ आणि दुसऱ्याचे देव हे कोळसाच वाटतात

जगभर उर्जा आणि संरक्षण कंत्राटे लाच दिल्याशिवाय मंजूर केली जात नाहीत हे सर्वाना माहित आहे. सहसा ह्या व्यवहारांचे पुरावे ठेवले जात नाहीत. इकडे पुरावे मिळाले आहेत.
एन्रॉन प्रकल्पाला मंजूरी देताना मातोश्री आणि पार्टी विथ डिफ्रन्सवाल्यानी हात धुवुन घेतले होते.

आग्या१९९०

साधे गल्लीतल्या रस्त्याचे कंत्राट घ्यावयाचे झाले तरी लाच द्यावी लागते, मग असे मोठे प्रकल्प लाच दिल्या / घेतल्याशिवाय मिळतात हि समजूत नक्की कोणत्या भाबड्या बाळांची आहे?

नोटाबंदी काळा पैसा आणि भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी केली होती एका भाबड्या बाळानी , त्याला जाब विचारण्यासाठी आपल्या अंगी बळ येवो. ते आले की या इकडे काय म्हणते ते बाळ हे सांगायला.

यासाठीच पुढे लिहिले आहे

"प्रत्येक भक्ताला आपले देव हे धुतले तांदूळ आणि दुसऱ्याचे देव हे कोळसाच वाटतात"

कोणताही व्यवसाय हा लाच दिल्या / घेतल्याशिवाय होऊ शकत नाही हे दुपारच्या सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे, जे कोणी भ्रष्टाचार संपवण्याच्या गोष्टी करतात ते स्वतः जास्त भ्रष्टाचार करतात आणि जे गरिबी हटवण्याच्या गप्पा करतात ते फक्त स्वजनांचीच गरिबी हटवतात हे प्रांजळपणे कबूल करण्यास आपली ना नसावी.

माझ्या वैम नुसार वरपासून खालपर्यंत प्रत्येक सत्ताकारणी हे शेणातील किडेच आहेत, आणि हे किडे पक्षातीत आहेत , आयते शेण संपल्यावर हे किडे एकमेकांचे शेण देखील आनंदाने खातात.

प्रत्येक भक्ताला आपले देव हे धुतले तांदूळ आणि दुसऱ्याचे देव हे कोळसाच वाटतात.

वाह ! नंबर एक.

-दिलीप बिरुटे

सकाळ्ची मालकी पवार कुटुंबियांकडे आहे. प्रताप पवार हे जाणत्या राजाचे धाकटे बंधू.निबंध लिहिल्यासारख लेख लिहिला आहे.

अकबर बिरबलाचा एक किस्सा होता आता नीट आठवत नाही पण त्याचे सार असे होते कि बिरबल अकबराला पटवुन देतो कि तू जरी राजा असला तरी खरे राज्य हे व्यापारी चालवतात.सध्याच्या काळात राष्ट्रप्रमुख वा पंतप्रधान त्या त्या राष्ट्राच्या सरकारी संस्थांना एका मर्यादेनंतर प्रमोट करु शकत नाही तेव्हा अदानी अंबानी सारख्या उद्योजकांना पुढे करुन जिथे सरकार डायरेक्ट हस्तक्षेप करु शकत नाही तिथे असे प्रकल्प वगैरे घेतले जातात. इवन स्वातंत्र्यपूर्व काळात व त स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही टाटा बिर्ला सारख्या उद्योजकांवर त्याकाळच्या नेत्यांचा विश्वास होता. आणि त्यांचा वापर करुनच भारताच्या अनेक आता अभिमानास्पद समजल्या जाणार्या प्रोजेक्टची पायाभरणी झाली होती.प्रत्येक सरकारच्या काळात त्या त्या सरकारशी निष्ठा ठेवणार्या उद्योजकांना नेहेमीच प्राथमिकता मिळाली आहे.प्रताप पवारांना हे नक्कीच माहीती असावे.

सुबोध खरे

कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. हे अमेरिकेला हि माहिती आहे. त्यांच्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात अनेक वर्षे आहेत. त्यामुळे हे काय आणि कसे चालते हे त्यांना व्यवस्थित माहिती असते.

केवळ भारत सरकारला कात्रित पकडण्यासाठी हे अदानीचे लाच देण्याचे प्रकरण काढलेले आहे. परंतु त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही हे अडणींचे समभाग परत वर आले यावरून सिद्ध झालेले आहे.

