Skip to main content

मेंदू, भावना व वर्तणूक (१)

लेखक मंजूताई यांनी मंगळवार, 02/05/2017 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
सेतू – A Conscious Parents’ Forum ह्या पालकांच्या सपोर्ट ग्रुप च्या वतीने नागपुरात दर महिन्यात पालकांसाठी एका चर्चा सत्राचे आयोजन केले जाते. मुलांच्या वाढीच्या वयात शाळा- अभ्यास तर महत्त्वाचे असतातच पण मुलांचा नुसताच बौद्धिक विकास झाला तर तो विकास एकांगी होईल. मुलांसंदर्भात पालक म्हणून आपल्याला इतरही अनेक गोष्टींची माहिती असणे आवश्यक असते. मुलांची शारीरिक - मानसिक - बौद्धिक वाढ, क्तिमत्त्वातील वेगवेगळ्या पैलूंचा विकास, विविध शास्त्रे, समाजजीवन, मूल्य – नैतिकता, कला – संस्कृती, सौदर्यदृष्टी ह्या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

तोड पिंजरा, उड पाखरा

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 02/05/2017 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
गेला एक तास या आडरस्त्यावर त्यांची गाडी चालली होती. "साहेब पत्ता बरोबर आहे ना ?" ड्रायव्हर हरिहरने विचारलं. "हो रे, हाच रस्ता सांगितलाय." आदित्य म्हणाला खरा पण मनातून त्यालाही खात्री नव्हती. आपल्या अक्ख्या आयुष्याचाच रस्ता चुकलाय असं त्याला वाटून गेलं आणि तेवढ्यातच समोर सायोची स्कूटी रस्त्याच्या कडेला त्याला दिसली. आता पुढे रस्ता संपलाच होता. फक्त पायवाट होती. आदित्य आणि हरिहर पायवाटेवरून चालू लागले. पाच दहा मिनीटांत ते एका मोठ्ठया बैठ्या घरासमोर आले. ते ओसरीपर्यंत पोहोचतात तोच आतून एक  वयस्कर गृहस्थ बाहेर आले. "आम्ही सायो मॅडमना भेटायला आलोय" आदित्यने सांगितलं.

होशंगाबादला काय काय बघावे? मिपाकर हैत का तिथे ?

लेखक चित्रगुप्त यांनी मंगळवार, 02/05/2017 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, उद्या संध्याकाळी मी होशंगाबादला पोहोचून ४ दिवस तिथे रहाणार आहे. बहुशः मोकळाच असेन. तरी तिकडे काय काय बघण्यासारखे आहे ? नर्मदेचे सौंदर्य बघायला सर्वोत्तम जागा/वेळ कोणती? काही प्राचीन अवशेष, किल्ला, जंगल वगैरे आहेत का ? शिवाय कोणी मिपाकर आहेत का ? कळवावे. जायचे अचानक ठरल्याने आधी विचारणा करता आली नाही. कदाचित तिथे नेट नसेल, त्यामुळे तिथे मिपाकर कुणी असतील तर मला कृपया फोनने संपर्क करावा. ९९५३९०८२२१.

निशाचर

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 02/05/2017 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
वेताळभैरवाचा नगारा वाजला. घोंघावतं वारं झोपडीत शिरलं. रातकिडे किर्रर्र. कंदिल ढळत होता. ओसरीत कुत्रं जोरात भुंकलं आणि मी जागा झालो. उठून कवाडामागचं दांडकं हातात घेतलं आणि बाहेर आलो. काळ्याभोर अंधारात जंगल सळसळत होतं. धो धो वाऱ्यानं फुफाटा डोळ्यात जात होता. तुळशीच्या ओट्यावर बसूनच कुत्रं भुंकलं होतं. कंदिलाची वात वाढवून चौफेर नजर फिरवली. कडब्याच्या गंजीजवळ चमकणारे दोन डोळे दिसले आणि एक थंड शिरशिरी अंगावर धावून गेली. ते हिंस्त्र डोळे होते. उग्र लालबुंद झालेले. एक भयाण सावली. हा भास तर नाही? कंदील उंचावत मी सावध गंजीकडं चालत गेलो. मिणमिणत्या प्रकाशात आता ती सावली अधिकच अवाढव्य होत चालली.

पाककृती आणि कॉपीराईट

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 02/05/2017 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रीया आणि कॉपीराईट या पहिल्या भागात मुख्यत्वे पारंपारीक कलांबद्दल चर्चा केली. पाककृतींच्या कॉपीराईट बद्द्ल काय होते ? कारण idea वर तर कॉपीराईट मिळत नाही, कॉपीराईट मुख्यत्वे शैली आणि मांडणीवर मिळतो. अ, ब, क, ड हे चार जिन्नस अमुक मात्रेने घेऊन एक पाककृती बनवता येऊ शकते हि एक idea झाली त्यावर तर कॉपीराईट मिळणार नाही पण शैली आणि लेखनातील मांडणीवर कॉपीराईट मिळतो. म्हणजे जसे की डिक्शनरीतील शब्दांवर कॉपीराईट मिळणार नाही पण डिक्शनरीच्या मांडणीच्या पद्धतीवर कॉपीराईट मिळतो.

