काथ्याकूट
टोल सेवा वापरली नसतानाही फास्टॅग भुर्दंड
Primary tabs
काल (७ जानेवारी २०२५) रात्री ११ वाजता माझ्या एचडीएफसी फास्टॅग खात्यातून ₹७२/- टोल शुल्क वजा झाल्याचा एसएमएस् आला. मात्र, त्यावेळी माझी कार घरी उभी होती आणि ती वापरात नव्हती.
मी आज सकाळी तो एसएमएस् पाहिला आणि लगेच फास्टॅग खात्यावर तक्रार नोंदवली.
मला माझी वजा झालेली शुल्क रक्कम परत हवी आहे. कदाचित नोंदविलेल्या तक्रारीवर कारवाई झाल्यावर ती रक्कम परत मिळेल.
तथापि, याची पुरेश्या गांभीर्याने चौकशी होईल याची मला खात्री करून घ्यायची आहे. शक्य झाल्यास मला टोल गेट मधून गेलेल्या वाहनाचा फोटो किंवा पुरावा हवा आहे. मी उद्या पोलीसात जाऊन या घटनेची लेखी तक्रार नोंदविण्याचा विचार करत आहे.
- याशिवाय इतर काही करण्याची आवश्यकता आहे का?
- असा फोटो किंवा पुरावा मिळतो का?
- पोलिसात तक्रार नोंदविण्याची गरज आहे का?
- इतर कुणाला असा अनुभव आला आहे का?
माहिती / सल्ला याबद्धल मिपाखरांचे आधीच धन्यवाद.
- (तेलंगणातील वाहनमालक) द्येस्मुक् राव
पोलीसात तक्रार नोंदवण्याची गरज आहे.
कारण कोणीतरी तुमच्या नंबरप्लेटचा वापर करतो आहे.
मी चारचाकी गाडी विकताना टोल फास्टॅग स्टीकर काढून घेतले होते. मात्र ते अकाउंट इनॅक्टीव केले नव्हते.
ज्याने गाडी घेतली तो कर्नाटकला घेऊन गेला. मात्र जाताना प्रत्येक ठिकाणचा टोल त्या फास्टॅग अकाउन्ट मधून जात होता.
मी कार डीलर कडे तक्रार केली. त्याने स्वतः च्या खिशातुन ते पैसे मला दिले.
माझा दुसरा अनुभव आरटीओचा
त्याच चारचाकी गाडीचा गाडी विकल्यानंतर वर्षभराने मला गाडी विदाउट हेल्मेट चालवल्याचा गुन्हा यासाठी साठी दंड केल्याचा मेसेज आला.
गम्मत म्हणजे त्यानी फोटो दिला होता तो एका स्कूटरचा होता.
मी ग्रीव्हन्स पोर्टलवर तक्रार नोंदवली.
तीन दिवसात मला माझ्यावरचा गुन्हा मागे घेतल्याचा मेसेज आला आणि मुंबईपोलिसांच्या पोर्टलवरही ते अपडेट झालेले होते.
एक शंका आहे. माझ्या जुन्या गाडीचा नम्बर पोलीसांच्या लेखी अजूनही माझ्याच नावावर आहे.
ते कसे बदलून घ्यायचे. गाडी ज्याने विकत घेतली त्याची माहिती माझ्याकडे नाही.मात्र माझ्याकडे असलेला एकमेव पुरवा म्हणजे ट्रान्सफर ची पावती डिलरने दिलेली आहे.
( गाडी चोरीला गेल्याची तक्रार देऊ का असा एक द्वाड विचार येऊन गेला.)
पण या सगळ्यासाठी कुठे विचारणा करायची ते माहीत नाहिय्ये
अश्या भानगडी ऐकण्यात आल्याने मी चारचाकी विकताना सर्व कागदपत्राबरोबर फास्टॅग रद्द करण्याच्या , आणि फास्टॅग मध्ये शिल्लक असलेले पैसे माझ्या खात्यात वळते करण्याचा ऑनलाईन अर्ज केला. ८-१० दिवसात ही प्रकिया पुर्ण होऊन माझ्या खात्यात शिल्लक पैसे जमा झाले.
