राजकारण

महाराष्ट्र विधानसभा २०२४ वाढलेल्या मतदानाचे परिणाम

Primary tabs

इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती गुरुवारी (14 नोव्हेंबर, 2024) रोजी असे म्हणाले की, https://timesofindia.indiatimes.com/india/invaders-colonisers-ruined-ou…
"इतिहास असे सांगतो की वैदिक काळापासून अनेक आक्रमणे होईपर्यंत गणित, खगोलशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र आणि शस्त्रक्रिया यातील नवनवीन कल्पनां मांडणारे भारत एक आघाडीचे राष्ट्र होते. या सगळ्यात अध्ययन, अध्यापन व संशोधन यात भारत अग्रेसर होता. "

"पण 700 AD ते 1520 AD याकाळात अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानमधील नेते आणि त्यानंतर ब्रिटिश वसाहतींमुळे भारतीय तरुणांना त्यांच्या विज्ञान, गणित आणि अभियांत्रिकी यासह इतर गोष्टींमधे अजिबात प्रगती करता आली नाही. सुमारे 1,000 वर्षांच्या कालावधीसाठी त्यांना बळजबरीने रोखून धरलेले होते. प्रगतीच्या वाटा रोखून धरलेल्या होत्या."

"इतिहास हे देखील सांगतो की अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानच्या राज्यकर्त्यांना विज्ञान, वैद्यक आणि गणिताची फारशी कदर नव्हती. ब्रिटिश विजेत्यांनी गणित, खगोलशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र आणि शस्त्रक्रिया या विषयांत महत्त्वाकांक्षी आणि काल्पनिक कार्य करण्याच्या आमच्या इच्छेला तुरळकपणे प्रोत्साहन दिले, परंतु आमची प्रगती मंदावलेलीच राहीली."

"ते पुढे म्हणाले की, भारतीय तरुणांना विज्ञान, गणित, अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्र, निसर्गाचे निरीक्षण करण्याची शक्ती, कुतूहल, अनुमान काढणे, गंभीर आणि विश्लेषणात्मक विचार, शोध आणि नवकल्पना, आणि समस्या व्याख्या आणि समस्या सोडवणे या सर्व गोष्टींपासून १००० वर्षे लांब ठेवण्यामुळे, भारतीय तरूणांचे अतोनात नुकसान झालेले आहे."

श्री. नारायण मूर्ती हे समाजवादी विचारसरणीचे असल्याचे मानले जाते. पण लवकरच त्यांना मोदीभक्तांमधे सामील केले जाईल असे वाटायला लागले आहे. 🤣

मला तर आता भिती वाटायला लागली आहे की, असाच एखादा जेएनयुमधील कम्युनिस्ट विचारसरणीचा माणूस असेही म्हणेल की, भारतात नवविचार मांडणे, संशोधन करणे याची खूप मोठी परंपरा आहे. जर भारतावर आक्रमणे झाली नसती. इथली ज्ञानसंपदा नष्ट झाली नसती. इथल्या अभ्यासकांना कवट्यांचे मिनार बनून आपले जीव गमवायची पाळी आली नसती तर कदाचित औद्योगिक क्रांती युरोपमधे न होता ती भारतातच झाली असती व ती सुध्दा ६००-७०० वर्षे अगोदरच झाली असती.
😉

मला तर असेही वाटायला लागले आहे की, मोदींचे अंधभक्त आता वाढायला लागले आहेत. नारायण मूर्तींसारखी जीवनांत यशस्वी झालेली माणसे,आपली बुध्दी मोदींच्या चरणी गहाण टाकायला लागली आहेत हे पाहून त्यांच्या बुध्दीची कीव करावीशी वाटायला लागली आहे. राममंदीर तोडून बाबरी मशिद बांधणाऱ्या बाबराचा उदोउदो करायचे सोडून त्या बाबरालाच दोषी समजायला लागली आहेत. बुरसटलेले विचार पसरवणारी नालंदा, तक्षशीला येथील भव्य ग्रंथालये जाळून नष्ट करणाऱ्या लोकांना नतद्रष्ट म्हणायला लागली आहेत. मोठमोठे ग्रंथ तोंडपाठ असणारे माणसे म्हणजे तर चालती फिरती ग्रंथालये. त्यांची मुंडकी उडवण्याचे व त्या मुंडक्यांचे मनोरे रचण्याचे महान कार्य करणाऱ्या सर्व आक्रमकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे दु:साहस जर नारायण मूर्तींसारखे विद्वान करायला लागले तर भारताची किती वाट लागेल याची कल्पनाच करवत नाही. हिंदूंची मोठमोठी मंदीरे ही तर एकप्रकारची बुरसटलेली विचार मांडणारी छोटीछोटी ग्रंथालयेच होती. त्यातही चालती बोलती फिरती ग्रंथालये असायची. भारतवर्षाला या सगळ्यांतून मुक्ती मिळवून देण्याचे महान कार्याला आज कमी लेखले जायला लागले आहे.

तरीपण बाबर, औरंगजेब असे थेट उल्लेख न करता "उझबेकिस्तानमधील राज्यकर्ते" असे शब्द वापरून नारायण मूर्ती साहेबांनी अजून तरी १०० टक्के मोदीभक्त न झाल्याचे दाखवून दिले आहे. तरीपण योगी आदित्यनाथ यांना मदत होईल अशी व्यक्तव्ये ऐकली की मनाला खूप व्यथा झाल्याशिवाय राहात नाही. 🤣

हे वाचल्यावर असे वाटायला लागले की
१. योगी आदित्यनाथ "बटेंगे तो कटेंगे" याचा परिणाम खरोखरच होतो आहे काय ?
किंवा
२. त्यामुळेच मतदान वाढते आहे का?
तसेच
३. हे वाढते मतदान भाजपालाच लाभदायक ठरेल हे कशावरून ?

वाढत्या मतदानाच्या बाजूने फक्त भाजपाच बोलत असल्याने भाजपाच्या चष्म्यातून प्रथम सगळा विचार करायचे ठरवले तेंव्हां खालील मुद्दे जाणवले.
तर लोकहो मतदान वाढेल व ते हिंदूंचे असेल असे समजून मुद्दे शोधायचा प्रयत्न करू.

मतदान टक्केवारी वाढण्याची कारणे खालील असावीत असे वाटते आहे.
१. मोदी शहा आपल्याला गृहीत धरायला लागले आहेत अशी समजून भाजपाला मत देणाऱ्यांची व्हायला लागली होती. त्यांसाठी एक हलकासा धक्का मोदी शहांना बसावा अशी एक सुप्त इच्छा जाणवत होती. पण मोदींचे बहुमत जावं एवढा काही राग नव्हता. त्यामुळे भाजपा २४० पर्यंत आल्यावर त्या लोकांच्या लक्षात आलं की जरा जास्तच जोरात धक्का मोदी शहांना मारलाय. ती लोकं परत येतील.

