जनातलं, मनातलं

साजुक तुपाचा शिरा

Primary tabs

सजुक तुपाचा शीरा

साधारण ४ थीत असेल त्या वेळी
शनिवार होता शाळा १/२ दिवस होति.
घरी आलो दप्तर ठेवल. हात पाय धुतले....
"अरे आपल्याला पारखी काकु कडे जायचय, समाचाराला..
तु चल माझ्या बरोबर....सोबत" आईन हुकुम सोडला
आम्हि दोघे निघलो पारखी काकुकडे,
अरे तुला पारखी काका माहित आहेत ना ते गेलेत.. आई
माझ्या फारस लक्षांत आल नाहि..
अरे समाचारला जायचे आहे...
तिथे शहाण्या सारख वागायच..आई....हो....मी
आम्हि दोघे काकुंच्या घरी आलो..
घरात शांतता..जमीनिवर पीठ सारवुन एक गोल त्या वर तेवता दिवा...
काकु कोप~यात शांत..कपाळ पांढर..
आईन त्यांच्या कडे पाहिल अन त्या रडायला लागल्या..
मी बघतच होतो..
"नका रडु..कहि आपल्या हातात असत का?.कस झाल?.आई म्हणाली
"काय सांगु?३- ३.३० ची वेळ असेल .... खुर्चीत पेपर वाचत बसले होते..मला म्हणाले ४ ला दुकानात जायच आहे..मला जरा शीरा कर खायला....काकु सांगत होत्या
आई ऎकत होति..काकु पुढे म्हणाल्या "अन मी शीरा केला साजुक तुपाचा अन शी~याची बशी घेउन आले अन म्ह्टले पेपर नंतर वाचा आधी हे खा...पण एक नाहि दोन नाहि..मग मी जरा हलवल तर पेपर हातातुन गळुन पडला अन...... काकु खुप रडायला लागल्या
मग आई पण जरा जवळ गेळी अन पाठीवरुन हात फिरवीत सांत्वन करु लागली.
काकु जरा शांत झाल्यावर म्हणाली "बहुतेक छातिचा रोग असेल"
"असेलहि... आमच कर्म..दुसर काय?..काकु म्हणाल्या.
जरा वेळान काकुंचा निरोप घेउन आम्हि निघालो
रस्त्यात हि आई डोळे पुसत होति...
मला एक प्रश्ण पडला होता.."शि~याच काय झाल असेल? मग तो शिरा कोणी खाल्ला असेल?????
avinash

झेल्या

१:
काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या भानगडीत पडू नये..
कशाला उगीच नसत्या भानगडीत 'शिरा'!!!

२:
'साजुक तुपाचा शिरा' अशा शीर्षकाखाली हा लेख घुसडण्याची 'सर्कस' कशासाठी?

बाकी ईनोद बराय..!

गद्य कवितेसरखं लिहून तुम्ही अजून एक विनोद बरा साधलात....!

(ह. घ्या.)
-झेल्या

कपिल काळे

विचारशक्तीची.

शिरयाचा प्रश्न पडणे, बालबुद्धीला साजेसे आहे. तिथेच संपेल प्रकरण तर, पुढे दुर्बीण.
सर्कशीत त्या कसरत करणारया मुलींचे जीवन समजून घ्यायचा प्रयत्न केलाय का कधी? जरा थोडा " एम्पथी"पूर्वक विचार केला तर दुर्बीण रोखताना हात कापतील. झुल्याकडेच काय, सर्कशीच्या तंबूकडे सुद्धा बघताना सुद्धा बघताना कणव येइल.
मग तुम्ही फिगर स्केटींग, जिम्नास्टीक चे टीव्ही शो अगदी " एंन्जॉय' करत असाल की? अण्णा हल्ली दुसरी चॅनेल्स लावतच नसतील .

