विवेकवादी दृष्टिकोनातून नाताळचा सण
Primary tabs
उद्या आहे नाताळचा सण. नाताळ उर्फ ख्रिसमस हा सण येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून अत्यंत श्रद्धेने साजरा साजरा केला जातो. तसे पाहता येशू ख्रिस्त यांचा जन्म 25 डिसेंम्बर ला झाला याचा कोणताही समकालीन पुरावा उपलब्ध नाही. परंतु भोळ्या भाबड्या ख्रिस्ती समाजाची श्रद्धा म्हणून हा सण साजरा करण्यास कोणाचीही हरकत असण्याचे कारण नाही. पण सण साजरा करण्याची सुद्धा एक आचारसंहिता असली पाहिजे.
आपण काय करतो तर साखरेचा मारा असलेले केक, चॉकलेट यासारखे पदार्थ खरेदी करतो. साखर आरोग्यासाठी विषासमान आहे हे आधुनिक विज्ञानाने सिद्ध झाले आहे. शिवाय आपली मुले केक, चॉकलेट खात टीव्हीसमोर बसून छोटा भीम पाहणार पण ज्यांच्या भरवशावर तो केक खायला मिळतो आहे त्या ऊसतोड कामगारांच्या वाट्याला मात्र शिळी भाकरी. ही विषमता पाहून अक्षरशः मन तुटते. हे कमी म्हणून की काय नाताळच्या आणि नववर्षाच्या स्वागताला उडवले जाणारे ते प्रदूषणकारी फटाके आणि प्रार्थनास्थळांवर पेटवल्या जाणाऱ्या त्या प्रदूषणकारी मेणबत्त्या.
हे सगळे टाळणे आपल्याच हातात आहे.
नाताळच्या दिवशी केक, मेणबत्त्या अशा व्यर्थ गोष्टींवर जो खर्च केला जातो त्याऐवजी गरीब मुलांना कपडे वाटणे, शिधावाटप करणे सहज शक्य आहे. फुगे,फटाके,लाऊडस्पीकर लावण्याऐवजी प्रत्येकाने आपापल्या परिसरात झाडे लावावीत.
याशिवाय आणखीन एक चिंतेचा मुद्दा म्हणजे नाताळच्या मार्फत होणारा अंधश्रद्धेचा प्रसार.
हरणांच्या गाडीत बसून दाढीचे खुंट खाजवत एक माणूस येतो आणि साखरयुक्त चॉकलेट वाटतो ही संकल्पनाच किती विचित्र आहे. हरणासारख्या नाजूक प्राण्याला एका जाड्या माणसाचे वजन ओढायला लावायचे ह्यात काही अर्थ आहे का?
अशा भाकड कथांवर आणखीन किती दिवस आपण विश्वास ठेवणार. विवेकवादाचे संस्कार बालवयातच व्हायला हवेत. अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आपल्या समाजाचा पाया भुसभूशीत करतात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
चला तर मग आपण सगळे मिळून एक शपथ घेऊ.
नको सांता आणि नको केक,
येशूला हवे वातावरण नेक,
नको ते फुगे आणि नको तो फटाक्यांचा जाळ,
साजरा करू प्रदूषणमुक्त नाताळ.
( माहिती तंत्रज्ञान उद्योगात काम करणाऱ्या माझ्या एक विवेकी , विचारी , विजिगिषु वृत्तीच्या मित्रवर्यांनी अफाट चिंतनानंतर हे लिहिले )
एकदा सण मुलांच्या, महिलांच्या ताब्यात गेला की कोणाचंच काही चालत नाही. बाकी पुढचं वाढवायचं काम दुकानदार सांभाळतात. कशाला वाईट वाटून घेता? थंडीचे दिवस असतात( उत्तर गोलार्धात), नोकरदारांना सुट्ट्या घ्यायच्याच असतात. करू दे मजा.
ऑ ?
म्हणजे पुरुष गोडधोड खात नाहीत की काय? आणि सण साजरे करत नाहीत की काय?
महिला आणि मुलेच काय ती सण बेजबाबदारपणे साजरा करतात?
आणि मूळ धाग्यात जो विषय आहे त्यावर असे वाटते की, सण म्हटला की तो कोणत्यातरी समजुतीवर आणि तारखेवर / तिथीवर आधारित असणे आलेच. त्या दिवशी एरवीपेक्षा जास्त गोडधोड आणि कर्बयुक्त किंवा चरबीयुक्त पक्वान्ने खाणे आलेच. सर्वच धर्मांत सण म्हटला की हे होतच असते.
सण कसा साजरा करायचा याची सूत्रे याच गटाकडे असतात.
विज्ञानवादी, विवेकवादी, बुद्धीवादी, चिकीत्सक वगैरे वगैरे बिरुदे मिरवणारे तथाकथित विचारवंत ठराविक एकाच धर्मावर टीका करत असल्याने उपरोधाने हा लेख लिहीला असावा असे वाटले. बाकी चू. भू. दे. घे.
