काथ्याकूट
चालू घडामोडी: जानेवारी २०२६
Primary tabs
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा!
सर्वांना नवीन वर्ष सुख समाधान समृद्धीचे जावो ही श्री चरणी प्रार्थना.
या महिन्यात महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणूक होत आहेत. त्यांत नेहमीप्रमाणे "स्थानिक निवडणुकांत उमेदवारांना व मतदारांना पक्ष-आघाडी-युती यांचे अडथळे नसतात" ही बाब ठळक करणाऱ्या घटना घडत आहेत.
तीन वर्षांपूर्वी चॅटजीपीटीच्या रूपाने कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसामान्यांच्या पुढ्यात अवतरली होती; आता तिचे स्वरूप अधिकच व्यापक झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याबद्धल काही नवे बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
यावर्षीच्या दिवाळीआधी सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल हे नक्की.
* कांदा लिंबू
मणिकर्णिका घाटाची अवस्था काय आहे ते या एक वर्षांपूर्वीच्या विडिओमध्ये(१०:०० पासून पुढे) पाहता येईल. Exploring Kashi - city older than history l secrets of Manikarnika Ghat l Banaras temples and food tour.
https://youtu.be/gAdJBifdVYI?si=pzXzAQ2ERa45NvGf
गलिच्छपणा, विकृतपणा, क्रुरता यांना पावित्र्याचे मुलामे चढवायचे काम धर्म करत असतो. मग मंदबुद्धी लोकांना त्यांचा 'अभिमान' (आय मिन दुरभिमान) निर्माण होतो.
सनातन धर्मात सर्वांना टीका टिपणी करण्याची मुभा आहे. पण अब्राहिम धर्माच्या विरुद्ध तुम्ही टिप्पणी करून पहा...
पिवळा पडला तर ताजमहाल तोडणार का ?
अतिक्रमण काढून मूळ घाटाचे संवर्धन करता आले असते .
भारतीय पुरातत्व खाते नावाचे बाहुले आहे , त्यांचे काम अशा जागा संवर्धित करणे आहे , पण आले शेठच्या मना , तिथे कोणाचे चालेना.
कपिलमुनी,
होळकर तत्कालिन संस्थानिक म्हणजे शासन होते. त्यांनी घाट बांधतना तोडफोड केली नसेल का?
प्रत्येक शासन त्या त्या काळच्या सौंदर्य दृष्टीने तोडफोड करून नवे काहीतरी बांधत राहणारच आहे. २०० वर्षांनी तिथे ग्लास फायबरचा पारदर्शक घाट बांधतील. तेव्हा कुणीतरी म्हणेल किती सुंदर टाईल्स होत्या.
आपण कशाला इतका लोड घ्यायचा?
अहिल्याबाई होळकरांनी अंदाजे तीन हजारांपेक्षा अधिक घाट केले आणि मंदिरे बांधली. तत्कालीन काळात नदी काठावर अशी व्यवस्था नव्हती, असे वाटते. आमच्या संभाजीनगर जिल्ह्यातील प्रवरा- गोदाकाठी संगमावर अशी सुंदर घाट आणि मंदिरे आहेत, ही घाट अठराव्या शतकात बांधलेली आहेत. आज तीनशे वर्षाहून अधिक काळ झाला पण अजिबात पडझड झालेली नाही. तत्कालीन प्रवाशांसाठी ऐतिहासिक 'बारवा' असाच विषय आहे. सद्य महाराष्ट्र सरकारने संवर्धनासाठी नुकतीच काही तरतुद केल्याचे वाचनात आले. चांगली गोष्ट आहे.
आपल्याकडे ऐतिहासिक गोष्टी संवर्धन करायची, पुरातन गोष्टी जपायची सवय नाही. उकरुन काढायची नवी परंपरा विकसीत झालेली आहे. विकासाच्या नावाखाली काही ऐतिहासिक किमान काही गोष्टी तरी सोडल्या पाहिजेत, असे वाटते.
-दिलीप बिरुटे
>> अहिल्याबाई होळकरांनी अंदाजे तीन हजारांपेक्षा अधिक घाट केले आणि मंदिरे बांधली. <<
म्हणजे युटिलिटी म्हणूनच बांधली ना? त्या त्या वेळच्या समाजाच्या सोयीसाठी होळकरांनी त्यांच्या बुद्धीला पटेल रुचेल ते केले. लोकांना चॉइस देखील नव्हता.
आता सर्वांनी आनंदाने निवडून दिलेले लाडके भाऊ आणि विश्वगुरु त्यांच्या त्यांच्या बुद्धीने आणि रुचीने समाजासाठीच हे कॉरिडॉर बांधत आहेत ना?
तिथे लेझर लाईट लागतील, घाट स्वच्छ होईल, लुबाडता येणारे पर्यटक येतील, त्यांच्या रीळा काढतील, समाजाला हेच तर हवंय.
तुमच्या सारख्या काही चुकार चार पाच लोकांना हळहळ वाटली तरी उर्वरित ९९ टक्क्यांना हेच हवं आहे.
काशीला तुम्ही गेले आहात का. नवीन कॉरिडॉर बनले तेंव्हा लोकांच्या घरात बंदिस्त केलेली, अवैध निर्माण करून लपवलेली अनेक मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला त्यातील दोन मंदिर येतात मुख्य मंदिराच्या परिसरात आहे आणि त्यांना तसेच जीर्णोद्वा रकेले आहे. जाऊ स्वतः डोळ्यांनी बघू शकता. अधिक ठिकाणी आधीच घाटांना व्यवस्थित आणि उत्तम रीतीने पुन्हा बांधते आहे लोकांच्या सोयी साठी. भारतातील मंदिरे आणि मेले समाजवादी अर्थव्यवस्थाचे प्रतिक आहे जेणेकरून काही लोकांच्या हातातील धन समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचते.
घाट तोडलेला नाही. सर्व घाटांची दुरुस्ती सुरू आहे. तुमचे म्हणणे आहे की सरकारने घाटांची दुरुस्ती न करता त्यांना भग्न अवस्थेतच राहू द्यावे. बाकी मंदिर परिसरात माता अहिल्याबाईंची मूर्ती स्थापित करून मोदीजींनी तिचे कार्य कोट्यावती भारतीयांपर्यंत पोहोचवले. बहुतेक त्याचेच दुःख झाले असावे.
उद्या मोदी पादला तरी रातराणी फुलली म्हणतील
उद्या मोदी पादला तरी रातराणी फुलली म्हणतील
उद्या मोदी पादला तरी रातराणी फुलली म्हणतील
फेकाफेकी करण्यात पण 'पटाईत' आहात. गुगलवर काही सर्च केले असते तर, काही दिसले असते. घाट उध्वस्त केलेले छायाचित्रे दिसली असती. भग्न अवस्थेत वगैरे काही नव्हते. चांगल्या अवस्थेत होते. रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली व्यवसायिकरणासाठी असलेली जागा सपाट केली आहे, भविष्यात काय करतील ते इथे दिले आहे.
-दिलीप बिरुटे
अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला ऐतिहासिक मनकर्णिका घाट अधर्मी , हिंदू द्वेषी सरकारने तोडला. मंदिरे, मूर्ती यांची तोडफोड केली.
