जनातलं, मनातलं

१५ ऑगस्ट चा दिवस

Primary tabs

तुझ्या रुपात मन कैद माझे झाले. तो कविता वाचत होता. "गप रे" ति वैतगली होति. जरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत.. बाबा मागे लागलेत लग्नासाठी..ति म्हणाली माझा हो कळव.. तो हसत म्हणाला.. अन काय कळवणार? तुला ना नोकरी, ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि......ति सिरियस् झाली होति अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम, एक मेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न.....तो वेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार, म्हणजे घर, दुध, किराणा, मुल, म्हणजे पैसा..ति म्हणाली हातात हात तुझा, अन तुझी साथ. पैसा ये‌इल. येतो. तो म्हणाला पैसा म्हणजे परसातल प्राजक्ताच झाड नाहि. हालवल कि फुलांनी आंगण भरुन जात..तिन फटकारल.. अग पण, तो बोलायच्या आतच ति म्हणाली.. पैसा कि प्रेम हा वाद विवाद कालबाह्य आहे.. प्रेमाच्या जागी प्रेम आहे, अन पैसा त्याच्या जागि. तु मल खुप आवडतोस.. पण तु मला विचार करुन निर्णय दे. तिन अल्टिमेटम दिला.. १५ ऑगस्ट चा दिवस होता आज खिशात पैसे होते. दिवस तिच्या बरोबर मजेत घालवायचा होता. त्यान तिला फोन केला. बर झाल, फोन केलास,मला पण तुझ्याशी बोलायच आहे.ति म्हणाली. नो प्रोब्लेम.. ताज मधे भेटु. काय?.. ति उडालीच. ताज च्या थंडगार वातावरणात, ति सुखावलि होति. मग काय ठरल?.तिन विषयाला हात घातला. तो बोलतच नव्हता. मी थांबु शकत नाहि...हि आपली शेवटची भेट.. तिच्या बोलण्याला धार होति.. तो आतुन तुटत चालला होता..प्लिज.. अरे प्लिज काय? सारच कठीण आहे... बाबांचि तब्बेत् बरी नसते..ति म्हणाली. मी निघते? ..प्लीज थांब, मला एक संधी दे..तो म्हणाला. तु फक्त एक वर्ष दे मला, तुल पाहिजे तेवढा पैसा देतो...तो म्हणाला. ति खळखळुन हसली." वेडा रे"अरे पैसा म्हणजे?... आय नो. तु काय् म्हणणार्... त्यान वाक्य तोडल."किति पैसे लागतात संसाराला? लाखो रुपये ति म्हणाली.. ठीक आहे. एक डिल.तो म्हणाला. आपण पुढच्या १५ ऑगस्ट ला आपण इथच, ताज मधे,संध्याकाळी. ७ ला भेटु. अन काय करु..तिन विचारल.. मी त्या दिवशी तुझ्या पायावर ७५ लाख रुपये ओतिल...तुला संसारा साठी. त्या चित्रपटांत हिरो हिरॉ‌इन ला नोटांनी अंघोळ घालतो तशी.अंघोळ घालीन... तो हसत म्हणाला. "मॅड आहेस." कुठुन् आणनार् एवढे पैसे?? तिने विचारले... ते तु माझ्यावर् सोड्..काहिहि करिन्.... पण वचन दे, वाट पहाशील म्हणुन.. तो म्हणाला. ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली. स्ंधि दिली आहेस्..ठिक् आहे आता पुढच्या १५ ऑगट् पर्य्ंत् एकमेकाला भेटायचे नाहि,,,फोन् नाहि..भेट् थेट् पढच्या १५ ऑगस्टला १५ ऑगस्ट.. तो तिचि ६ वाज ल्या पासुनच वाट पहात होता. तेच टेबल होत, मागच्या वर्षीच, ति ये‌इल? तो अस्वस्थ होता ७ वाजायला आले होते, अन तेवढ्यात ति आत येताना दिसली. तिच्याशी नजरानजर होतच त्यान हात हलवला. हाश हूश करत ति समोरच्या खुर्चीवर बसली. कशी आहेस? फार गरम होत आहे. पहिल पाणी पिते. म्हणत उठुन ति त्याच्या समोरच्या ग्लास घ्यायल वाकली.. ति वाकली असताना, त्याला ब्ला‌उज मधे लपवलेल्या मंगळसुत्रचा पदर दिसला. अग मी मागवतो असे म्हणेपर्यंत तिन ग्लास तोंन्डाला लावला होता. अरे फार पाणी पाणी झाल होत.. हं आता बोल.ति उत्सुकतेने म्हणाली काय बोलु? तुच सांग. तिच्याकड बघत तो म्हणाला. मग काय? कुठे आहे ७५ लाख? ति हसत म्हणाली.. त्याचा चेहेरा पड्ला होता., नाहि जमल, तु म्हणालीच तेच खर. ७५ लाख काय ७५ रु जमले नाहि. पैसा मिळवण कठिण आहे.. जा‌उ देत, मला माहित होत, ...ति समजावणीच्या स्वरांत म्हणाली. मल पण तसच वाटत होते. मी तर् खर् येणारच् नव्हते.. पण म्ह्टल तुला शब्द दिला होता...ति तो बघत होता..अजुन काय? पडलेल्या चेहे~यानि तो म्हणाला. सांगु ति म्हणालि.. अरे माझ लग्न झाल, घरचे मागे लगलेच होते. तो बॅन्केत आहे, १ बेडरुम च घर आहे... तुझ अस.. ति म्हणाली. सॉरी.मला माफ् कर्... तुझ खर आहे., तु ठीकच केल, माझ्याबरोबर कसला स्ंसार्..मी कवि.भड्ंग् माणुस्.... तुझ् आयुश्य् वायाच गेल असत...तो अपराधिपणाने म्हणाला ठीक आहे. मी निघते, तुला आता अस भेटण बर नाहि...ति. बरोबर आहे......तो... निघते.. ति म्हणाली.. तो तिच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता.. तो बराच वेळ तो बसुन होता. सार संपल होत. रुम च्या नोकरानि टॅक्सीत सामान भरल.. सर कुठे? टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले. सहारा एयर पोर्ट. ईंटर नॅशनल टर्मीनल. टॅक्सी वेगात चालली होति, गार हवेच्या सपक्यान डोक शांत होत होत. विमान तळावर टॅक्सी थांबली, त्यान ट्रॉलीत लगेज भरल.व भाड देवुन तो निघाला, सर.......,टॅक्सी ड्रायव्हर ने हाक मारली, सर, तुमची बॅग राहिली आहे, त्यान टॅक्सी ड्रायव्हर कड बघितल, अन म्हणाला बॅग तुला राहु देत, त्यात ७५ लाख रुपये आहेत. नाहितरी, मला आता त्याचा काहिच उपयोग नाहि,..अस् म्हणत् तो निघला ड्रायव्हर बराच वेळ त्याच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता [जुन्या कथेच्या आधारे.]
अमोल खरे

