लहानपणी श्रावणामध्ये दर रविवारी घरच्या देवांची पूजा झाल्यानंतर आजी आदित्यराणूबाईची कहाणी वाचायची. ही कहाणी ऐकायला घरात असणाऱ्या सर्वांनी बसलच पाहिजे तिचा हा नियम होता. मी, भाऊ, बाबा, आई एवढेच नाही तर अगदी आमचे माळी मामा, ड्रायवर दुबेजी, घरी कामाला येणाऱ्या लक्ष्मीबाई सर्वांना हातावर तांदळाचे तीन दाणे घेऊन देवासमोर बसावे लागायचे. त्यावेळी काहीतरी वेगळं करतो आहोत म्हणून मस्त वाटायचं आम्हाला. मी आणि माझा भाऊ जसजसे मोठे झालो तसे ही कहाणी आम्ही आवडीने वाचायला लागलो होतो.
ही कहाणी म्हणजे मुळात सुर्यनारायणाची उपासना आहे.