कंडोम

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 02/05/2017 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
कामगार दिवस आज एक मे कामगार "दिवस" -------------------------------------------- कंडोम भांडवल शाही ख~या अर्थाने रुजवलीत तुम्हि मालक आता या देशावर तुमचेच राज्य चालु झाले आहे मालक * भाकरीसाठी लढायचा अधिकार काढुन घेतलात मालक नोटा चारुन संप फोडण्यात तरबेज झालात तुम्ही मालक * मजुराचे रक्त खूप स्वस्त दरात मिळते या देशात मालक ५-५०रु थोबाडावर फेकून ८तास शोषायला चटावलात तुम्ही मालक * देशातल्या राज्यकर्त्यांचे खरे रंग उमगलेत आम्हा मालक निळे, तिरंगी, भगवे, सा~यांचा एकच रंग उमगले आम्हा मालक * भांडवल शाहित जाती व्यवस्था चांगलीच राबवलित मालक कंत्राटी कामगार नांवाची नवीनं जात निर्माण केलीत मालक . कंत्राटी का

भटकंती सह्याद्रीच्या कुशीतली...K2S ट्रेक

लेखक sagarshinde यांनी सोमवार, 01/05/2017 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
(ट्रेकिंग बद्दल माझे अनुभव लिहिण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे त्यामुळे व्याकारनिक चुका सांभाळून घ्या हि विनंती :-) )

न्यूरेम्बर्ग - भाग ३

लेखक अफगाण जलेबी यांनी सोमवार, 01/05/2017 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
न्यूरेम्बर्ग - भाग २ न्यूरेम्बर्ग - भाग ३ २० नोव्हेंबर १९४५ या दिवशी खटल्याला प्रत्यक्ष सुरुवात होण्याआधी अनेक पडद्यामागच्या घडामोडी घडल्या. खटला सुरु होण्याच्या साधारण एक आठवडा आधी रशियन सरकारी वकील रुदेन्कोला मलेरिया झाल्याचा निरोप न्यायाधीशांना मिळाला. ब्रिटिश आणि अमेरिकन वकिलांचा आणि न्यायाधीशांचा अर्थातच याच्यावर विश्वास बसला नाही. ‘ हा राजनैतिक मलेरिया असावा ‘ असं मत ब्रिटिश परराष्ट्र खात्याने व्यक्त केलं. दुसरीकडे सर्व आरोपींच्या वकिलांनी या न्यायालयाच्या वैधतेला आव्हान देणारी एक याचिका दाखल केली.

तलाक

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/05/2017 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. सुधीर रा. देवरे ही पोस्ट केवळ उत्सुकता आणि जाणून घ्यावे या हेतूने लिहीत आहे. म्हणून या पोस्टचा अर्थ कोणी धार्मिक वा राजकीय या अंगाने घेऊन गैरसमज करून घेऊ नये ही विनंती. मी या विषयाकडे सामाजिक प्रबोधन म्हणून पाहतो. सगळ्याच धर्मातील अनिष्ट प्रथांना विरोध या विचारधारेतून झालेले हे लिखाण आहे: परदेशात राहणार्‍या माझ्या एका उच्चशिक्षित मुस्लीम मित्राला विचारलं, ‘आजच्या काळात तोंडी तीन तलाक विषयी तुमचं मत काय आहे?’ मित्र म्हणाला, ‘आपण धार्मिक बाबींवर न बोललेलं बरं. आपण आरएसएस विचारांचे आहात का?’ त्याचे उत्तर ऐकून मी चपापलो.

एका माणसाची गोष्ट

लेखक परशुराम सोंडगे यांनी सोमवार, 01/05/2017 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा ************** **एका माणसाची गोष्ट ** शेवटची बस चुकली. आता खाजगी वाहना शिवाय पर्याय नव्हता. पाण्याची बाटली घेतली. ढसा ढसा पाणी प्यायलो. आता खाजगी वाहन जिथं लागतात तिकडं निघालो.थोड पुढं चलत गेलो की एक पोरगा पळत पळत आडवा आला. तो पण ओरडतचं," साहेब, पाटोदा ना ?" " हो, तुला कसं कळलं ?" " असं कसं ? तुम्हाला कोण ओळखत नाही? " अशी स्तुती केली की मला थोड मूठभर मांस अंगावर चढल्यासारखं वाटलं. " बरं तुझी गाडी कोणती ?' " मॅक्स आहे साहेब " " टेप ?" " आताच नवा कोरा बसविला ...सांऊड सिस्टीम पण.." " पण ड्रायवर चांगला का ?" " एकच नंबर ? त्याच्या ड्रायव्हींगला तोड नाय. लय हात साप त्याचा" " अरे...!