जनातलं, मनातलं

चूक-२

Primary tabs

मी त्याला नेहमी पाहायचे, पण लक्ष द्यायचं नाही ठरवलं होतं. माझं आयुष्य वेगळं होतं, माझे स्वप्न वेगळे होते. साधीशी मी, काळीसावळी, पण स्वाभिमान माझ्या मनात होता. घरची परिस्थिती हलाखीची होती, बाप दारू पिऊन मरून पडलेला, आई आणि लहान बहिणीची जबाबदारी माझ्यावर होती. कॉलेजला सायकलने जाणं, वर्गात शिकणं, आणि घरी आल्यावर आईला मदत करणं – हेच माझं रोजचं जगणं.
पण त्या वर्गात तो होता. त्याचं आणि माझं काहीच कधी जुळलं नव्हतं. वर्गातल्या इतर मुलांसारखा तोही माझ्याकडे पाहायचा, काही बोलायचा. सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण मग त्याच्या बोलण्याची मर्यादा ओलांडली जाऊ लागली.
एक दिवस घरात आईसमोर रडत रडत सांगितलं की, “माझ्या मागे लागतोय तो.” माझ्या मनात विश्वास होता की बाबा माझं रक्षण करतील, त्याला थांबवतील. पण बाबांनी मला कॉलेज सोडायला लावलं. मला वाटलं होतं की मी शिक्षण पूर्ण करीन, नोकरीला लागीन, घराची जबाबदारी उचलू शकेन. पण एका अनोळखी मुलाशी लग्न लावून दिलं गेलं.
आता माझं आयुष्य एका झोपडीत बंदिस्त झालंय. नवरा गॅरेजमध्ये काम करतो, पण घरी येऊन दारूच्या नशेत मला मारतो. त्याच्या हातात लोखंडी पाइप असतो; मला वाटतं तो कधीतरी माझा जीव घेईल. मुलीसाठी सगळं सहन करत आहे, पण माझं मन आतून तुटलं आहे. माझ्या स्वप्नांसोबत माझ्या आत्म्याही मेलाय.
रोज तो रस्त्यावरून जातो. त्याची अंगावर सोनेरी दागिने मिरवणारी त्याची बायको माझ्या डोळ्यांसमोर असते. आमचं आयुष्य किती वेगळं आहे, पण माझ्या मनात एकच प्रश्न आहे – माझी काय चूक होती?
मी त्याच्याकडे पाहते, आणि त्याला प्रश्न विचारते, माझं आयुष्य असं का झालं? मी काय चुकीचं केलं होतं? माझ्या या प्रश्नांना कधीच उत्तर मिळणार नाही, आणि मी आयुष्यभर हेच प्रश्न विचारत राहणार.

सर्वप्रथम , कथा काल्पनिक आहे असे गृहीत धरत आहे कारण ही जर सत्य कथा असेल तर सदरहु लेखकाने मुलीची छेड काढल्याची सरळ सरळ कबुली दिली आहे असे सिध्द होईल जे की कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे. मिपा प्रशासनाने ह्याची दखल घ्यावी.

आता कथा का आवडाली नाही ह्यावर काही टिपण्ण्या :

१. छेड काढणे म्हणाजे नक्की काय ?

माझ्याकडे पाहायचा, काही बोलायचा

नुसते मुलीकडे पाहणे , बोलणे ह्याला छेड काढणे म्हणतात का ? आणि समजा त्या मुलीला ते आवडत नसेल तर तिने सदरहु कथेतील लेखकाला तसे स्पष्ट सांगितले होते का ?

त्याच्या बोलण्याची मर्यादा ओलांडली जाऊ लागली

बोलण्याची मर्यादा ओलांडली म्हणजे काय ? कथेतील नायक अश्लील असे काही बोलायला लागलेला का ? कथीतील नायक दिल्ली हरियाणा येथील आहे काय ?

२. मागे लागणे म्हणजे नक्की काय ?

माझ्या मागे लागतोय तो.