गाडी विकल्यावर या मालकाचा या वाहनांनी आजपासून काहीही संबंध नाही अशा स्वरूपाची पावती आरटिओ खात्याकडून मिळायला हवी. इतर बाबतीत तत्पर असणारे खाते इकडे अपडेट्स कधी आणणार? संगणकीकरण झाले आहे ना?
https://www.youtube.com/post/Ugkxjl2VEa3nOvWVEjpZ40WBM-iPjCX0wfdP
https://www.youtube.com/post/Ugkx2EpVSGd59116umr_wEjWF2BKmFq2ozzy
का
https://www.lokmat.com/pune/car-is-outside-the-house-and-toll-is-being-…
माझ्या ओळखीचे एक गृहस्थ, housekeeping, security, support वगैरे मनुष्यबळ पुरविण्याच्या व्यवसायात आहेत. त्यांची काल भेट झाली. ते अनेक ठिकाणी टोल नाक्यांवरही मनुष्यबळ पुरवितात.
माझ्या या फास्टॅग भुर्दंडाबद्धल त्यांच्याशी बोललो. ते हसून म्हणाले, "हा प्रकार अगदी सामान्य आहे. टोल नाक्यांवर जितके आर्थिक गैरप्रकार होतात तितके कदाचित इतर कुठेही होत नसतील! तुमचे गेलेले पैसे एचडीएफसी फास्टॅगकडून कदाचित परत मिळतील. पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला हरकत नाही पण त्याचा काही उपयोग होणार नाही. फक्त आपला वेळ वाया जाईल."
दरम्यान मी थोडी ऑनलाइन शोधाशोध केली. असे प्रकार बऱ्याच प्रमाणात होतात असे दिसते.
टीम बीएचपी चा हा धागा -
FASTag: Money deducted when the car was parked at home!
वर्षभरापूर्वीची ही एक बातमी -
Money deducted from FASTag accounts even when vehicles not on roads
अजून एक बातमी -
Toll deducted but car was at home
रेडिट वरचा हा धागा -
Fastag deduction happened while car is at home and I travelled in bike
बरंच उत्खनन केलेलं दिसतंय आपण...
यांची एखादी युनियन नाही का ? असल्या आचरटपणाशी एकत्र येऊनच लढा द्यावा लागेल...
(असल्या फालतू कारणासाठी झगडावं लागतं ही खरंच लाजिरवाणी बाब आहे)
नाय तर तुमीच स्थापन करा " आखिल मराठी फॅस्टॅग पिडित संघटना" अन करा सुरू !
पहिल्याछुट, देशातील एका हिंदू बांधवाला हिंदूचं सरकार असूनही अशा प्रकारे न वापरलेल्या रस्त्याचं टोलला सामोरं जावं लागलं, वाईट वाटलं. दु:ख झालं. महाराष्ट्र आणि केंद्रसरकारबद्दल सरकारच्या धोरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतो. साल्यांनो अरे माणसाचा धर्म तरी बघत जा. बाय द वे, हे लोक धर्म बघून चलन कापत नाही, हेही या निमित्ताने सिद्ध झालं. अर्थात, आपल्या गोबरयुगात पैशांच्या कापाकापी आणि लुटमारीचं अजिबात आश्चर्य वाटत नाही. (हलकेच घ्या )
आता मुद्द्यावर येऊ. बाकी, न गेलेल्या रस्त्यावरुन टोल घेतला, कापला असा अनुभव आला नाही. काल विद्यापीठात मंत्री येणार होते, अभिजात मराठीच्या कौतुकाचा कार्यक्रम होता. विद्यापीठाच्या कार्यक्रमात डोकावून जाऊ आणि लवकर निघता येईल अशा बेताने रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली. मंत्र्याच्या स्वागतासाठीच्या प्रवेशद्वारावर मित्रमंडळीसोबत उभा राहिलो. मंत्री आले नाहीत कंटाळा आला. पण, मंत्री येणार म्हणून जो फौजफाटा येतो त्या फौजफाट्यात सर्वात पुढे ते ट्राफीकवालेही असतात त्या ट्राफीकवाल्याने आपल्या गाडीचा फोटो काढून पंधराशे रुपयाची पावती फोटोसहित पाठवली. पंधराशेचा मेसेज आल्याने मुड ऑफ झाला. शांतपणे विचार केल्यावर लक्षात आलं. थोडा त्रास झाला असता पण गाडी गर्दीत कुठेतरी कोंबली असती तरी चालले असते असे वाटले. कार्यक्रम सोडून तसाच निघालो. धन्यवाद.