मणिकर्णिका प्रश्न चिघळतोय अस संध्या तरी वाटतंय. काही एक्स हॅडल्स वर केसेस दाखल केल्या गेल्याचे समजले. (आरोप बहुतेक चुकीच्या बातम्या देणे,एआयचा वापर करुन बनवलेली चित्रे पसरवणे/ इ. काही आरोप असावेत.) मी एक व्हिडियो पाहिला ज्यात एका तोडलेल्या भागातील एका मूर्तीवर पाय ठेवून एक व्यक्ती पुढे जात होता,मूर्ती अहिल्यादेवींची सांगितले जाते आहे!
Modi’s Manikarnika Ghat 'Makeover' | Destroying Kashi To Make A Budget Disneyland? | Akash Banerjee
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #UGC_RollBack
कालच्या महापालिका निवडणुकींचे निकाल पाहता प्रश्न पडतो विविध पक्षांचे जुने मतदार का फिरले? न घाबरता मतदान केलं आणि साथ सोडली.
मतदार तिथेच आहे हो, पण निवडणूक आयोगच इतर पक्षांच्या मतदारांची नावे उडवतोय, भाजपला पैसे वाटू देतोय नी खराब मशीन्स (म्हणजे जीत “चुकून” भाजपलाच मत जाते कुठलेही बटण दाबले तरी) विरोधी उमेदवारांवर चाकू हल्ले पिस्तुल हल्ले करू देतोय, तर वेगळा निकाल लागणार का?
तुमच्या मते मतदान केंद्रात असलेले पोलिंग एजंट झोपलेले असतात. फक्त जिथे ठाकरे सेना जिंकली त्या ठिकाणच्या मशीन ठीक होत्या. बहुतेक फक्त 116 जागांच्या मशीन खराब असतील. बाकी मतदान ४५ टक्के झाले असते तर महायुतीचा दारुण पराभव झाला. ६० टक्के झाला असता तर महायुतीला 175 जागा मिळाल्या असतात हे मुंबईचे वास्तव आहे.
महाराष्ट्रात मतदान केंद्रावर अनेक प्रकाराच्या लबाड्या केल्या गेल्या ह्याचे शेकडो व्हिडिओ समोर आले आहे. पोलिस आणि निवडणूक कर्मचारी ह्यांचा पक्षपातीपणा स्पष्टपणे दिसून आला. अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे व्हिडिओ आहेत. निवडणूक आयोगाला अजून काय पुरावे हवे?
+1
उद्धव सेनेला अपेक्षेप्रमाणे यश आले नाही यावर मंत्री नितीश राणे "ओक्साबोक्शी हसले " असं एका राजकीय समिक्षकाने म्हटले आहे. कारण हसावे का रडावे हा उद्धवसाहेबांना प्रश्न पडला असेल. सत्तरेक जागा जिंकल्यामुळे रडून इविएमवर खापरही फोडतात येत नाही आणि बहुमतासाठी जागा कमी पडल्याने आनंदही होत नाही अशी कुचंबणा झाली.
पुढे काय?
टोमणे मार मारून हैराण करणार. ते आजपासूनच सुरू झाले.
लोकशाहीतील निवडणूका म्हटल्या की, कोणी हरणार कोणी जिंकणार आपण विश्लेषण करतो ते आपल्या प्रत्येकाच्या दृष्टीने. मुंबई महापालिका निवडणूका महाराष्ट्रभर चर्चेचा विषय होता. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, दोघे भाऊ निवडणूकीत एकत्र आले हे अनेक मराठी माणसांना सुखावणारे होते. उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे, आदित्य ठाकरे, यांच्या सभा गाजल्या. निवडणूकीचे मुद्दे बिनतोड होते. अदानीने मुंबई गिळली पासून ते मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होतोय इथपर्यंत.
उद्धवसेनेनेकडे विधानसभा निवडणूकीत पदरी आलेलं अपयश. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत त्यांच्याकडे म्हणून त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिलं नव्हतं. गेल्या दोन वर्षात सोडून गेलेले असंख्य नगरसेवक. सत्ता संपत्तीच्या बळावर भाजप- मिंधे गटाची दहशत. सत्तेच्या बळावर धकावत, आमिषं दाखवत, उद्धवसेना खिळखिळी करुन टाकली. लढणारे कार्यकर्ते आणि हमखास निवडून येतील असे कार्यकर्ते ऐनवेळी भाजपात दाखल झाले. अशा वेळी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मनापासून सोबत केली ती जिंदादिल जीगरबाज मराठी माणसाने. मराठी पट्ट्यात मराठी माणूस उद्धव सेनेच्या पाठीमागे जिद्दीने उभा राहिला, ताकद दिली. सगळं गमावलं तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, हा विश्वास मराठी माणसांनी दिला. सर्व गमावले असताना दोघांनी मिळून ६५ +०६ असे नगरसेवक निवडून आले, आपला मराठी माणसाचा बाला किल्ला राखून ठेवला. मला वाटतं इथे मराठी माणूस जिंकला उद्धव ठाकरे जिंकले.
काही राहिलेले नगरसेवक आणि नवे चेहरे ही उद्धव ठाकरेंसोबत राहिले. दोन हजार दोन ते ते दोन हजार सतरापर्यंत निवडून आलेल्या जवळ जवळ ११५ नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्याशी काडीमोड घेतला. सत्ता नसली की लोक वेडे होतात. कायम सत्तेशी नातं असलं पाहिजे असे ज्यांना ज्यांना वाटतं ते सर्व सोडून गेले. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्त्व, आदित्य ठाकरे यांचं नवं पाऊल आणि जे जीगरबाज कार्यकर्ते नेते उद्धवसेनेला जिंकण्यासाठी लढत ते या निवडणूकीत उतरले आणि नव्या चेह-यांसोबत जिंकले. शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) यांना जवळ जवळ आठ लाख मतदान म्हणजे मतदानाच्या चौदा टक्के मतदान तर, विजयी उमेदवारांची मतदान टक्केवारी ही सत्तावीस टक्के होती. ( लोकसत्ता आकडेमोड साभार ) अशी आहे, याचाच अर्थ असा मुंबई महापालिकेच्या निवड्णूकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मराठी माणसाने जिंदादिली दाखवून भरभरुन मतदाने केले.
