Skip to main content

बकरी ने पैसे का खाल्ले ?

लेखक खट्याळ पाटिल यांनी शुक्रवार, 16/06/2017 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
नोंद : लेखा चा हेतू फक्त मनोरंजन आणि हसवणूक आहे. लेख हा खऱ्या बातमीवर आधारित असला तरी, पूर्णतः काल्पनिक आहे. याचा कोणत्याही व्यक्ती किंवा घटनेशी काही संबंध नाही. . कृपा करून हि कथा स्वतःच्या नावाने दुसरी कडे छापू नये. copy-right संदर्भ : नुकतीच एक बातमी सर्वे पेपर मध्ये गाजत आहे कि एका बकरी ने शेतकऱ्याच्या ६२ हजारांच्या नोटा खाल्ल्या.

आरोग्यदायी पदार्थांच्या पाककृती हव्या आहेत.

लेखक एस यांनी शुक्रवार, 16/06/2017 02:34 या दिवशी प्रकाशित केले.
(सर्वात आधी पाककृती विभागात आल्याबद्दल क्षमा करा. इथे येण्याचे प्रस्तुत लेखकाचे हे केवळ दुसरे धारिष्ट्य आहे!) (दुसरे म्हणजे हा धागा पाककृती विभागात काढावा की काथ्याकूट विभागात, हा गहन प्रश्न न सुटल्यामुळे सांप्रत येथेच पांढऱ्यावर काळे करत आहे (पाडत आहे!). तरी धागा कुठल्याही विभागात (अगदी खफवरसुद्धा) हलवला तरी चालेल.) मला स्वतःला स्वयंपाकाचे शून्य ज्ञान आहे. परंतु वैयक्तिक कारणांस्तव मी बरेच दिवस (किंवा वर्षे) अशा पदार्थांच्या पाककृतींच्या शोधात आहे, जे पदार्थ आरोग्याला आणि जिभेलासुद्धा चांगले असतील.

फ्लो डायग्राम---->माझ्या पावसाळी कविता॑चा

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 15/06/2017 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या जुन्या पावसाळी कविता॑च्या कागदा॓ची शेकोटी कशी रसरसून पेटलीय ! पण ना धग ना धूर मग कुठले माझ्या डोळ्यात पाणी ? | | \/ मग कुठली पाण्याची वाफ?
काव्यरस

एका वेड्याची रोजनिशी.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 15/06/2017 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire एका वेड्याची रोजनिशी. ऑक्टोबर ३ आज एक विचित्र गोष्ट घडली. आज जरा उशीराच उठलो. सावित्रीबाई माझी न्याहरी घेऊन आल्या तेव्हा मी त्यांना किती उशीर झालाय हे विचारले. १० वाजून गेलेत हे ऐकल्यावर मी घाईघाईने आवरले. खरं सांगायचं तर आज ऑफिसला जायची इच्छाच नव्हती कारण तिथे जाऊन साहेबाचा कडू औषध घेतल्यासारखा चेहरा पहावा लागला असता.

तो, मी आणि इगो…!

लेखक सनकी यांनी गुरुवार, 15/06/2017 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवस झाले मन अस्वस्थ होत होतं. दिवसातून एकदा तरी त्याचा विचार मनात यायचाच. त्याच्याशी जवळ जवळ वर्षभर बोललो नव्हतो. मग एके दिवशी लावला फोन आणि बोललो. तसा व्यवस्थित बोलला, अगदी formally कोणाशीही बोलावं तसं. का कुणास ठाऊक मी त्याच्या आवाजात मायेचा ओलावा शोधत होतो, पण तसं काही जाणवलं नाही. त्याला म्हणालो कैक दिवस आपलं बोलणं किंवा भेटणं झालाच नाही, तेंव्हा भेटू. तो म्हणाला सध्या परगावी चाललोय १५ दिवस. मग मी म्हणालो आलास की फोन कर, तो हो म्हणाला नि मी फोन ठेवला. फारशी आशा नव्हती पण कुठेतरी आतून वाटत होतं की करेल फोन.

अगरीयांच्या शोधात

लेखक अमृता गंगातीरकर यांनी बुधवार, 14/06/2017 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका डॉक्युमेंटरी फिल्मच्या संदर्भात मध्य प्रदेश आणि छत्तीसगढच्या आदिवासींचा रहिवास असलेल्या जंगलात भटकण्याचा अनुभव मिळाला. खनिज वितळवून लोह मिळवणाऱ्या अगरीया नावाच्या आदिवासी जमातीला हुडकून त्यांच्या ह्या पुरातनकालापासून चालत आलेल्या पद्धतीवर फिल्म बनवण्याचा घाट आम्ही घातला होता. पूर्णपणे शहरात जगलेल्या वाढलेल्या मला ह्या आदिवासींकडून आणि त्यांच्या जगावेगळ्या लोखंड गाळण्याचा पद्धतीकडून काय अपेक्षा ठेवावी हेच कळत नव्हते. ह्या फिल्मची रिसर्चर आणि असिस्टन्ट डिरेक्टर असलेल्या मला माझा रिसर्च मला खूप वेगवेगळ्या प्रकारचे परस्परविरोधी पुरावे देत होता.

पावसावर कविता? नाय नो नेव्हर!

लेखक रातराणी यांनी बुधवार, 14/06/2017 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
आता पाऊस आला की, सगळे कविता करतील पावसावर, प्रेमावर, शहारलेल्या भेटींवर. तुम्हाला सांगते, आम्हा (सो कॉल्ड) कवीलोकांना, निमित्त हवं असतं उगा. सेंटीमेंटल कविता लिहून, मजा घेत असतो तुमची. हळवे कोपरे, हळवे क्षण, एक पाऊस पडून गेला, की सगळं कसं हुळहुळतं, आम्ही त्याचीच वाट बघतो. मग काहीबाही लिहून, जखमेवर एक फुंकर मारतो, गरम चहाचे भुरके घेत, पावसाला एन्जॉय करतो. मी नाही हा असं करणार पावसाबिवसावर कविता? लिहून लिहून काय लिहणार? कसा बाहेर पाऊस पडताना मी आत कोरडीठक्क. फारफार तर बाहेरचा पाऊस आत, आतला पाऊस बाहेर! खिडकीत बसून आठवलेली पावसातली पहिली भेट.