राफेल राफेल, चौकीदार चोर आहे सारखे अदानी अदानी घोषणा होतील आणि हवेत विरून जातील.
यातील काहीही श्री मोदींना चिकटत नाही आणि त्यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप काही जनतेला मान्य होत नाहीत

त्यामुळे विरोधकांचा कायम पोटशूळ उठलेला असतो. तो काही २०२९ पर्यंत (बहुधा २०३४ पर्यंत) शमणार नाही.
तेंव्हा करा जे करायचे ते

कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. एमसी लाचलुचपत विभाग कशासाठी असतो?

कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. सुधारीत मग लाचलुचपत विभाग कशासाठी असतो?

सुबोध खरे

गेली ७५ वर्षे दारूबंदी खाते काय करत आले आहे?

घटनेच्या ४४ व्य कलमात लिहिलेले असूनही गेली ७५ वर्षे समान नागरी कायदा का आला नाही?

भुजबळ बुवा

उगाच कळफलक बडवून काहीतरी भंपक गोष्ट टंकण्यापेक्षा अभ्यास वाढवा

कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. बाकी भाजपची सत्ता असली की असे साक्षात्कार होतात. :)
उद्या अदानीने कुणाचं मुडदा पाडला की कोणतेही सरकारी काम हे असे मुडदे पाडल्याशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. असे म्हणू नका म्हणजे झाले.
माणूस चुकीचा असला पण तरीही “आपला” असला तर त्याच्या गैरकृत्यांचे कसे समर्थन होऊ लागते ह्याचे डॉ. साहेबांचे हे वाक्य दाखवून देते. :) छान प्रगती.
आयरणीच्या देवा:)

सुबोध खरे

उगाच कळफलक बडवून काहीतरी भंपक गोष्ट टंकण्यापेक्षा अभ्यास वाढवा

सुबोध खरे

उगाच कळफलक बडवून काहीतरी भंपक गोष्ट टंकण्यापेक्षा अभ्यास वाढवा

सुबोध खरे

भुजबळ बुवा

मी भ्रष्टाचाराचे समर्थन कुठे केलेले आहे ते दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा.

माझ्या प्रतिसादात नसलेला अर्थ काढू नका

उगाच फालतू बडबड करण्यापेक्षा हे दाखवून द्या अन्यथा आपली निरर्थक बडबड बंद करा

कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे.

सुबोध खरे

कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे.

हे सत्य आहे

यात समर्थन कुठे आहे?

वेश्याव्यवसाय जगभर चालतो हे सत्य आहे याचा अर्थ ते समर्थन आहे असा अर्थ तुम्ही काढत असाल तर तुमच्या अकलेची कीव करावी लागेल.

साधारण पणे मी कुणाची अक्कल काढत नाही
परंतु आपण मला तसे करणे भाग पाडता आहात.

सुबोध खरे

एखादे सत्य लिहिणे हे त्याचे समर्थन आहे

असा अर्थ आपण काढत असाल तर

आपल्या अकलेची कीव करावी लागेल.

Vichar Manus

इंदिरा गांधी की राजीव गांधी नी corruption is a global phenomenon ase म्हटले होते . त्यांनी सत्तच सांगितले होते तेव्हा ते भ्रष्टाचराबाबत समर्थन करतात असे म्हटले गेले होते

मग लाचलुचपत विभाग कशासाठी असतो?

बहुदा दिल्या / घेतल्या गेलेल्या लाचेतील आपला वाटा गोळा करून आपल्या खात्याच्या मंत्र्याकडे अतिरिक्त (ठरलेल्या तक्त्या / टारगेट व्यतिरिक्त ) रक्कम पोहोचवण्यासाठी असावा.

लाचलुचपत विभाग नक्की कधी कारवाई करू शकतो? फक्त संशयावरून करतो / करू शकतो का ज्याच्या कडून लाच मागितली आहे अशा किंवा ज्याला जबरदस्तीने लाच दिली जात आहे अशा व्यक्तीच्या तक्रारीनंतरच कारवाई करता येते?

माफ करा पण अज्ञान आणि अभ्यासाचा कंटाळा असल्यामुळे अशा शंका येतात आणि मिपा वर सर्व दीर्घ / लघु शंकाचे निराकरण होते म्हणून विचारले.

आग्या१९९०

बोफोर्स मध्येही काही सापडले नाही. विरोधी पक्षांचे कामच आहे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे. त्यामुळे सत्ता येतेच भविष्यात.

