Skip to main content

..........पाठीशी नाही.

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी गुरुवार, 20/04/2017 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
चालला मार्गावरूनी तो तोच माझा मार्ग आहे त्याच्याच पाठी चाललो मी तोच माझा दीप आहे दाखवी प्रकाश मजला राहुनी माझ्यापुढे पाठीचे संकट त्याने आधीच निवारलेले असे पाठराखण कशास हवी तो मार्गदर्शक असता जरी पाठच्या वारांची आता तमा न बाळगे मी तरी तव पावलावरी पाऊल ठेवुनी नि:शंक झालो मी उरी दर्शनाची आस माझी भागवी जन्मांतरी.
काव्यरस

शिकण्याच्या पद्धती (Learning methods)

लेखक मंजूताई यांनी गुरुवार, 20/04/2017 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
सेतू - अ कॉन्शस पॅरेंट फोरम तर्फे मैत्रेयीचा(समुपदेशक) शिकण्याच्या पध्दतीवर एक चर्चात्मक कार्यक्रम घेतला. मैत्रेयीने टाटा इंस्टीट्युट ऑफ सोशल वर्कमधून एमएसडब्ल्यू केले आहे. पौगंडावस्थेतील मुला व मुलींच, विवाहपूर्व व विवाहत्तोर जोडप्यांच समुपदेशन करते. आज शिकण्याच्या पद्धती सांगितल्या, उद्या तुम्ही त्या अमलात आणल्या व लगेच मुलाचे मार्क्स वाढले असं खात्रीलायक होईलच, असं नाही पण ह्या पालकांना मार्गदर्शक नक्कीच ठरतील. शिकण्याच्या पद्धतीत तीन महत्त्वाच्या बाबी आहेत. १) इन्फर्मेशन /माहिती २) नॉलेज/ज्ञान 3)प्रयत्न.

मायानगरी

लेखक ज्ञानदेव पोळ यांनी गुरुवार, 20/04/2017 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतल्या घरांना पत्र्याचा सोफा नाही कि सोफ्यात चूल नाही. चूल असली तरी त्या चुलीत विस्तवाचा फुललेला आर नाही कि चुलीत भाजलेल्या शेंगा नाहीत. इथल्या घरांना आंगण नाही कि अंगणात तुळस नाही. दारात कुरड्या सांडग्याची वाळवण नाहीत कि वाळवणाला काठी हलवत राखण बसलेली म्हातारी नाही. मुंबईतल्या घरासमोर गुरांचा गोठा नाही कि "गोठ्यात चिळ चिळ वाजणारा धारेचा आवाज नाही. दाराला राखण करीत आडवा पडलेला राजा कुत्रा नाही कि उकिरंडयावर पायानं उकरणाऱ्या कोंबडया नाहीत. नातवडांना जत्रेला घेऊन निघालेला धोतर पटक्यातला म्हातारा इथल्या रस्त्यावर नाही कि मधल्या लेकीकडं साखरचं गठुळ घेऊन निघालेली लुगडया चोळीतली म्हातारी नाही.

श्रीसाईसच्चरित भाग २. अध्याय १ . शब्दार्थ आणि भावार्थ

लेखक aanandinee यांनी गुरुवार, 20/04/2017 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीसाईसच्चरित भाग २. अध्याय १ मंगलाचरण ओवी १३ ते ४२ भावार्थ आजच्या टू मिनिट नूडल्सच्या जगात बर्याच जणांना हे भलं मोठ्ठं मंगलाचरण म्हणजे पाल्हाळ वाटू शकतो. मी माझ्या वैद्यकीय विद्यार्थीदशेत असताना जेव्हा श्रीसाईसच्चरित वाचत असे तेव्हा मी हे मंगलाचरण पटकन 'वाचून टाकत' असे कारण मला मुख्यत्वे रस कथांमध्ये होता. आता मी विचार करते की हेमाडपंतांना इतक्या सगळ्या लोकांना वंदन करण्याची गरज का वाटली असेल? बरं त्यातही नावं न घेतल्यामुळे ही मंडळी, जसं की वेगवेगळे देव, ऋषी,संत हे रागावणार होते असंही नाही. मग एवढी मोठी यादी कशाला? उत्तर आहे हेमाडपंतांच्या मनात असलेली 'कृतज्ञता'.

