Skip to main content

स्पेशल महापुरूष

लेखक परशु सोंडगे यांनी मंगळवार, 04/04/2017 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
आता आता कुठं तुम्ही वाटून घेतले खुशाल महापुरूष एका एका जातीचा एक एक स्पशेल महापुरूष मग अपोआपचं वाटले गेली रंग, तळी, डोंगर नदया ,गाव नि गल्ल्या बोळी,मोहल्ले कॅलेडरवरल्या तारखासुध्दा सोडल्या नाहीत.जातीच्या चिकट लगदाळीने जो तो विणत गेला आपल्याच जातीचं कोष गुरफटत गेला त्या चिकाट लाळेत माणूसजाती जातीच्या कशाल्याशा गर्वानं फुगून फुटू लागली सा-यांचीचं छाताडं.
काव्यरस

हळव्या खुणा

लेखक चांदणशेला यांनी मंगळवार, 04/04/2017 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
डोळ्यांत क्षितिजाच्या व्याकूळ होता जीव पाऊली अश्रूंच्या होता घायाळ भाव गात्रात दु़़खाने केला होता निवारा थरथर प्राणांची पाहत कापत होता वारा कातर सुराने निशब्द झाल्या होत्या संवेदना पंखात पापण्यांच्या होत्या हळव्या खुुणा अशा संध्येकाठी एकांत होता बुडाला तू जाताना सायंतारा तमांत होता निजला
काव्यरस

नवीन उपक्रम : कथुकल्या

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी सोमवार, 03/04/2017 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिभेचा महानायक श्री विनायकाला त्रिवार वंदन करून नवीन उपक्रमाला सुरुवात करत आहे. कथा म्हटलं की दोन प्रकार आपल्यासमोर येतात – लघुकथा आणि दीर्घकथा. साधारणतः हजार शब्दांच्या वरील कथेला लघुकथा असं म्हटलं जातं. त्यापेक्षा छोट्या कथा आजकाल अधूनमधून लिहल्या जाऊ लागल्या आहेत. ह्या कथा पटकन वाचून होतात, लिहायला कठीण असतात आणि वाचकांना विचार करायला भाग पाडतात. मिपावर सूक्ष्मकथा, शशक लिहल्या गेल्या आहेत, जात आहेत. यावर्षीच्या शशक स्पर्धेदरम्यान बऱ्याचजणांचं असं म्हणणं होतं की अशा छोट्या कथा नियमितपणे लिहल्या जायला हव्या. वाचकाच्या इच्छेला मान देऊन मी हे आव्हान स्विकारत आहे.

" ळ " च्या करामती

लेखक ऋतु हिरवा यांनी सोमवार, 03/04/2017 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
"ळ" हे अक्षर जास्तीत जास्त वापरुन मी काही रचना केल्या आहेत. छंदबद्ध किंवा चारोळी प्रकारचे हे लेखन आहे. म्हणून 'जे न देखे रवी ..' हे व्यासपीठ मी निवडले आहे. या रचना तुम्हाला कशा वाटतात बघा. सूचनांचे स्वागत आहे. "ळ" चे यमक जुळावे असा प्रयत्न केलेला नाही. १) आजोबांची कवळी अळिमिळी गुपचळी, नातू येता जवळी आजोबांची खुलली कळी २) कसलं खूळ , कोवळं मूल डावा डोळा , लोण्याचा गोळा बावळा बोका, मटकावी सगळा मुलाच्या डोळा , पाणी गोळा ३) पिवळे पातळ, निळे काठ गळा माळ पोवळ्याची | पाठी रुळे नागीण काळी माळी वळेसर बकुळीची | बाळी शोभे आगळी पाळी सजली कुड्यांनी |( पाळी ..

(#मिपालेझीनेस - मी आज केलेला आराम - एप्रिल २०१७)

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 03/04/2017 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. "मी आज केलेला आराम " या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे , इतका प्रतिसाद मिळत आहे की लोकं आरामात डुंबुन गेल्याने गेले तीन महीने धागा काढायलाही विसरलीत !! आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन आराम सुरू केला आहे. आराम सुरू केलेल्या आणि आरामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. हां तर तसेही नवीन फायनान्शीयल ईयर सुरु झाल्यावर आम्हाला कामाचा लोड नसतो . ऑफीसात येऊन मस्टर क्लिक करणे अन जुने पुराणे काही उरले सुरले बग क्लीयर करणे इतकेच काय ते काम !