२. ४००+ पर्यंत आरामात आपण जातोय या नादात काही लोकं फिरकलीच नाहीत. ४००+ नाऱ्यामुळे गाफीलपणा वाढला. पूर्वी शिवाजी महाराज शत्रूगोटात गाफीलपणा यावा यासाठी शरणागतीची हूल उठवत असत. इथे तर आपलीच लोकं गाफील राहण्यासाठी प्रयत्न केला गेलाय. ती चूक दुरूस्त होताना दिसते आहे.

३. यावेळेस आरएसएस सक्रीय झालीय असे वाटतंय. लोकसभेत जरा थंडपणा जाणवला होता. नेहमीची उत्साही मंडळी गायब झाल्याचे लक्षात आले होते. ती परत दिसायला लागली आहेत.

४. बांगला देश फॅक्टर खूप प्रभावी ठरेल असे वाटतंय. सैन्य व रेल्वेच्या खालोखाल वक्फ बोर्डाकडे जमीन आहे हे बऱ्याच जणांना प्रथमच कळतंय असं वाटतंय. वक्फ बोर्डावर सरकारचे काहीच नियंत्रण नाही याउलट हिंदूंच्या मंदिरांवर सरकारचे संपूर्ण नियंत्रण हा आपपर भाव प्रथमच हिंदू धार्मिक लोकांच्या लक्षात येतोय. त्यामुळे किर्तनकार, प्रवचनकार, वारकरी आपआपसात काही बोलत असतील तर तो अंडर करंट खूप मोठा असू शकतो.

५. नेमानी सारख्या लोकांनी आपल्या मागण्या ऊघडरित्या मांडायला सुरवात केल्याने मविआची पंचाईत होतीय तर लोकांमधे धृविकरण होतंय. बंद दाराआड करायच्या गोष्टी हा माणूस सर्व दारं खिडक्या सताड उघडून का करतोय हे उबाठामधल्या कित्येकांना कळेनासं झालं असेल.

६. भाजपाच्या धोरणांना आंतरराष्ट्रीय परिस्थिती खूप अनुकूल आहे. आहेरे वर्गातले, सुशिक्षीत, परदेशात राहणारे असे बरेच हिंदू आहेत की ते भाजपाच्या मुस्लीम धोरणांबाबत संपूर्णपणे तटस्थ आहेत. मुस्लीमांनी देवळे फोडली. लोकं मारली हे त्यांना माहीत आहे. पण त्याचे त्यांना सोयरसुतक फारसे नाही. तो इतिहास झाला. तो आता उगाळून आता काय फायदा हा त्यामागे व्यवहार्य विचार असतो. पण मुस्लीम राष्ट्रांत मंदिरे उभारायला मुस्लीमच मदत करताहेत हे पाहिल्यावर तेही प्रथमच विचार करायला लागले आहेत. स्पेन, इंग्लंड, जर्मनी मधे मुस्लीमांचे अतिरेकी वागणे व त्यावर त्या देशांनी केलेली कार्यवाही यामुळे यालोकांना प्रथमच असे वाटायला लागले आहे की भाजपा जे काही मुद्दे मांडतो आहे त्यात काहीतरी तथ्य असावे. बांगलादेशातील घटनांमुळे या सगळ्यावर फोकस पडून जणूकाही त्याकडे बहिर्गोल भिंगातून तपासणी सुरू झाली आहे.

७. कॅनडा प्रकरणातूनही भारताचे हित व अहीत या मुद्यांतून परकीय भारतीय विचार करायला लागले की काय असे वाटायला लागले आहे.

७. यातूनच ट्रंप हा भारताचा मित्र व ओबामा वगैरे भारताचे हितशत्रू असा काहीसा प्रकार अमेरिकेत प्रथमच होऊन डेमोक्रोटीक पक्षाकडील हिंदू मते रिपब्लिकनांकडे वळली असावीत असा संशय यायला लागला आहे. ट्रंप यांचा विजय ऐतिहासीकच मानावा लागेल. दोन्ही सभागृहे व इलोक्टरल मतांनामधील त्यांचा विजय हा काही निसटता विजय म्हणता येत नाहीये . त्याला निर्विवाद विजयच म्हणायला लागेल. या सर्व घडामोडींचे पडसाद त्यांच्या भारतातील नातेवाईक व परिचीतांमधे उमटणे साहजिक आहे. त्यामुळे परदेशीय भारतीयांचे भारतातील नातेवाईक व तत्सम श्रेणीतील आहेरे वर्गातली लोकं प्रथमच भाजपाचा मुस्लीम विरोधाकडे डोळसपणे पहावयास सुरवात करायला लागले असावेत असं वाटू लागलं आहे. याबाबत नारायण मूर्तींचे उदाहरण दिलेले आहेच.

या सगळ्यामुळे हिंदूंचे मतदान वाढेल अशी मी समजूत करून घेतलेली आहे.

त्याच बरोबर यातूनच मी काश्मिर व हरियाना निवडणूकांकडे पाहातो आहे. मला असे वाटते आहे की,
१. हिंदूं हितैषी मतदान वाढण्याचा गेल्या ४० वर्षांचा कल चालूच राहीलेला असून, प्रथमच हिंदूबहुल जम्मूमधून कॉंग्रेस संपूर्णपणे उखडली गेली आहे. पंडितांच्या पलायनाच्यावेळी व त्यानंतरही कॉंग्रेस १०-११ आमदार निवडून आणू शकत असे.

२. हुरियत कॉन्फरन्स किंवा तत्सम उमेदवार खूप मोठ्या प्रमाणावर उभे राहूनही त्यांना काश्मिर खोऱ्याने नाकारलेले आहे. यांच्यापेक्षा नॅशनल कॉन्फरन्स नक्कीच राष्ट्रीय आहे असे माझे मत आहे. त्यांनी नक्कीच काश्मिरसाठी जास्त तुरूंगवास भोगला आहे. हाल सहन केले आहेत. स्वतंत्र उमेदवार जेवढे पाकिस्तान धार्जिणे असतील त्यापेक्षा नॅशनल कॉन्फरन्स नक्कीच कमी पाकिस्तान धार्जिणी असेल. ही गोष्टही भाजपाच्या धोरणाला अनुकूल आहे असे मला वाटते. कारण मुल्ला मौलवी धार्जिण्या मुस्लिमांकडून राष्ट्रीय मुसलमांनाकडे मतदान जाणे ही भारताच्या दृष्टीने खूपच भाग्याची गोष्ट मी समजतो.