कथेतील लेखक स्त्रीपात्राच्या मागे लागलाय म्हणजे नक्की काय केले त्याने ? कारण विशिष्ठ मर्यादेत राहुन स्त्री सोबत प्रणयाराधन करणे हे छेड काढणे कसे असु शकते ? विशेषतः, कथेतील स्त्रीने त्या लेखकाला स्पष्टपणे "मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही, मला तुझ्याविषयी काहीही शृंगारिक भावना नाहीत" असे स्प्पष्ट सांगितल्याचे कथेतुन कोठेही निदर्शनास येत नाही.
कॉलेजमध्ये , वयात आलेल्या मुलांनी वयात आलेल्या मुलींसोबत विशिष्ठ सभ्य मर्यादेत राहुन प्रणयाराधन करणे , साध्या मराठीत - पोरगी पटवायचा प्रयत्न करणे ह्याला छेड काढणे म्हणता येणार नाही .

३. अनाकलनीय निर्बुध्दता
सदरहु कथेतील स्त्री पात्राची दोन वाक्ये पहा :

बाप दारू पिऊन मरून पडलेला,

माझ्या मनात विश्वास होता की बाबा माझं रक्षण करतील

ही दोन्ही वाक्ये इतकी विरोधाभासी आहेत की ह्याला अनाकलनीय निर्बुध्दता ह्या व्यतिरिक्त दुसरा काहीही शब्द सुचत नाही. दारुडा माणुस स्वत्:चे रक्षण करु शकत नाही तो इतरांचे काय काय करणार ?

४. भूतकाळातील अव्वाच्यासव्वा काल्पनिक उड्डाणे

मी शिक्षण पूर्ण करीन, नोकरीला लागीन, घराची जबाबदारी उचलू शकेन

ह्या एका वाक्यावरुन तुमच्या पिढीचा तुमच्या वयाचा अंदाज येत आहे. तुम्ही साधारण ४०-५० वर्षाचे असावेत आणि तुम्ही कॉलेज हे १९९०-२००० च्या दशकात पाहिले असवे. कारण आजच्या काळात असा विचार करणारी मुलगी सापडणे हे जवळपास अशक्य आहे. किमान माझ्या पाहण्यात तरी अशी एकही मुलगी नाही. घराची जबाबदारी उचलेन हा विचार मुलांच्या मनात येतो , मुलींच्या नाही. नाहीच नाही. नोकरी लागुन स्वतःच्या पायावर उभेराहिलेली मुलगी - "आयेम अ स्ट्राँग इन्डिपेंडंट वुमन , आय डोन्ट नीड मेन , फाट्यावर मारते मी ह्या दारुड्या बापाला." असेच म्हणेल.

५. आत्मा मृत्यु वगैरे वगैरे

माझ्या आत्म्याही मेलाय.

ह्या वाक्यावरुन सदरहु कथेतील स्त्रीपात्राच्या बाळबोध आकलनाचे दर्शन होते. आत्मा कधीही मरत नसतो. असो. ह्याविषयावर अन्यत्र लिहुन झालेले आहे बर्‍याचदा त्यामुळे इथे पुनरावृत्ती नको.

६. सुख

त्याची अंगावर सोनेरी दागिने मिरवणारी त्याची बायको

सदरहु लेखिकेला काय वाटतं ? त्याची अंगावर सोनेरी दागिने मिरवणारी त्याची बायको ही काय तिच्या संसारात सुखी असणार आहे काय ? तीही कुढत असणारच आहे तिच्या मनात , काही ना काही खुसपट काढुन , काय मेली माझं नशीब , कोणाच्या गळ्यात बांधलं आहे बापाने? त्या राहुल सोबत लग्न केलें असतं तर आज अमेरिकेत रहात असते, इथे नुसतं घुसमटत आहे जीव. वगैरे वगैरे. संपुर्णपणे आत्मतृप्त अशा व्यक्ती विरळ्या असतात ! प्रत्येक स्त्री काही ना काही विषय काढुन मेलोड्रामा करतच असते. खुद्द रामासारखा पती असताना सोनेरी हरीण पाहिजे असा हट्ट धरुन सीतेने मेलोड्रामा केला , अन युध्दिष्ठिरासारखा न्यायनीतीमंत लोकोत्तर पती असलेल्या द्रौपदीने विनाकारण 'आंधळ्याची पोरं आंधळी' असे बोलुन मेलोड्रामा केलाच ना ! गौतमासारखा पती असुन अहिल्या इंद्रासोबत रत झालीच ना , तेही तो इंद्र आहे हे कळत असुन ! गोपिकाबाई म्हणजे खरेतर सुखाच्या परमोच्च शिखरावरची बाई- बाजीरावा सासरा, नानासाहेबांसारखा पती, विश्वासरावांसारखा सुंदर पुत्र अन माधवरावांसारखा धाकटा पुत्रही कर्तृत्ववान, असे असुनही बाई आयुष्यभर काही ना काही उपद्व्याप करुन रडतच राहिलेली आहे.
असो , तात्पर्य काय तर -
बायकांना आयुष्यात मेलोड्रामा लागतो. हे निसर्गाचे इंटेलिजंट डिझाईन आहे. त्याला पर्याय नाही. आहे हे असं आहे.

