बाबाची चप्पल
बाबाची चप्पल
फार तर पन्धरा सोळा वर्षान्चा असेन नसेन. बाबाची चप्पल माझ्या पायाला यायला लागली. मग कधी तरी बाबा घरी असताना बाबाची नजर चुकवून त्यान्ची चप्पल मुद्दाम घालून जाण हा स्वभाव बनला. बाबा चिडायचा म्हणायचे तुझी चप्पल घालून जा म्हणून. पण त्या चिडण्यात ही गम्मत वाटायची. का कोण जाणे पण त्या चपलेच्या स्पर्शात खुप खुप आपले पणा वाटायचा. बाबा सदोदित बरोबर असल्याचा भास व्ह्यायचा. बाबाने रागावून मग स्वताच्या चपले सारखी चप्पल आणून दिली. पण तरीही बाबान्ची चप्पल घालून घेण्यात जी गम्मत होती ती ह्या नव्या चपलेत नव्हती. बाबाला आवडायचे नाही आणि तेच मला आवडायच.
मिसळपाव