Skip to main content

वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 10/04/2017 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
डिअर ऑल, अध्यात्मिक लेखनाचं पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Enlightenment असं साईटचं नांव असेल. वेब डिझाईन, माझा ग्राफिक डिझायनर मुलगा करेल. लोकांचे अध्यात्मिक गैरसमज दूर करुन जीवन सर्वांग सुंदर करणारा एक विषय त्यांच्याप्रत पोहोचावा असा उद्देश आहे. यात माझं आतापर्यंत झालेलं लेखन, लेखावरच्या लोकांच्या वॅलीड प्रतिसादांना वेळोवेळी दिलेली उत्तरं, नव्यानं होणारं लेखन आणि साईटच्या माध्यमातून लोकांशी ऑनलाईन संवाद, असं साईटचं स्वरुप असेल.

नाशिकचा औद्योगिक इतिहास : १

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 10/04/2017 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
बॉलपेनच्या टाचणी सारख्या छोट्या तोंडापासून विमानापर्यंत हजारो उत्पादने बनवणाऱ्या नाशिकची एक औद्योगिक नगरी म्हणून जगभर आज ख्याती आहे. नाशिकमध्ये कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतींमधून मानवी जीवनाला आवश्यक असणाऱ्या जवळ जवळ सगळ्या उत्पादनाची निर्मिती आज नाशिक मध्ये होते. गंमत अशी आहे की देशांतर्गत जवळपास सगळ्या महत्वाच्या शहरांना रस्ते रेल्वे यांनी जोडलेल्या नाशिकची मुख्यत्वे उद्योगामुळेच अखिल विश्वाशी जरी अलगद नाळ आता जोडली गेली असली तरी नाशिकने आपलं गावपण छान जपलंय. त्यामुळे नाशिकचा आजवरचा औद्योगिक इतिहास आणि भविष्याकडे होणारी वाटचाल हा एक छान चिंतनाचा, अभ्यासाचा विषय होऊ शकतो.

अंजलीची गोष्ट - संवेदना .... सहवेदना

लेखक aanandinee यांनी सोमवार, 10/04/2017 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
"डॉक्टर, आत येऊ?" दरवाज्यातून आवाज आला. "हं, ये" अंजलीने पाहिलं काल रात्री डिलिव्हरी झालेली १२ नंबरची पेशंट आली होती. "अगं चालून का आलीस तू? काही होतंय का?" अंजलीने काळजीने विचारलं. "बस आधी". राधा समोरच्या खुर्चीवर बसली. राधा परवा डिलिव्हरी साठी बायकांच्या वॉर्डमध्ये ऍडमिट झाली होती. घरची परिस्थिती बरी होती म्हणून स्पेशल रूम घेतली होती. काल रात्री नॉर्मल डिलिव्हरी झाली. बाळ बाळंतीण दोघेही व्यवस्थित होते. पहिलंच बाळ, त्त्यामुळे घरच्यांमधे आनंदी आनंद होता. "बाळ कुठे आहे?" अंजलीने विचारलं.

आईस क्रिम

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 10/04/2017 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या बालपणी " वाडीलाल..अमुल..वॉल्स"असे ब्रान्डेड आईसक्रिम नसायचे... सुट्या लागल्या कि पॉट भा्डयानी आणायचा..्बर्फ आणायचा...खडे मिठ..आणायचे.. घरचे दुध साखर..त्यात आंबे वा कलिंगड घालुन ते मिश्रण पॉट मधे घालायचे बाजुनी बर्फ ्मिठ घालुन पोराना बसवायचे फिर्वायला.... फिरवताना जड जायला लागले कि समजायचे आईस क्रिम तयार झाले... मग आतले भांडे अलगद बाहेर काढायचे..अन मस्त आईस क्रिम चापायचे.. आईस क्रिम फिरवत असताना ह्याच्या शर्टाच्या आत बर्फ टाक अश्या मज्या मस्करी चालायच्या .

नको तेवढे सत्य..... सत्यानाश !