७. शेवटी सर्वात महत्वाचे काय ?

माझी काय चूक होती?

सदरहु कथेतील पात्राने अनेक चुका केल्या आहेत :पण सर्वात महत्वाची चुक म्हणजे -
आपल्यामागे कोणीतरी मुलगा दिवाना झालेला आहे हे दिसत असताना त्याचा फायदा करुन घेणे ऐवजी त्याविषयी तक्रार करणे.
भले तिला तो मुलगा आवडालेला नव्हता पण तरीही ती त्याला म्हणु शकली असती की - हे बघ , माझा बाप दारुडा आहे, मला बहीणीची जबाबदारी आहे, आपण लग्न केले तर हे सगळं तुझ्या डोक्यावर पडेल , चालेल का ? हे ऐकुनच तो मुलगा दूर प़ळुन गेला असता. आणि समजा थांबला असता तर तो खरेच चांगला माणुस आहे हे तिलाही पटले असते कदाचित आणि पुढे ती त्याला म्हणु शकली असती की आपण एकत्र कॉलेज करु , स्वतःच्या पायावर उभे राहु अन मग ठरु , चालेल ? तो पर्यंत तू मला कॉलेजात साथ देशील का ?
हे असे स्पष्ट बोलली असती तर तिचे आयुष्य खुप वेगळे असते हे मी पैज लाऊन सांगु शकतो.

असो.

पुढील लेखनासाठी शुभेछा !

Bhakti

हा हा हा!
कथेपेक्षा टीका मोठी ;)
हो शेवटचा ७. खुप चांगल्या पद्धतीने तिची चूक काय ते सांगितले.

बाब्बो! छाती, पोट कंबर नी आणखी काय काय दडपणारा अणुबॉम्ब प्रतिसाद.
असो. उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.
कथा काल्पनिक आहे असे गृहीत धरत आहे कारण ही जर सत्य कथा असेल तर सदरहु लेखकाने मुलीची छेड काढल्याची सरळ सरळ कबुली दिली आहे असे सिध्द होईल जे की कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे.
सर्वप्रथम कथा काल्पनिक आहे. नायकाच्या जागी मी स्वतःला उभे केलेय नायिकेच्या जागी…. असो. खरी जरी असती तरी दखलपात्र गुन्हा कसा? मुलीला कुठून शोधून आणले असते? आणी शोधायला गेला असतात तर तिचा नवरा आणलेला लोखंडी पाईप घेऊन अंगावर धावला असता तर?… ह्यावरून एक किस्सा आठवला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात काही दाढीवाले सांगत होते की आम्ही बांग्लादेशी आहोत. काही लोक व्हिडिओ घेऊन पोलिसात गेले तर पोलिसांनी सांगितले की व्हिडिओ वरून कारवाई करता येणार नाही. लउद्या ते कोर्टात उलटून पडले तर? :) तत्समात कथेवरून स्वर्ग गाठू नका.

नुसते मुलीकडे पाहणे , बोलणे ह्याला छेड काढणे म्हणतात का ? आणि समजा त्या मुलीला ते आवडत नसेल तर तिने सदरहु कथेतील लेखकाला तसे स्पष्ट सांगितले होते का ? कदाचित तिने सांगितलेही असेल पण त्याने ऐकले नसेल म्हणून ती बापापर्यंत गेली. छेड नेमकी कोणत्या रीतीने काढली ह्याबाबतीत स्पष्टोक्ती नाही.

बोलण्याची मर्यादा ओलांडली म्हणजे काय ? कथेतील नायक अश्लील असे काही बोलायला लागलेला का ?
कथीतील नायक दिल्ली हरियाणा येथील आहे काय ?>>>

काहीतरी वाईट बोलला असेल. आपल्याला काय? सगळ्याच गोष्टी नायिकेने सांगायलाच हव्या का? आणी आपण कसे ठरवणार हे मर्यादेत आहे की नाही ते? जीला बोलला तीच ठरवेल ना? नायक मराठीच आहे.