आता, निवडणूकांचा घोळ, सोयीचं सगळं भाजपा सत्ता असल्यामुळे सगळं करुन घेतो. महापालिकांच्या निवडणूका झाल्या पण निवडणूकांचे चक्राकार आरक्षण सोडत अजून काढून झालेली नाही. निवडणूकीपूर्वीच हे करावे लागते, त्यामुळे सोडत निघाल्याशिवाय महापोर होणार नाही. अजून सगळ्या गोष्टीस वेळ आहे, तो पर्यंत भाजपा- आणि मिंधे गटाच्या महापोरास मुंबईच्या विकासासाठी शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
खूप छान प्रतिसाद बिरुटे सर, सगळे काही गमावले असताना ० तून सुरुवात करून ठाकरे बंधूनी ७१ नगरसेवक निवडून आणले हे खरोखर वाखणण्याजोगे आहे! इतका पैसा, संपत्ती, इडी, निवडणूक आयोग सोबत असूनही भाजपला १०० आकडा गाठता आला नाही, ईव्हीएम मशीन्सवर बारकाईने लक्ष ठेवले, डुप्लिकेट वोटिंग करणाऱ्याना जागेवर चोप दिला तर असे निकाल लागतात नाहीतर काय होते हे विधानसभेला आपण पाहिले. बाकी शिवसेना फोडून शिंदेंनी काय मिळवले?, शिंदे जिंकले असते तर वेगळी गोष्ट होती, पण “तुला नाही मला, घाल कुत्र्याला” असे करून शिंदेनी नेमके काय मिळवले हे कळत नाही, आजवर एक चांगला शिवसैनिक म्हणून शिंदेंबद्दल आदर होता, पण आता तो ही त्यांनी गमावला, शिंदेंबद्दल आता तिरस्कार वाटू लागला आहे, आजवर अनेक लोक शिवसेना सोडून गेले राणे, भुजबळ वगैरे पण शिवसेना संपवून भाजप वाढवण्यासाठी जीवाचे रान करणारा कुणी झाला नाही, मुंबईतर गेलीच पण स्वतच्या ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर अश्या भागातही भाजपला मोठे करून ठेवले आहे, उद्या हाच भाजप पक्ष आपल्या परंपरेला अनुसरून शिंदेंना राजकारणातून संपवेल, पण तो पर्यंत मराठी माणसाचे प्रचंड नुकसान शिंदेनी करून ठेवलेले असेल, बाकीच्या भिकार महापालिका भाजपकडे गेल्या ह्याचे वाईट नाही वाटले पण मुंबई पालिका शिवसेनेंकडे आणी पुणे- पिंपरी चिंचवड महापालिका अजितदादांकडे असायला हव्या होत्या असे मनापासून वाटते, पुण्यात राष्ट्रवादीचे लोक कामे करताना रस्तोरस्ती दिसतात, भाजपचं कुत्रही दिसत नाही कुठे!
काल परवा पासून ट्विटर वगैरे सोशल मीडियावर मराठी माणसांविरुद्ध भाजपच्या परप्रांतीयांच्या पोस्टचा ऊत आला आहे, ठाकरे बंधू, शिवसेनेविरुद्ध गरळ ओकली असती तर समजू शकलो असतो पण ते सरळ मराठी माणूस हा शब्द वापरून काहीबाही लिहिताहेत, मराठी माणसाविरुद्ध भाजपेयींच्या मनात इतका कसला राग आणी द्वेष आहे कळत नाही.
प्रतिसादाशी सहमत.
शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचं महापालिका नगरसेवकांचे बळ पाहिले तर, आकडा शंभरी गाठतो. भाजपापेक्षा पुढे जातात. याचा अर्थ असा की मुंबईत मराठी माणूस शिवसेनेकडेच आशेने पाहतो. शिवसेनेच्या पाठीशी राहतो. शिवसेनेला बळ देतो. बाकी, आज सत्ता शिवसेनेकडे ( उद्धव ठाकरे) नाही तरी निकराची झूंज दिली. लढले. निवडणूकीत सगळीकडून सगळे शिवसेनेवर तुटून पडलेले. अशा वेळी एकटे छातीचा कोट करुन लढले मिळालेलं यश पक्षासाठी आनंदायी आहे, ठाकरेंच्या चेह-यावर तो आनंद दिसतो.
-दिलीप बिरुटे
वाह, मस्त विनोदी लिहिलं आहे; छान वाटलं. अजून येऊ द्या!
13 दिवसांचे सरकार असताना अटल बिहारी वाजपेयींनी विक्टोरीया टर्मीनस चे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस असे करण्याचा जो प्रस्ताव युती राज्य सरकारकडून आला होता त्यासाठी केंद्राकडून मार्ग मोकळा करून दिला होता.
तसेच सहार विमानतळाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी अंतराष्ट्रीय विमानतळ करण्याचे काम सुद्धा अटल बिहारी वाजपेयींनी केले होते.
पहिल्यांदा भारतीय नाण्यांवर छत्रपतींची प्रतीमा छापणारे सरकार हे अटल बिहारी वाजपेयींचे होते.
नावात "बिहारी" असणाऱ्या व्यक्तीने ऐवढं केलं होतं आणि आमचे शरद पवार "संभाजीनगर" बोलायला सुद्धा नकार देतात.
ऐवढंच काय तर बॉम्बे चे नामांतरण मुंबई करण्याचा जो निर्णय झाला तो सुद्धा शिवसेना आणि भाजपच्या युती सरकारने घेतला होता,
बहुमतासाठी लागणारे ५०% आमदार हे भाजपचे होते.
1985 चा अपवाद वगळता शिवसेनेला कधीही स्वबळावर मुंबई महानगरपालिकेवर बहुमताचा आकडा गाठता आला नाही,
1997 पासून जे काही शिवसेनेचे महापौर झाले ते भाजपच्या पाठिंब्यावर.
बाळासाहेबांनी मुंबईत मराठी माणूस टिकवला पण ते करताना भाजपच्या पाठिंब्यावर कारभार चालू होता.
आज लोकं गुजरातचं राज्य येणार अशी भिती दाखवत आहेत,
पण 80 व 90 दी च्या काळात मुंबईवर पाकिस्तान पुरस्कृत डॉन लोकांचा पलडा भारी होता,
काँग्रेसने कधीही अंडरवल्ड वर कारवाई केली नाही आणि प्रकरण शेवटी ऐवढं वाढलं की दाऊदने पाकिस्तानातून स्फोटके आयात करून मुंबईत कित्येक बॉमब्लास्ट केले,
मुंबई ही आर्थिक राजधानी ज्या व्यापारी वर्गामूळे आहे ते जीव मुठीत घेऊन जगत होते,
गुलशन कुमारची हत्या सगळ्यात मोठा इंवेट ठरला होता,
एक एक करून श्रीमंत लोकं मुंबईतून बाहेर पडत होती.
यावेळी कोणत्या व्यक्तीच्या हाती गृहमंत्रालय गेल्यावर हा सगळा प्रकार मुंबईत थांबलेला आठवतय का ?
गृहमंत्री गोपीनाथ मुंडे!
एकेकाळी आर्थिक राजधानी असल्याले कोलकत्ता हे कम्यूनीस्टांच्या सत्तेमूळे पाठी पडले तसेच या डॉन लोकांमूळे मुंबई सुद्धा पाठी पडणार होती.
तेव्हा भाजपच्या गृहमंत्र्यांनी स्वताच्या कुटूंबाची पर्वा न करता थेट नडायचा निर्णय घेतला होता.
भारतीय नौसेनेच्या झेंड्यावर ब्रिटीशांचा क्रॉस असायचा,
तो क्रॉस अटल बिहारी वाजपेयींनी काढला होता,
सोनिया गांधींनी पुन्हा तो क्रॉस बसवला आणि मराठी शरद पवार गप्प राहिले,
तो क्रॉस बदलून झेंड्यावर शिवरायांची राजमूद्रा असणार हा निर्णय गुजराती मोदीने घेतला.