३. हरियानामधे कॉंग्रेसची मते २७% वरून ३९% पर्यंत गेली तर भाजपाची ३६% वरून ३९% पर्यंत गेली. धृविकरण झाले लोकसभेचे तंतोतंत प्रतिबिंब विधानसभेत पडले यात वादच नाही. पण वाढलेले मतदान हे सर्वस्वी भाजपाकडेच गेले हे त्यातूनच लक्षात आले. त्यामुळेही माझ्या पहिल्या भागाला पुष्टी मिळाली असेच वाटले.

४. झारखंडातही पहिल्या फेरीचा तोच मतदान वाढीचा कल दिसून येतो आहे.

मोदींच्या बाबतीत काहीही लिहीले की, काही जणांकडून विरोध होतो. त्यामुळे वाचकवर्गातील मोदीविरोधकांना यांत काहीच तथ्य नाही असे वाटते. त्यातून काहीही ते शिकणे शक्यच नसते. त्यामुळे ते आहेत तिथेच राहतात. बऱ्याच जणांची वागणूक शेखर गुप्तांसारखी असते. त्यांना दिसत असूनही पहावयाचे नसते. ते तर मी मांडलेले मुद्दे फारच हिरीरीने खोडून काढतात. माझ्या पोस्टमुळे मोदी विरोधकांचा यत्किंचीतही फायदा होऊ नये याची अत्युच्च दर्जाची काळजी त्यांच्यामुळे घेतली जाते.

याउलट मोदी आवडणारे सगळं वाचतात. त्यांचे मोदीप्रेम वाढते. कुंपणावर बसलेला मोदींकडे सरकायची शक्यता वाढीस लागते. मुख्य म्हणजे ही लोकं माझ्या पोस्टला
अनुमोदन देत नाहीत. यामुळे होत काय की, माझ्या पोस्टचा फायदा युतीला किती झाला हे कधीच कळत नाही. त्यामुळे मोदी विरोधक कायमच निकाल येईपर्यंत जिंकलेल्या अवस्थेत राहतात.

तर आता आपण वाढलेले मतदानाचे आकडे जिल्ह्याप्रमाणे पाहू. (प्रतिसादामधे वाढलेल्या मतदानाच्या प्रमाणे यादी दिलेली आहे.)
जिल्हा - केंद्राचे नाव : वाढ अथवा घट
Ahmednagar-Shrigonda : 6.12
Ahmednagar-Shrirampur : 6.07
Ahmednagar-Rahuri : 5.8
Ahmednagar-Ahmednagar City : 5.1
Ahmednagar-Shirdi : 4.83
Ahmednagar-Akole : 3.57
Ahmednagar-Sangamner : 3.2
Ahmednagar-Shevgaon : 3.18
Ahmednagar-Karjat jamkhed : 0.68
Ahmednagar-Parner : -0.25
Ahmednagar-Nevasa : -0.56
Ahmednagar-Kopargaon : -5.07

Akola-Murtizapur : 12.07
Akola-Akola West : 6.96
Akola-Akola East : 5.53
Akola-Balapur : 4.55
Akola-Akot : 4.2

Amravati-Teosa : 9.25
Amravati-Melghat : 7.58
Amravati-Amravati : 6.55
Amravati-Morshi : 5.38
Amravati-Badnera : 5.22
Amravati-Achalpur : 4.8
Amravati-Dhamamgaon railway : 3.08
Amravati-Daryapur : 2.89

Aurangabad-Vaijapur : 12.76
Aurangabad-Gangapur : 8.87
Aurangabad-Paithan : 5
Aurangabad-Sillod : 4.85
Aurangabad-Phulambri : 2.34
Aurangabad-Aurangabad West : 1.2
Aurangabad-Kannad : 0.75
Aurangabad-Aurangabad central : -0.35
Aurangabad-Aurangabad East : -0.57

Beed-Ashti : 8.36
Beed-Parli : 2.15
Beed-Kaij : 0.11
Beed-Georai : -1.51
Beed-Majalgaon : -1.62
Beed-Beed : -3.69

Bhandara -Bhandara : 5.11
Bhandara -Tumsar : 3.35
Bhandara -Sakoli : -0.92
Buldhana-Mehkar : 9.42
Buldhana-Chikhli : 6.25
Buldhana-Sindkhed Raja : 5.81
Buldhana-Khamgaon : 5.39
Buldhana-Buldhana : 3.88
Buldhana-Jalgaon (Jamod) : 3.22
Buldhana-Malkapur : 1.86

Chandrapur -Brahmapuri : 9.04
Chandrapur -Ballarpur : 7.36
Chandrapur -Chimur : 7.11
Chandrapur -Warora : 7.04
Chandrapur -Chandrapur : 6.74
Chandrapur -Rajura : 1.56

Dhule-Dhule City : 9.6
Dhule-Sakri : 4.95
Dhule-Shindkheda : 4.49
Dhule-Dhule Rural : 4.18
Dhule-Shirpur : -0.36

Gadchiroli -Gadchiroli : 6.3
Gadchiroli -Armori : 5.42
Gadchiroli -Aheri : 3.54
Gondiya-Gondiya : 6.09
Gondiya-Amgaon : 3.78
Gondiya-Arjuni-morgaon : 0.3
Gondiya-Tirora : -0.44

Hingoli-Kalamnuri : 4.45
Hingoli-Hingoli : 4.04
Hingoli-Basmath : 0.56

Jalgaon-Jalgaon City : 9.57
Jalgaon-Bhusawal : 8.8
Jalgaon-Jalgaon Rural : 6.49
Jalgaon-Erandol : 5.15
Jalgaon-Pachora : 4.85
Jalgaon-Raver : 4.51
Jalgaon-Muktainagar : 3.09
"Jalgaon-Jamner : 2.98"
Jalgaon-Amalner : 2.64
Jalgaon-Chopda : 1.93
Jalgaon-Chalisgaon : -1.38

Jalna-Jalna : 8.51
Jalna-Bhokardan : 6.63
Jalna-Badnapur : 6.02
Jalna-Ghansawangi : 3.95
Jalna-Partur : 1.39

Kolhapur-Chandgad : 6.34
Kolhapur-Kolhapur North : 4.31
Kolhapur-Shirol : 3.37
Kolhapur-Hatkanangle : 3.07
Kolhapur-Radhanagari : 2.7
Kolhapur-Kagal : 1.3
Kolhapur-Ichalkaranji : 1.09
Kolhapur-Kolhapur South : 0.63
Kolhapur-Karvir : 0.63
Kolhapur-Shahuwadi : -1.12

Latur-Latur Rural : 8
Latur-Udgir : 7.05
Latur-Latur City : 5.88
Latur-Nilanga : 3.44
Latur-Ausa : 2.91
Latur-Ahmadpur : 1.81