श्रीगुरुजी

घाईघाईने क्वात्रोकीमामाला भारतातून बाहेर काढून सुखरूप इटलीला पाठवून दिलं, स्वीडन सरकारला पत्र लिहून बोफोर्स प्रकरणाचा तपास लांबणीवर टाकण्यास सांगितले, मामाच्या गोठविलेल्या खात्यातील ४० लक्ष डॉलर्स आपल्या कळसूत्री बाहुल्याला सांगून मुक्त केले, अर्जेंटिनाने पकडल्यानंतर न्यायालयाला व सर्व देशाला अंधारात ठेवून आपल्या सरकारमधील मंत्री पाठवून त्याला सोडविण्याची व्यवस्था केली.

काहीच सापडलं नव्हतं तर इतकी लबाडी का केली होती?

आग्या१९९०

विरोधी पक्षांची त्यांची सरकारे आल्यावर पुरावे जमा करून आणायचा होता स्विडनवर दबाव. टू जी घोट्याळातही काहीही सापडले नाही. सिब्बल सुरुवातीपासूनच सांगत होते, सरकारचे एक पैशाचे नुकसान झाले नाही. विरोधी पक्षाचे कामच आहे कसेही करून आपले अस्तित्व टिकवून ठेवणे.

श्रीगुरुजी

विरोधी पक्षांची त्यांची सरकारे आल्यावर पुरावे जमा करून आणायचा होता स्विडनवर दबाव

पुरावे पूर्ण नष्ट करून आरोपीला सुखरूप देशाबाहेर पाठवून दिल्यानंतर विरोधी पक्षांचे सरकार आले.

टू जी घोट्याळातही काहीही सापडले नाही. सिब्बल सुरुवातीपासूनच सांगत होते, सरकारचे एक पैशाचे नुकसान झाले नाही.

सिब्बल थापाड्या आहे. तो भ्रष्ट सरकारमध्ये मंत्री होता व आरोपींचा वकील होता. १ रूपयाचा सुद्धा तोटा झाला हे तो मान्य करणार होता का?

२००७ मध्ये २ जी तरंगलहरी आपल्या पाठिराख्यांना खिरापतीसारख्या वाटल्यानंतर सरकारला जेमतेम ७,५०० कोटी मिळाले होते. पण २०१४ मध्ये मोदी आल्यानंतर न्यायालयाने ते वाटप रद्द करून लिलाव करायला लावला ज्यातून १,००,००० कोटीहून अधिक महसूल मिळाला.

२०११ मध्ये उच्च न्यायालयात खटला सुरू झाला. मे २०१४ पर्यंत मनमोहन सरकार होते. ३ वर्षांच्या कालावधीत व्यवस्थित पुराव्यांच्या फाईल्स गहाळ करण्यात आल्या. कोळसा खाणी घोटाळ्याच्या फाईल्स सुद्धा मे २०१४ पूर्वी अशाच गहाण केल्या होत्या.

आग्या१९९०

तो भ्रष्ट सरकारमध्ये मंत्री होता व आरोपींचा वकील होता. १ रूपयाचा सुद्धा तोटा झाला हे तो मान्य करणार होता का?
आरोप करणारे स्वच्छ होते त्यांना सिद्ध का करता आले नाही ?

पण २०१४ मध्ये मोदी आल्यानंतर न्यायालयाने ते वाटप रद्द करून लिलाव करायला लावला ज्यातून १,००,००० कोटीहून अधिक महसूल मिळाला.
त्याला नोशनल लॉस म्हणतात. टाईम , टेक्नॉलॉजी आणि मार्केट डिमांड विचारात घेऊन हिशोब केल्याने नुकसान शून्य मान्य केले गेले .

श्रीगुरुजी

आरोप करणारे स्वच्छ होते त्यांना सिद्ध का करता आले नाही ?

याची कारणे आधीच लिहिली आहेत.

त्याला नोशनल लॉस म्हणतात. टाईम , टेक्नॉलॉजी आणि मार्केट डिमांड विचारात घेऊन हिशोब केल्याने नुकसान शून्य मान्य केले गेले .

कोणी नुकसान शून्य मान्य केले? सिब्बलने की न्यायालयाने? शून्य नुकसान होते तर मग आधीचे खिरापतरूपी वाटप रद्द करून लिलाव करूनच तरंगलहरी द्याव्या हा आदेश न्यायालयाने का दिला? ७,५०० कोटी आणि १,००,०००+ कोटी हे दोन्ही आकडे सारखेच का?