आता आपल्या दुस-या मुद्द्याकडे येतो. प्रश्न बहात्तर रुपयांचा नाही, पण ज्या पद्धतीने हे झालं त्या अशा लहान-सहान गोष्टींचा राग येतो. ताण होतो. व्यवस्थेविरुद्ध पेटून उठावे वाटते, हे केलंच पाहिजे. जीवंतपणाचे लक्षण आहे. असं म्हणतात की, ''आदमी मरने के बाद कुछ नही सोचता, आदमी मरने के बाद कुछ नही बोलता, कुछ नही सोचने और कुछ नही बोलने पर आदमी मर जाता है'' आपण जीवंत आहोत तेव्हा बोलले पाहिजे आणि व्यवस्थेविरुद्ध भिडले पाहिजे.
मला असा ताण या पार्किंगवाल्यांचा येतो. आठेक दिवसापूर्वी रेल्वे स्टेशनला गाडी उभी केली. आजुबाजूला गाड्या उभ्या होत्या म्हणून लावून दिली. परत आलो तेव्हा एक मुलगा पावतीचं इलेक्ट्रीक मशीन घेऊन माझ्या स्वागतासाठी उभा होता. मला पाहून मशीन वर केलं म्हणाला पच्चीस रुपये. म्हटलं पार्किंग किधर है, त्याने पाचशे मिटरवर लावलेला बोर्ड दाखवला. म्हटलं, भाई पार्किंगकी जगह उधर है, तू पार्किंग के पैसे इधरसे ले रहा है, ये कुछ ठीक नही है. ( त्याचा आव नम्र होता, म्हणून माझा टोन मोठा केला. तो जर मोठ्या आवाजात बोलला असता तर, मी फार घासघीस केली नसती. हल्ली असे वाद परवडत नाही) दहा रुपये देव, म्हटला आणि विषय संपला.
आता आपल्या तिस-या मुद्द्याकडे येऊ. पोलिसात तक्रार द्यावी काय ? मला असे वाटते की, जर आपण टोल नाक्यावरुन गेलो नाही हे नक्की असेल आणि त्याचा दंड भरावा लागलाय असे वाटत असेल तर, पोलिसांकडे न जाता पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार नोंदवावी, तेच अशा तक्रारींचा त्यांच्या पद्धतीने फॉलोअप घेतील असे वाटते. अर्थात, यात वेळ फार जातो आणि काय लागेल ते माहिती नाही प्रयत्न करावे लागतील, यश अपयश हा नंतरचा भाग.
माझा सायबर तक्रारीचा एक अनुभव सांगून थांबतो. फेसबूकवर माझा फोटो चिकट्वून कोणी तरी, नवे डू अकाउंट करुन कोणत्या तरी हॉस्पीटलमधील कोणत्या तरी मुलाचा आयसीयूमधील गंभीर मुलाचा फोटो डकवून माझ्या मित्रमंडळींना मेसेंजेसवर वीस हजार रुपयांची मागणी केली होती. ताण आलाच, मग मी प्रत्यक्ष सायबर विभागाकडे तक्रार केली. दोन चार वेळी प्रत्यक्ष कार्यालयात भेटी दिल्या. अशी हजारो प्रकरणे त्यांच्याकडे असतात. पण, जो पर्यंत कोणी पैसे दिलेले नसतात, कोणी फसत नाहीत. तो पर्यंत ते काही गांभीर्याने प्रकरण हातात घेत नाहीत, असे वाटले. रिपोर्ट करा वगैरे सांगून आता ते प्रकरण जवळजवळ मी विसरत चाललो आहे.
पण, तुम्ही पाठपुराव करीत राहा. शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
सर,
जेवणात पाच पक्वान्न असावीत पण वाढप्याने आपणाला वाढायचा अगोदर शिंकून, खोकून हात साफ न करता त्याच हाताने वाढायला सुरुवात केल्यावर अन्नावरची वासना निघून जाते तसं हल्ली आपले प्रतिसाद वाचताना होते.