Mumbai City-Mahim : 6.34
Mumbai City-Shivadi : 6.19
Mumbai City-Worli : 5.55
Mumbai City-Malabar hill : 5.54
Mumbai City-Mumbadevi : 4.75
Mumbai City-Colaba : 4.44
Mumbai City-Wadala : 4.38
Mumbai City-Sion koliwada : 3.09
Mumbai City-Dharavi : 2.45
Mumbai City-Byculla : 2.3

Mumbai Suburb-Andheri West : 10.15
Mumbai Suburb-Goregaon : 9.17
Mumbai Suburb-Versova : 9.06
Mumbai Suburb-Kurla(SC) : 8.23
Mumbai Suburb-Mulund : 7.61
Mumbai Suburb-Vandre West : 7.36
Mumbai Suburb-Borivali : 7.26
Mumbai Suburb-Bhandup West : 6.65
Mumbai Suburb-Jogeshwari East : 6.33
Mumbai Suburb-Ghatkopar East : 5.62
Mumbai Suburb-Dahisar : 5.43
Mumbai Suburb-Mankhurd shivaji Nagar : 5.05
Mumbai Suburb-Charkop : 5.03
Mumbai Suburb-Ghatkopar West : 4.91
Mumbai Suburb-Kandivali East : 4.8
Mumbai Suburb-Andheri East : 4.73
Mumbai Suburb-Vandre East : 4.29
Mumbai Suburb-Magathane : 4.13
Mumbai Suburb-Vile parle : 3.88
Mumbai Suburb-Kalina : 2.78
Mumbai Suburb-Chembur : 2.72
Mumbai Suburb-Dindoshi : 2.29
Mumbai Suburb-Vikhroli : 2.24
Mumbai Suburb-Malad West : 2.17
Mumbai Suburb-Chandivali : 1.16
Mumbai Suburb-Anushakti Nagar : -1.23

Nagpur-Nagpur North : 7.17
Nagpur-Nagpur central : 6.82
Nagpur-Nagpur West : 6.55
Nagpur-Nagpur South : 6.44
Nagpur-Nagpur East : 6.02
Nagpur-Ramtek : 5.58
Nagpur-Kamthi : 5.15
Nagpur-Nagpur South West : 4.61
Nagpur-Umred : 1.71
Nagpur-Savner : 0.77
Nagpur-Katol : 0.15
Nagpur-Hingna : -0.3

Nanded-Loha : 4.96
Nanded-Mukhed : 4.45
Nanded-Deglur : 2.19
Nanded-Bhokar : 2
Nanded-Hadgaon : 1.69
Nanded-Kinwat : 0.85
Nanded-Nanded North : 0.16
Nanded-Naigaon : -0.07
Nanded-Nanded South : -0.13

Nandurbar -Nandurbar : 11.61
Nandurbar -Nawapur : 5.57
Nandurbar -Shahada : 3.38
Nandurbar -Akkalkuwa : -0.29

Nashik-Igatpuri : 11.94
Nashik-Nandgaon : 10.85
Nashik-Nashik central : 9.08
Nashik-Sinnar : 8.98
Nashik-Yevla : 8.61
Nashik-Devlali : 8.58
Nashik-Dindori : 8.39
Nashik-Malegaon outer : 8.19
Nashik-Baglan : 8.1
Nashik-Chandvad : 7.9
Nashik-Nashik East : 7.71
Nashik-Kalwan : 5.88
Nashik-Malegaon central : 2.37
Nashik-Nashik West : 2.22
Nashik-Niphad : -1.03

Osmanabad-Umarga : 4.96
Osmanabad-Osmanabad : 2.53
Osmanabad-Tuljapur : 2.11
Osmanabad-Paranda : 1.52

Palghar -Palghar : 24.36
Palghar -Dahanu : 12.34
Palghar -Vikramgad : 9.36
Palghar -Nalasopara : 5.54
Palghar -Boisar : 0.02
Palghar -Vasai : -0.87

Parbhani -Pathri : 4.19
Parbhani -Gangakhed : 3.73
Parbhani -Parbhani : 2.99
Parbhani -Jintur : 2.08

Pune-Pune cantonment : 9.5
Pune-VADGAON SHERI : 9.24
Pune-Shivajinagar : 7.88
Pune-Kasbapeth : 7.64
Pune-Parvati : 7.11
Pune-Khadakwasala : 5.12
Pune-Chinchwad : 4.73
Pune-Bhor : 4.69
Pune-Daund : 4.51
Pune-Kothrud : 4.48
Pune-Ambegaon : 3.62
Pune-Hadapsar : 3.38
Pune-Baramati : 2.9
Pune-Bhosari : 1.83
Pune-Shirur : 1.61
Pune-Pimpri : 1.57
Pune-Junnar : 1.42
Pune-Maval : 1.38
Pune-Khed alandi : 1.18
Pune-Indapur : 0.57
Pune-Purandar : -4.72

Raigad-Mahad : 4.51
Raigad-Panvel : 4.37
Raigad-Karjat : 4.37
Raigad-Alibag : 4.27
Raigad-Uran : 2.38
Raigad-Pen : 1.53
Raigad-Shrivardhan : 0.33

Ratnagiri -Rajapur : 8.52
Ratnagiri -Ratnagiri : 5.9
Ratnagiri -Chiplun : 3.23
Ratnagiri -Guhagar : 2.42
Ratnagiri -Dapoli : 0.65

Sangli-Miraj : 10.97
Sangli-Tasgaon-Kavathe Mahankal : 6.78
Sangli-Palus-Kadegaon : 4.9
Sangli-Sangli : 4.58
Sangli-Khanapur : 4.16
Sangli-Islampur : 0.98
Sangli-Shirala : 0.31

Satara-Koregaon : 9.93
Satara-Karad North : 7
Satara-Phaltan : 6.25
Satara-Patan : 6.09
Satara-Man : 5.37
Satara-Karad South : 4.45
Satara-Satara : 4.37
Satara-Wai : -0.97

Sindudurg-Kudal : 9.53
Sindudurg-Sawantwadi : 7.72
Sindudurg-Kankavli : 4.13

Solapur-Madha : 6.35
Solapur-Solapur South : 6.07
Solapur-Solapur City North : 5.67
Solapur-Sangola : 5.2
Solapur-Akkalkot : 4.89
Solapur-Mohol : 3.68
Solapur-Solapur City central : 2.1
Solapur-Malshiras : 1.78
Solapur-Barshi : -0.08
Solapur-Karmala : -1.3
Solapur-Pandharpur : -2.19