अदानी हिरवी ऊर्जा नावाचा समभाग आज ४८ रुपे पडलाय. आदानीचे अजून नुकसान व्हावे. आनंदी आनंद गडे जिकडे तिकदे चोहिकडे :)

वामन देशमुख

आदानीचे अजून नुकसान व्हावे.

कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते.

---

आज ४८ रुपे

रुपे ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी पेमंट सेवा आहे. मीही तिचा लाभ घेतो. इथे जाहिरात केल्याबद्धल आभार.

सुबोध खरे

भुजबळ बुवा

तुमच्या शहरात सी एन जी २ रुपयाने महाग झालाय

त्याची चिंता करा.

अदानी कुठे? तुम्ही कुठे?

आता वसुली सरकार येणार असल्याने, वसुलीदेखील झपाट्याने होणार ते माहित असल्याने असे २ रुपये वाढतीलच. पण आपला मालक १ नंबर श्रीमंत करायचा शेटचा डाव फेल जातोय ते आनंद काय वर्नावा?? :)

देशातील नामवंत उद्योगपती वटवृक्षा सारखे. असंख्य कुटुंबाचे आधार. देशाचा अर्थीक कणा, अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली धाक जमवून देशाच्या प्रगतीचे आधार स्तंभ. यांच्या चॅरिटेबल संस्थांमुळे कित्येक गरजूंचे मदतनीस.

आपल्यासारखे सामान्य लोकांनी कितीही कळफलक बडवला तरी त्यांच्या ढुंगणाला खबर नसते.. केवळ राजकीय असूयेपोटी काहीही बरळायचे. हे म्हणजे अकलेचे तारे तोडण्या सारखे.

सुर्या वर थुंकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती थुंकी थुकंणार्याच्या तोंडावरच पडणार.

देशातील उद्योग डिस्टॅबीलाईझ करून अर्थ व्यवस्थेला धोका पोहचवण्याचा प्रयत्न करणे हा सुद्धा अर्थिक दहशतवाद म्हणावा लागेल.

वामन देशमुख

देशातील उद्योग डिस्टॅबीलाईझ करून अर्थ व्यवस्थेला धोका पोहचवण्याचा प्रयत्न करणे हा सुद्धा अर्थिक दहशतवाद म्हणावा लागेल.

देशातील काही नेत्यांपासून ते निरनिराळ्या संस्थळांवर कार्यरत असणारे त्यांचे IT cell हेही, अश्या उद्योगांबद्धल नकारात्मक बोलतात ते अशाच आर्थिक दहशतवादी हल्ल्यांत सहभागी असतात.

वामन देशमुख

"Patriotism is the last refuge of the scoundrel." असं तीन शतकांपूर्वीचं एक वाक्य आहे. भारतात मात्र "देशद्रोह हे देशद्रोही लोकांचं पहिलं आणि कायमचं शस्त्र असतं" असंच म्हणावं लागेल.

देशद्रोह हे देशद्रोही लोकांचं पहिलं आणि कायमचं शस्त्र असतं +१ आणी असे. लोक स्वतःला देशभक्त म्हणवतात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

देशातील नामवंत उद्योगपती हा लाच देणारा उद्योगपती नामवंत कधी झाला? हिंडेनबर्ग रिपोर्ट वगैरे बातम्या आपल्यापर्यंत पोहोचल्या नाही का कर्नल साहेब? की भाजप धार्जिणा म्हणजे नामवंत?
अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली धाक जमवून देशाच्या प्रगतीचे आधार स्तंभ. धाक जमवून की पत घालवून? जरा टाटा बिर्ला अंबानी ह्यांच्याकडे पाहा.
केवळ राजकीय असूयेपोटी काहीही बरळायचे उद्योगपतीबद्दल राजकीय असूया का असेल?
सुर्या वर थुंकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती थुंकी थुकंणार्याच्या तोंडावरच पडणार. बरोबर, पण देशद्रोह्यांबद्दल सामान्य माणसाने बोलणे हे सूर्यावर थुंकणे नसते.
देशातील उद्योग डिस्टॅबीलाईझ करून अर्थ व्यवस्थेला धोका पोहचवण्याचा प्रयत्न करणे हा सुद्धा अर्थिक दहशतवाद म्हणावा लागेल. सहमत लाच देऊन देशाची पत घालवणे, एखाद्या राजकीय पक्षाला आपला मिंधा बनवून कर्जमाफी करून घेणे कशात बसते?