तुमच्या प्रतिसादातील पहिला परिच्छेद अगदीच अस्थानी आहे. पुढील प्रतिसाद वाचनिय असला तरी ते वाचण्याची इच्छा निघून गेली.
असो. आपल्या दु:खात सहभागी आहे.
वाचकांना आवडतं असं वाढायला जमेल की नाही माहिती नाही.
पण, हळुहळु निश्चित प्रयत्न करीन.
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
-दिलीप बिरुटे
( अस्वच्छ जालीय वाढपी )
(त्यांच्या जेवणात पाच पक्वान्ने असतात हे वगळता) पूर्ण प्रतिसादाशी आणि आशयाशी पूर्णत: सहमत. प्रोफेश्वरांबद्धल सहानुभुती वाटते.
डुप्लीकेट आयडीने लिहायचं ना हे सगळं...=))
-दिलीप बिरुटे
तुमच्याकडून असा प्रतिसाद अपेक्षित नव्हता, भक्तांनी केलेल्या वैयक्तिक आरोपांवर तुम्ही टीका केल्याचे दिसले नाही कधी, मुक्तविहारी यांच्या पोंवर तर तुम्ही गप्पच बसता. अर्थात कुठं काय लिहायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. मात्र त्यातुन दिसते ती फक्त दांभिकता.
नाहीतरी तुम्हाला (आणि आता मिपावर नसलेल्या, शेणपट्ट्यात वळवळणाऱ्या एकाला) मिपाखरे काही गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे हलकेच घ्या असं तुम्ही लिहिलं काय नाही लिहिलं काय, फरक पडत नाही!
असंच लिहीत रहा, काहीवेळा वाचायला मजा येते.
धन्यवाद.=))
-दिलीप बिरुटे
किमान शब्दांत कमाल अपमान!
बिरुटे सर
प्रत्येक धाग्यावर आपला वैयक्तिक आकस आणण्याची आवश्यकता नाही.
त्यामुळे आपल्याला काय सांगायचं आहे ते अगदी उत्तम असलं तरी लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.
त्यातून जर आपले १५०० रुपये गेल्याचा राग असा दुसरीकडेच निघाबणार असेल तर कठीण आहे. हे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर काढल्यासारखे आहे
आपली राजकीय मते राजकीय धाग्यावर अगदी आवेशाने व्यक्त करा. परंतु वैयक्तिक आकस किंवा राग असा प्रत्येक धाग्यावर येणार असेल तर लोक तुम्हाला सुद्धा भुजबळांच्या* पंक्तीला बसवण्यास वेळ लागणार नाही.
* अमरेंद्र बाहुबली * उर्फ भुजबळ हे कोणत्याही धाग्याचा असाच विचका करत असतात
त्यांना पंख फुटले...
अमरेंद्र बाहुबली * उर्फ भुजबळ हे कोणत्याही धाग्याचा असाच विचका करत असतात >>>>>>>> मुक्तविहरी नावाचे आयडी पण तेच करतात किंबहुना त्यापेक्षा जास्त, पण त्यांच्यावर कोणी टीका करत नाही . कारण ते ठरावीक विचारसरणी चे आहेत
हे बाकी खरे, मुक्तविहारी हे कचकचून लेंड्या टाकत असतात.
मिपावर आलं की रस्त्याच्या दुतर्फा मुक्तविहारीच्या प्रतिसादाच्या लेंड्या दिसतात याच्याशी मात्र सहमत. =))
-दिलीप बिरुटे
चुक. त्यांच्या आत बसलेला डोंबोलीकर बाबा त्यांना काही वेगळे करु देत नाही आणी एका ठराविक वयाच्या पुढे गेला की माणसाला रुळ बदलणे अवघड असते.
पण बिरुटे सरांची बात वेगळी आहे. त्यांचे जुने लेख काढून वाचले की ते जाणवते. इतरवेळी ते चांगले लिहितात पण मोदीभूत त्यांचे बोकांडी बसल्यापासून ते चळले आहेत.