अफजल खानाच्या कबरी भोवती भव्य दरगाह मराठी शांतीदूतांनी उभी केली होती,त्यावर चादरी टाकणे,फूल वाहणे,मन्ऩत करणे हे सर्व प्रकार चालू होते,
जेव्हा शिवप्रेमींनी ती दरगाह तोडण्याची धमकी दिली तेव्हा उद्धव ठाकरेंनी लगेच दरग्याह ला सुरक्षा पूरवली,
पण त्याच ठिकाणी गद्दार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनल्यावर त्यांनी सगळी दरगाह तोडून फक्त कबर शिल्लक ठेवली व तीथला सगळा गैरप्रकार थांबवला.
मित्रांनो यूटूब वर जाऊन लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी वेळी लिहल्याले "माझी मैना गावाकडे राहिली" हे गीत ऐका,
त्यात अण्णाभाऊ एका कडव्यात बोलतात की रावणाची जी अवस्था झाली होती ती स.का पाटलाची झाली आहे,
कोण होते बरं हे स.का पाटील ? मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष,
काँग्रेसच्या सरकारने अधिकृत घोषणा केली होती की मुंबईला केंद्रशासीत ठेऊ आणि सर्व मराठी काँग्रेसी लोकांचा त्याला पाठिंबा होता,
यामूळे "मुंबई सकट संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे" हा नारा लागला होता.
जरा ईतिहास वाचून बघा की संयुक्त महाराष्ट्राचा लढा नेमका दिला कोणा विरोधात होता.
भाजप जिंकली म्हणजे हुतात्म्यांचा अपमान झाला,संयुक्त महाराष्ट्राचा लढा वाया गेला,मराठी माणूस हरला वगैरा च्या गोष्टी जे फेकत आहेत त्यांना ईतिहासच माहित नाही मुंबईचा,
खरं म्हणजे तर ते महाराष्ट्रवादी सुद्धा नाहीत.
बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांच्यावर ज्यांनी जन्मभर टीका केली,
शिवसैनिकांच्या खळखट्याक ला जे लोकं हिंसात्मक चळवळ बोलायचे,शिवसैनिकांना सडकछाप गुंडे बोलायचे,लोकशाहि ला धोका म्हणायचे,बाळासाहेब हे मुंबईचे हिटलर आहेत असं म्हणायचे,
अशा सर्व पत्रकार,विचारवंत आणि परिचित चेहऱ्यांनी जेव्हा राज ठाकरे मोदी विरोध करू लागले आणि 2019 ला युती तूटली तेव्हा अचानक ठाकरे प्रेम,मराठी माणसाचा लढा या सर्व गोष्टींना स्वताची विचारसरणी म्हणून स्विकारलं.
नसता जोपर्यंत मुंबईतला परप्रांतीय काँग्रेसच्या बाजूने होता तोपर्यंत हे लोकं महाराष्ट्रवादी नव्हते.
आज मुंबई मुंबई करत जे रडत आहेत त्यांना ऐवढंच सांगेल की मुंबई सुद्धा तुम्हाला माहित नसती फक्त बॉम्बे माहित असता जर भाजप नसती.
ईतिहास माहित नसणाऱ्या आणि फक्त राजकीय स्पेस बघून विचारधारा बदलणाऱ्या लोकांनी अम्हाला मराठी भैय्ये,गुज्जू वगैरा काहीही म्हणून हिणवलं,
तरी आमची एकच स्पष्ट भूमिका आहे.
मला संभाजीनगर बोलणारा गुजराती चालेल पण औरंगाबाद बोलणारा मराठी व्यक्ती चालणार नाही,
चार मतांसाठी औरंगजेबाच्या कबरीवर फुले टाकणारा मराठी नेता नको पण छत्रपतींच्या समाधीवर डोकं टेकवणारा गुजराती नेता चालेल.
धर्मद्रोह करणाऱ्या मराठी गणोजी शिर्के पेक्षा अम्हाला शेवट पर्यंत धर्मासाठी हाल सोसणारा परप्रांतीय कवी कलश कधीही चालेल.
-विवेक मोरे
स्त्रोत: https://www.facebook.com/groups/314307681949215/permalink/2554670924828…
ताजमहाल मधे दर शुक्रवारी नमाज पठणाला परवानगी देणारे अटलबिहारी होते, संसदेवर हल्ला झाला तरीही पाकिस्तानवर कारवाई न करणे अटल बिहारी होते, सैन्याला बॉर्डर एलआरओस करू न देता चढाईवरील कारगिल ताब्यात घेण्यासाठी दबाव टाकणारे अटलबिहारी होते त्यामुळे कित्येक सैनिकांचा जीव गेला, अतिरेक्यांच्या दबावाने मोठमोठे दहशतवादी सोडणारे अटलबिहारी होते!
तसेच मदरसांना भरघोस मदत करणारे मोदी आहेत, फक्त हिंदुत्वाचा बुरखा पांघरला म्हणजे किणी हिंदूंचा तारणहार होत नाही, त्यासाठी कृती करावी लागते! औरंगाबादचे संभाजीनगर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या पाठींब्यावर २०२१ ला केले, (२०१४ ते १९ ला तथाकथित हिंदुत्ववादीनी खुर्च्या उबवल्या त्यांनी का केले नाही?) तेच नामांतर बदलून फक्त शाहरावहे नाव संभाजीनगर करून जिल्ह्याचे नाव औरंगाबादच ठेवणारे हिंदुत्ववादी होते का?
बाकी अटलबिहारीनी १९४२ ला इंग्रजाना माफीनामा लिहून दिल्याचे कुठेतरी वाचले होते हे खरे आहे का? खरे असेल तर तिला एकट्या सावरकरांवर का केली जाते?
ह्या प्रश्नांची उत्तरे हा विवेक मोर देणार का?
उत्तरे Bombay Scottish चे विद्यार्थी देतील.
ठाकरे मुळात आळशी आहेत. ह्यांना कष्ट न करता सत्ता पाहिजे असते. घेतली तर दिवसात एखादी सभा घेतात ती पण संध्याकाळी ऊन उतारली की. मुंबईत भावनिक मुद्दे मांडले नसते तर एवढेही नगरसेवक उभाटा गटाला मिळाले नसते. बाकी शहरांत तर उभाटा फिराकलेच नाहीत. विरोधकांनी राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी आणि राज्यात उभाटा कडे आशेने पाहू नये. अत्ता झालेल्या निवडणुकात कोणी किती सभा घेतल्या ह्याची आकडेवारी whatapp वर फिरत आहे. आकडे कदाचित चुकीचे असतील पन ट्रेंड मात्र सेमच असेल.
Fadanvis 33
Shinde 29
Ajit dada 25
Uddhav thakare 3
Raj thakare 4
Vijay vadettivar 25
सभा किती घेतल्या त्यावर मतदान होत नाही, फडणवीसांच्या सभान गर्दी कधीही नसते, मुंबईतल्या युतीच्या सभेतही गर्दी नव्हती, खुर्च्या रिकाम्या होत्या. निवडणूक आयोगाचा गैरवापर, हव्या तश्या मतदार याद्या बनवून घेणे, पुसली जाणारी मार्करची निशाणी ह्यामुळे शक्य असलेले डुप्लिकेट वोटिंग, ह्यासगळ्यासाठी मदत करणारी प्रशासकीय यंत्रणा, प्रचंड वाटला जाणारा पैसा नी ह्याकडे कानाडोळा करणारी सरकारी यंत्रणा सर्व होते म्हणून भाजपला मुंबईत इतक्या जागा नी अनेक पालिकेत सत्ता मिळाली! प्रामाणिक निवडणुका झाल्या असत्या तर भाजपला आपली लायकी कळाली असती.