विना पुरावा आरोपीस फाशी दिलीत.

जर अडानी नामवंत नाही तर काय तुम्हाला नामवंत म्हणायचे.

अडानी यांनी लाच दिली असावी असा अंदाज बांधून फक्त परदेशी लोकांनी आरोप केलेत.असल्या
आरोपांना फाट्यावर मारायला हवे.

हिडनबर्ग चे पितळ उघडं पडले आणी चारी मुंड्या उताणा पडला.

कोण देशद्रोही, लाखो लोकांचा पोशिंदा? काय पुरावा आहे ते सांगाल काय?

भाजपकडून बोललं की काही लोकांच्या पोटात दुखायला लागते. अडानी उद्योग समुह १९८८ मधे सुरू झाला. २०१३ पर्यंत दिन दुनी रात चौगुनी अशी प्रगती केली. या पंचवीस वर्षाच्या कालावधीत काॅग्रेस सरकार होती. तेंव्हा अडानी यांचे मूल्यांकन कसे कराल....

जाऊ द्यात, मी तरी कशाला तुमच्या नादी लागतोय.

हाथी चाले अपनी चाल......

जर अडानी नामवंत नाही तर काय तुम्हाला नामवंतm म्हणायचे. मला म्हणू नकाच मी नेहमी माझ्य नावापुढे कुप्रसिद्ध मिपाकर असे लिहितो. बाकी लाच देणारा फक्त भाजप धार्जिणा आहे म्हणून त्याला नामवंत म्हणावे का?
हिडनबर्ग चे पितळ उघडं पडले आणी चारी मुंड्या उताणा पडला. कर्नल साहेब आपल्या भ्रष्ट व्यवस्थेने किती गुन्हे दाखल केले नी तपास केला?? मग तुम्ही कोणत्या बेस वर अदानीला क्लीनचिट दिली? काहीं पुरावे द्या. आहेर का? वाट पाहतो.
अडानी यांनी लाच दिली असावी असा अंदाज बांधून फक्त परदेशी लोकांनी आरोप केलेत.असल्या
आरोपांना फाट्यावर मारायला हवे.
सर त्यानी पुरावे वगैरे गोळा करुन वॉरंट काढले आहे, ते अमेरिकन न्यायालय आहे, अमेरिकन.
भाजपकडून बोललं की काही लोकांच्या पोटात दुखायला लागते. बोला की, पण सोबत एका भ्रष्ट उद्योगपतीचीही बाजू घ्यावी अशी काही भाजपची घटना आहे का?

वामन देशमुख

ते अमेरिकन न्यायालय आहे, अमेरिकन.

"लोकांच्या तावडीत सापडलेला किरकोळ ठक सुटका करून घेण्यासाठी क्षीण युक्तिवाद करण्याचा तावातावाने प्रयत्न करीत आहे" अशी इमोजी कल्पावी.

पुढे निघून गेलात.

काॅग्रेस राजवटीचे पंचवीस वर्ष याबद्दल काहीच नाही.
अम्रीकेत समन्स आणी वाॅरंट वेगळे.

, a warrant and a summons are not the same thing in American law:
Summons
A letter that requires a person to appear in court for a minor offense. A summons is typically issued by a court clerk and doesn't usually require evidence. If the person doesn't appear in court, the judge may issue an arrest warrant.
Warrant
A court order that authorizes law enforcement to arrest a person or conduct a search. A warrant is usually issued by a judge or magistrate and requires probable cause to be established. Arrest warrants are typically valid for a specific period of time, but they can remain active indefinitely until the person is arrested or the warrant is recalled.

जाऊ द्यात, तुम्ही बसा टिमकी वाजवत.

"अडानी यांनी लाच दिली असावी असा अंदाज बांधून फक्त परदेशी लोकांनी आरोप केलेत.असल्या
आरोपांना फाट्यावर मारायला हवे."
एफ बी आयने तसे आरोप केले आहेत आणि आरोप्पत्र सादर केले होते. १६ ते २३ न्यायमूर्ती(ग्रँड ज्युरी)ना त्या आरोपात तथ्य वाटले आहे. दिलेल्या पुराव्यांची खात्री करून घेतल्यावर ग्रँड ज्युरींनी अदानी ह्याच्या विरोधात वॉरंट काढले आहे.