दोघी ( कथा ) ( काल्पनीक )

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 03/04/2017 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
दोघी ( कथा ) ( काल्पनीक ) चिनु आज खुप खुशीत होती . बरेच दिवसांनंतर ती आपल्या आईबरोबर समुद्र किनारी फिरायला आली होती . संध्याकाळच्या गार हवेत समोरुन येणा-या लाटांचे थेंब अंगावर झेलण्यात दोघींनाही मजा येत होती . समुद्र किनारी फारशी गर्दी नव्हती . त्यामुळे मधेच लहर आली म्हणुन चिनु एखाद्या स्वच्छंद हरणासारखी काठावरच्या वाळुत इकडुन तिकडे धावु लागली . तिच्या मागे पळताना , तिला आवरताना आईची मात्र दमछाक होउ लागली . "चिनु ...थांब .. किती पळतेस?.. जरा हळु... पडशील कुठे तरी .. " आई काळजीने म्हणाली . तेव्हा कुठे चिनु थांबली .

तमाशा

लेखक ज्ञानदेव पोळ यांनी सोमवार, 03/04/2017 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
चैत्र निघाला की गावागावात यात्रांचा हंगाम सुरू व्हायचा. खेड्यातील या यात्रांमध्ये तमाशा हेच मुख्य आकर्षण. संगीतबारीचा आणि ढोलकीफडाच्या तमाशांचे फड गावोगावी दिवस रात्र रंगू लागायचे. तमाशा खेड्याची लोककला, परंपरा आणि संस्कृती. पठ्ठे बापूराव, विठाबाई भाऊ नारायणगावकर, मालती इनामदार, काळू-बाळू, रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर, मंगला बनसोडे, दत्ता महाडिक, माया तासगावकर अशी अनेक मंडळी या लोककलेचे शिलेदार. तर काही वारसदार.

लॉजिक म्हणजे काय?

लेखक arunjoshi123 यांनी सोमवार, 03/04/2017 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
लॉजिकला आपण मराठीत तर्क म्हणतो. एखादे विधान वा वागणे वा कृत्य हे लॉजिकल म्हणजे तार्किक किंवा इल्लॉजिकल म्हणजे अतार्किक असते. तार्किक वागणे, विधान मनात, समाजात, कोठेही, अगदी वैज्ञानिक वर्तुळांत स्वीकार्य असते (अपवाद - मात्राशास्त्र). अतार्किक वागण्याची विधानांची खिल्ली उडवली जाते, त्यांना स्वीकारले जात नाही. इथेही भावनात्मक वा ज्याला आपण सेंटीमेंटल म्हणतो अशा वर्तनांचा अपवाद असतो. पण शेवटी लॉजिक म्हणजे काय? सर्वच तत्त्वज्ञानांची, म्हणजे अगदी विज्ञान धरून सर्वच तत्त्वज्ञानांची एक गोची आहे कि त्यांना कोणतेही सत्य केवल संदर्भात (अबसॉल्यूट काँटेक्स्टमधे) सिद्ध करता येत नाही.

डाव - १ [ खो-कथा-दुसरी]

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 03/04/2017 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी, आम्ही दुसरी खो कथा आपल्यासमोर घेऊन येत आहोत. पहिल्या कथेला दिलेल्या ऊत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तसेच पहिल्या कथेला काही दिग्गजांनी दिलेले सल्ले अमलात आणण्याच्या यावेळी प्रयत्न करणार आहोत. यावेळी प्रत्येक लेखक आपापले वेगळे पात्र घेऊन कथा पुढे सरकवत राहील. पहिली कथा अद्भुतिका होती. यावेळी ती रहस्यकथा असेल. आम्ही आठजण मिळून कथा लिहीणार असलो तरी यावेळी नवीन लेखकांना पुढचे भाग लिहिण्यासाठी आमंत्रित करणार आहोत.

एक विनोदी अनुभव

लेखक उपेक्षित यांनी रविवार, 02/04/2017 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर गेले बरेच दिवस डोक्यात विचार येत होता कि देवाचे अस्तित्व खरच आहे ? खरच या जगात देव हि संकल्पना आहे? म्हणायला गेलो तर मी थोडा डाव्या विचारांकडे झुकलेलो आहे पण अजूनही मला मी निट समजलो नाहीये. घाबरू नका मंडळी गेल्या काही दिवसात बर्याच गल्लाभरू चित्रपटात हा विषय अगदी सोयीस्कर रीतीने हाताळून त्याची पद्धतशीरपणे वाट लावण्यात आली आहे. सो मी तुमचे बौद्धिक घेऊन तुम्हाला अजून पकवणार नाहीये. खरे तर मी माझ्याच वागण्याचे आकलन करायचा प्रयत्न करतोय बघा. तर झाले असे कि माझी आई काही धार्मिक संस्थांशी जोडली गेली आहे साहजिकच आहे तिला यात रसही आहे आणि आपल्याच वयाच्या मैत्रिणींशी थोडी हितगुज हि होते.