सभा किती घेतल्या त्यावर मतदान होत नाही
कदाचित राहुल गांधीनचाही यावर विश्वास असावा. विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रसारख्या महत्वाच्या राज्यात केवळ चार सभा घेतलेल्या. मोदी एका फेरीत दोन सभा तरी घेत होते.
सभा आणि मिळणारी मत ह्याचा कांय असेल नसेल पण कोणता नेता किती कष्ट घेतो हे तरी ह्यावरून समजतं.
उभाटा मुख्यमंत्री असताना मंत्रलयात येत न येता घरून कारभार करायचे ह्याविषयी लिहिलं आहेच. कोण कला नगर ते मंत्रालंय प्रवास करणार त्यापेक्षा घरीचं बसा असं त्यांचं गणित असणार.
ठाकरे बंधूनी घेतलेल्या तीन चार सभा तरी का घेतल्या हे समजतं नाही. त्यापेक्षा संजय राऊंतांना अजून इंटरव्हिव्ह तरी द्यायला पाहिजे होत.
विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रसारख्या महत्वाच्या राज्यात केवळ चार सभा घेतलेल्या. मोदी एका फेरीत दोन सभा तरी घेत होते.तसे तर मोदी लोकसभेवेळीही फिरत होते पान काय मिळाल? प्रचंड मोठा पराभव झाला! नंतर मतदार याद्या बदलल्या, मतदार संघ पुनर्रचना केली, अनेकांची नावे उडवली. ईव्हीएम सेटिंग झाल्याचे आरोप झाले, अनेकांवर इडीच्या धाडी पडल्या त्याना पक्षात घेतले तेव्हा कुठे जाऊन विधानसभेला विजय मिळाला! नुसत्या सभांनी मोदीना यश मिळाले असते तर इतकी उठाठेव करायची गरज पडली असती का?
>> उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे, आदित्य ठाकरे, यांच्या सभा गाजल्या. निवडणूकीचे मुद्दे बिनतोड होते. अदानीने मुंबई गिळली पासून ते मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होतोय इथपर्यंत.....>>
पहिल्या प्रथम सांगायचं तर अगदी बाळासाहेबांपासून सभा गाजत आहेत, टाळ्या पडत आहेत. पण नेत्यांनी आणि पक्षाने काय केलं? कोणते आदर्श जनतेसमोर ठेवले ? बेळगांव प्रश्न, पाकिस्तानवर टीका, घराणेशाही बद्दल कॉन्ग्रेसवर टीका. हे तिन्ही गायब. मराठी शाळांतच मुलांना शिकवा दुकानांच्या पाट्या मराठीतच, बॉम्बे नको मुंबई म्हणा फक्त सभेत. बाहेर दुसरंच काही. मराठी माणसांनो { गिरणी कामगार - एका खोलीत चाळीत राहणारे लोक) तिथेच राहा मतं आम्हालाच द्या, अंबरनाथ बदलापूरला जाऊ नका हे सांगणे सोपं आहे. नवीन पिढी कशी राहणार? झुणका भाकर, वडापावचं काय झालं ? सध्या कोण या टपऱ्या चालवतात? चौपाटीवर भैयांना हाकलले तिथे मराठी भेळवाले आले का? ठाण्यात तळावपालीवर आले का? टाळ्यांची वाक्य बोलायची, एवढंच.
General Category Is New Jews | What's The Problem With BJP? | BIG Mistake!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #UGC_RollBack
सध्या मोदींच्या बाबतीत नवनवे वाद निर्माण होत आहेत असे दिसते.
नवा वाद : १२ जानेवारी २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांनी अहमदाबाद येथील आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात भगवान हनुमानाचा आकार असलेला एक मोठा पतंग उडवला. बाकी,अहमदाबाद चे नामांतरण अजुनही झालेले नाही.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #UGC_RollBack
अनारक्षित श्रेणी कोई कोटा नहीं… जनरल कैटेगरी पर SC-ST और OBC का भी अधिकार; SC का बड़ा फैसला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sapphire... Ed Sheeran
isn't it obvious?
मला कळत नाही जे ओपन कॅटेगरी म्हणजे सगळ्यांना ओपन असा अर्थ होतो तर हा निर्णय म्हणजे जे अतिशय ऑब्वियस आहे तेच सांगणे? यात नवीन काय आहे?
एखाद्या ST मुलाला ९५ टक्के मार्क पडले आणि समजा सगळ्या मुलांच्यात त्याचा क्रमांक पाचवा आहे तेव्हा त्याला ओपन मधूनच प्रवेश दिला जातो जोवर पाहिले ५० टक्के लोक भरत नाहीत तोवर?
duh!!!
आरक्षित वर्गातील व्यक्तीने कुठलीही सवलत, जसे वय, फी ई. घेतली नसेल तरच त्याला अनारक्षित वर्गातून प्रवेश घेता येईल अशी ह्यात गोंधळात टाकणारी अट घातली आहे.
असे असू शकेल की जनरल कॅटेगरी न भरल्यास इतर राखीव जागांसाठी लायक उमेदवार तिथे भरती केले जाऊ शकतात. जनरल कोटा असे काही नाही. म्हणजे एक्सक्लुसिव जनरलच उमेदवार मिळेपर्यंत ती जागा भरताच येणार नाही असे नव्हे. (किंवा अन्य शब्दात: इतर राखीव चालणारच नाहीत असे नव्हे)
नाही. आरक्षण सवलत न घेणाऱ्यांसाठीच आहे.
गुणवत्ता हाच निकष.
General Category Is New Jews | What's The Problem With BJP? | BIG Mistake!अनारक्षित श्रेणी कोई कोटा नहीं… जनरल कैटेगरी पर SC-ST और OBC का भी अधिकार; SC का बड़ा फैसलाहं.
हिंदू, सवर्ण, सुशिक्षित, शहरी, तरुण, पुरुष नागरिक हा चढत्या क्रमाने संघ-भाजपच्या हिटलिस्ट वर आहे.
अटी नीट समजून घ्या. अनारक्षित वर्गाला काहीच धोका नाही. योग्य निर्णय आहे. आरक्षण नको असेल एखाद्याला तर काय गैर आहे.
अटी नीट समजून घ्या. अनारक्षित वर्गाला काहीच धोका नाही. योग्य निर्णय आहे. आरक्षण नको असेल एखाद्याला तर काय गैर आहे.आरक्षण कसे लागू होते याचा तपशील माहीत नाही; पण सध्या तरी तुम्ही म्हणता त्या वरील ठळक भागात तथ्य वाटते आहे.
अनारक्षित वर्गाला काहीच धोका नाही. योग्य निर्णय आहे. आरक्षण नको असेल एखाद्याला तर काय गैर आहे.
