Skip to main content

मराठी स्त्री-गीतातील स्वप्नातीत रामायण

लेखक माहितगार यांनी रविवार, 16/04/2017 06:35 या दिवशी प्रकाशित केले.
वाल्मिकी रामायणासहीत विवीध रामायणांचा परिचय असतोच, शिवाय गीत रामायण सोबतीला रामायणासंबधीत पॉपकॉर्नसारखे अधे मध्ये चघळायला वाद विषय, खरे म्हणजे हल्ली तोच तो पणा नकोसा झाल्याने कधी मधी गीत रामायणातल्या एखाद -दोन गीतांपलिकडे रामायण बद्दल मजल जात नाही. पण http://ccrss.org वर असलेल्या ओवी गीतांना सहज चाळता चाळता हाती आलेले मराठी स्त्री लोकगीत रामायणाच्या या अनोख्या रूपाने लोकगीतांतलं रामायण आजही खिळवून ठेऊन पुन्हा एकदा वाचावे वाटेल असे आहे - कुठे कुठे काव्यशास्त्र विनोदाचा धाट आहे असे वाटावे, काही वेळा रामायण आहे कि राधा-कृष्णाच्या लीला असेही वाटून जाईल.

कथुकल्या ३ + शशक पुर्ण करा चॉलेंज

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी रविवार, 16/04/2017 00:58 या दिवशी प्रकाशित केले.
कथुकल्या १ कथुकल्या २ ---------------------- नमस्कार मंडळी. यावेळी तुमच्यासाठी एक चॅलेंज टाकलं आहे. तिसरी कथा शतशब्दकथा आहे…पण ती आहे अपूर्ण. तुम्हाला येईल का ती पुर्ण करता… ----------------------------------------------- १. स्मशानचोर दिग्या अन जग्या मुडदे चोरायचे… स्मशानात पुरलेले. संशयाला जागाच सुटणार नाही असं परफेक्ट त्यांचं काम.

एक कप तिचा....

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 16/04/2017 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याचा हिशोब साचा एक कप तिचा,एक माझा! दिसायला दोन्ही एकच फ्लेवरंही सारखाच फक्त चाखण्याची रित ज... रा निराळी म्हणूनच.. एक कप तिचा,एक माझा! माझा आधी संपेल, तिचा नंतर चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर.. त्यातूनच घडते जादू शेवटी टेस्टी... लज्जतदार... सुरंगी पण तरिही.. एक कप तिचा,एक माझा! एकत्र असून थोडं वेगळेपण वेगळं असूनही थोडस्सं एकत्रपण..! तिचं सावधपण माझं अंधळेपण जगण्यातली वागण्यातली गोडी वाढवणारं.. त्याच कारणानी.. एक कप तिचा,एक माझा! गोडिच्या बेरजा, अजाणतेपणी केलेल्या वजा-बाक्या! कधी गुणाकार.. कधी भागाकार परत त्यांच्याही बेरजा वजाबाक्या!!! पण गणित तिथेच येऊन थांबतं..

देव्हारा...५

लेखक विनिता००२ यांनी शनिवार, 15/04/2017 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
कंपनी सेक्रेटरी भारद्वाज उठुन उभे राहीले. "जंटलमन, सहायसरांची अवस्था आपण जाणताच. त्यांच्या इच्छेनुसार 'अभिजीत सहाय' यांची कंपनीचे नवे मॅनेजींग डायरेक्टर म्हणुन नियुक्ती करत आहोत. कंपनीचे सर्व निर्णय त्यांच्या परवानगीनेच घेतले जातील." भारद्वाजांच्या खुलाशानंतर तिथे शांतता पसरली. फायनान्सर्सना डुबणार्‍या कंपनीत काही इंटरेस्ट नव्हताच. सर्व हक्क अभिला दिल्यामु़ळे अभिराम आणि रघुराज जबाबदारी घेण्यातुन मोकळे झाले. देव्हारा...५ अभिने रोज अ‍ॅफिसमधे यायला सुरवात केली. पण अननुभवी अभिवर कोणी विश्वास ठेवत नव्हते. रोज संध्याकाळी तो देव्हार्‍यात दिवा लावायचा.