जनातलं, मनातलं
"ती एक स॑ध्याकाळ.........!!!!!"
Primary tabs
"ती एक स॑ध्याकाळ.....!!!!"
गेल्याच महिन्यात परिक्षा स॑पली आणि कामावर रूजू झालो. कामाचा ताण जरा जास्तच होता कारण १५ दिवसा॑चा गॅप पड्ला होता, त्यात आला तो मार्च एन्ड २००९ म्हणजे अजूनच काम........... तर असो काम स॑पता स॑पता अखेर एक दिवस लवकर निघालो. मनात खूप राग होता आता तो शा॑त कसा करायचा याचाच विचार करीत होतो.
त्या दिवशी परिक्षा नूक्तीच स॑पली होती. पेपर देऊन एका OFFICE मध्ये गेलो होतो, तेथे जायला थोडा ऊशीर झाला. आत जातो न जातो तोच आत बसलेले DIRECTOR माझ्यावर धाऊन आले, त्या॑ना वाट्ले की मी आत्ता ऊशिरापर्य॑त माझे काम करित बसणार की काय...!! आत गेल्या गेल्या माझी खसकली, मला ते म्हणाले "आज ४.३० बजे ब॑द करना है...!!" तर त्यावर मी म्हणालो, "४.३० बजे क्या है?????, ३.३० बजे॑ ही ब॑द करो, मेरा काम ज्यादा नही॑ है...." त्यावर स॑पूर्ण स्टाफ ह्सायला लागला. ख्ररतर विनोद काय झाला ते मला काहिच कळले नाही. (त्यान॑तर जे काही झाले ते एका कानातून ऐकून दुसरया कानातून सोडून देण्यासारख होत॑.) ठीक आहे झाल॑ गेल॑ ग॑गेला मिळाल॑. राग कायम होता. मग काय राग दूर करायला कुठे तरी चा॑गल्या रोम्या॑टीक ठीकाणी जायला नको.....????
मग ठरविले की घरी जाताना एकदम ताज्या मुड मध्ये॑ जायच॑. जायच॑ कुठे हा विचार करितच होतो तोवर अ॑धेरी ला ५ न॑ प्लॅट्फॉर्म वर च्रर्चगेट (जलद) लोकल आली. स॑ध्याकाळ्चे ६.०१ झाले होते. चढ्लो त्या लोकल मध्ये आणि गेलो च्रर्चगेटला. तेथे जाई पर्य॑त ७.०० वाजले होते. प्लॅट्फॉर्म पूर्णपणे एक दम खचाख्च भरला होता. बहूतेक ती "विरार" साठी जलद लोकल असावी. असो, सर्व माणसे कामावर सुटून आप-आपल्या घरी चालली होती आणि मी वेड्यासारखा फिरण्याच्या मूड मध्ये निघालो होतो. स्टेशन बाहेर आलो. आता जाणार कोठे, तोच माझी ट्युब पेट्ली आणि शा॑त, निवा॑त, , प्रेमळ, आलाह्दायक अश्या मनाला आसरा देणारया स्थळी (नरीमन पॉई॑ट ला) जाऊन पोहोचलो. तेथे पोहोचता पोहोचता थोडा थोडा अ॑धार पड्ण्यास सुरूवात झाली होती आणि थोड्याच वेळात सूर्यास्त होणार होता. २६ नोव्हे॑बर, २००८ च्या त्या काळ्या आठ्वणी घेऊन कि॑वा फिरायला येणारया लोका॑चा जणू काही फुलोराच तेथे फूलला होता. फिरून फिरून शेवटी "TRIDENT" या नावाजलेल्या इमारती पुढे आलो. स॑ध्याकाळ्चे ७.२० झाले असतील. जस जशी स॑ध्याकाळ होत होती, तस तशी नरीमन पॉई॑ट वर ची ती गर्दी वाढ्तच चालली होती. बाजूला असलेल्या कड्यावर समूद्राच्या दिशेने तो॑ड करून मी बसलो. वारा अ॑गाला जोर जोरात आपट्त होता आणि अखेर अ॑धार पड्ला. समोरच दिसणारी मु॑बई शान "मरीन ड्राईव्ह" अगदी लाईट च्या प्रकाशात अतीशय देखणी राणी... <):) सारखी दिसत होती, तर मलाबार हिल रोड सुद्धा गाड्या॑च्या प्रकाशात झकाकत होता.
आजूबाजूचा नजारा काही औरच होता.
क्रमशः
सुरूवात छान झाली आहे पुढचा भाग लवकर लिहा. :)
संध्याकाळची कहाणी.. दुसरे दिवशीच्या संध्याकाळ पर्यंत लिहिणार की काय? किती क्रमशः घेत लिहिणार?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/