Skip to main content

महाराष्ट्र दिन २०१७ : चारोळी स्पर्धा

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 25/04/2017 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो. नुकतेच भरगच्च उपक्रम पार पडलेले असल्याने थोडासा विसावा घेऊन मिपाकरांना जरा हलक्या फुलक्या लिखाणासाठी आता मस्त संधी आहे. १ मे रोजी होणार्‍या महाराष्ट्रदिनानिमित्त मिपाकरांनी चारोळ्यांची बरसात करावी अशी इच्छा आहे. शीघ्रकवी, चारोळी स्पेशालिस्ट, विडंबन, सुडंबन स्पेशालिस्ट, विनोदी कवी, प्रेमकविता अन निसर्गकवितांची झडी लावणार्‍या कवी/कवयत्रींची मिपाला कधीच कमी पडली नाही. आता विषय सोपा, जिव्हाळ्याचा अन स्पेशल आहे. तेंव्हा किबोर्डावर नाचू देत आपली बोटे. येऊ देत काही चारोळ्या. नव्हे......

आगमन, निर्गमन पुनरागमन (भाग ४)

लेखक Anand More यांनी मंगळवार, 25/04/2017 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आयुष्यात कन्नड साहित्य उशीरा आले. तोपर्यंत मराठी साहित्याने माझ्या मनावर गरूड केले होते. (इथे साहित्य हा शब्द मी कथा आणि कादंबरी इतक्या मर्यादित अर्थानेच वापरला आहे. त्यात वैचारिक लेखन गृहीत धरलेले नाही.) पण उशीरा येऊनसुद्धा एक मात्र स्पष्ट जाणवले की मी वाचलेले कन्नड साहित्य मी वाचलेल्या मराठी साहित्यापेक्षा खूप वेगळे आहे. बहुतांश मराठी कादंबऱ्या मला व्यक्ती आणि निसर्ग किंवा व्यक्ती आणि व्यक्ती किंवा व्यक्ती आणि त्याचा समाज यांच्यापैकी कुठल्यातरी एकाच नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या वाटल्या.

सुगंध

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 25/04/2017 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
या ओंजळीतून त्या ओंजळीत फुले सहज निघून जातात... उरल्या सुगंधाचे अत्तर फुलांच्या आठवणीत दरवळत राहते! -शिवकन्या
काव्यरस

पान

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 25/04/2017 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
पान म्हणालं की कलकत्ता सादा आठवतं, मग मसाला मग मगई... त्यापलीकडे कधी मजल गेली नाही! पण ह्या पाना आधी एक महत्वाचं पान म्हणजे आपलं... केळीचं पान! आठवतं का केळीचं पान, आता त्यावर जेवण मिळवणे म्हणजे जरा "नशीब वान आहेस लेका!" वगैरे म्हणावं लागतं! पारंपरिक गोष्टींचा रितिरिवाजांचा जसा ऱ्हास होत चाललाय, तसाच ह्या पानांवर जेवण केरण्याचा ही, बरोबर आहे म्हणा! आता जागा नसते ना, जिथे जागा असते तिथे भलत्याच गोष्टींनी जागा घेतलेली आहे आज काल! असो... केळीच्या पानावरचे जेवण लहानपणी खूप अनुभवले, त्यावर तरंगणारे पाणी, अगदी बरोब्बर मध्ये असलेल्या लांब देठाचा मोठेपणा! मोठेपणा म्हणजे...

चुकणारी आई

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 25/04/2017 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
"तुम्ही दोघांनी जर पटपट खाल्लं तरच पार्कमधे जायचंय, नाहीतर नाही" तिने नेहेमीप्रमाणे मुलांनी लवकर खावं म्हणून सांगितलं. आर्यन आणि विहान वय वर्ष पाच आणि तीन, दोघांनी आईची धमकी कितपत गंभीर आहे याचा अंदाज घेतला. आर्यनने पहिला घास तोंडात टाकला आणि "आय डोन्ट लाईक डोसा" म्हणून तोंड वाकडं केलं. विहानने तर भरवलेला घास तोंडातून फू फू करून बाहेर काढला. "त्यांना नकोय तर जाऊदे ना कॉर्नफ्लेक्स खाऊ दे त्यांना" नवर्याचा एक्स्पर्ट ओपिनियन! तोही मुलांसमोरच! तिला सुचेना की आता आधी मुलांना ओरडावं की नवर्यावर चिडावं ! "आपल्या पोटातल्या गुड बॅक्टरीयासाठी आंबवलेले पदार्थ चांगले असतात.

