Skip to main content

केवळ माझीया विवेका संगे

लेखक माहितगार यांनी सोमवार, 17/04/2017 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
मुर्ती पूजा करण्यास तयार आहे व्यक्तिपूजा बांधण्यास सांगू नका कोण किती मोठा छोटा माझे मला ठरवू द्या अक्षरपूजा करण्यास तयार आहे शब्दपूजा बांधण्यास सांगू नका ग्रंथ किती मोठा छोटा माझे मला ठरवू द्या असेल खड्डाही पुढे जरी माझा मला आकळु द्या अंधळा असेनही जरी मी काठीने माझेच मला चाचपू द्या चोखाळलेले नको आता ते मलाच शोधू द्या मार्ग हवे ते ठार बहिरा असेनही जरी मी वास माझाच मी शोधणार आहे अभिव्यक्ती हाकण्याचा नाही कोणता उपाय केवळ माझीया विवेका संगे माझाच मी बहरणार आहे लागलेल्या ठेचांचे ही गाणेही आनंदाने गाणार आहे
काव्यरस

पाण्यात हसरी राधा रुक्मिणी सवे

लेखक माहितगार यांनी सोमवार, 17/04/2017 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
तरूस लगडली सुवासिक आम्रफळे परी कोयी अन बीया मोजतो हा बळे पाण्यात मासे उसळतात रेतीच्या खोप्यास हसतात तृष्णार्त कृष्णा टोचती का खडे जळात उतरू कसा प्रश्न हा पडे आर्जवी पाणिते अवीट परी कृष्णास दिसे का मीठ खेळती कधी लहर कधी लाट प्रश्नांकीत किनारी मुरलींची पाठ तुडूंब सरोवर नरतनी पक्ष्यांचे थवे पाण्यात हसरी राधा रुक्मिणी सवे

तडा गेलाच आहे तर...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 17/04/2017 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
नका बांधू चौकटींनो मला उधळून जाऊ द्या तडा गेलाच आहे तर मला निखळून जाऊ द्या! नको ते रोजचे बघणे मुखवट्याआडचे मुखडे मुलामा वाटतो पारा,पुरा निथळून जाऊ द्या! घन्या अंधारल्या वेळी तरी द्या हाक स्वप्नांनो पहाटे काफिला तुमचा मला वगळून जाऊ द्या! अश्या बेरंग अश्रूंची कुठे उरते खूण मागे? गुलाबी रंग प्रेमाचा तरी मिसळून जाऊ द्या! मलाही वाटते आहे तशी माझीच प्रतिमा ती म्हणाली पेटले आहे..अता उजळून जाऊ द्या! नको अश्रू,नको सुमने,नका श्रद्धांजली वाहू ऱ्हदय असलेच तर त्याला जरा ढवळून जाऊ द्या! जगाच्या मध्यरात्रीचे असे व्हा सूर्य अश्रूंनो चकाकी चांदण्यावरची झणीं वितळून जाऊ द्या! —सत्यजित
काव्यरस

मोबाईल ऍपची कल्पकता आणि उपयुक्तता

लेखक कल्पक यांनी सोमवार, 17/04/2017 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
युक्रेनमधल्या एका छोट्या खेड्यात एक यान कूम नावाचा मुलगा राहायचा. त्याची आई गृहिणी होती आणि वडील बांधकाम कंपनीत मॅनेजर होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. मूलभूत सोयींचा तुटवडा होता. तो सोळा वर्षांचा असताना, १९९२ साली युक्रेनमधल्या अस्थिर राजकीय-सामाजिक परिस्थितीमुळे त्याची आई त्याला घेऊन अमेरिकेत कॅलिफोर्नियाला स्थलांतरित झाली, वडील मात्र येऊ शकले नाही. परिस्थिती इतकी बिकट होती की अमेरिकेत खर्च कमी व्हावा म्हणून त्याच्या आईने अभ्यासासाठी लागणाऱ्या वह्या-पेन असं शालेय साहित्य सुद्धा येताना आणलं.

नाद मेघांचाच दर्जेदार होता...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 17/04/2017 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
नाद मेघांचाच दर्जेदार होता पावसाचा जोर फुसका बार होता! ओल आहे काळजाच्या खोल रुतली स्पर्श त्याचा केवढा उबदार होता! रात्र होती चंद्र होता गार वारा चांदण्याचा कवडसा अंगार होता! सावल्याही हाय मज सोडून गेल्या की उन्हाचा रंग काळाशार होता?? सापडेना खंजिराची खूण कोठे काळजावर काजळाचा वार होता! ओळखावे तू मला ही आस नव्हती हा तसा माझा नवा अवतार होता! का प्रवासाला निघाला एकटा?तो... सूर्य होता वा कुणी अंधार होता? फार थोडे मित्र दिसले आॅनलाइन आज बहुधा वाटते रविवार होता! जिंकलो..नाबाद-शतकी खेळ केला यष्टिच्या मागे कुणी दिलदार होता! —सत्यजित
काव्यरस

वाहताना-जगताना

लेखक पिशी अबोली यांनी रविवार, 16/04/2017 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
उसळतं, फेसाळतं, झेपतं? का खुपतं? झिरपून, खुरपून, खरं-खुरं, खोटं-नाटं कळेल का? मिळेल का? वाहताना, जगताना, हरवायचं, हे ठरवायचं?

बाळा, उरले तुजपुरती......

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 16/04/2017 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही युद्धग्रस्त देशात घडणारी एक नेहमीची घटना. एक सैनिक लढता लढता धारातीर्थी पडतो. अंत्यविधीसाठी त्याचे शव त्याच्या घरी आणतात. सुन्न झालेले त्याचे कुटुंबीय व सुहृद मृत्यूचे दु:ख अन भविष्याची चिंता यात दुभंगून गेलेले असतात. वातावरणात एक अस्वस्थ करणारी , हृदय पिळवटणारी शांतता……..काळ जणू गोठलाय. पण त्याचवेळी कठोर वास्तव आपल्या निर्मम अस्तित्वाची जाणीव करतंय... सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी या अटळ परिस्थितीवर कविता लिहिली त्यावेळी ब्रिटनचा राजकवी असलेल्या कवि आल्फ्रेड टेनिसन याने.

उधई माले गिळी टाकई!...

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 16/04/2017 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
-डॉ. सुधीर रा. देवरे पुस्तकांसाठी (1993 ला) ओसरीच्या एका भिंतीला प्लायवूडचे शेल्फ तयार करून घेतले होते. मी जी पुस्तके विकत घेतो आणि वर्गणी भरून जी नियतकालिके मागवतो ती या शोकेसमध्ये ठेवत होतो. हया पुस्तकांमध्ये अनेक दुर्मिळ पुस्तकं होती की ते आता विकत घ्यायचं ठरवलं तरी मिळणार नाहीत. संदर्भासाठी जे पुस्तक लागतं ते काढून काम झाल्यावर पुन्हा जागेवर ठेऊन द्यायचं असा परिपाठ. पुस्तक केव्हाही लागतं म्हणून चाळवाचाळव नेहमी होत होतीच. असंच एका दिवशी मला कुठलंतरी पुस्तक हवं होतं म्हणून काढायला गेलो तर एका पुस्तकाला उधई लागलेली दिसली.