Thane-Dombivali : 15.38
Thane-Kalyan East : 14.88
Thane-Kalyan West : 13.25
Thane-Bhiwandi Rural (S.T.) : 11.49
Thane-Airoli : 11.45
Thane-Kalyan Rural : 11.22
Thane-Kopri-Pachpakhadi : 10.65
Thane-Belapur : 10.03
Thane-Ovala - Majiwada : 9.37
Thane-Murbad : 8.87
Thane-Thane : 8.25
Thane-Ulhasnagar : 7.55
Thane-Ambernath : 6.55
Thane-shahapur : 5.61
Thane-Bhiwandi West : 4.05
Thane-Mira Bhayandar : 3.34
Thane-Bhiwandi East : 3.25
Thane-Mumbra-Kalwa : 2.08

Wardha-Wardha : 12.19
Wardha-Hinganghat : 5.89
Wardha-Deoli : 5.42
Wardha-Arvi : 4.48

Washim -Washim : 6.44
Washim -Risod : 3.86
Washim -Karanja : 3.66

Yavatmal-Yavatmal : 7.56
Yavatmal-Digras : 5.81
Yavatmal-Arni : 5.01
Yavatmal-Ralegaon : 4.34
Yavatmal-Wani : 3.47
Yavatmal-Umarkhed : 1.92
Yavatmal-Pusad : 1.34

आपण पुढच्या निवडणुकीच्या वेळी, एखाद्या राजकीय पक्षाकडून त्रयस्थ निरीक्षक म्हणून भाग घ्या.

शाम भागवत

खरंय.
त्या गावातून मुमं साठी कोणी मिळतंय का बघा ना.
:)

श्रीगुरुजी

बाकी धुळे शहरात मुस्लिम मते ६७००० असताना ७०००० मतदान mim ला कसे झाले

अधिकची मते मुस्लिमहृदयसम्राटाच्या पक्षाची आहेत.

Vichar Manus

अमरेंद्र बाहुबली सातत्याने खोट्या बातम्या टाकत आहेत, त्यांच्या विरुद्ध काही कारवाई करता येणार नाही का

वरील 35 मतदार संघातील हा डाटा आहे... सगळेच आकडे जवळपास same कसे असू शकता..

अजून असे भरपूर मतदारसंघ आहेत...

.
.
.
.
.
.
.

हे खरे आहे का? खरे असेल तर लोकशाहीची तीरडी उठली असे म्हणावे लागेल.

गवि

जिल्ह्यातील शेकडो किंवा हजारो विद्यार्थ्यांचे दहावीचे मार्क, आरोग्य शिबिरातील मुलांची वजने, एखाद्या शहरातील हजारो घरांचे गेल्या महिन्याचा वीज वापर किंवा वीज बिल.. असा कोणताही तुमच्या आवडीचा डेटा घ्या.

त्याला चढत्या भांजणीने लावून घ्या.. म्हणजे असेंडिंग किंवा दिसेंडिंग ऑर्डर.

कोणताही मोठा रँडम डेटा गॉशियन डिस्ट्रीब्युषन पाळतो. हा नैसर्गिक किंवा सांख्यिकी नियम आहे.

त्यामुळे त्याच्या इंटर क्वार्टाईल रेंज (२५ ते ७५ पर्सेंटाइल) दरम्यान तुम्हाला अनेक रीडिंग अशी जवळजवळ जोडून आलेली दिसतील. हा मेडियनच्या दोन्ही बाजूंचा मुख्य प्रातिनिधिक भाग असतो.

मग दहावीच्या निकालात घोटाळा असे म्हणायचे का? की शेकडो मुलांची वजने अगदी दहा वीस ग्रॅम फरकाने इतकी सारखी कशी असे म्हणायचे?

उलट यामुळे हा डेटा नैसर्गिक आणि शुद्ध असल्याचे सिद्ध होते.

तुम्ही सांख्यिकीबद्दल जाणून देखील टीव्ही ९ शी सहमत असाल तर मग काही म्हणणे नाही.

वामन देशमुख

तुम्ही सांख्यिकीबद्दल जाणून देखील टीव्ही ९ शी सहमत असाल तर मग काही म्हणणे नाही.

त्यांचा आणि सांख्यिकीचा काय संबंध?

संख्यांचा शोध तर मनुवाद्यांनी लावलाय!

सुबोध खरे

त्यांचा आणि सांख्यिकीचा काय संबंध?

भुजबळांचा केवळ सांख्यिकी शीच संबंध नाही असे नाही तर त्यांचा तर्कशुद्धता, सत्य, वैचारिक समृद्धी आणि तारतम्य यांच्याशी सुद्धा काहीही संबंध नाही.

हातात कळफलक आला कि तो बडवायचाच एवढीच विचारसरणी असल्यावर काय करता?

शाम भागवत

मविआ जिंकणार होती पण इव्हीएम घोटाळ्यामुळे जिंकली असं मानण्यामुळे मविआला कधीच आपल्या चुका कळणार नाहीयेत. हे असंच चालू राहीलं तर महानगरपालिकेच्या निवडणुकात दारूण पराभवाचा पाया रचायला सुरवात झालीय असं म्हणायला हरकत नाही.

पुरोगामी विचारवंत व मिडीयाने खोटी स्तुती करून भरपूर नुकसान करून ठेवलंय. आता आम्हीच बरोबर आहोत हे स्वत:लाच समजावून सांगण्याच्या नादात बुडत्याचा पाय खोलात अशी अवस्था होण्याची शक्यता जास्त.

बघूया कितीवेळ हे चालणारेय ते. खूप काळ चालू राहीलं तर मनपा निवडणूका महायुती आरामात जिंकणार हे नक्की.

दुसरं असं की जाणत्या लोकांना हा विजय हिंदूत्वाचा असल्याचे लक्षात आले तरी उपयोग नाही. ते त्यांनी मान्य करणे म्हणजे स्वातंत्र्यापासून जी भूमिका घेतली ती चुकीची होती याची कबूली देण्यासारखे आहे. तिसरं असं की हिंदूत्व वाढायला भरपूर वाव आहे तर मविआचे मुस्लीम अनुनयाला आता फारसा वाव नाही.

त्यामुळे एकच उपाय शिल्लक राहतो. तो म्हणजे पूजापाठ सुरू करणे. देवळांत जाऊन आरत्या करणे. संकष्टीला उपास करणे. येनकेन प्रकारे आम्ही हिंदू आहेत हे लोकांच्या नजरेस आणणे. गुजराथमध्ये जनेऊधारी राहूल गांधींचा जन्म यातूनच झाला होता. आता महाराष्ट्राचा नंबर आहे.