ये, दिग्बन्ध तोडून ये,

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 24/04/2017 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
ये, दिग्बन्ध तोडून ये, आजच्या कविते ओसन्डत, फुफा॑डत, अनावर ये भारून टाक अवघ्या अस्तित्वाचे अवकाश कडाड कोसळ या अस्थिमज्जेच्या पि॑जर्यावर एक एक अणू व्यापून टाक जाणिवेचा-तुझे देणे चुकेपर्य्॑त घे आधार तोकड्या अक्षरा॑चा - या कागदावर उमटण्याआधी एकच क्षण था॑ब, कालच्या कवितेच्या कलेवरावर कफन घालून येतो
काव्यरस

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ३)

लेखक Anand More यांनी सोमवार, 24/04/2017 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीपूरच्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असते मंजुनाथाचे मंदिर. हा मंजुनाथ भारतीपूरच्या पंचक्रोशीत आपली सत्ता गाजवत असतो. त्यासाठी त्याचा सहाय्यक असतो भूतराया नावाचा देव. तो अंगात येतो आणि लोकांवर वचक ठेवतो. मंजुनाथ सर्वशक्तिमान पण निष्क्रिय असतो तर भूतराया सेवक पण क्रियाशील असतो. या भूतरायाची कीर्ती इतकी मोठी की प्रत्यक्ष राष्ट्रपती त्याच्या दर्शनाला येऊन जातात आणि प्रसाद म्हणून कपाळभर कुंकू माखून घेतात. भूतरायाचा प्रभाव एव्हढा मोठा की भारतीपूरमध्ये कोणीही आपले वाद विवाद कोर्टात घेऊन जात नाही. सगळे वादविवाद भूतरायच्या मर्जीने सुटतात.

प्रिय सचिन

लेखक चिनार यांनी सोमवार, 24/04/2017 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे सचिन...!! आजकाल तुझ्याविषयी बोलणं..लिहिणं...इतकंच काय तुला टीव्हीवर बघणंही सोडून दिलंय मी.. का म्हणजे काय?? त्रास होतो रे..खरंच खूप त्रास होतो... आज तुझा वाढदिवस आहे...म्हटलं बघूया, जमतंय का काही लिहायला.. लिहायला लागतंच काय रे??

अता ही भेट टळणे शक्य आहे ..

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 24/04/2017 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
अता ही भेट टळणे शक्य आहे (तुझे मजला वगळणे शक्य आहे) जरासा जोर लावावास अजुनी पहा माझे निखळणे शक्य आहे नको इतकी मुजोरी आरशावर तुझेही रुप ढळणे शक्य आहे असे येऊ नये वेळीअवेळी (कुणी काही बरळणे शक्य आहे) जरा जपूनीच ये ग्रीष्मात इथल्या तुझी काया वितळणे शक्य आहे तुला पाहून येथे एकटीला फुलांचे बावचळणे शक्य आहे डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

ती एकदाच दिसली...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 24/04/2017 05:01 या दिवशी प्रकाशित केले.
ती एकदाच दिसली अन् छंद होत गेला दिनदर्शिका-फुल्यांचा धरबंद होत गेला! होती कथा विराणी,झाली गझल रुमानी बहुधा पुन्हा व्यथेला,आनंद होत गेला! शर खोल-खोल रुतला नजरेतला तिच्या अन् एकेक मंद ठोका मग बंद होत गेला! केसांत मोकळ्या त्या मन गुंतवीत गेलो कमळात बंद भुंगा स्वच्छंद होत गेला! टिपतो सुगंध वारा..उबदार ओंजळींनी बागेतल्या कळ्यांचा गुलकंद होत गेला! ती गुणगुणत असावी बहुतेक शेर माझे प्रत्येक शब्द माझा मकरंद होत गेला! केंव्हातरी अचानक येतो सुगंध अजुनी हा कायदा ऋतूंचा,बेबंद होत गेला! —सत्यजित
काव्यरस