Skip to main content

देव्हारा...२

लेखक विनिता००२ यांनी शनिवार, 08/04/2017 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
देव्हारा...२ "म्हणजे! हुशार, सुंदर, बोलकी. पण तू एकटीच! त्या आदेश आणि अभिजितला नको हं!" तो बजावत म्हणाला. "का?" तिने आश्चर्याने विचारले. "हे बघ, आमचा ग्रुप खुप शिस्तप्रिय आणि अभ्यासू आहे." तो फुशारकी मारत उत्तरला. त्याच्यापासून पिच्छा सोडवावा म्हणून तनूने वह्या आवरल्या आणि ती लायब्ररीबाहेर आली. संदिप पण तिच्या पाठोपाठ बाहेर आला. ती काही बोलली नाही याचा अर्थ त्याने होकारार्थी घेतला.>>>> "आता तूच बघ ना, आदेश ठिक आहे. पण तो आहे त्या अभिजितचा जानी दोस्त! आणि अभिजित म्हणजे... श्रीमंत बापाचा लाडावलेला कार्टा! काहीतरी ताळतंत्र आहे का त्याला?

रक्तरंग

लेखक संदीप-लेले यांनी शनिवार, 08/04/2017 01:56 या दिवशी प्रकाशित केले.
पुनः एक दंगल झाली, रक्त खुप वाहिले भगवे, हिरवे, निळे सारे रंग त्याचे पाहिले सीमेवरचे युद्ध आठवे, रक्त ज्यात सांडले रंग नव्हता त्याला, आश्र्चर्य याचे वाटले शहीदरंगी कफन, ज्यांच्या शवांवर टाकले रंग रक्ताचे त्यांच्या, त्या कफनांवर माखले दंगलीच्या रंगांचे कफन शहिदांना घातले तिरंग्यावरील पांढ-याचे मर्म काही उमगले
काव्यरस

अनवट किल्ले २: शिलाहारकालीन अशेरीगड

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 07/04/2017 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात आपण गंभीरगडाची सफर केली. संध्याकाळी गंभीरगड उतरुन कासा उधवा रस्त्यावर उभे राहिलो. या रस्त्यावर वाहतुक आहे कि नाही याची मला शंकाच होती. व्याहळीपाड्याचे रुप बघुन तिथे मुक्काम करणे शक्यच नव्ह्ते. जानेवारी महिना असल्याने काळोख लवकर पडला, आम्ही उभे असलेल्या जागेमागे स्मशानाची शेड होती. मला भीती वाटत होती कि एकून आमचा अवतार बघून एखाद्या वाहनचालाकाला आम्ही भुते वाटुन अ‍ॅटॅक वगैरे येतोय कि काय ? पण तसे काहीही न होता, एक जीप थाबंली, पण ती बापगाव पर्यंतच जाणार होती.

शेजाऱ्याचा डामाडुमा - नेपाळमध्ये राणा शासनाचे शतक - नेपाळ भाग ८

लेखक अनिंद्य यांनी शुक्रवार, 07/04/2017 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
शेजाऱ्याचा डामाडुमा - नेपाळमध्ये राणा शासनाचे शतक - नेपाळ भाग ८ श्री तीन राणाज्यूं को सरकार स्थिरस्थावर झाल्यानंतर नेपाळच्या सामान्यजनांचा बाहेरील जगाशी कमीत कमी संपर्क येईल याची काळजी घेण्यात आली - अपवाद नेपाळी उमराव आणि गोरखा सैन्याचा. सगळ्या नेपाळी सरदार-भारदारांच्या व्यक्तिगत सैन्य तुकड्यांना एका छत्राखाली आणून राणांनी आधी गोरखा सैन्यावर पूर्ण ताबा मिळवला. म्हणून खऱ्या अर्थाने एकजिनसी 'रॉयल नेपाल आर्मी' स्थापण्याचे श्रेय राणा शासकांचे. सुगौलीच्या तहानंतर (वाचा- नेपाळ भाग ५) काठमांडूच्या दरबारात ब्रिटिश प्रतिनिधीची नियुक्ती घडून आली होती.