फेसबुकवर उमेदवाराला त्याच्या राहत्या भागातल्या बूथवर शून्य मतदान झाले किंवा गावातल्या एकूण मतदानाच्या दुप्पट मतदान झाले हे दावे चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहे. दुप्पट मतदानाचा दावा हा पोलिंग एजंटने उमेदवाराच्या दोन हस्तकांकडे जो डेटा दिला त्याची बेरीज झाल्याने चुकून करण्यात आला असे आता समोर येत आहे. या अशा पोस्टी खातरजमा केल्याशिवाय मायबोलीवर आल्या नाहीत.
२००९ च्या निवडणुकांनंतर भाजपचे लोक ईव्हीएम बद्दल आक्रोश करायचे तेव्हां त्यांच्याबद्दल मनात अविश्वास होता. यांना रडायची सवयच असते असं वाटायचं. पण २०१४ नंतर मिळालेलं बहुमत हे शंकास्पद आहे. आम आदमी पक्षाला दिल्लीत मिळालेलं बहुमत किंवा योगींना मिळालेलं बहुमत हे सुद्धा शंकास्पद आहे. २०१४ नंतर बी जी कोळसेपाटील आणि अन्य बर्‍याच जणांनी सर्वोच्च न्यायालयात दावे दाखल केले होते. त्यातल्या व्हीव्हीपॅटचा खटला कोर्टात कूर्मगतीने चालला. २०१७ ला उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आल्यानंतर कोर्टाने व्हीव्हीपॅट बद्दल निकाल दिला.
या घटना राजकीय पक्षांना आक्रोश करायला पुरेशा होत्या. त्या वेळी कुठल्याही पक्षाने आवाज उठवला नाही. आता विधानसभेला पानीपत झाल्यावर ईव्हीएम बद्दल शंका घेणे आणि लोकसभेला ३१ जागा मिळाल्यावर त्या नीट चालल्या असे मानणे हे भाजपला २००९ नंतर जे ऐकवत होतो त्याच धर्तीवर आहे. अशाने ईव्हीएम विरोधातला लढा गांभीर्याने लढता येणार नाही.
ईव्हीएम नकोच याची कारणे भाजपच्या अध्यक्षांनीच सर्वोच्च न्यायालयात दिली आहेत. ८ ओक्टोबर २०१३ ला सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम मधे फेरफार होऊ शकतात हे मान्य केलेले आहे. या पेक्षा मोठा आधार असण्याची काय गरज आहे ? ईव्हीएम बाबत सर्वात महत्वाचा आक्षेप म्हणजे बॅलट पेपरवर माझं मत कुठं गेलं हे सिद्ध करता येतं. बॅलट पेपरच्या काऊण्टर फॉईलला क्रमांक दिलेला असतो. त्यावरून मला माझं मत नंतर शोधता येतं.
ईव्हीएम मधल्या मताला मी स्पर्श करू शकत नाही यासाठी व्हीव्हीपॅट आलं. पण त्याची मतं मोजायचीच नसतील तर त्याचा काडीचाही उपयोग नाही. शिवाय शंका आहे या कारणासाठी मतमोजणीचा अर्ज फक्त दुसरा आलेला उमेदवारच करू शकतो.. म्हणजे जो निवडून येणार आहे तो उमेदवार जर तिसरा, चौथा किंवा पाचवा आला तर तो अर्ज करू शकत नाही.
ईव्हीएम हॅक होऊ शकतं हे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन चार तासात सिद्ध करायचं. त्यासाठी सोर्स कोड पण ते देणार नाहीत. हात लावायचा नाही. हे म्हणजे एखाद्याने चोरी केल्याचा आरोप पोलिसांनी केला असेल तर पोलिसांनी तशीच चोरी करून दाखवायची. त्यासाठी चोराची चौकशी करायची नाही. त्याला हात लावायचा नाही. त्याने चोरी कशी केली हे विचारायचे नाही. असा निकाल दिल्यासारखेच आहे.
निवडणूक आयोगाला खात्री आहे तर ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही हे सिद्ध करण्यासाठी ते तज्ञांच्या ताब्यात द्यायला हरकत काय आहे ? उलट अशाने जर काही बाबी समोर आल्या तर त्या दूर करणे शक्य होईल.
ईव्हिएम हॅकिंगच्या अनेक थिअरीज आहेत. त्या खर्‍या कि खोट्या हे माहिती नाही. पण त्यातली अनिल अंबानींच्या जुन्या सीडीएमए वाली थिअरी काहीच्या काही वाटते. या थिअरीज चुकीच्या असतीलही. पण ईव्हीएमला बाहेरून अ‍ॅक्सेस नाही हा दावाही चुकीचा आहे आणि यावरून दक्षिणेतल्या एका तरूण आय ए एस अधिकार्‍याने राजीनामा दिला आहे.
व्हीव्हीपॅट मधे चिन्हं आणि नावं दिसावीत यासाठी मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणूक आयोगाकडून एक टीम प्रत्येक बूथवर येते. ही टीम लॅपटॉप ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटला कनेक्ट करते. या वेळी ईव्हीएम इंटरनेटच्या संपर्कात असतं. नेटवरून मतपत्रिका डाऊनलोड केली जाते. याच कारणाने त्या अधिकार्‍याने राजीनामा दिला. कारण लॅपटॉप अशा कारणासाठी कनेक्ट करता येतो याचा पुरावा आहे. याचाच अर्थ बाहेरून काही ढवळाढवळ करता येत नाही हे चूक ठरतं. नंतर लॅपटॉप कनेक्ट करतात कि नाही हा प्रश्नच नाही. पण असे करता येतं त्यामुळे विश्वासार्हता धोक्यात आली आहे हा प्रश्न आहे.
मतदान बॅलट पेपर वर घेण्यात इगो आड येत आहे का ? जोपर्यंत सर्व शंका दूर होत नाहीत तोपर्यंत बॅलट पेपरवर निवडणुका झाल्या पाहीजेत.
मतपेट्या पळवता येतात तसेच ईव्हीएम सुद्धा पळवता येतात. गुजरात सरकारने जे वीस लाख ईव्हीएम घेतले आहेत त्यात समांतर मतदान करून मतमोजणीच्या वेळी सील आणि मतदान यंत्रांचे नंबर्स मॅच केले जात नाहीत याचा फायदा घेत बोगस ईव्हीएम मोजणीच्या वेळी आणले जातात असा आरोप आहे. त्या मशीन्सची बॅटरी जास्त वेळ न चालल्याने ९९% फुल्ल असते. कारण काही क्षणात त्यात मतदान केलेले असते. ते दिवसभर चालवले जात नाहीत. हा आरोप खरा आहे असा दावा नाही. पण बॅलट पेपर ज्या कारणासाठी नको ते कारण ईव्हीएम ला सुद्धा लागू आहे एव्हढचं प्रतिपादन.
(माबोवरील एक प्रतिसाद)

सुबोध खरे

मतदान बॅलट पेपर वर घेण्यात इगो आड येत आहे का

रेल्वे ला उशीर होतो म्हणून बैलगाडी वापरण्यात इगो आड येतो का
असे विचारण्यासारखे आहे हे.
असो

घरात पाळणा हलत नाही यात पलन्गाचाच दोष आहे मानणा र्यांच्या पाळणा कसा काय हलणार हो ?

