जे न देखे रवी...

कधी निसटले धागे

Primary tabs

कधी निसटले धागे
मज कळलेच नाही
कशी उसवली वीण
मज कळलेच नाही

त्या निवांत भेटी
त्या एकांत गाठी
डोळ्यांत हर्षाचे झरे
अन देहांची मिठी
क्षण ते सरले जरी
मन ते भरलेच नाही

ती मधाहूनी गोड
कुठे हरवली ओढ ?
अशी कशी मुक्याने
मोडली माझी खोड
माणसाचे मन ते
मज उमगलेच नाही

येते रात सजुनी
येतो पाऊस अजुनी
शालीन थंडी गुलाबी
मारते मिठी बाजूनी
मग कसा प्रेमाचा
ग्रीष्म गेला विझुनी ?
काय खरं नि खोटं
तू मज वरलेच नाही ?

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामीनी.....

सखी मंद झाल्या तारका.....

तरूण आहे रात्र अजूनी....

किंवा.....

दोन रात्रीतील आता संपला वेडेपणा.....

सुक्या

प्रत्येकाच्या आयुष्याचा एक हळवा कोपरा . . .
पुलेशु.

या कवितेचा संदर्भ ही एक चर्चेतील , ताजी आणि दुर्दैवी गोष्ट आहे .
असो .
सर्व वाचकांचे आभार