Skip to main content

ये कश्मीर है - दिवस पहिला - ९ मे

लेखक एक_वात्रट यांनी रविवार, 30/04/2017 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
काश्मीर हे भारतातले सगळ्यात प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे यात काही वाद नाही. फिरायला जायच्या ठिकाणांची भारतात कमतरता नाही, पण काश्मीर या नावाभोवती जे कोंदण आहे ते इतर कुठल्याच पर्यटनस्थळाला नाही. निसर्गसौंदर्य पहायला आवडणा-या प्रत्येक भटक्यासाठी भारतात काश्मीर आणि परदेशात स्वित्झर्लंड ही दोन्ही स्वप्न-गंतव्ये असतात हे नक्की. २०१५ वर्षीच्या मे महिन्यात आम्ही काश्मीरचा प्रवास केला. हे प्रवासवर्णन हे म्हणजे त्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.

मैत्रि...

लेखक DTPS यांनी रविवार, 30/04/2017 04:03 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते कधि हसून तर कधि मुक्त रडून ति कुलवायची असते गरज नाही रोजच भेटले बोलले पाहिजे पण मनापासुन एकदा तरि आठवण काढायची असते मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते... कोण आपले कोण परके हे भेद मैत्रित विसरायचे असते सगळ्यांना सोबत घेऊन जगायचे असते भांडण रुसवे फुगवे आनंदाने उपभोगायचे असते मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते.... फायद्या तोट्याला इथे किंमत नसते सगळी गोळा बेरीज शेवटि शून्यच असते हेवे दावे सारे काही इथे गौंन असते मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते.... आयुष्याच्या शेवटी हि मैत्रिचि कुपी अलगद उघडायची असते आठवणींच्या रम्य स्वप्नात सैर करायची असते

ओंजळीने ती जसा,झाकून घेते चेहरा...

लेखक सत्यजित... यांनी रविवार, 30/04/2017 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
ओंजळीने ती जसा झाकून घेते चेहरा... का कसा ठावूक नाही,लाल होतो मोगरा! मोकळ्या केसांतुनी बहरून येतो केवडा अन् बटांचा जीवघेणा पीळ दिसतो कोबरा! आरसा घायाळ होतो ती जशी डोकावते केवढी नाजूक आहे,हीच का ती अप्सरा! ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते सारखी खेचतो भोळ्या जिवाला पाकळ्यांचा भोवरा! काय सांगू केवढी असते सुगंधी भेट ती? ती फुलांची पाहुणी अन् मी फुलांचा सोयरा! —सत्यजित

बाहुबली २ - The Conclusion

लेखक समीर_happy go lucky यांनी शनिवार, 29/04/2017 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण भारतीय चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा ते निर्विवादपणे नायक प्रधानच असतात. नायक प्रधान अन कहाणी असूनही कहाणीत नायकाच्या चारित्र्याला वेगळ्या उंचीवर सामान्यांच्या आवाक्याबाहेर पोचवणारे. अमोल पालकरांच्या छोटी सी बात सारखे हलके फुलके करमणूक प्रधान चित्रपट दक्षिण भारतात बनतात कि नाही दे जाणे. अर्थात "देव जाणे" कारण भाषा सीमा. तर हा भाग बाजूला ठेवू पण बाहुबली २ म्हणजे भारतीय किंबहुना दक्षिण भारतीय सिनेमा हा खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर पोचला असेच म्हणावे लागेल.

कथुकल्या ५ ( विज्ञानकथा स्पेशल )

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 29/04/2017 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
१. टेस्ट सब्जेक्ट नाकातून परत रक्त यायला लागलं. मी खिशातल्या रूमालाने नाक पुसलं. कमाल आहे, यावेळचं रक्त लालऐवजी काळपट दिसत होतं. कदाचित रस्त्यावरच्या उघडझाप होणाऱ्या दिव्यांमुळे तसं दिसत असावं. “मुव्ही आवडला का रे?” प्लियानीने आपला रेशमी हात माझ्या गळ्यात टाकत विचारलं. ती माझ्या इतकी जवळ असूनसुद्धा तिचा सहवास मला जाणवत नव्हता. पण परफ्युमचा मंद मोहक चंदनी सुगंध मात्र मनाला मोहवून टाकत होता. हा सुगंध मला पृथ्वीची आठवण करून देतो. “तुला मुव्ही आवडला का ?” तिने परत विचारलं. “हो.