लॉन-वरचं लगीन!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 20/04/2017 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
https://scontent-lax3-2.xx.fbcdn.net/v/t31.0-8/fr/cp0/e15/q65/17991585_1325052557581027_2522918732284372163_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=87b7fe7cee10ef8de3ed78cb4dfac684&oe=59985CF0 नाटकापेक्षा आमच्या धंद्यात, नेमका उलटा खेळ आहे. तिथे भेळेला खाणारा आहे. इथे खाणाय्राला-भेळ "आहे! " स्टेज लागून तयार आहे. नेपथ्यंही सज्ज आहे. वधूपार्टी येऊन गरम, आणी .. वरंपार्टी थंड आहे.

प्रतिभा

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी गुरुवार, 20/04/2017 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
खरंतर दोन वर्षांपासून प्रतिभा आमच्या ऑफिसमध्ये काम करीत होती. ती थोडी अबोल होती. फारशी स्वतः हून मिसळत नसे. ऑफिसमधल्या कोणत्याही कार्यक्रमाला मात्र ती न चुकता हजेरी लावीत असे . पण ती बरीचशी निर्विकार होती. तिची प्रतिक्रिया क्वचितच बघायला मिळत असे. माझी सहकारी म्हणून ती उत्तम होती. प्रत्येक कामाची ती अगदी मन लावून आखणी करून ते यशस्वी करून दाखवीत असे. वयाने माझ्यापेक्षा एखादं दोन वर्ष लहान असेल किंवा बरोबरीची पण असेल. तिचा चेहरा थोडा करारी वाटायचा. उभट कपाळ , त्या खाली असलेले स्थिर डोळे तिचा गंभीर पणा उगाचच वाढवीत आहेत असे वाटे.

निखारा

लेखक सागरलहरी यांनी गुरुवार, 20/04/2017 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
सावली ही लांबली चौकटीशी थांबली दूर दिसते मेघमाला वीज कोठे गुंतली धग पून्हा निखा-याला राख ज्याची राहिली .. सागरलहरी

ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 19/04/2017 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. काही गोष्टी बोलाव्याशा वाटल्या. म्हणून हे आधी लिहिलेलं पत्र नावं व किरकोळ संदर्भ बदलून आपल्यासोबत शेअर करतो आहे. आपल्या आयुष्यातले ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन! दि. ३ जुलै २०१६ प्रिय लोकेश आणि तेजश्री वहिनी! तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आज सकाळी उठल्यापासूनच लोकेशशी बोलणं सुरू होतं. तेव्हा म्हंटलं चला थोडं सविस्तर बोलू. त्या दिवशी आम्ही भेटलो असतानाही भेटायचं चाललं होतं. तेव्हा आता इथे पत्रातूनच भेटावं म्हंटलं. आणि मला पत्रातून भेटायला खूप आवडतं. जेव्हा प्रत्यक्ष भेटतो; तेव्हा खूप वेळ फॉर्मल बोलण्यात- हाय हॅलोमध्ये जातो किंवा जनरल बोलण्यात जातो.

50x7 सायकलिंग चॅलेंज आणि तीळसे येथील मंदिराला एक भेट.

लेखक इरसाल कार्टं यांनी बुधवार, 19/04/2017 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आज लिहितोय आमच्या(मी, प्रसाद दाते आणि धडपड्या) 50x7 सायकलिंग चॅलेंज बद्दल आणि त्या निमित्ताने माझ्या तीळसे येथील शिव मंदिराच्या भेटीबद्दल. तर नेहमीप्रमाणे ग्रुपातली मरगळ झटकण्याचा रामबाण उपाय म्हणून कुणीतरी पुन्हा एकदा आठवड्याच्या आव्हानाचा मुद्दा 'सायकल सायकल' या समूहात मांडला. आणि पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं. लागलीच मोर्चेबांधणी सुरु झाली सगळ्यांची. तर, अस्मादिकांची नुकतीच पुणे ते वाडा घौडदौड कमालीची यशस्वी झालेली आणि चोहोबाजूंनी येणाऱ्या कौतुकाचा परिणाम म्हणून दुणावलेला आत्मविश्वासाच्या भरात आम्हीही लागलीच त्या चर्चेत उडी घेतली.