पोरगी पटवायचा प्रयत्न करणे ह्याला छेड काढणे म्हणता येणार नाही . असे कसे? तिने सांगितले ना पहिले २ वेळा दुर्लक्ष केले. कदाचित तिने पहिल्या दोन वेळा त्याला समजावयचा प्रयत्न केला असेल पण तिसऱ्या वेळी त्याने मर्यादा ओलांडली (ती काहीही असेल. हात धरला असेल, काहीतरी अपशब्द बोलला असेल किंवा काहीही असेल?) त्यामुळे छेड काढली हे ठरवणार नायिकाच!

ही दोन्ही वाक्ये इतकी विरोधाभासी आहेत की ह्याला अनाकलनीय निर्बुध्दता ह्या व्यतिरिक्त दुसरा काहीही शब्द सुचत नाही. दारुडा माणुस स्वत्:चे रक्षण करु शकत नाही तो इतरांचे काय काय करणार ?
असे काही नाही, अनेक बेवडे बायको मुलाना सुखवस्तू ठेवतात काहीही कमी पडू देत नाहीत. पिऊन तर्र होऊन पडून असले तरी त्यांच्या पिण्यामुळे कुटुंबाची आबाळ होईल किंवा मुलांचे संरक्षण होणार नाही ह्याकडे दुर्लक्ष करत नाहीत. नायिकेचा बाप पिऊन तर्र असला तरी आपण त्याची मुलगी असल्याने ह्या बाबतीत तरी तो समजूतदार पणा दाखवेल असे नायिकेला वाटले होते. पण कसले काय? त्या बेवड्याने किटकिट नको म्हणून तिचे लग्न लावून दिले.त्यामुळे मुलीच्या दृष्टिकोनातून पहा. बाप बेवडा आहे पण बाप आहे. आपला बाप पण तो दाखवेल असे तिला वाटले ह्यात तिची काहीही चूक नाही.
ह्या एका वाक्यावरुन तुमच्या पिढीचा तुमच्या वयाचा अंदाज येत आहे. तुम्ही साधारण ४०-५० वर्षाचे असावेत आणि तुम्ही कॉलेज हे १९९०-२००० च्या दशकात पाहिले असवे. नाही मी ३१ वर्षांचा आहे. माझे कॉलेज हे २००९ ते २०१४ ह्या काळात होते. छोट्या शहरात (माझे धुळे) पगारपाणी, संधी कमीच असतात. त्यामुळे अनेक कुटुंब गरीब असतात. अश्या कुटुंबात बापाला (तो ही बेवड्या) नि हलाखीच्या परिस्थितीला फाट्यावर मारून जाणार कुठे?
आत्मा कधीही मरत नसतो तेच तर! तिचे स्वप्न हा तिचा शरीर चालवणारा आत्मा होता नी स्वप्नांसोबत तिचा आत्माही मेलाय. (कविकल्पना समजा)
बायकांना आयुष्यात मेलोड्रामा लागतो. हे निसर्गाचे इंटेलिजंट डिझाईन आहे. त्याला पर्याय नाही. आहे हे असं आहे. ह्याबाबतीत सहमत. कदाचित तिच्या बापाने दुसर काहीतरी खुसपट काढून तिचे लग्न लावले असते?

आपल्यामागे कोणीतरी मुलगा दिवाना झालेला आहे हे दिसत असताना त्याचा फायदा करुन घेणे ऐवजी त्याविषयी तक्रार करणे. चूक! तो छेड काढत होता. प्रेमाराधना करत नव्हता. नायिकेने नि नायकाने तेच सांगितले आहे. ( मला कथा लिहितानाची माझी चूक लक्षात आलीय, मागे लागल्याचा अर्थ वेगळा होतो. तो त्रास देतोय असे तिने आईला सांगायला हवे होते. मालक, चालक, संपादक, मेहेरबान, कदरदान, कथेत योग्य तो बदल करून द्यावा अशी विनंती करतो.)