नको सांता आणि नको केक,येशूला हवे वातावरण नेक,
नको ते फुगे आणि नको तो फटाक्यांचा जाळ,
साजरा करू प्रदूषणमुक्त नाताळ
.
मला ह्या "गप्पी मासे पाळा हिवताप टाळा " स्टाईल घोषणा फार आवडल्या.
अशाच काही स्लोगन वेगवेगळ्या सणांच्या करायला पाहिजेत.
.
नको तो सुरकुंबा नको तो खजूर.
मिळून सारे म्हणू "जी हुजूर जी हुजुर".
.
नको ते फटाके नको त्या पणत्या
पैशाचा चुराडा पाहून ईडी लावल खणत्या .
.
अजून टाकेन सुचल्या तर....
फार उपरोधिक लेख लिहिण्यामागे राग खूप आलेला आहे असे जाणवतेय.
ख्रिस्तविरोधी कुठले.
तुम्ही हा लेख लिहिला म्हणून मी माझ्या डायबेटिक आज्याला अख्खा प्लम केक जबरदस्तीने खायला लावणार आहे. मी दम्याने त्रस्त असलो तरी फटाक्यांची अख्खी फॅक्टरी उडवणार आहे.
तुम्ही ख्रिस्तविरोधी लिखाण करून मला हे सगळे करायला भाग पाडले आहे...
ख्रिस्ताचा जन्म बायबल प्रमाणे उन्हाळ्यांत झाला. ख्रिसमस आणि येशील जन्म ह्यांचा काहीही संबंध नाही.
इटली प्रदेशांत जे जुने राजे होते ते सूर्यदेवाला मानायचे. थंड प्रदेशांत सूर्याची शान विशेष असते. हिंवाळा आला कि जीवन बंद होते. शेती शक्य नाही. ज्याने उन्हाळ्यांत भरपूर काम करून लाकूड, अन्न वगैरे गोळा केले असेल तोच माणूस आणि त्याचे प्राणी जिवंत राहतात. त्यामुळे सॉलीसिट्स आले कि हिवाळा आता जाणार हि शक्यता निर्माण होते आणि त्यासाठी त्या प्रदेशातील लोक मोठ्या प्रमाणावर सूर्य देवाची भक्ती करण्यासाठी एक मोठे फेस्टिवल करत. ह्याला यूलटाईड म्हणतात. फिनलंड पासून मेक्सिको पर्यंत विविध भागांत ह्या प्रकारचे सण आहेत. भारतीय लोक सुद्धा संक्रांत साजरी करतात पण भारतीयांचे गणित चुकल्याने संक्रांत डिसेंबर मध्ये येत नाही .
डग्लस फिर हे असे झाड आहे त्याची पर्णगळती होत नाही. हिंवाळ्यांत सुद्धा ते अतिशय हिरवे राहते. त्यामुळे थंड हवामानात हे झाड जीवनाची प्रेरणा देते. म्हणून सूर्याचे प्रतीक म्हणून हे झाड घरांत आणून त्याची पूजा केली जाते.
ख्रिस्ती धर्माने राज्यावर कबजा केल्यानंतर हे सण बंद करण्याचे प्रयत्न केले पण ज्या पद्धतीने बाटगे ख्रिस्ती ओणम करतात त्याच पद्धतीने लोकांनी हा सण सोडला नाही. शेवटी नाईलाजाने चर्चने ह्याचे नामकरण केले आणि ख्रिस्ती धर्मांत त्याचा समावेश केला.
वृक्ष पूजा हि चांगली गोष्ट आहे आणि हिंदू धर्माच्या मूळ भावनांशी सुसंगत आहे. त्यामुळे घरांत ख्रिसमस ट्री आणण्यास माझ्या मते तरी हरकत नाही.
साहना,
तुमच्या या संदेशाशी बराचसा सहमत आहे. फक्त या विधानाशी जरा असहमती आहे :
मकरसंक्रांत जानेवारीत येते तशी प्रत्येक राशीची संक्रांत प्रत्येक ग्रेगेरीयन महिन्यांत येते. माझ्या मते भारत युरोपच्या मानाने विषुववृत्ताच्या अधिक जवळ असल्याने भारतात डिसेंबराच्या कर्कसंक्रांतीपेक्षा जानेवारीतली मकरसंक्रांत अधिक प्रभावी असते. मात्र याबाबत चूकभूल देणेघेणे.
आ.न.,
-गा.पै.
मी ह्या विषयावर मिपा वर खूप वर्षे आधी लिहिले आहे असे वाटते.
भारतीयांनी चूक केली असे लिहिल्याने काही लोकांना वाईट वाटते पण त्यांत आपल्या पूर्वजांची चूक नाही.
दोन प्रकारची राशिचक्रे आहेत. सायण राशीचक्र (tropical ) आणि निरायण राशीचक्र (sidereal). दोन्ही मध्ये बारा राशी आहेत पण या राशीचे स्थान निश्चित करण्याची पद्धती पूर्णपणे वेगळी आहे. सायण राशीचक्र हे प्रामुख्याने पाश्चिमात्य असून निरायण राशीचक्र हे प्रामुख्याने वैदिक आहे.