त्यांना करू द्या रडारड

बैलगाडी वापरण्यात इगो आड येतो का अमेरिका, कॅनडा, जर्मनी इंग्लंड हे बैलगाडी वापरतात नाही?

शाम भागवत

त्या मशीन्सची बॅटरी जास्त वेळ न चालल्याने ९९% फुल्ल असते.

या संदर्भात निवडणुक आयोगाने स्पष्ट केले आहे की,
मतदान करण्यासाठी टेक्निकली मशीन योग्य आहे की नाही हे दाखवण्यासाठी केलेली ती योजना आहे.
(मोबाईलची बॅटरी किती शिल्लक राहीली हे दाखवण्यासाठीचे गमक इथे वापरून, आम्हीच बहूसंख्या कसे आहोत हा दावा ) 🤣

जोपर्यंत व्होल्टेज ७.४ ते ८.० मधे असेल तर ९९ टक्के बॅटरी असल्याचे दाखवले जाते. थोडक्यात मशिन किती वापरले याच्याशी याचा काही संबंध नाही.

व्होल्टेज ७.४ ते ८.० मधे असेल तर ९९ टक्के बॅटरी असल्याचे दाखवले जाते. थोडक्यात मशिन किती वापरले याच्याशी याचा काही संबंध नाही.

काम केलंय का कधी मशीनवर ? का अंदाजपंचे.
कोणतीही बॅटरी उपयोगात आणल्यानंतर बॅटरी उतरते हे माहिती आहे की नाही ?

बॅलेटवर हिंदुंची मतं पडत असतील तेव्हा देव बॅटरी फूल ठेवत असावा. ;)

-दिलीप बिरुटे

शाम भागवत

त्यातल्या व्हीव्हीपॅटचा खटला कोर्टात कूर्मगतीने चालला.

जलदगती व कूर्मगती याविषयीचे निकष वाचायला आवडतील.

शाम भागवत

या अशा पोस्टी खातरजमा केल्याशिवाय मायबोलीवर आल्या नाहीत.

🤣 🤣 🤣

शाम भागवत

यावरून दक्षिणेतल्या एका तरूण आय ए एस अधिकार्‍याने राजीनामा दिला आहे.

याबद्दल अधिक माहीती वाचायला आवडेल.

वामन देशमुख

याबद्दल अधिक माहीती वाचायला आवडेल.

त्यांच्या बहुसंख्य विधानांना हे विधान लागू होते.

पण दडपून खोटे बोलण्याचे बीग्रेडी बाळकडू मिळालेले असल्याने त्यांच्यावर इतक्या euphemistic बोलण्याचा काही परिणाम होत नाही.

---

मनुवादीयों के भूत बातों से नहीं मानते हैं.

शाम भागवत

खूप मोठ्या प्रतिसादाला १-२ ओळीत उत्तर देणे परवडते. तेवढ्या भांडवलावर मग ते भरपूर काम करत राहतात.
🤣

शाम भागवत

बॅलट पेपरच्या काऊण्टर फॉईलला क्रमांक दिलेला असतो. त्यावरून मला माझं मत नंतर शोधता येतं.

गुप्त मतदानाची ऐशी की तैशी.
🤣

सुबोध खरे

कशाला वाद घालताय?

नाही तरी श्री मोदी यांनी निवडणूक आयोग, इ व्ही एम, सीबीआय इ डी इत्यादींना पाळीव कुत्रा बनवलेलंच आहे तर २०२९ अन २०३४ मध्ये ते येणार हे नक्की झालाय ना?

मग एवढा अवाढव्य निवडणुकीचा खर्च करण्या ऐवजी हे पैसे लाडका भाऊ लाडक्या बहिणीला असेच देऊन टाकू.

काय म्हणताय भुजबळ बुवा आणि बिरुटे सर?

निवडणुकीचा खर्च करण्या ऐवजी हे पैसे लाडका भाऊ लाडक्या बहिणीला असेच देऊन टाकू.

तात्काळ योजनांवर आणि मिळणा-या पैशांवर जर मतदान होत असेल तर, आता जाहीरनामे, प्रचार, पक्ष वगैरेची फार गरज वाटत नाही.
घरोघर खात्यात पैसे द्यायचे आणि मतदानाच्या आदल्या दिवशी प्रत्येकी चार-पाच हजार देऊन टाकले पाहिजेत...लाडक्या योजनाच भविष्यकाळात लोकप्रिय होतील. रेवडी की काय म्हणतात त्याला...

>>>> काय म्हणताय भुजबळ बुवा आणि बिरुटे सर?
माझी आठवण केल्याबद्दल आभार. वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. ;)

-दिलीप बिरुटे

शाम भागवत

कर्नाटकांत सुरू करायला हरकत नाही. आजन्म कॉंग्रेसचे सरकार खरंच तिथे येईल असं वाटतंय तुम्हाला?
कर्नाटकांत मुस्लीम अनुनय करत राहा.
पुढच्या निवडणुकांत वाढत्या हिदुत्वाचा टक्का मतदान फिरवणार आहे हे नक्की. ४० वर्षांचा हिंदूत्वाचा कल या निवडणूकीत अबाधित राहीला आहे. पुढच्या निवडणुकीत गेल्या ४५ वर्षांचा कल असे शब्द प्रयोग करायला लागणार आहेत.
😀
पालघर मधे २४.३६ टक्के मतदान वाढलंय.

पैसेवाली लोकं जी मतदान करीत नाही असं म्हटलं जातंय त्या कुलाब्यात ४.४४ टक्के मतदान वाढलंय. रेवडीमुळेच असणार. होना.
नारायण मूर्ती रेवडी मिळाल्यामुळेच अफगाण व उजबेकिस्तानमधील राज्यकर्त्यांबद्दल बोलायला लागले असावेत. नाही का.
काश्मिर प्रश्नांत सतत नाक खूपसणाऱ्या जर्मनीमधे मशिदी सील केल्या जायल्या आहेत. तेही रेवडीमुळेच का ?

देवळात भजन कीर्तन नियमित करीत जा. महाराष्ट्रातला हिंदू आता पाच वर्षासाठी सेफ झालाय. इंजॉय.

