जनातलं, मनातलं
धुके असे पडले की
Primary tabs
धुके असे पडले की
धुके असे पडले की
धुक्याचा महाल आकाशी
सोपान त्याचा असा की
त्यावरी उभी तू टोकाशी
तू परी अस्मानीची
मी फकीर धरतीचा
वाट अशी भयंकर
मार्ग नसे परतीचा
विचार तरी काय करावा ?
तोही थांबला तर्कापाशी
सोपानावरून खुणवू नको
जीवाची होईल तडफड
तुजसवे वर जायाचे तर
प्राणपाखरू करेल धडपड
इथे जगुनी काय करावे ?
आता जावे स्वर्गलोकाशी
छान लिहिले आहे ,
पण गल्ली चुकली आहे असे नमूद करून खाली बसतो
राऊतजी
खूप आभार
आणि सर्व वाचकांचे खूप आभार
कविता कशी पहावी ? ... असो
ज्याची प्रेयसी देवाघरी गेली आहे अशा एका प्रियकराची ही वेदना आहे .
त्यामुळे अर्थ लागेल