दिलेल्या पुराव्यांची खात्री करून घेतल्यावर ग्रँड ज्युरींनी अदानी ह्याच्या विरोधात वॉरंट काढले आहे. अदानीभक्त हे मान्य करणार नाहीत. अश्या भ्रष्ट माणसाचे अधिकाधिक नुकसान व्हावे. तिथल्या ज्युरींच्या घरी आरत्या होतात का? होत असतील तर खोट्या डिग्रिवाला तिथेही धडकेल. :)

अजून खटला उभा राहीला नाही. त्या आगोदरच उत्साही वीरांनी भ्रष्ट म्हणू लेबल लावले आहे.

"एक रूका हुआ फैसला" आहे.

Sagar Adani, executive director of Adani Green and nephew of Gautam Adani, used his mobile phone to track details of the bribes offered to Indian officials, US authorities alleged. In a meeting between some Adani and Azure executives in 2022, Gautam Adani detailed aspects of the bribery scheme including steps he personally took to offer money to government officials, the US authorities said.

https://www.deccanherald.com/india/explained-us-findings-related-to-ada…

आणखी काय पुरावे हवेत? पुराव्यांची १००% खात्री पटल्यावरच वॉरंट निघाले आहे.

पण काका माईनी पुरावे दिलेत आता तरी मान्य करा. अदानी भ्रष्ट आहे की तुम्हीही डॉ. खरेंसारखे भ्रष्टाचाराचे समर्थन कराल?

आणखी काय पुरावे हवेत? पुराव्यांची १००% खात्री पटल्यावरच वॉरंट निघाले आहे.

मग, अदानींना (किंवा अदानीला) अमेरिकन कोर्टात खटला चालून काय शिक्षा मिळेल ? तुमच्या ह्यांचे ह्या बाबतीत काय मत आहे ?

माहित नाही रे धर्मराजा. तिकडचे कायदे वेगळे,शिक्षा वेगळ्या. पण ह्या प्रकरणातून अदानीना बाहेर काढणे ही ट्रम्प आणि मोदी ह्यांच्यासमोरची मोठी कसोटी असेल. त्यातही भारत सरकारपुढील आव्हाने मोठी असणार आहेत. कारण ह्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी अमेरिका/ट्रम्प खूप मोठी किंमत मागतील हे नक्की.
हार्ले डेविडसन बाईक्स्,भारतात बंद पडलेल्या फोर्ड कंपनीचे पुनुरुज्जीवन... असे बरेच काही असेल असे ह्यांचे मत.

सुबोध खरे

माई
बहुसंख्य वृत्तपत्रातून आलेल्या माहितीप्रमाणे अडाणी यांच्यावरील खटल्याची हि सुरुवात आहे आणि याला अनेक वर्षे जातील.
त्यातून श्री अडाणी यांच्यावर वैयक्तिक असे कोणतेही आरोप नाहीत.

तेंव्हा अडाणी याना काही होण्याची शक्यता बहुसंख्य कायदेतज्ञांच्या मते शून्य आहे. असे अनेक लेख इकॉनॉमिक टाइम्स आणि बिझिनेस स्टॅंडर्ड मध्ये आलेले आहेत

जरा वाचून पहा.
बाकी भुजबळ आणि इतर फुरोगामी यांच्या प्रतिसादाला उत्तर देणे हा शुद्ध कालापव्यय आहे

अदानीला शिक्षा होण्याची शक्यता कमी आहे हे मान्य पण दुसर्या देशाने एखाद्या उद्योगपतीवर लाचखोरीचे आरोप करणे, त्याचे पुरावे देणे आणि त्याच्यावर वॉरंट निघणे.. ह्यातून त्या उद्योगपतीची पत काय उरली? आणि देशाची ईमेज? 'अदानीने भारतीय नेते/नोकरशहा ह्यांना लाच दिली आहे" असा आरोप दुसरा देश करतो आणि आपले लोक हे प्रकरण उडवुन लावतात. मोदी/जयशंकर मॅनेज करतील असे म्हणतात..

सुबोध खरे

माई तुमचं वय झालाय हे खरं

ज्या अमेरिकेचा अध्यक्ष निवडणुकीपूर्वीच गुन्हेगार सिद्ध झालाय आणि आताचा अध्यक्ष आपल्या मुलाला अत्यंत गहन गुन्ह्यातून माफी देतो

त्या देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल कशाला चिंता करायची? उद्योगपतीची पत काय उरली?