त्यांच्याबद्द्ल आदर आहेच आणि त्यांच्याकडून अजूनही अपेक्षा आहेत म्हणून त्यांना समजावण्याचा प्रयत्न होतो.
>>>>अजूनही अपेक्षा आहेत म्हणून त्यांना समजावण्याचा प्रयत्न होतो.
आपली भाषा पाहता आपणास कशामुळे वेदना झाल्या ते लक्षात आलं. तेव्हा, आपण जालावर कोणालाही समजावणे वगैरेची आवश्यकता नाही. हमे हमारे हाल पर छोड़ दो.
-दिलीप बिरुटे
धन्यवाद सर ! मला वेदना वगैरे काही झाल्या नाहित पण तुमच्या विनंतीचा मान राखून आपके हाल पर छोड रहे है |
:)
ते नोटबंदीनंतर असे बावचळले आहेत.
तुम्हीसुद्धा कित्ती वेळा वैयक्तिक झाल्याचे दिसून येते पण तुम्ही मिपाचे बाब्या आहात ना.
कापले गेलेले पैसे आज सकाळी परत आले.
सविस्तर नंतर लिहितो.
किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदीआनंद झाला
रास खेळू चला, रंग उधळू चला
आला आला ग कान्हा आला
बहात्तर रूपये मिळाल्यचा खुप आनंद झाला. काय मॅटर लिहिलं ? कोणास लिहिले ? नाव, धर्म, तपशील द्यावे लागले की कसे ?
काय, काय माहिती द्यावी लागली. सविस्तर लिहा.
-दिलीप बिरुटे
( उत्सुक )
हिमालया पाईलेक्ष गोळ्या सुरू करा, मूळव्याधाला आराम पडेल.
तुझा स्वानुभव दिसतोय बेडका.
तुमच्या सारख्या मुळव्याध ग्रस्त रुग्णांना औषध देण्याचा.
दुसऱ्या दिवशी एका मित्राला घेऊन तक्रार नोंदवायला पोलीस ठाण्यात गेलो. तेथील सीआइ ओळखीच्यात आहेत. त्यांनी प्रकरण ऐकून घेतले आणि म्हणाले, "कारची काळजी करू नका. क्लोन / डुप्लिकेट नंबर प्लेट असा काही प्रकार नाही. फक्त पैशांचा प्रश्न आहे. ते तुम्हाला परत मिळतील. लेखी तक्रार नोंदविण्याची गरज नाही."
फास्टॅग खात्यावर तक्रार केल्यानंतर पाच दिवसांत माझी रक्कम मला परत मिळाली.
पोलीस, संबंधित उद्योगात असलेले माझ्या ओळखीचे लोक, ऑनलाइन शोध यातून मिळालेल्या माहितीचा सारांश -
१. टोल नाक्यावर एखाद्या वेळी फास्टॅग आपोआप स्कॅन होत नसेल तर तेथील ऑपरेटर हातात मशीन घेऊन स्कॅन करतात. तरीही स्कॅन होत नसेल तर कारचा नंबर manually नोंदवून मग टोल कापतात. अश्या वेळी ऑपरेटरने चुकून (किंवा मुद्दामहून) दुसऱ्या एखाद्या कारचा नंबर नोंदवला तर माझ्या कारसोबत घडलेला प्रकार होतो.
२. टोल नाक्यांवर वाहनांच्या प्रकारानुसार निरनिराळे शुल्क असते. उदा. सर्वात लहान वाहन - कार / जीप यांना ₹११५, बस / ट्रक यांना ₹३६५ तर चार किंवा अधिक Axle असलेली मोठी वाहने यांना ₹५५० ते ₹७२० असे शुल्क असते.
एकाच मार्गावरून नेहमी प्रवास करणारी मोठी वाहने, कार किंवा बसचा फास्टॅग वापरून कमी शुल्क भरतात. आणि मग उरलेल्या फरकाची रक्कम त्या टोल नाक्याची कंपनी आणि त्या वाहनांची ट्रान्सपोर्ट कंपनी असे वाटून घेतात.
३. अनेक व्यावसायिक वाहनचालक आपल्या वाहनाचा फास्टग काचेवर चिकटवत नाहीत. जिथे गरज आहे तिथे हातात धरून स्कॅन करवितात. जिथे हितसंबंधातील टोल नाके आहेत तिथे क्र १ किंवा २ प्रमाणे शुल्क वाचवितात.
