Skip to main content

जगायास कारण ईतकेच आहे...

लेखक सत्यजित... यांनी मंगळवार, 09/05/2017 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
नवे रोज धागे नवा पेच आहे जगायास कारण ईतकेच आहे! कुणी एकटा जात नाही प्रवासा कुणी चालताना कुणा ठेच आहे! कुणी आरसा काल देवून गेले मला भेटतो मी नव्यानेच आहे! कुण्या वर्तुळाच्या कडेने फिरावे उभे विश्व सारे फुकाचेच आहे! नको फार त्रागा करु तू उन्हाचा सखी सावली या उन्हानेच आहे! —सत्यजित
काव्यरस

भटकत होतो

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 08/05/2017 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
भटकत होतो. एक डोंगर दिसला. चढत गेलो. हिरवी झाडं पाणी फुलं. उन मरणाचं. झळझळत गेलो. भटकत होतो. बोडकं माळरान. तुडवत गेलो. कुसळं शेळ्या मेंढ्या कुत्री. चप्पल तुटलं. भळभळत गेलो. आभाळाच्या कडेला लावून मी हात बसलो या देवळात मूर्तीच्या गाभाऱ्यात ठोकळाच ठेवलेला ही उदास छटा आता नको आहे हे उनाड पाखरू आता नको आहे ही गंजकी तलवार आता नको आहे जगणं *** वगैरे नेहमीचंच

अघटित

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी सोमवार, 08/05/2017 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळी रात्र. ..... रस्त्यावर दिवे नाहीत. तसा तो मोठा रस्ता होता. पालिकेला , वाहन चालवायला रस्त्यांवर दिव्यांची गरज काय असं वाटत असावं. आधीच अमावास्या , त्यात पाऊस आणि लगतच्या खाडीवरून येणारा वेगवान थंडगार वारा. तोंडावर पाण्याचे फटकारे बसत होते. वाहनांच्या दिव्यांनी जे दिसेल तेवढेच आणि तितकाच वेळ दिसत होते आणि समोरचं जग मुळी अंधारात गुडुप होतंय असं वाटत होतं. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. त्याच्या हातात छत्री नव्हती की अंगावर रेनकोट नव्हता. विश्वास ....एक भक्कम बांध्याचा, चाळिशीकडे झुकलेला , पाच साडेपाच फूट उंचीचा प्रौढ तरूण होता.

जिद्द

लेखक परशुराम सोंडगे यांनी सोमवार, 08/05/2017 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा . . . . . . जिद्द . . . . . . . . . . . . . . विदर्भातील एका शहरात सहज भरकटत होतो. सकाळची वेळ असून ही उन्हं चांगलचं चटकत होतं. रसत्यावर गर्दी होती. खरं तर आम्ही चहाच्या शोधात होतोत. फुटपाथवर अनेक टप-या थाटलेल्या होत्या. त्यात चहाच्या टप-या ही होत्या.पण त्यात स्वच्छ तर एक ही नव्हती, पॉश पण नव्हती. अस्वच्छ होत्या. किळसवाण्या होत्या. त्यावर ही लोकांची झुंबड उडालेली होती.आम्हाला पाॉश हॉटेल हवं होत.बरीच पायपीट झाल्यानंतर ही तिथं चहा जाऊन प्यावं असं हॉटेल सापडलं नाही. एका टपरीजवळ थांबलो.

राजकारण आणि We...The People!

लेखक चिनार यांनी सोमवार, 08/05/2017 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे खूप पॉलिटिक्स चालतं रे इथं. मी म्हटलं होतं ना तुला! आता बघ,तुला मेल पाठवला त्यानं..मला नाही पाठवला!", माझा कलीग तणतणत म्हणाला. कंपनीच्या मेलबॉक्सवर येणाऱ्या असंख्य बिनकामांच्या मेलपैकी एक मेल आमच्या मॅनेजरने त्याला पाठवला नाही ह्यावरून तो चिडला होता. खरं म्हणजे त्या ईमेलचा माझ्याशीच काय तर आमच्या अक्ख्या डिपार्टमेंटशी काहीही संबंध नव्हता. मॅनेजरला FYI म्हणून आलेला ईमेल त्याने पुढे पाठवण्याची तशी काही गरज नसते. पण मेल पाठवणं हा मॅनेजरलोकांचा आवडता उद्योग असतो.तेव्हढंच रिकाम्या हाताला काम मिळतं बाकी काही नाही!! आता 'मला का नाही पाठवला?' ह्या प्रश्नाचं माझ्याजवळ काहीही उत्तर नव्हतं.