सायण राशीचक्र है पूर्णतः सूर्य आणि पृथ्वी ह्यांच्यावर अवलंबून आहे. पण मार्च २१ - ह्याला नेहमीच ० डिग्री आणि मेष राशी असे नाव दिले जाते (प्रत्यक्षांत मेष राशी कुठेही असू). म्हणूनच तुमच्या जन्म मार्च २२ ला असेल तर तुमची सन सीईन ही मेष मानली जाते. एका अर्थी हे राशीचक्र फक्त वर्षातील ऋतू समजण्यासाठी आहे
निरायण राशीचक्र हे आपले नेहमीचे भारतीय राशीचक्र. ह्याचा संबंध प्रत्यक्ष राशीशी आहे. अमुक ग्रह अमुक राशीत आहे असे ठाऊक असल्यास तुम्ही रात्री बाहेर आकाशांत तो ग्रह त्या राशींत पाहू शकता.
पृथ्वी आपल्या अक्षावर थोडी कलली आहे हे आम्हाला ठाऊक आहे पण त्यांत पृथ्वी थोडीशी हलते. त्यामुळे हि दोन्ही राशी चक्रांत थोडासा फेज डिफरंस येतो म्हणजे दर ७१ वर्षांनी एक दिवस बदल.
हजारो वर्षे मागे, भारतीय खगोलशास्त्रतज्ञांनी हे पहिले कि मकर संक्रांत म्हणजे सूर्याच्या मकर राशीचा प्रवेश आणि उत्तरायण (winter सॉलिस्टीस) दिवस एकच आहे. त्यामुळे मकर संक्रांत आणि उत्तरायण ह्यांचा संबंध आहे असे समजून विविध सण देशभरात साजरे होऊ लागले. पण काळाच्या ओघांत मकर संक्रांत पुढे जात गेली जी सध्या जानेवारी १६ च्या आस पास येते.
श्रीमद भागवत सांगते :
यन्मध्यगतो भगवांस्तपतपतिस्तपन आतपेन त्रिलोकीं प्रतपत्यवभासयत्यात्मभासा स एष उदगयनदक्षिणायनवैषुवतसंज्ञाभिर्मान्द्यशैघ्य्रसमानाभिर्गतिभिरारोहणावरोहणसमानस्थानेषु यथासवनमभिपद्यमानो मकरादिषु राशिष्वहोरात्राणि दीर्घह्रस्वसमानानि विधत्ते ॥ ३ ॥
स्वैर भाषांतर : मकर राशीतून प्रवेश करता सूर्य दिवस आणि रात्र सामान करतो आणि उत्तरायण सुरु होते !
विष्णुपुराण :
> When the sun enters Capricorn (the winter solstice), his northern progress commences; and his southern when he enters Cancer (the summer solstice).
त्यामुळे पूर्वीच्या काळी मकर संक्रांती साजरा करण्याचे प्रमुख कारण हे उत्तरायण हे होते पण हे चुकीच्या समजुतीवर अवलंबून आहे.
मकर राशीला सण म्हणून साजरे करण्याचे काहीच प्रयोजन नाही. तीळगूळ वगैरे आरोग्याला चांगले इत्यादी कायप्पा संदेश येत असतात पण हेच तिळगुळ आणि काही शेकडो वर्षांनी आम्हाला उन्हाळ्यांत खावे लागतील.
साहना,
गणन व प्रत्यय यांची सांगड घालायलाच हवी. याकरिता लोकमान्य टिळकांनी बरीच धडपड केली होती. त्यासंबंधी एक लेख इथे सापडला : http://www.mahratta.org/CurrIssue/2020_May/6_Lokmanya%20tilak%20ani%20t…
तस्मात वेधगणित व वेधप्रत्यय यांच्यात समन्वय साधण्याची प्रक्रिया भारतात अनेक शतकांपासनं चालंत आलेली आहे. त्यामुळे संक्रांत उन्हाळ्यात साजरी करायची वेळ येऊ नये. त्याआधी एखादी अखिल भारतीय ज्योतिर्विद परिषद भरवून यथोचित निर्णय घेता यावा. त्याच धर्तीवर संक्रांतीसारखे सण विहित प्रक्रियेद्वारे कालसुसंगत करता यावेत. भारतीय धर्मशास्त्रे कालानुरूप पालटणारी आहेत.
मला अंधुकसं आठवतं त्याप्रमाणे शंकर बाळकृष्ण दीक्षित यांनीही सायन-निरयन समन्वयाचा प्रयत्न केला होता. मात्र त्यासंबंधी विश्वकोशांत निश्चित माहिती सापडली नाही.
आ.न.,
-गा.पै.
मान्य ! सध्या सुद्धा कुणी तरी कौल नावाच्या व्यक्तीची हीच धडपड आहे. कुंभमेळा हा डिसेंबर मध्येच व्हावा आणि त्याचा मकर संक्रांतीशी संबंध ठेवू नये हि धडपड अनेकांची आहे.
I missed you!
आता पुन्हा लगेच गायब नका होऊत.