-दिलीप बिरुटे

शाम भागवत

माझे भजन पूजन नेहमीच चालूच असतं हो.
त्यामुळे नव्याने मला काहीच करायचं नाहीये. किंवा ते भजन पूजन वाढवायचीही मला जरूरी वाटत नाही.
मविआ ला यश मिळावं म्हणून त्यांच्या पाठीराख्यांनी काही तरी करीयचं आहे.
येती पाच वर्षे काहीच करणार नसाल तर पाच वर्षांसाठी नाही, तर त्यानंतरही आपोआप हिंदू सेफ असणार आहे.
😀

ह्यावरून आठवले. पुणेस्थित एका मॅडम साहेबानी हिंदूनी एकत्र यावे म्हणून आठवड्यातल्या एका वारी सारसबागेच्या गणपतीला आरतीला जमावे असे फेबुकवर आवाहन केले होते. निवडणूकीच्या सहाएक महिने आधी सुरू होते हे. बहुतेक आता बंद झाले आहे. आता गणपती आठवेल तो थेट २०२९ ला. :)

शाम भागवत

ठसंकष्टीला मटण एकदम चांगले लागते असं कोणीतरी २०२९ ला म्हणणार आहे.ठ
असं मी अजिबात म्हणणार नाही आहे.
😀

शाम भागवत

कशाला वाद घालताय?

खूप मोठ्या प्रतिसादाला १-२ ओळीत उत्तर देणे परवडते. तेवढ्या भांडवलावर मग ते भरपूर काम करत राहतात. कारण त्यांना काहीतरी सिध्द करायचं असतं.
आपण आपलं नेहमीचे काम करायला मोकळे.
🤣

श्री मोदी यांनी निवडणूक आयोग, इ व्ही एम, सीबीआय इ डी इत्यादींना पाळीव कुत्रा बनवलेलंच आहे बऱ्याच दिवसांनी तुमच्या बरोबर सहाम्य होण्याची वेळ आली.असे सत्य कधीतरीच तुमच्या लेखणीतून झिरपते.

शाम भागवत

अर्र.
स्मायली टाकायचीच राहीली.
हरकत नाही. आत्ता टाकतो.
😁

शाम भागवत

यासाठी व्हीव्हीपॅट आलं. पण त्याची मतं मोजायचीच नसतील तर त्याचा काडीचाही उपयोग नाही.

१. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, कलकत्ता यांनी सँपल म्हणून ४७९ मशिन्समधील व्हीव्हीपॅटची तपासणी केली जावी असं सुचवलं होतं. त्यावर निवडणुक आयोगाने कोर्टात सांगितल की, आम्ही प्रत्येक विधानसभा मतदार संघात रँडमली ५ मशिन्सची तपासणी करतो व ही मशिन्स उमेदवार निवडतात. यानुसार आम्ही २०६०० मशिन्समधील व्हीव्हीपॅट तपासलं. एकही चूक त्यात सापडली नाही.
२. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, कलकत्ता यांनी सुचवलेल्या आकड्याच्या ५० पट तपासणी झालेली असल्याचं कळल्यावर, सुप्रीम कोर्टाने व्हीव्हीपॅटची १०० टक्के मोजणी करायच्या मागणीला नकार दिला आहे.

जर व्हीव्हीपॅटची १००% मोजणी केली आणि त्यात काही तफावत आढळली नाही तर मग व्हीव्हीपॅटमध्ये काहीतरी गफलत आहे अशी ओरड सुरू होईल. म्हणजे मतदारांना दाखवताना एक व्हीव्हीपॅट दाखवतात पण प्रत्यक्षात मोजताना वेगळेच कागद मोजतात अशाप्रकारे.

अशा लोकांचा खाक्या- चित भी मेरी पट भी मेरा असाच असतो. त्यामुळे त्यांना रडायला एक नाही तर दुसरे कोणतेतरी कारण तयारच असेल.

शाम भागवत

हो.
असंही होऊ शकेल. पण त्यामुळे ते त्यांची विश्वासार्हता घालवून बसणारेत. अबांनी एवढे मेसेजेस टाकले आहेत की, त्यांनी एखादी योग्य मुद्दा मांडला तरी त्याकडे मविआच्या मतदारांकडून दुर्लक्ष केले जाईल.
मोदींवरील अतिरेकी टीकेचा मोदींनाच फायदा झाला हे त्यांच्या कसे लक्षात येत नाही कळत नाही.

🤣

सुबोध खरे

कळफलक हातात आला कि तो बडवायचा एवढा च प्रोग्रॅम वापरणारा मेंदू असला कि त्यातून काय फायदा होतो कि तोटा होतो याचा विचार कसा करता येणार?

श्रीगुरुजी

शेवटी काय ठरलं मग? मतदानयंत्रात गडबड करून महायुती जिंकली की जनतेने उस्फूर्तपणे महायुतीला भरघोस मते दिली?

शपथविधी सोहळ्याच्या वृत्तपत्रातील भाजपच्या जाहिरातीत राजर्षी शाहू महाराज आणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे ह्यांचे फोटो नव्हते. मनुवाद्यांचा राजर्षी शाहू महाराज व वेदोक्तावरील राग समजू शकतो त्यामुळे त्यांनी वगळले असावे, पण ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने त्यांचे फोटो लावून मते मागितली त्या बाळासाहेब ठाकरे ह्याना तरी वगळायला नको होते.

श्रीगुरुजी

बाळ ठाकरेंचे चित्र न टाकणे हा उत्तम निर्णय. भाजपने आता बाळ ठाकरेंचे दाखले देणे, त्यांचा उदोउदो, त्यांची तथाकथित हिंदुत्ववादी विचारसरणी वगैरे कायमस्वरूपी बंद करावे.

मते मागतांना बरे फोटो वापरला बाळासाहेब ठाकरेंचा? आणी शाहू महाराजांबद्दल काय?

श्रीगुरुजी

उठाने २०१४ व ३०१९ मध्ये मोदींचे चित्र वापरले होते. बाळ ठाकरेंच्या काळात वाजपेयींचे चित्र वापरायचे, भाजपचे कमळ चिन्ह सुद्धा वापरत होते.

वाजपेयींच्या फोटोवर वाजपेयी स्वत पडले होते.मोदींचे चित्र न वापरताही २००४ नी २००९, २०२४ ला शिवसेनेचे चांगले खासदार जिंकले. मोदींचा असून नसून काहीही फायदा नाही. पण बाळासाहेबांचा फोटो मते मागायला वापरायचा नी नंतर गायब करायचा हा मतलबी पणा आहे. आणी शाहू महाराजांच्या प्रश्नाला बगल का देताय?

श्रीगुरुजी

मोदींचा, वाजपेयींचा फोटो वापरायचा आणि भाजपच्या मतांवर निवडून यायचे आणि नंतर त्यांनाच घाणेरड्या शिव्या हासडायच्या या नीच वृत्तीला सणसणीत थोबाडीत मिळाली आहे.