सही कविता. फक्त शेवट करुण नका ठेवत जाऊ हो. कवितेतील फॅक्ट खरी असली, जरी ९० % केसेस मध्ये असंच घडतं असलं तरी खोटं खोटं वाचायला बरं वाटतं.

दशानन

ज ब रा !

एक चुक केली त्याने तिच्या एक मस्त पैकी श्रीमुखावर वाजवायला पाहीजे होती एक थप्पड !

अश्या प्रेमवीरांना आमचा सलाम !

प्राजु

अश्या प्रेमवीरांना आमचा सलाम !

राजे, तुम्ही हात कायम कपाळाच्या एका कोपर्‍यात ठेऊनच असता काहो... प्रेमभंग, दिसला की लगेच सलाम !!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दशानन

=))

मी स्वतःला इमॅझीन करुन बघितला =))

कविता छान आहे.... पण आपली आहे का??? राजे ने दिलेला दुवा पण पाहीला...
लेखकाने पुढे येवुन खरे काय ते सांगावे ही विनंती

मी हि कविता फार पुर्वि म्हनजे ०६/०५ च्या सुमारास लिहिलि.. ति मराठी कविता व नंतर ३१/०३/०७ ला मराठी कवि ह्या ऑर्कुट कम्युनिटी येथे प्रथम प्रसिध्ध केली...मी त्या कम्युनिटी वर अनेक कविता लिहिल्या आहेत....त्या पैकि हि कविता महाराष्ट्र .कॉम त्यांनि ज्या अनेक कविंच्या कविता प्रसिध्द केल्या तशि हि पण केलि आहे...आपण त्यांना तसे विचारु शकता....आपण मराठी कवि ह्या वरच्या माझ्या कविता वाचल्यावर आपणास हे लक्षात येईल...अर्थात.माझ्या कविता आवडतिल असे मी म्हणु शकत नाहि...काव्यांजली व कवितेचे गाव या ऑरकुट कम्युनिटी वर मी कविता लिहितो....आपण त्या कविता वाचुन मी १५ ऑगस्ट सारखी कविता लिहु शकतो की नाहि ते ठरवा.किवा काथ्याकुट करा...कविता माझीच आहे मग मी माझ्या ब्लोग वर ज्या शेकडो कविता आहेत तर हि पण टाकणारच ना.......या पेक्षा मी आणखीन काय लिहु???

http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=21189521&tid=252390587762…

संपादक मंडळ...... ध्न्यवाद..न्याय मिळाला..मळभ दुर झाले..आभारी आहोत <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P

नरेश_

ही कथा आहे की कविता ?
असो. जे काही आहे ते उत्तमच आहे.

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)