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 10/04/2017 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी शिकविले होते, बोलावे नेहमी खरे मनात एक ओठात दुसरे, हे वागणे नाही बरे ..... आता वाटते, असे सांगणे होते कां खरेच चांगले? मनातले खरे ऐकून झालेय कधी कोणाचे भले? ..... कालच असे झाले, नवीन साडी होती नेसली पदर आखूड वाटला, सैलसर वेढे होते खाली ..... कंटाळा आला ठीक करायचा, म्हटले ह्याना विचारू अहो, चांगली दिसतेय, की पुन्हा नेसून सुधारू? .... हे तरी अस्से नां, एरवी पुस्तकात डोके खुपसून आज मात्र नेमके ह्यांनी पाहिले नीट लक्ष देऊन .... “शी शी अग काय हे कशी नेसलीय भोंगळ म्हणतील तुला मैत्रिणी किती ही अजागळ .... तुझी ती सरिता बघ, कशी साडी नेसते चोपून बघणारे सुद्धा बघतात सारखे सारखे मागे
काव्यरस

भाजलेल्या कैरीचे रायते

लेखक अनन्न्या यांनी सोमवार, 10/04/2017 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
बय्राच दिवसांनी मिपावर लिहायला जमतेय. घेऊन आलेय आंबा सिझन स्पेशल रेसिपी!! साहित्यः २/३ कच्चे रायवळ आंबे (ही आंब्याची जात विशेषतः कोकणात दिसते. त्या ऐवजी कोणत्याही कैय्रा घ्या.), ३ चमचे तेल, मीठ, गूळ, अर्धा चमचा मोहोरी, पाव चमचा हिंग, २ चमचे लाल तिखट raita कृती: कैय्रा धुवा, पुसून कोरड्या करा. निखाय्रात किंवा मध्यम आचेवर कैय्रा भाजून घ्या. गार होऊ द्या. साल सोलून गर काढून घ्या.

नवीन इयर फोन बाबत सल्ला हवा आहे...

लेखक झिंगाट यांनी सोमवार, 10/04/2017 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
मला माझ्या MI 3S फोन साठी इयर फोन घ्यायचा आहे. माझ्या गरजा ---- १)ट्रेन च्या गर्दीत वापरण्यासारख्या मजबूत असावे. २)MIC हवाच. ३)आवाज चांगला आणि LOUD असावा. एखादा ₹400-600 मध्ये चांगला इयर फोन सुचवावा.

जिममधल्या गमती, किस्से

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 09/04/2017 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
जिम म्हटलं की तिथे गेलं, व्यायाम केला, परत आलं असं सर्वसाधारणपणे होतं. पण म्हणजे; प्रत्येकाचं नाही. किंवा अगदी प्रयत्न केला तरी तिथे काही किस्से असे घडतात की ते कायम लक्षात राहतात. जेंव्हापासून व्यायाम करायला, किंबहुना जिमला जायला सुरुवात केली तेंव्हापासून आजवर घडलेले निवडक काही किस्से सांगावेसे वाटतात. तसं व्यायामाबद्दल बोलायला #मिपाफिटनेस धागा आहेच; इथे जरा अवांतर. ठाण्यात पूर्वी एक गोल्ड जिम नावाचं जिम होतं. तळवळकर्स त्या वेळी बरंच लोकप्रिय झालं होतं. आणि गोल्ड हे नवं आणि ठाण्यातलं दुसरं 'जिम' होतं.

दाही दिशांस जेंव्हा...

लेखक सत्यजित... यांनी रविवार, 09/04/2017 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
दाही दिशांस जेंव्हा,अंधार दाटला होता भरपूर,काजव्यांचा आधार वाटला होता! पृथ्वी कधीतरी तर थांबेल वाटले होते माझ्यासवे दिशांनी संसार थाटला होता! ही कंपने अशी का गाण्यात सुरमयी आली? हुंकार वेदनांचा कंठात दाटला होता! अमृत म्हणून प्यालो एकेक दवाचा बिंदू मग्रूर पावसाचा मग ऊर फाटला होता! लाटेवरुन एका नुकताच स्वार झालो अन् एका क्षणात अवघा दर्याच आटला होता! मिळवून दाद गेले,सत्कार जाहले त्यांचे माझाच शेर ज्यांनी तूर्तास लाटला होता! मज मायना जरा हा,उशिराच उमगला होता पत्रामधून माझा पत्ताच काटला होता! —सत्यजित
काव्यरस

न्यूरेम्बर्ग - भाग २

लेखक अफगाण जलेबी यांनी रविवार, 09/04/2017 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
न्यूरेम्बर्ग - भाग १ न्यूरेम्बर्ग - भाग २ खटला सुरु होण्याआधी काही गोष्टींचं स्पष्टीकरण अत्यंत आवश्यक होतं. मुख्य मुद्दा म्हणजे हा खटला चालणार कुठे? याचं सगळं कामकाज कसं होणार? कैद्यांना – ज्यांच्यातले काहीजण साक्षीदारही असणार होते – ठेवायचं कुठे? त्यांचं संरक्षण कसं करायचं? ज्या कोर्टरूममध्ये हा खटला चालणार होता ती कशी असेल? या सर्व कामकाजाची नोंद कशी ठेवायची?