आता तुमच्या "थेट " भाषेत विचारतो-- बॉडी कलर स्टॉकिंग्जमधून तुम्हाला काय दिसतं हो? असली आरपार दिसणारी दुर्बीण जर असेल तर द्या की, आपण ती विमानतळावर क्ष- किरण तपासणी यंत्राच्याएवजी वापरु.

काल बर्म्युडा , आज दुर्बीण, उद्या काय पुढे?

प्राजु

सडेतोड प्रतिसाद आवडला. अशा आंबट लोकांना असेच चपराक बसायला हवेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पांथस्थ

सर्कशीत त्या कसरत करणारया मुलींचे जीवन समजून घ्यायचा प्रयत्न केलाय का कधी? जरा थोडा " एम्पथी"पूर्वक विचार केला तर दुर्बीण रोखताना हात कापतील. झुल्याकडेच काय, सर्कशीच्या तंबूकडे सुद्धा बघताना सुद्धा बघताना कणव येइल.

लाचार परिस्थितीत (कारण आवड आहे म्हणुन सर्कशीत काम करणार्‍यांचे उदाहरण माझ्या तरि पाहण्यात/ऐकण्यात नाहि) काम करणार्‍या त्या मुलींच्या तोकड्या कपड्यांकडे बघुन लोकं असे विचार करतात (करतात तर करतात लहान मुलांनाहि तेच शिकवतात) हे वाचुन किव आली.

सर्कशीतल्या त्या झगमगाटामागे एक विचित्र अशी असहायता नेहेमी मला जाणवते. कधी कधी ती फार सुन्न करणारी वाटते. प्रेक्षकांसमोर हसर बागडत खेळ करणार्‍या त्या कलाकारांची आगतिकता त्यांच्या चेहेर्‍यावरच्या रंगामागुनहि दिसते. असो.

कुणाला ह्या सर्कशीतल्या कलाकारांविषयी (परिस्थिती, समस्या ई.) माहिती असल्यास इथे नक्कि टाकावी.

(माझी हि मतं भारतीय सर्कशीबद्दल आहेत.)

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

नीधप

>>सर्कशीतल्या त्या झगमगाटामागे एक विचित्र अशी असहायता नेहेमी मला जाणवते. कधी कधी ती फार सुन्न करणारी वाटते. प्रेक्षकांसमोर हसर बागडत खेळ करणार्‍या त्या कलाकारांची आगतिकता त्यांच्या चेहेर्‍यावरच्या रंगामागुनहि दिसते. असो.<<
सहमत

>>लाचार परिस्थितीत (कारण आवड आहे म्हणुन सर्कशीत काम करणार्‍यांचे उदाहरण माझ्या तरि पाहण्यात/ऐकण्यात नाहि) काम करणार्‍या त्या मुलींच्या तोकड्या कपड्यांकडे बघुन लोकं असे विचार करतात (करतात तर करतात लहान मुलांनाहि तेच शिकवतात) हे वाचुन किव आली. <<
अगदी अगदी!

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सुनील

प्रेक्षकांसमोर हसर बागडत खेळ करणार्‍या त्या कलाकारांची आगतिकता त्यांच्या चेहेर्‍यावरच्या रंगामागुनहि दिसते

नक्कीच. आणि हे सर्कशीबाबत जेवढे लागू आहे तितकेच अन्य व्यवसायातही. बाहेरून चमचमत्या दिसणार्‍या ह्या दुनियांचे अंतरंग फार जीवघेणे, काळेकुट्ट असते.

अविनाश, तुम्हाला याबाबत काही माहित असेल तर, एक उत्तम हृदयस्पर्शी कथा लिहू शकाल. पण दुर्दैवाने तुमचा आजवरचा अनुभव तसा वाटला नाही म्हणून खालची अवांतर वाटणारी प्रतिक्रिया दिली.

असो, आता तुम्ही हा सर्कशीचा दुसरा भाग काढून टाकला आहेच, तेव्हा इथेच थांबतो.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुनील

कालच एक झक्कास बोट विकत घेतलीय. खास क्रूझ साठी.