डाव - ३ [खो कथा]

लेखक दीपक११७७ यांनी शुक्रवार, 07/04/2017 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
डाव - १ [ खो-कथा-दुसरी] डाव - २ [खो कथा] डाव - ३ [खो कथा] ----------------------------------- सखाराम: रात्री झोपेत अचानक माझ्या डोसक्यात ईचारचक्र सुरु झालं, आता समद स्पष्ट झालया, विकी रुपाच्या मागे, उस्ताद रुपाच्या मागे... आयला हा प्रेमाचा खो खो लई डेंजर. मागं असेच एक दोघाचे मुडदे पडले व्हते बाजुच्या गावात, असल्या प्रेमप्रकरणापाई. मला नगं बाबा हे लफडं..वस्ताद १० वी नापास, मारामारीे त्याच्या घरात रोजच हाय. त्याचा बाप आताच जेलमधून सुटुन आलाय.

देव्हारा...१

लेखक विनिता००२ यांनी शुक्रवार, 07/04/2017 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
देव्हारा...१ तनूने प्रोफेसरांची नजर चुकवून हळूच हातातल्या घडयाळाकडे बघितले. लेक्चर संपायला अजून पंधरा मिनीट अवकाश होता. तिने दाराकडे पाहिले. अभिजीत बाहेर पण आलेला नव्हता. बळजबरी ती लेक्चरमधे मन गुंतवू लागली. मागच्या बेंचवर बसलेल्या आदेशला तिचा अस्वस्थपणा लगेच लक्षात आला. अभिजित आज पण उशीरा येणार हे त्याला माहित होते. तो मनापासून हसला. अभिजीत, तनिष्का,आणि आदेश या तिघांची घट्ट मैत्री होती. तिघेही मॅनेजमेंटचे विद्यार्थी! आदेश आणि तनिष्का मध्यमवर्गीय परिवारातील तर अभिजीत गर्भश्रीमंत बापाचा मुलगा! त्याची सर्व तर्‍हाच न्यारी होती.

तुझ्यात जीव रंगला

लेखक परशु सोंडगे यांनी शुक्रवार, 07/04/2017 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा *************** कुणात जीव रंगला ? ***** परवा आमच्या शहरातल्या मोठया कपडयाचा दुकानात जाण्याचा योग आला.असा योग नेहमीचं येतो. सौ.चा हट्टच होता.मेहूणी आली होती. आम्ही त्या अलीशान, भव्य दुकानात शिरलो.ते पण कसबसं... यात नेहमीचं प्रचंड गर्दी असते. दुकानातल्या गर्दीला एक प्रकारची शिस्त असते.या दुकानात तसं काही नाही नसतं.तो एक बाजारचं असतो. नुसता गर्दा... कसं उभा राहयचं . लेडीज विभात गेलोत. त्यात पुन्हा वयानुसार, फॅशननुसार विभाग ... दवाखान्यात जसे सुपरस्पॅशालिटी डाॅक्टर असतात अगदी तसंच इथं ही होतं . सारं सारं स्पशेलचं. दुकानात पोहचल्या नंतर माझं काम संपलं होतं.

हे फक्त माणसातच !

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 07/04/2017 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री मासे आणणाऱ्या एकाकी माणसाला बोकेमांजरे चहुबाजूने घेरतात. माणूस पळू लागला कि, त्याच्यावर झेप घेऊन त्याला बोचकारतात. त्याच्या हातातील मासे क्षणार्धात लंपास होतात. मासे मिळताच बोकेमांजरे माणसाला तिथेच सोडून देतात. हे सगळे किती विश्वासाहार्य, predictable आहे! मासे मिळाल्यावर, मासे तर फस्त करायचेच पण माणसाची आतडी बाहेर येईपर्यंत त्याला ओरबाडत, बोचकारत रहायचे, मग, रात्रीच्या भयाण शांततेत फिस्कारत हिंडायचे ....... हे मात्र फक्त माणसातच ! - शिवकन्या.

कविता

लेखक संदीप-लेले यांनी शुक्रवार, 07/04/2017 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज वाटते एक कविता अशी जन्मावी हाताने तर नव्हेच आणि ती मी न लिहावी तू नुकतीच नाहलेली अन ओलेती असावी केस मोकळे, दवबिंदूंनी पापणी मिटावी ऊन कोवळे लेऊन कांती तुझी चमकावी आज वाटते ... अशी पाहुनी तुला, मला अस्फूट स्फुरावी जवळ येउनी तू माझ्या नयनी वाचावी ह्या हृदयीची त्या हृदयी होऊन जावी आज वाटते ... मिठीत माझ्या दिठी तुझी ती अलगद यावी गात्रांमधली थरथर होऊन तू प्रसवावी ओठ टेकता तुझ्याच ओठांतून उमटावी आज वाटते एक कविता अशी जन्मावी हाताने तर नव्हेच आणि ती मी न लिहावी