Skip to main content

[खो कथा] पोस्ट क्र. ८ (अंतिम)

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 30/03/2017 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी त्या मितीकरीला हलवून हलवून उठवलं. "अहो मितीकरी, उठा. इथे कसे पोचलो आपण ? मला प्लिज सगळं स्पष्ट सांगाल का?" आम्ही एका स्तूपाजवळ होतो . "हं" आळोखे पिळोखे देत तो उठला . आजूबाजूचा अंदाज घेत म्हणाला," सांगतो, तू माझा जीव वाचवलायस त्यामुळे तेवढं तरी माझं कर्तव्य बनतं. पण आधी तू सांग तू यात कसा अडकलास?" "अहो ते सरबत प्यायल्यावर आपण एकत्रच आलो ना इथं? " "अरे इथं नाही या सगळ्या प्रकरणात तू कसा अडकलास ?" "अच्छा, ते होय. त्याचं काय झालं, शशिकांत माझा जिगरी दोस्त. व्यवसायानं गणितज्ञ.

ट्रम्प तात्या निघाले प्रचाराला....

लेखक ज्ञानदेव पोळ यांनी गुरुवार, 30/03/2017 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
हाईट हाऊसच्या दारावर पोस्टमनने बेल वाजवली तसं मेलानिया ट्रम्प बाईनी भाकरी थापता थापता कडी काढून दार उघडलं. पोस्टमन कडून घेतलेलं पत्र चुलीपुढं बनियन लुंगी लावून गरम भाकरी अन पिटलं खात बसलेल्या डोनाल्ड तात्यांच्या हातात दिलं. डोळे मिचमिच करीत आणि तोंडातला भाकरीचा घास गिळत गिळत ट्रम्प तात्यानी एका दमात ते वाचून काढलं. “काय वं काय लिवलय! जरा मोठ्यानं वाचून दाखवा की?” मेलानिया बाईनी परातीत थापलेली भाकरी तव्यात टाकत प्रश्न केला. “मुंबई मधून पत्र आलय! निवडणुकीच्या प्रचाराला या म्हणून!” ताटात हात धुवून लुंगीला हात पुसत पुसत ट्रम्प तात्या बायकोकडं बघून म्हणाले.

मृगजळ...

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 30/03/2017 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
अख्खा दिवस सरतो रणरणत्या उन्हात. सरत्या संध्याकाळी होणाऱ्या भेटीची वाट बघण्यात. उन्हं कलतात, साजरा संधिप्रकाश पसरतो आभाळभर. ठरल्या ठिकाणी जमू लागतात एक-एक करत सगळेच. जीवाभावाची मित्रमंडळी एकत्र आली की छान निवांत गप्पा होतात, खाणं-पिणं होतं, आठवणी जागवल्या जातात आणि कोणाच्यातरी तोंडून अभावितपणे मनातली भावना शायरीवाटे व्यक्त होते. त्याला प्रतिसाद म्हणून साजेशा ओळी समोरून येतात आणि मग रंगत जाते रात्र... मैत्रीची, आठवणींची, प्रेमाची, शायरीची... जब रूह में उतर जाता है बेपनाह इश्क का समंदर लोग जिंदा तो होते हैं, मगर किसी और के अंदर दौलत नहीं, शोहरत नहीं, न वाह चाहिये कैसे हो..?

निशीगंधाचे उखाणे

लेखक परशु सोंडगे यांनी गुरुवार, 30/03/2017 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
रात शांत शांत कशी वारा अबोल जरासा. पेटला धूंदीत गारवा चाहूलीत तू चंद्र जसा. निशीगंधाचे हे उखाणे. अंगी शहारांची रे टिंबे. सांगू नको तू कुणाला प्राणात गोंदले प्रतिबिंबे. परशुराम सोंडगे,पाटोदा 9673400928
काव्यरस

अंजलीची गोष्ट - आनंदयात्री

लेखक aanandinee यांनी गुरुवार, 30/03/2017 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
"हाय" त्या ओळखीच्या आवाजाने चमकून तिने दरवाज्याकडे पाहिलं. अपूर्वाला पाहून ती चकितच झाली. "अपूर्वा, तू इथे? सगळं ठीक आहे ना?" तिने काळजीने विचारलं. "खरं म्हणजे ठीक नाहीये. ठीक असताना कोणी डॉक्टरकडे कशाला येईल?" अपूर्वाने हसत हसत म्हटलं. "ते ही खरंच. अगं पण घरी यायचस, बोल काय म्हणतेस?" अंजलीने विचारलं.  "आमची न्यूज तुझ्या कानावर आली की नाही?"क्षणभर विचार करून अंजली म्हणाली, "हो, आई म्हणाली की तुझं आणि तुषारचं पटत नाहीये म्हणून"  "हो त्याचबद्दल बोलायचं होतं" अपूर्वाने समोरचा पाण्याचा ग्लास उचलला, एक घोट पाणी पिऊन मग तिने सांगायला सुरुवात केली, "आमच्या लग्नाला आता नऊ वर्ष झाली.

?? नाव सुचले नाही ??

लेखक इना यांनी गुरुवार, 30/03/2017 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
काळरात्र सरताना उमलते पहाट अनवाणी किती युगांच्या वेदनांची गातात श्वास गाणी सोडले मी जिथे स्वतःला दूर तो गाव आहे प्रवास कसला? आता नुसती फरफट आहे कोण इथे जन्मास आला घेऊन खरा चेहरा? नितीमत्ता मिरवीत आहे मुखवटयांचा आसरा मोहाच्या झाडाखालीच असते सदैव येणेजाणे चार पावसाळे पाहिल्यांचे आहे अनोळखी वागणे शून्य शब्दात व्यक्त होणे आजची निकड आहे बोलक्या लोकांना आता 'समजून' घेणे आहे!

अँबी वॅली - बियाँड दि हेवन !

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 30/03/2017 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
अँबी वॅली हा काय माहौल आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न इतकाच या लेखनाचा उद्देश आहे. माझ्या असिस्टंटनं आमच्यासाठी ही काँप्लिमेंटरी पिकनिक अरेंज केली होती. तिचा पती तिथे डिरेक्टर आहे आणि त्यानं डे-वन पासून अँबी वॅलीची संपूर्ण निर्मिती गेल्या तेवीस वर्षात केलीये. तिथे वी वेअर ट्रिटेड अ‍ॅज इनवेस्टर्स पण अदरवाइज ते एकूण प्रकरण आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे सुब्रता रॉय, सहारा कंपनी, सुप्रीम कोर्ट केस, पिकनिक अफोर्डेबिलीटी हे विषय बाजूला ठेवलेत तर पोस्टचा आनंद नक्की घेता येईल.

वायाच एमबी चालली

लेखक फुंटी यांनी बुधवार, 29/03/2017 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
दिसती अनेक हिरवे ठिपके तरी कुणी देईना रिप्लाय हायला वेदना नेमकी तीच जाणे फेसबुक राहिलो व्यर्थ मी लॉगिन चालली वायाच एमबी चालली