जीवन एक अर्थ!

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 08/05/2017 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य अर्ध संपलं तरी जगण्यातला अर्थ संपला नाही खूप जगले म्हंटल तरी जगण्यातला मोह संपला नाही खूप काही बाकी आहे जगून सारंच घ्यावं ... वाटत एकटं... दुकटं... सर्वांबरोबर... आयुष्य वाटून घ्यावं... वाटत! जवानी मनाची अवस्था आहे तिला पूर्ण भोगावं वाटत! समाज... बंधन... झुगारून देऊन मुक्त स्वच्छंद जगावं वाटत!! मात्र स्वप्नातून जाग येताच आयुष्याचं वास्तव पुढे असतं जवानी... मुक्त... स्वच्छंद.. एकटं.. विसरून कामाला लागावं लागत!!!
काव्यरस

या गुलाबाच्या फुलाला...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 08/05/2017 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिजे तर बाग सारा,आज तू जाळून जा... या गुलाबाच्या फुलाला,आज तू माळून जा! सांगतो वारा खबर..तू यायची अन् जायची... तू मला भेटून जा..वा,तू मला टाळून जा! तू दिलेल्या डायरीचे,काय झाले ऐक ना... एकदा माझ्या मनाचे,पान तर चाळून जा! चांदण्याचा कवडसा मी,मोल माझे काय ते? तू नभीचा चंद्रमा हो..वचन दे..पाळून जा! मेघ राहू दे तुझे तू,दाटलेले अंतरी... वेदनेवर दोन अश्रू,कोरडे ढाळून जा! प्रीत-पत्रे-शेर-कविता..फोल तू ठरवून जा... कैफियत ऐकून माझी,मजवरी भाळून जा! —सत्यजित
काव्यरस

हरवले सापडले : एक विलक्षण अनुभव

लेखक कानडाऊ योगेशु यांनी रविवार, 07/05/2017 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ७ मे २०१७ वेळः साधारण रात्रीचे ८-३० गेल्या काही तासांपूर्वीच ही घटना घडलेली आहे. पायाखालची जमीन सरकणे,जग स्वत:भोवती फिरणे पासुन ते हॅपी एंडीग पर्यंतचा विल्क्षण अनुभव ह्या घटनेने दिला. व दरम्यान देवावरची श्रध्दा अजुन मजबुत झाली. झाले असे कि आज रविवार व घरी एकटा असल्याने संध्याकाळच्या जेवणाची सोय करण्यासाठी बाहेर पडलो.मागच्या महीन्याचे रेंटचे पैसेही घरमालकाला द्यायचे होते.रक्कम दहाहजारावर होती. पण आधी बाहेरची कामे उरकु व नंतर पैसे देऊ असा विचार करुन रक्कम पाकिटात ठेवली. जाताना नेहेमीप्रमाणे बर्म्युडा टी शर्ट अश्या टिपिकल घरगुती पेहेरावात गेलो. होण्डा अ‍ॅक्टीवा काढली.

खास पाहिजे असलेल्या पुस्तकांसाठी मदत धागा

लेखक उपेक्षित यांनी रविवार, 07/05/2017 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस झाले हा धागा काढायच्या विचारात होतो पण राहून जात होते, आजच मोदकचा पुस्तकावरचा धागा पाहून परत उचल खाल्ली. तर मंडळी बर्याचदा आपल्याला एखादे पुस्तक अथवा एखाद्या विषयावरचे पुस्तक पाहिजे असते पण ते कसे/ कुठे मिळेल याची माहिती नसते तर या धाग्याचा उद्देश हाच आहे कि तुम्हाला पाहिजे असलेल्या पुस्तकाची इथे तुम्ही चौकशी करू शकता, ते कुठे मिळेल याचे पण इथे इतर सदस्य मार्गदर्शन करतील. काही वेळा पुस्तकाचे नाव माहित असेल तर चटकन मिळून पण जाते पण बर्याचदा आपल्याला एखाद्या विशिष्ठ विषयावरचे पुस्तक पाहिजे असते ज्याचे नाव आपल्याला माहित नसते तर त्यासाठी पण कदाचित इथे मदत होऊ शकते. धागा छोटा आहे पण म