होय. मान्य आहे. माझ्या डोक्यात डबल बेनिफिट असा समज होता. परत समजवुन घेतले. धन्यवाद.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sapphire... Ed Sheeran
UGC vs Upper Caste Students: Ajeet Bharti Replies To Absurd IT Cell Defence
अजित भारती यावेळी बोलतं आहे,मनात काही ठेवत नाही.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sapphire... Ed Sheeran
नवा विद्यापीठीय कायद्याबद्धल ही एक पोस्ट वाचण्यात आली -
तुमच्याच मुद्दयाचे तुम्हाला स्पष्टीकरण देतो... कायदेशीर भाषा चुलीत टाका. एक सोपे प्रकरण सांगतो... एक मुलगी आहे. तिला एका मुस्लिम ओबीसी मुलाने छेडले / विनयभंग केला , तिचे शेकडो विद्यार्थ्यांच्या समोर स्तन दाबले. तिने संतापून त्याच्या कानशिलात भडकावली.
त्या मुलाने तिच्या विरुद्ध नवीन UGC- 2026 कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली.
परिणाम ???
तिचे तत्काल निलंबन होईल. अर्थात ती निर्दोष सिद्ध होईपर्यंत परत कॉलेज मध्ये जाऊ शकणार नाही. तिच्या शिक्षणाचे होणारे नुकसान कोण भरून देणार आहे ?
ज्याने तक्रार दाखल केली त्याने चार त्याचेच ओबीसी मुसलमान मित्र साक्षीदार म्हणून उपस्थित केले. परंतु कॉलेज च्या सी सी टी व्ही मध्ये त्याने तिचे स्तन दाबले आणि मग तिने कानशीलात भडकावली हे दिसून येते. त्यामुळे कॉलेज चे प्राचार्य आणि महिला प्राध्यापिका मुलीची बाजू योग्य आहे असे म्हणतात.
परंतु जी समिती बनवली आहे त्यात एक पण सवर्ण नाही, ती समिती पूर्वार्ध जाणीव पूर्वक विचारात घेत नाही आणि त्या मुलीला दोषी ठरवते आणि तिला रस्तिकेट केले जाते अर्थात तिचे शिक्षण संपले.
दुसरीकडे तो मुलगा आता प्राचार्य आणि महिला प्राध्यापिकांच्या विरोधात तक्रार दाखल करून त्यांना सुद्धा निलंबित करवू शकतो.
त्यामुलीने विनयभंगाची तक्रार पोलिस चौकीत दाखल केली तरी या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस काहीही हालचाल करणार नाहीत.
जर ती न्यायालयात गेली तर स्तन दाबणे हा विनयभंग होतो किंवा नाही ? यावर वकील 2 वर्ष लढू शकतात आणि सध्या जे निर्णय येत आहेत त्यात स्तन दाबणे म्हणजे विनयभंग नाही असा निकाल 10 वर्षांनी एखाद्या न्यायालयाने दिला तरी नवल वाटायची गरज नाही.
तिसरीकडे या प्रकरणातून बेमालूम सुटल्यामुळे नंतर तो ओबीसी मुसलमान मुलगा आणि त्याच्या मित्रांनी रोज मुलींचा विनयभंग केला बलात्कार केला तर त्यांना कोण थांबवणार आहे ???
आणि तक्रार खोटी सिद्ध झाली तरीही त्या मुलावर काहीही कारवाई होणार नाही आहे. तक्रारदाराला खोटी तक्रार केली तरीही अभय दिले गेले आहे.
UGC कायदा संविधानाच्या मूलभूत पायाचे दगड काढतो आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या...
यात नैसर्गिक न्याय तत्व पायदळी तुडवले जाते आहे.
यात आरोपीवर तो निर्दोष असल्याचे स्वतःच सिद्ध बंधन घातले जात आहे.
आरोपीची बाजू ऐकून घेणार्या मंडळीत सगळी फिर्यादीच्या जातीची माणसे बसली आहेत.
आणि आरोपी निर्दोष आहे हे सिद्ध होईपर्यंत शिक्षण या मूलभूत हक्काला मुकणार आहे.
जरी तो निर्दोष आहे हे सिद्ध झाले आणि फिर्यादी खोटा आहे सिद्ध झाले तरी फिर्यादीला काहीही शिक्षा नसल्याने तो आरोपीचे रोज कॉलेजला येणे किती कठीण करू शकणार आहे हे समजून घ्या...
वकील झाला म्हणून व्यवस्थेचे गुलाम होऊ नका...
UGC 2026 कचरा कुंडीत फेकून देणे... 26 जानेवारी 1950 साली घटनाकर्त्यांनी ज्या पद्धतीची न्यायमूर्ती नेमणूक पद्धती ठरवली होती तिचे पुंनरुज्जीवन आणि UGC 2026 सारखा भिकारडा नियम बनवणार्या जज वर महाभियोग येईपर्यंत शांत बसायचेच नाही....
आता मुसलमान ओबीसी हे काय प्रकरण आहे ? असे विचारू नका हा भाजपा वाल्यांचाच पराक्रम आहे
स्त्रोतः
https://www.facebook.com/100081508882716/posts/pfbid0NNN8PMY4PnCk6BfY6D…
तिने ताबडतोब उच्च न्यायालयात रीट अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. असे झाल्यास एक तर तो सीसी टी व्ही चे रेकॉर्डिंग न्यायालयात सुरक्षित राहील
शिवाय ugc कायदा हा मूलभूत हक्काच्या वर जात नसल्याने त्या मुलीवर होणाऱ्या पुढील कार्यवाहीला( निलंबन किंवा तत्सम) न्यायालय ताबडतोब स्थगिती देऊ शकेल
याशिवाय त्या मुलावर विनयभंगाची तक्रार दाखल होऊ शकेल शिवाय त्याच्या चार मित्रांनी खोटी साक्ष दिल्याबद्दल त्यांच्या वर पण कार्यवाही होऊ शकेल.
असे झाल्यास कायद्यातून पळवाटा काढणार्यांना चाप नक्की बसू शकेल.
यु जी सी २०२६ कायदा काय आहे ते यात आलेले नाही, त्यामुळे आधी ते स्पष्ट करावे ही विनंती.
University act 2016
Gives powers to University authorities against ragging of students in....
Section 23 (d)
And
Section 56 (g)
And
Section 73 (9)
सविस्तर नियम येथे वाचायला मिळतील. (दुव्यावर थेट पीडीएफ फाईल उघडेल.)
आणि हे सुद्धा वाचा.
-दिलीप बिरुटे
वाचतो.
१.खटले लढले जातील ते प्रथम विद्यापीठाच्या नियम अटी कायदे यांवर. मानसीक छळणूक फक्त.
२. जिथे छळणूक झाली आहे आणि मृत्यूही झाला आहे तिथे पोलिस थेट हस्तक्षेप करतात भारतीय दंड विधान लागू होते.
३. वाच्यावरतीही भारतीय घटनेतील आल्यावरही आपला लंडनला जातो. व्यक्तिगत स्वातंत्र्य, जातपात धर्म यांची करणे.
संबंधित विद्यार्थ्यांना कॉलेज सोडायला भाग पाडणे आणि त्यातून मुक्त होणे हाच सोपा मार्ग अवलंबला जातो.