अदानी याना जगभर भरपूर लोक कर्जे देतील त्याची चिंता तुम्ही करू नका? इस्रायलने अगोदरच अदानीला पाठिंबा दिला आहे https://www.reuters.com/world/india/israel-backs-indias-adani-after-us-…

ज्या देशाने आपल्या बळावर जगभर सर्वत्र काड्या करून आपली आर्थिक सत्ता कायम ठेवली आहे त्यांना का आणि कशासाठी भीक घालायची?

मोदी सरकारने अमेरिकेला तीन वेळेस फाटा मारला आहे. S -४०० विकत घेताना, रशिया कडून तेल घेताना आणि चबहार बंदराचा विकार करताना.

अमेरिकेने तुमचे काय वाकडे केले?

आणि अगोदर पोखरण १ आणि २ केल्यावर अमेरिकेने तुमच्यावर निर्बंध टाकले. तुम्ही कुठे त्यांना भीक घातली?

शेवटी बळी तो कान पिळी हेच तत्व सत्य आहे.

तुमच्याकडे शक्ती असेल तर तुमचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही.

सर्वे गुण: कांचनम आश्रयते ! तुम्ही श्रीमंत असलात तर तुमच्याकडे सर्व सद्गुण असतात.

गज: नैव व्याघ्र: नैव सिंह: नैवच नैवच
अजापुत्रो बालिम दद्यात
देव: दुर्बल नाशक:

हत्तीचा नाही वाघाचा नाही सिंहाचा तर नाहीच नाही
बोकडाचाच बळी दिला जातो. देव सुद्धा दुर्बळाचा नाशक आहे

हा अदानी कुठेना कुठे काहीना काही गैरउद्योग करतच असतो, आपल्या पैशाने सरकार बसलंय हे त्याला माहित आहे त्यामुळे कारवाईची भीतीही नाही. भाजप पक्ष अडाणीच्या पैशांनी मिंधा झाला आहे. त्यामुळे भारत सरकार ह्या अडाणीच्या गैरकृत्यांवर कारवाई करेल ही शक्यता शून्य. अमेरिका आरकार कारवाई करतंय ह्याचं मी एक भारतीय म्हणून स्वागत करतो. अमेरिकेने ह्याच्या नांग्या ठेचाव्यात.

वापरलेली भाषा अक्षेपार्ह आहे. जर संबंधितांनी काय गैरऊद्दोग केले त्याचे पुरावे मागीतले तर....
मानहानीचा खटला दाखल केला तर...
पळता भुई थोडी होईल.

लेखक,वाचक आणी प्रतिसादक यांची याविषयाबद्दल माहीती वृत्तपत्रातील माहीतीवर आधारित आहे. दाखल झालेले आरोपपत्र जरी लेखा बरोबर दिले असले तरी अमेरीका व भारत यांच्या कायद्यांतर्गत असलेल्या बाबींचे ज्ञान कितपत आहे ते बघावे लागेल.

आरोपपत्र सादर केले आहे. वृत्तपत्रातील माहीती हा पुरावा कितपत ग्राह्य धरावयाचा आणी विधिज्ञ त्याच्या कश्या चिंधड्या उडवतील हे बघावे लागेल.

प्रत्यार्पण संधी हा एक मोठा अडसर आहे का? ब्रिटन आणी भारता मधे सतरा असे मामले प्रलंबित आहेत.

अडानी हे अंतरराष्ट्रीय पातळीवर विख्यात उद्योगपती आहेत. त्यांचे अनेकांशी हितसंबंध आहेत. अशा सन्मानित व्यक्ती बद्दल बोलताना संयमित भाषेचा उपयोग करणे अपेक्षित आहे. अर्थात इतर कोणत्याही व्यक्ती बद्दल सुद्धा हाच निकष लागू पडतो.

गुन्हा न्यायालयात प्रलंबित आहे. अजून सिद्ध झाला नाही. अशा परिस्थितीत भ्रष्ट, लाचखोर असे गंभीर आरोप लावणे कितपत योग्य आहे व जर याची दखल संबंधितांनी घेतली तर मानहानीचा गुन्हा दाखल होऊ शकतो हे सुद्धा प्रतिसादकांनी लक्षात ठेवले पाहीजे. प्रतिसाद देताना भाषेचा वापर अतिशयकाळजीपूर्वक केला पाहीजे.केला पाहीजे असे माझे मत आहे.

सर्व मिपाखरे सुज्ञ,सुजाण आहेत हे गृहीत धरतो.