एका पाकिस्तानी गाढवाची किंमत..

लेखक माहितगार यांनी शनिवार, 29/04/2017 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही काही वेगळ्या रुपकाच्या अर्थाने धागा लेख उघडला असेल तर अंमळ चुकला आहात. हि पाकिस्तानच्या प्रसिद्ध अंग्रेजी दैनिक डॉननेच दिलेली बातमी आहे. तुम्ही म्हणाल कि असते एकेका प्राण्याला किंमत, तशीच असेल पाकिस्तानी गाढवालाही किंमत, त्यात विशेष ते काय ? विशेष बाब अशी कि पाकिस्तानी गाढवांच्या किंमतीची चर्चा सिंधच्या विधानसभेत झाली, आणि चर्चेचा उद्देश्य तसा किंमत नव्हताच मुळी ४७०० गाढवांची त्यांच्या पोलीसांना म्हणे कातडी मिळाली जी कुणी चिनी व्यापारी चीनला घेऊन जाणार होता. म्हणजे नेहमीचाच व्यापार होणार होता तर यात सिंधी विधानसभेत चर्चा होण्यासारखे काय मोठे ?

दि अदर साईड….

लेखक चिनार यांनी शनिवार, 29/04/2017 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
तो म्हणे डिप्रेशनमध्ये होता. कधीपासून,कश्यामुळे ते काही माहिती नाही. आता बघणाऱयाला वाटतं, श्रीमंत बापाचा एकुलता एक मुलगा..लाडात वाढलेला..मस्तीत जगलेला..कसलं आलंय डोंबलाचं डिप्रेशन? श्रीमंती एवढी की तो जन्मभर बसून खाऊ शकेल. पण ती काय एका दिवसात नव्हती आलेली. त्याच्या आज्यानं अन मायबापानं भरपूर खस्ता खाल्ल्या..पण त्याला एवढंच माहिती की ग्रँडपाचा कसलातरी बिझनेस होता तो मॉम-डॅडनी एक्सपांड केला. त्याच्यासाठी ही गोष्ट इतर अनेक गोष्टींसारखी "व्हॉटएव्हर!" कॅटेगिरीत यायची. आपण त्या बिझनेसचं अजून एक्स्पान्शन करू असं त्याला कधी वाटलं नाही.त्याच्यावर तसं काही बंधनही नव्हतं.

नवसंजीवनी

लेखक Madhurima Datar यांनी शनिवार, 29/04/2017 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
वसंजीवनी बंकिमचंद्र शरतचंद्र विमलरा^य यांचा बंगाल| साँदेश‚ रसगुल्ला‚ कालाजामून यांचा मिठास्वाद म्हणजे बंगाल| नझरूल इस्लामांच्या कवितेतला दुर्गेचा अवतार धारण करणारा बंगाल| रक्तपदमा आणि जमुना यांचा लपंडाव म्हणजे बंगाल| मां^च्या कोमल छायेतील बंगाल| कधी सख्यांच्या एका कौतुकाच्या धापेचा बंगाल| तर कधी भाभींच्या गोड थट्टेचा बंगाल…… परंतु… रंगूनच्या एका हाकेसरशी )दयावर दगड ठेवून आदित्यला हाच ‘बंगाल’ सोडावा लागला| “मा^ की होलोÆ” “तू जा आदित्य| रंगून तुला साद घालतय|यशप्राप्त भव”| ती असं जरी म्हणत असली तरी वर्षा तिच्या डोLयात साठली होती| फेसाLत्या लाटांवर स्वार होवून बोट रंगूनच्या दिशेने जात होती|

ऐसी काये केली करणी काय जाणो

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 29/04/2017 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
ऐसी काये केली करणी काय जाणो तुझे तुज जाणों काय जालें ।। छन्द ऐसी गोडीं सगुणाची आवडी भक्तिचिच गुढी आनंदाची ।। निर्गुणाचे ध्यानी ब्रह्मभाव खाणी रूप तुझे मनी नूरे परि ।। नको आम्हा देवा निर्गुण करणी तुझेनि चरणी वेध लागे ।। मोहलो सावळ्या टाळ अन चिपळ्या धुंद देत टाळ्या गजरी तुझे ।। सागरलहरी