दुरुस्ती
१.खटले लढले जातील ते प्रथम विद्यापीठाच्या नियम अटी कायदे यांवर. मानसीक छळणूक फक्त.
२. जिथे छळणूक झाली आहे आणि मृत्यूही झाला आहे तिथे पोलिस थेट हस्तक्षेप करतात भारतीय दंड विधान लागू होते.
३. याच्यावरतीही भारतीय घटनेतील कलमांवरही खटला लढवला जातो. व्यक्तिगत स्वातंत्र्य, जातपात धर्म यांची कलमे.
संबंधित विद्यार्थ्यांना कॉलेज सोडायला भाग पाडणे आणि त्यातून मुक्त होणे हाच सोपा मार्ग अवलंबला जातो.
>> तिचे तत्काल निलंबन होईल. अर्थात ती निर्दोष सिद्ध होईपर्यंत परत कॉलेज मध्ये जाऊ शकणार नाही. तिच्या शिक्षणाचे होणारे नुकसान कोण भरून देणार आहे ? <<
तिच्यावर अन्याय झाला आहे तिला सहानुभूती. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे.
मात्र तिचे निलंबन तिच्या पथ्यावरच पडणार आहे कारण विद्यापीठातले शिक्षण कुचकामी आहे. आणि येत्या १० १२ वर्षात त्या शिक्षणाला किती महत्त्व राहील हे देवालाच ठाऊक.
ज्ञान मिळवण्यासाठी कोणत्याही शिक्षण संस्थेची गरज आता राहिली नाही. समजा या शिक्षणात तिला प्रयोगशाळांची गरज लागणार असेल तर अशा प्रयोगशाळा कोणालाही भाडेतत्त्वावर मिळू शकतील अशी व्यवस्था झाल्यास या विद्यापीठ किंवा शाळा नामक तुरुंगांची गरज राहणार नाही.
१. अभ्यासक्रम स्वतः सोडून देणे वा तो अभ्यासक्रमाला मुळात प्रवेशच न घेणे
आणि
२. त्या अभ्यासक्रमातून स्वतःची काहीही चूक नसताना (खरंतर स्वतःवरच अन्याय झालेला असताना) निलंबन होणे
या दोन बाबींत १८० अंशाचा फरक आहे. त्यामुळे
हे विधान त्या मुलीवर झालेल्या अन्यायाचे, त्या मुलांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे, तसेच असे जिझिया कायदे करणाऱ्या शासन व्यवस्थेचे trivilization करते व गंभीर गुन्हा व अन्यायाच्या घटनेच्या चर्चेला अगदी अयोग्य वळण देते.
१.नर्सिंग होम काढण्यासाठी एचडी डॉक्टर असावा लागतो हा एक नियम झाला.
२.पण पैसेवाले किंवा एमडी नसलेले लोकही एक व्यवसाय म्हणून नर्सिंग होम काढतात आणि एका एमडी डॉक्टरास नोकरीवर ठेवतात. अधिकार / प्रमुखपद त्याच्या नावावर.
३. एक मोठी जागा घेऊन त्यात एमडी,एमएस भाडेतत्त्वावर ठेवतात. कुठेही कसलीही पाटी, सर्टिफिकेट लावलेले नाही, पैसे पूर्णपणे रोखीने घेऊन सेवा देतात अशीही हॉस्पिटले(!) आहेत. केवळ धंदा.
मात्र तिचे निलंबन तिच्या पथ्यावरच पडणार आहे कारण विद्यापीठातले शिक्षण कुचकामी आहे.
अनाठायी प्रतिसाद
सुबोधजी, तुम्च्या सारख्या मेडिकल डीग्रीचा किंवा काही मोजके अपवाद वगळता चारी बाजूला पाहा, काही ठराविक म्हणजे अगदी मोजक्याच स्टेम बेस्ड डिग्री वगळता सर्व शिक्षण निव्वळ बेकार आहे. त्यासाठी कुणालाही कॉलेजचा एकही रुपया भरायची गरज नाही. अगदी इंजिनियरिंगचे शिक्षण घेण्यासाठी सुद्धा कॉलेजची पायरी चढायची गरज नाही.
काही वर्षांनी शिक्षण संस्था कालबाह्य होतील असे मला वाटते.
सुबोधजी, तुम्च्या सारख्या मेडिकल डीग्रीचा किंवा काही मोजके अपवाद वगळता चारी बाजूला पाहा, काही ठराविक म्हणजे अगदी मोजक्याच स्टेम बेस्ड डिग्री वगळता सर्व शिक्षण निव्वळ बेकार आहे. त्यासाठी कुणालाही कॉलेजचा एकही रुपया भरायची गरज नाही. अगदी इंजिनियरिंगचे शिक्षण घेण्यासाठी सुद्धा कॉलेजची पायरी चढायची गरज नाही.
काही वर्षांनी शिक्षण संस्था कालबाह्य होतील असे मला वाटते.
हे आपले वैयक्तिक मत आहे.
पदवीमध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम कितीही निरुपयोगी असला तरी कोणत्याही नोकरीसाठी एक किमान पात्रता म्हणून पदवी आवश्यक असते.
व्यवसाय करताना सुद्धा आपल्याला त्यात कितीही ज्ञान असले तरी कागदोपत्री पदवी आवश्यकच आहे.
आपल्याकडे पदवी नसली तर लग्नाच्या बाजारात आपल्याला बारावी पास म्हणून बहुसंख्य स्थळे नकारच देतील.
श्रीगुरूजी मिपावर असते तर मुंबई शिवसेनेच्या हातातून गेल्याबद्दल त्यांना अपार दुःख झाले असते.
जातियवादी भाजपाच्या विरोधात सोशल मिडियातील आवाज मोठा झाल्यावर आता मेनस्ट्रीम मिडिया [ न्यूज चॅनल्स ] ने UGC च्या बद्धल बोलण्यास सुरु केले आहे.
या विषयावर अधिक जाणुन घेण्यासाठी द अभिषेक तिवारी शो या युट्युब चॅनलवर नेहा दास यांची मुलाखत घेण्यात आलेली आहे, ती पाहण्या सारखी आहे. तसेच नेहा दास यांच्या एक्स हॅडलवर या विषयावर त्यांनी केलेल्या पोस्ट माहितीपूर्ण आहे.
सवर्ण बच्चे क्यों जाएँगे जेल?Dharmendra Pradhan | Narendra Modi | Neha Das |The Abhishek Tiwary Show
झी न्यूजः
DNA: UGC के नए नियम से समानता या भेदभाव ज्यादा? University Grants Commission
रिपब्लिक भारतः
UGC Guidelines 2026: SC/ST और OBC पर UGC की नई गाइडलाइन से क्यों नाराज छात्र? जनरल कैटेगरी का अंत!
जाता जाता: Odisha SDTE panel approves 11.25% SEBC quota, raising SC/ST seats in tech, med courses
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kya Miliye Aise Logon Se... Izzat (1968 )
महाराष्ट्रात विवास्पद कारकीर्द सांभाळलेले, महापुरुषांबद्दल काहीच्या काही बोलून चर्चेत राहिलेले आणि अख्खा महाराष्ट्र साखर झोपेत असतांना पहाटे शपथविधीस उपस्थित झालेले माजी राज्यपाल कोश्यारी यांना आज पद्मभूषण देऊन गौरवण्यात् आले.
