पिझ्झा.. बेस, सॉस.. सगळं काही शुन्यापासून
अमेरिका म्हणलं की बाकी बर्याच गोष्टींबरोबर डोळ्यासमोर येतो तो पिझ्झा. इकडे आल्यावर तो दिवस उजाडलाच कि ज्या दिवशी थोडा उत्साह पण होता, हाताशी वेळ पण होता आणि डोक्यात पिझ्झा करावा तोही कणिक मळून बेस करण्यापासून असा विचार पण घोळत होता. झालं, ठरलं आणि मी पिझ्झा कृती शोधायला सुरुवात केली. पिझ्झा करताना तो गव्हाच्या पिठाचा करावा असा कधीचाच विचार केला होता. त्या दृष्टीने बघायला सुरुवात केली. पण मग शंकेखोर मनाने उचल खाल्ली आणि वाटलं पूर्ण प्रयोग फसला तर. नकोच ते. त्यापेक्षा थोडा तरी मैदा वापरू. पण तशी पाकृ कुठे सापडेना. मग मैद्याच्या आणि पूर्ण गव्हाच्या पिझ्झा कृतीचा अभ्यास करून माझ मीच थोडं प्रमाण बदललं आणि पिझ्झा बनवला. तर असा तो पिझ्झा ज्याची साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी खाली दिली आहे.
मिसळपाव