पेश्यल बर्म्युडा ट्रायंगल क्रूझ विथ शिरा-पुरी अशी टूर अरेंज करावी असा मानस आहे.

काय किंमत लावावी एका क्रूझ साठी?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पांथस्थ

आधी फिरवुन आणा मग सांगतो ;)

तसा लेख फारच अवांतर असल्याने प्रतिक्रियेलाहि तोच नियम लागु आहे ;)

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

चित्रा

ह्या दोन गोष्टी एकत्र का जोडल्या कळले नाही. नक्की लेखकाला यातून काय सुचवायचे आहे?
हे उपहासात्मक, समाजातील व्यंग दाखवणारे लेखन आहे का? या प्रश्नांची उत्तरे अविनाश यांनी द्यावीतच. तसे नसल्यास लिखाण हृदयशून्य आहे असा समज वाचकांनी करून घेतल्यास चुकीचे नाही.

ज्याअर्थी अविनाश यांनी मिपावर लेखन करायचे असे ठरवले आहे, त्याअर्थी त्यांनी त्यांच्या लेखनासंबंधी असलेल्या वाचकांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली पाहिजेत असे वाचक म्हणून वाटते. ती खालील दुव्यांवरही दिलेली दिसली नाहीत - इथे
आणि इथे

झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)

या प्रश्नांची उत्तरे अविनाश यांनी द्यावीतच. तसे नसल्यास लिखाण हृदयशून्य आहे असा समज वाचकांनी करून घेतल्यास चुकीचे नाही.

"या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे माहीत असूनही जर ती अविनाश यांनी दिली नाहीत, तर त्यांच्या डोक्याची शंभर शकले होऊन ती त्यांच्याच पायांशी लोळू लागतील."

- (प्रेतातला वेताळ) झुरळ मारणारा क्षत्रिय.

झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)

प्रकाटाआ

धनंजय

लहान मुलाच्या डोळ्यांना मोठेपणी कळतील त्या भावना (मग तो शोक असेल, किंवा आंबटशोक) दिसत नाहीत, समजू येत नाहीत, अशा काही या कथा आहेत का?

या धाग्याला धरून हृदयस्पर्शी, माणुसकीने भरलेल्या कथा लिहिणे शक्य आहे, असे वाटते.

लेखकाने स्पष्टीकरण द्यावे. अन्यथा चित्रा यांच्याशी सहमत - "लिखाण हृदयशून्य आहे असा समज वाचकांनी करून" घेणे साहजिक आहे.

मला तरी वरील लेखात काही आंबटशौक वाटला नाही. सर्कस ही कथा पण मी वाचली होती. त्यात त्या लहान मुलाने आण्णा दुर्बिण घेउन सर्कशीत काय बघायचा हे लिहीले आहे ते तसे पाहणे चांगले का वाईट यावर काहीच भाष्य नाही कारण तो या लेखाचा विषयही नाही. त्या त्या वेळेला त्या लेखकाच्या मनात काय भावना येऊन गेल्या ते ते तसे लिहीले आहे असे मला वाटते. आणि ते सुधा आता मला कळते आण्णा दुर्बिण घेऊन काय पहायचा ते असे लिहीले आहे. म्हणजे त्या वयात ते कळत नव्हते आता वयापरत्वे आलेल्या जाणीवेमुळे ते कळले आहे. म्हणजे लेखक आण्णाप्रमाणे सर्कशीत जाऊन आताही ती गोष्ट तशीच पहात असेल असे नाही.
अशा अनेक वाईट गोष्टींचा अर्थ वय लहान असताना कळत नाही पण मोठा झाल्यावर कळतो त्याची कबुली देणे म्हणजे आंबटशौक असणे असा मला तरी वाटला नाही.

(लेखकाप्रमाणे अनुभव आलेला)
पुण्याचे पेशवे
Since 1984