भले तिला तो मुलगा आवडालेला नव्हता पण तरीही ती त्याला म्हणु शकली असती की - हे बघ , माझा बाप दारुडा आहे, मला बहीणीची जबाबदारी आहे, आपण लग्न केले तर हे सगळं तुझ्या डोक्यावर पडेल , चालेल का ? हे ऐकुनच तो मुलगा दूर प़ळुन गेला असता. बरोबर. तिने आपली परिस्थिती सांगितली असती तर नायकाने दया येऊन किंवा स्वतची लाज वाटून हे थांबवलं असते.
हे असे स्पष्ट बोलली असती तर तिचे आयुष्य खुप वेगळे असते हे मी पैज लाऊन सांगु शकतो. शतश सहमत. बापाला सांगणे हा मूर्खपणा होता हे नायकाने देखील कथेत कबूल केले आहे.

तुम्ही कथेची छान चिरफाड केलीय. उदाहरणेही छान दिलीत. नायिकेच्या चुकाही लक्षात आणून दिल्या. ह्यावरून एक कळले की आपल्या आयुष्याला लागलेल्या ग्रहणासाठी आपणच जबाबदार असतो, दुसऱ्याकडे बोट दाखवून काही फायदा नसतो. निर्णय आपल्याला घेता आलेला नसतो. खूप खूप आभार.

विवेकपटाईत

कथेपेक्षा प्रतिसाद जास्त आवडला. गोडबोले भाऊ वकील असते तर कपिल सिब्बल पेक्षा जास्त प्रसिद्ध झाले असते.

समाजात अनेक प्रकारच्या घटना घडतात. घटना घडल्यानंतर अनेक प्रतिक्रिया,प्रतिसाद येतात. कोण चुक कोण बरोबर या निष्कर्षाप्रत पोहचणे व आपलाच निष्कर्ष बरोबर असे म्हणणे किंवा कथेतील पात्रां कडे वाचकाने आपल्या दृष्टीकोनातून बघणे स्वाभावीकच.

कथानक,पात्र,घटना कशा मांडाव्या हा लेखकाचा ह्क्क तर सकारात्मक, नकारात्मक प्रतिसाद हा वाचकांचा ह्क्क.

टोकाची चिरफाड संयुक्तिक, कथेला न्याय देणारी नसते असे माझे मत. असो निंदकाचे घर असावे शेजारी.

गोडबोले भाऊ वकील असते तर कपिल सिब्बल पेक्षा जास्त प्रसिद्ध झाले असते.

नाही, नाही ते पॅथॉलॉजिस्ट जास्त चांगले झाले असते. कथेचे (शव) विच्छेदन अतिशय सुंदर केले आहे.

समाजात अनेक प्रकारच्या घटना घडतात. घटना घडल्यानंतर अनेक प्रतिक्रिया,प्रतिसाद येतात. कोण चुक कोण बरोबर या निष्कर्षाप्रत पोहचणे व आपलाच निष्कर्ष बरोबर असे म्हणणे किंवा कथेतील पात्रां कडे वाचकाने आपल्या दृष्टीकोनातून बघणे स्वाभावीकच.

कथानक,पात्र,घटना कशा मांडाव्या हा लेखकाचा ह्क्क तर सकारात्मक, नकारात्मक प्रतिसाद हा वाचकांचा ह्क्क.

टोकाची चिरफाड संयुक्तिक, कथेला न्याय देणारी नसते असे माझे मत. असो निंदकाचे घर असावे शेजारी.

गोडबोले भाऊ वकील असते तर कपिल सिब्बल पेक्षा जास्त प्रसिद्ध झाले असते.

नाही, नाही ते पॅथॉलॉजिस्ट जास्त चांगले झाले असते. कथेचे (शव) विच्छेदन अतिशय सुंदर केले आहे.

टर्मीनेटर

अरेरे...
(लेखक महराष्ट्रातील कट्टर मराठी भाषा प्रेमी असल्याने आणि कथानकाचे स्थळ-काळ नमुद केलेला नसल्याने स्थळ=महराष्ट्र आणि काळ=गेली ३-४ दशके असे गृहीत धरुन)
फुले-शाहुंच्या महराष्ट्रात सावित्रीच्या एका लेकीच्या शिक्षणाची अशा प्रकारे झालेली हेळसांड आणि त्यातुन उद्भवलेला पुढचा दैवदुर्विलास वाचुन काळजाला भोके पडली...
ह्याच साठी केला होता का अट्टाहास त्या महात्म्यांनी(?)