४. टोल नाक्याच्या नियमावलीप्रमाणे अनेक शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, इतर विशेष व्यक्ती यांच्या वाहनांना टोल शुल्क माफ असते. अश्या लोकांचे मित्र-नातेवाईक वगैरे लोक आपल्या वाहनाचा फास्टग काचेवर चिकटवत नाहीत. त्याऐवजी त्या शासकीय लोकांचे ओळखपत्र दाखवून टोल शुल्क वाचवितात.
---
अवांतर :
माझे एक परिचित, तेलंगणातील काही टोल नाक्यांवर मनुष्यबळ सेवा पुरवितात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार -
नियमाप्रमाणे प्रत्येक टोल नाक्यावर -
१. ऍम्ब्युलन्स ड्राइवर आणि वैद्यकीय मदतनीस (प्राथमोपचार) यांसोबत तयार ठेवणे अनिवार्य आहे.
२. जीपसदृश्य पिक-अप वाहन (दोन विरुद्ध दिशेला जाण्यासाठी) ड्राइवर आणि मदतनीस,यांसोबत सदर टोल नाक्यापासून ते दुसऱ्या टोल नाक्याच्या अर्ध्या अंतरापर्यंत (== टोल नाक्याच्या हद्दीपर्यंत) चोवीस तास सतत गस्त घालत राहणे अनिवार्य आहे. कुठे काही incident झालेला असेल तर त्याची तात्काळ नोंद घेऊन पुढील कारवाई करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.
३. प्राथमोपचार सुविधा, शौचालय या बाबी निशुल्क पुरविणे अनिवार्य आहे.
असे इतरही असंख्य नियम घालून दिलेले आहेत. पण प्रत्यक्षात कोण किती नियमांचे पालन करते?
- (व्यवस्थेशी न लढता जुळवून घेणारा) द्येस्मुक् राव
माझ्याबाबती झालेला प्रकार.
एका टोलनाक्यावर एका साधारण टेम्पोमागे माझी कार होती व टेम्पो काही कारणाने जास्त वेळ घेत होता.मी शक्यतो टोलबुथच्या अलिकडे एक मार्किंग असते कि जिथे पुढचे वाहन जोपर्यंत जात नाही तोपर्यंत शक्य्तो तुम्ही तुमचे वाहन त्या मार्किंग पुढे नेऊ नये नाहीतर पुढच्या वाहनाचा टोलपण तुमच्या अकाऊंट मधुन जाऊ शकतो. (तशी सूचनाही लिहिलेली असते.)त्यावेळीही तशी काळजी घेत होतो पण टेम्पो वाल्याने मग खाली उतरुन मला पुढे यायला सांगितले. टोलबुथचा कर्मचारी ही बाहेर येऊन आत या असे हाताने सांगत होता.मी त्यानुसार गेलो पुढचे वाहन क्लिअर झाले. माझी कार आता बुथपाशी आली आणि समोर माझाच नंबर दिसत असल्याने मी कारचा वेग वाढवला पण अचानक तिथल्या बॅरिकेडचा दांडा खाली आला आणि जवळजवळ कारच्या पुढच्या काचेला धडकणारच होता पण मी दणकन कार थांबवली आणि थोडक्यात वाचलो. अजुन्ही इंडिकेटरवर माझ्या कारचा नंबर होता तो जाऊन पुन्हा रिसेट झाला.तिथल्या त्या कर्मचार्याने कार पुन्हा मागे न्यायला लावुन पुन्हा नंबर दिसल्यावर पुढे जाऊ दिली.
प्रवासात असल्याने एस.एम.एस पाहिले नाहीत पण नंतर कळुन चुकले पुढच्या टेम्पोवाल्याने माझ्या फास्टटॅग चा वापर करुन टेम्पो काढला. मी दोन वाहनांचे पैसे भरले.
त्यानंतर काही झाले तरी पुढचे वाहन निघुपर्यंत मी मार्किंग च्या पुढे कार नेत नाही.