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
माझा ह्या पुरस्कारावरून विश्वास उडाला आहे! नीतिमत्ता वगैरे काही असते की नाही?
कोश्यारी आणि धीरेंद्र या दोघांना पद्म पुरस्कार म्हणजे अवघड आहे. पण आताशा इतक्या नैतिक पडझडीचे आश्चर्यही वाटत नाही. तथापि इथे कोणी या दोघांचे समर्थन करणारे असतील तर त्यांचे मत वाचायला आवडेल.
एकदा अंधभक्त टैग लागला की बलात्काऱ्यांचेही समर्थन करतात!
माजी राज्यपाल कोश्यारीला ( महात्मा फुले आणि पत्नीस हिडीस पद्धतीने वक्तव्य फेम) - पद्मभूषण
धीरेंद्र शास्त्री - भारतीय गणवेशधारी सैनिकांची सलामी
बेशक मंदिर मस्जिद तोडो बुल्लेशाह ये कहता ...
भारतात बुल्लेशाहची प्रतिकात्मक थडगे उखडले
अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिन माफ़ करना भाईयों,
हात तर दोनच
आणि त्यातला डावा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांxवर
म्हणून फक्त
उजव्या हाताने सलाम,
सलाम, सबको सलाम
भाईयों और बेहेनों, सबको सलाम.
कवी - मंगेश पाडगावकर
बारामती इथं झालेल्या विमान अपघातात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झालं आहे. विमान लँड होत असताना झालेल्या या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. अजितदादांच्या अपघाती मृत्यूने महाराष्ट्र सुन्न झाला असून सर्वांनाच धक्का बसला आहे.
अजित पवार हे आज सकाळी आपल्या काही सहकाऱ्यांसह मुंबईहून बारामतीकडे येत होते. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादा हे सभेसाठी बारामतीला येण्यासाठी निघाले होते. मात्र बारामतीत पोहोचल्यानंतर विमान लँड होत असताना ते कोसळले. या अपघातात अजित पवारांसह इतर तीन जणांचा मृत्यू झाला. विमान अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर अजित पवार यांच्यासह इतर जखमींना बारामतीतील रुग्णालयातच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु तत्पूर्वीच त्यांच्या प्राणज्योत मालवली होती
अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली
इथे असलेल्या प्रत्यक्षसाक्षी महिलेने विमान धावपट्टीवर चिकटल्या नंतर स्फोट झाल्याचं सांगितलं आहे : https://www.loksatta.com/maharashtra/ajit-pawar-death-plane-crash-timel…
वरील बातमीनुसार :
यावरनं विमानातच ध्वंस्फोटक ( बॉम्ब ) असावासं वाटतं. पोलिसांना माहिती असेलंच.
-गा.पै.
यांना प्रत्येक अपघात हा घातपात दिसतो
प्रत्येक दुर्घटना ही सुरुवातीला घातपात म्हणूनंच धरायची असते. नंतर पुरावे मिळतील वा न मिळतील त्यानुसार धारणा बदलायची असते.
-गा.पै.
ते बरोबर असेल पण तुमचा एकंदर जालीय वावर पाहता तुम्हाला मुळ शंकेला चिकटून राहायचे आणि त्याभोवती नवनवीन थिअरीज मांडायचे आकर्षण जास्त आहे असे दिस्ते.
गामा, जर हा घातपात असेल तर कुणी केला असण्याची शक्यता आहे असे तुम्हाला वाटते?
खरेतर सर्व महाराष्ट्राला हा घातपात आहे याची शंका आहेच.
cui bono ? हा प्रश्न विचारायचा. इंग्रजीत ह्यास 'who benefits ?' असं म्हणतात.
तर दादांच्या जाण्याने कोणाचा फायदा होणार आहे, हा प्रश्न विचारला पाहिजे. निदान सुरुवातीस तरी या प्रश्नाच्या उत्तराकडे संशयसूची वळणार. पुढचं पुढे.
-गा.पै.
विमानांसाठी एकच इंधन न वापरता दोन वेगळी हवीत. इंधन अ आणि ब वेगवेगळे काहीच धोकादायक नसणारे पण दोन्ही एका जागी आणल्यावर जळणार असं काही स्पेस रॉकेटांत वापरतात तसं.
आज दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्यासहित एकूण पाच जणांनी या अपघातात प्राण गमावले.
अपघातातील मृतांना श्रद्धांजली. ॐ शांती.
---
या विमान अपघाताची चौकशी होईलच. पण इथे मिपावर श्री गवि यांनी त्यासंबंधी लेख लिहावा, चर्चा सुरू करावी अशी अपेक्षा आहे.
आज सकाळी अचानक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची बातमी आली आणि धक्का बसला. विश्वास बसला नाही. नेमकं काय झालं हे कळण्यापूर्वीच धक्कादायक बातमीत दमदार नेत्याच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला. दिवसभर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. प्रशसनावर जबर पकड, तळागाळातील कार्यकर्त्याचा कायम गोतावळा, आणि शरद पवारांच्या तालमीतून तयार होऊन महाराष्ट्राच्या राजकारणात आपली एक वेगळी छाप निर्माण केली. जाती-मातीच्या गटा-तटात मात्र अलिप्त राहिले असे वाटते. सर्वसमावेशक गोतावळा ही अजिदादा पवारांची ओळख महाराष्ट्रात झाली होती. एका दुर्दैवी विमान अपघातात काळाने त्यांना आपल्यात ओढून नेले. महाराष्ट्राच्या राजकारण-समाजकारणात दादा आपली आठवण कायम राहील.
महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यास भावपूर्ण आदरांजली. 😌🙏
-दिलीप बिरुटे
अजितदादाना भावपूर्ण श्रद्धांजली!
महाराष्ट्राला न लाभेलेल सर्वोत्तम मुख्यमंत्री असे अजितदादांबद्दल म्हणता येईल, दादा मुख्यमंत्री बनावेत अशी सुप्त ईच्छा मनात होती!
सभेतील हजरजजाबीपणामुळे ते अनेक विनोद करायचे, आताच झालेल्या pcmc महापालिकेच्या निवडणुकीवेळी त्यांनी कुत्र्यांच्या नसबंदी वर झालेल्या भ्रष्टाचारावर, “ती कुत्री काय म्हणत असतील?” अशी भाषणात केलेली मिश्किलीची रील व्हायरल झाली होती त्यावर खळखळून हसू आले होते, प्रचंड फिरणारे अनेक सभा घेणारे म्हणून अजितदादा माहीत होते. सकाळीच एक सहकाऱ्याने अजितदादांच्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी वाचून सांगितले, तेव्हा छोटामोठा अपघात झाला असावा असे वाटले पण नंतर अपघाताचा फोटो पाहून चर्र झाले, नी थोड्याच वेळात बातमी आली. काही नेते विचारांच्यापलीकडे जाऊन आपले झालेल असतात हे ते गेल्यावरच कळते! दादाना भावपूर्ण श्रद्धांजली! _/\_
दादांना श्रद्धांजली.
( पूर्व मिपाकर कै• वरुण मोहीते यांच्याशी दादांची दोस्ती होती.)