जावा फुल स्टॅक

अडानी हे अंतरराष्ट्रीय पातळीवर विख्यात उद्योगपती आहेत. त्यांचे अनेकांशी हितसंबंध आहेत.

म्हणून त्यांना गैरप्रकार करण्याचा अधिकार आपोआप प्राप्त होतो का? नमो नमो नमो.

आणी त्यानी कितीही झोल केले तरी ते गुजराती तसेच मोदींचे हितचिंतक असल्याने त्यांना आपोआप सन्मान प्राप्त होतो. अंधभक्तीला सीमा नाही.
मिपावरील एक महात्मा ह्यानी म्हटलेच आहे की असे झोल करावेच लागतात हे आंतरराष्ट्रीय सत्य आहे वगैरे वगैरे.

टीपीके

अगदी बरोबर. गुन्हा कोणीही, अगदी कोणीही केला असेल तर त्यावर गुन्हा दाखल करून खटला चालला पाहिजे. न्याय हा सगळ्यांना सारखा पाहिजे. खरं तर ज्यांनी लाच घेतली / मागितली त्यांचीही जाहीरपणे नावं आली पाहिजेत आणि त्यांच्यावरपण त्याच वेळी खटला चालला पाहिजे. तरच न्याय यंत्रणा , सत्ताधारी , विरोधक आणि माध्यमे निःपक्ष आहेत हे सिद्ध होईल.

तो पर्यंत हे आरोप फक्त राजकीय राहतील. बरोबर ना?

बरोबर. पण भाजपेयी अडाणीच्या पैशाने मिंधे झाले असतील त्यामुळे अदानीवर गुन्हा नसेल केला दाखल.

टीपीके

मग त्यानां त्यांची जागा दाखवायलाच पाहिजे त्यामुळे तुम्ही जे करताय ते स्पृहणीय आहे. तुम्ही खरंच राजकीय कारणासाठी नाही तर न्यायासाठी लढता आहात हे दाखवण्यासाठी ज्यांनी लाच घेतली त्यांची पण नावे का नाही घेत? म्हणजे तुमच्या उद्दिष्टांवर कोणी शंका नाही घेऊ शकणार.

टीपीके

बाकीचे आरोपी कोण आणि त्यांच्या विरुद्ध आपण कसा प्रचार करायचा आणि गुन्हे दाखल करायचा आग्रह करायचा ? तुमचे या विषयावरील मौलिक विचार समजावून घ्यायला आवडेल

टीपीके

यात गृहमंत्र्यांचा काय संबंध?

आणि आपण त्या हलकट बीजेपीवाल्यांसारखा निरपेक्षपणाचा आव तर आणू शकतो ना? इतके उघड उघड पक्षपाती झालो तर जनता काय विचार करील?

तामिळनाडू,आंध्र,ओडिशा आणि छत्तिसगड. ह्या राज्यांच्या उच्च अधिकार्यानी/राजकीय नेत्यानी(तत्कालिन सत्ताधार्यानी) लाच घेतल्याचे आरोप आहेत. अदानीने लाच दिली हे खरे असेल तर ह्या राज्यांतील तत्कालिन सत्ताधार्याना जाब विचारला गेला पाहिजे. पण मुख्य मीडिया ह्याबाबत मूग गिळुन गप्प दिसतोय.आंध्रचे जगन मोहन रेड्डी ह्यांच्या अफाट संपत्तीबद्द्लच्या सुरस कहाण्या प्रसिद्ध आहेत.
आपले मराठी विद्वान पत्रकारही ह्या प्रकरणावर बोलताना दिसत नाहीत. अदानीचे नाव आल्यावर सुरुवातीला सगळ्यांना हुरुप आला पण ह्यात बिगर-भाजपा नेते गुंतलेले आहेत हे लक्षात आल्यावर पत्रकारांनी आपली लेखणी म्यान केली. !

गोदी मीडिया आहे ती. विरोधी पक्षांवर कारवाई केली तर मालकावरही कारवाई करावी लागेल. कारण लाच घेणे गुन्हा आहे तसेच देणेही गुन्हा आहे.

गोदी मीडिया आहे ती....

हो क्का? बर्र....

मग, सामना हे मुखपत्र कुठल्या पक्षाचे?

------

सुबोध खरे

चहा, बिस्किटे, सरकारी घर, राज्यसभेचे सदस्यत्व, भूखंड, श्रीखंड घेणाऱ्या पत्रकारां कडून तुमची अपेक्षा काय आहे माई?