Actually, मी नेहमीच असे करतो. पुढे वाहन असेल तर, टोलबूथची डावी-उजवीकडची खुजी भिंत सुरु होते तिथे थांबतो. त्याचे किमान दोन फायदे होतात -
१. तुमच्याबाबतीत झालेला प्रकार टाळता येतो.
१. जर पुढचे वाहन निघायला जास्त वेळ लागत असेल आणि बाजूची मार्गिका मोकळी असेल तर लगेच रिव्हर्स करुन तिकडे जात येते.
मी ही तसेच करतो पण बर्याच वेळेला टोलबुथवरले कर्मचारीच हाताने इशारा करकरुन बोलावतात.ह्या प्रसंगानंतर सावधगिरी बाळगतो.
@ वामन देशमुख : उत्तम माहिती संकलन
@कानडाऊ योगेशु: माहितीपूर्ण प्रतिसाद
धन्यवाद !
फ़ास्ट टॅग येण्याआधी मी कधीही टोल भरत नसे. माझ्या बाजूला बसलेला माणूस जवळच्याच चौकीतील “पाटील” साहेब असे नी त्यांचे नाव घेतले की गाडी सुटे. फास्टॅग ने सगळी वाट लावून ठेवलीय. भरपूर ओळख सांगितली तरी टोल वाले नंबर टाकून गाडी सोडतात नी तासभराने टोल गेल्याचा मॅसेज येतो.
Dear Sir,
Greetings from **** Bank!
We are currently unable to determine the reason for the charge on your FASTag account ending with ****. However, we will raise a dispute with the respective toll plaza to obtain clarity and this process may take up to 45 working days.
As a gesture of goodwill, we have initiated a request to credit the amount of Rs.55 and the same will reflect in your FASTag account within 2 working days. Additionally, we have raised your dispute, and our team is actively investigating the reason for the debit.
Please find the enclosed statement to check the refund posted in your FASTag account.
Additionally, we have raised a dispute with the toll plaza regarding this transaction to prevent any future occurrence.
क्वचित असेही होते (म्हणजे एक शक्यता असते) की एखादा एसएमएस उशिरा, अनेक दिवसांनी येतो. मागे कधीतरी कापल्या गेलेल्या टोलचा मेसेज नंतर आला की गोंधळ होऊ शकतो. अर्थात लोकेशन दिलेले असते त्यावर. आणि वेळ पण.
हे बरोबर आहे. असं अनेकदा होतं. ग्राहकाला (किंवा इतर संबंधितांना) एखाद्या व्यवहार पुर्ततेचा (टोल, बँक, खरेदी इ) एसेमेस येणे हा त्या व्यवहाराचा अंतर्भूत भाग (inherent part of the transaction) नसतो. त्यामुळे एसेमेस उशिरा येणे किंवा अगदीच न येणे ही असामान्य बाब नाही.
तथापि, माझ्या केसमधे, गाडी आठ-पंधरा दिवसांपासून हैद्राबादेच्या बाहेर गेलीच नव्हती; कुठेही टोल नका ओलांडला नव्हता.
त्याशिवाय ज्या नाक्यावर टोल कापण्यात आला त्या नाक्यापर्यंत माझ्या घरापासून कारने जाण्यासाठी दुसरे किमान तीन टोल नाके ओलांडावे लागतात. त्याशिवाय तिथे चारचाकीने जाणे शक्य नाही. आणि मला तर त्या एकाच टोल नाक्याचा एसेमेस आला होता. स्टेटमेंटमध्येही तेच दिसत होते.
गेल्या महिन्यभरात २ वेळा माझा टोल एकाचवेळी २ वेळा कापल्या गेल्याचा मॅसेज मला आला. मी ते माझ्या टोल बँक खात्यात काऊन चेक केले जे खरे होते, नगर बायपास टोल नका नी चाळकेवाडी टोल नाका इथे हे प्रकार झाले. मागेही झाले होते मी nhai ला तक्रार केली होती पण त्यांनी तक्रार नोंदवून घ्यायचं नाटक करून नंतर काहीही रिप्लाय दिला नाही. मग मी सरळ ज्या बँकेचा फास्टॅग आहे त्यांना तक्रार केली. त्यांनी पैसे परत केलेत.